✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 16/08/2018 वार - गुरूवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९८७ - नॉर्थवेस्ट एरलाइन्स फ्लाइट २५५ हे एम.डी. ८२ प्रकारचे विमान डेट्रोइट विमानतळावर कोसळले. १५५ ठार. चार वर्षांची बालिका वाचली. 💥 जन्म :- १९५७ - रणधीरसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १८८६ - श्री रामकृष्ण परमहंस, भारतीय तत्त्वज्ञानी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली - देशभरात 72 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा, लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण* --------------------------------------------------- 2⃣ *माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी व्हेंटिलेटरवर ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम्स रुग्णालयात जाऊन घेतली भेट* --------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली: डिसेंबरमध्ये लोकसभेची निवडणूक होत असल्यास त्याच वेळी चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक घेण्यास आम्ही सक्षम आहोत, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे* --------------------------------------------------- 4⃣ *नवी दिल्ली - वैयक्तिक कारणावरून आम आदमी पक्षाचे नेते आशुतोष राणा यांचा राजीनामा, केजरीवालांनी नाकाराला आशुतोष यांचा राजीनामा* --------------------------------------------------- 5⃣ *केरळ - हवामान खात्याकडून सावधानतेचा इशारा, मुसळधार पावसाचा वर्तवला अंदाज.* --------------------------------------------------- 6⃣ *मेरठ: शरियतच्या धर्तीवर हिंदू महासभेनं देशातील पहिल्या हिंदू न्यायालयाची केली स्थापना केली आहे. या न्यायालयात हिंदूंशी संबंधित खटल्यांवर निकाल देण्यात येतील, असं हिंदू महासभेकडून जाहीर करण्यात आलं आहे.* --------------------------------------------------- 7⃣ *भारताचा महान कर्णधार काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचं निधन, जसलोक रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 •••••••••••••••••••••••••••••••••••••••• =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *उद्याची काळजी आज कशाला* http://nasayeotikar.blogspot.com/2018/08/blog-post_8.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *श्रीशैल्यम् मल्लिकार्जुन* हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे. हैद्राबादपासून सुमारे २१० कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. पूर्व दिशेला नल्लमलाई डोंगर रांगात वसलेले हे (शिव) तीर्थक्षेत्र आहे. याची समुद्र सपाटीपासूनची उंची ४७६ मीटर आहे. येथील जंगल सदाहरित प्रकारचे आहे. तसेच येथे कृष्णा नदीच्या (पाताळगंगेच्या) काठावर जाण्यासाठी रज्जूमार्ग आहे. येथे श्रीशैलम् धरण असून भव्य जलविद्युत निर्मिमीती केंद्र आहे. कथा - येथे पूर्वी असलेल्या महाकाली मंदिरात नंदी तपस्या करत होता. या तपस्येत असलेल्या नंदीवर प्रसन्न होउन मल्लिकार्जुन आणि ब्रम्हरंभा रूपात शिव-पार्वती इथे प्रगट झाले. इतिहास - श्रीशैलमचा इतिहास सातवाहन काळापर्यंत सापडतो. चौदाव्या शतकातील प्रोलया वेमा रेड्डी या राजाचा कार्यकाळ हा श्रीशैलमचा सुवर्णकाळ मानला जातो. राजा प्रोलयाने पाताळगंगा (कृष्णा नदी) ते श्रीशैलम असा मार्ग बांधला. या नंतर अतिशय ताकदवान अशा विजयनगर साम्राज्यात मुख्य मंदिराचे आणि दक्षिण टोकाकडील गोपुरांचे दगडी बांधकाम करण्यात आले. पुढे पंधराव्या शतकात विजयनगर साम्राज्य नावारूपास आणणारे राजा कृष्णदेवराय यांनी राजगोपुर आणि सलुमंतापस व इतर भागाचे निर्माण कार्य केले. इ.स १६६७ मधे छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेच्या वेळी मंदिराच्या उत्तरेकडील गोपुराचे बांधकाम केले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= जे काही दिसतंय त्या सगळ्यावरच विश्वास ठेवायचा नसतो. मीठ सुद्धा साखरेसारखं दिसत असतं *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) 'रामाचा शेला' चे लेखक कोण ?* साने गुरुजी *२) कॉस्मिक किरणांचा शोध कुणी लावला ?* व्हिक्टर हेस *३) एका पदार्थातून दुसर्या पदार्थात सूर्यकरण जाताना त्याचा वक्रीभवन कोन मोजणारं उपकरण कोणतं ?* वर्णपटदर्शक *४) युरेनियम अणुकेंद्रावर शून्य कणांचा वर्षाव केला असता काय होतं ?* अणुकेंद्राचं विघटन *५) निरनिराळ्या शारीरिक व्याधींना कारक ठरणार्या अतिसूक्ष्म जंतूंना काय म्हणतात ?* विषाणू *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 निखील देवेंद्र खराबे, नागपूर 👤 नरेंद्र नाईक 👤 मिथुन बिजलीकर 👤 अशपाक सय्यद 👤 रमेश बारसमवार 👤 जी. के. प्रसाद 👤 सुभाष पालदेवार 👤 के. राम मोहन *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *झुला* प्रत्येकाच्या मनात एक आठवणींचा झुला असतो मनमोकळ झुलायला ज्याचा त्याला खुला असतो आठवणींच्या झुल्यावर प्रत्येकाला झुलता येत कटू आठवणी टाळून आनंदाने फुलता येत शरद ठाकर सेलू जि परभणी =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *जन्माला येणारा नवजीव या सृष्टीतील पहिला अनुभव घेतो तो 'मातृस्पर्शाचा.' या स्पर्शातून दृढ होत जातं नातं एकमेकातलं आणि जोपासली जाते मातृत्वाची जाणीव... आजन्म कृतज्ञतेने..! पुढे त्याला वेगवेगळ्या स्पर्शांची ओळख होत जाते. विविधांगी स्पर्श देत जातात उभारी त्याच्या जीवनाला. कधी बंध गुंफला जातो माणसा माणसांशी ! जोडला जातो तो नवचैतन्यानं पशु-पक्षी, झाडं-फुलं या नैसर्गिक तत्वांशी ! वात्सल्याचे स्पर्श आजही मोरपीस फिरवतात मनावर, बाळाच्या जावळांचे स्पर्श आजन्म पिच्छा पुरवतात.. लक्षात राहतात असे स्पर्श..!* *पण काही डंख मारणारे, नकोसे असलेले रस्त्यांवरचे स्पर्श थरकाप उडवतात. कधी कधी स्पर्श होतात विचारांचे, स्वातंत्र्याचे, अभासी जगातून वास्तवतेचा स्पर्श देणारे. देऊन जातात भान कळत-नकळत मानवतेचे..! खुणावतात स्पर्श अवकाशात उंच भरारी घेण्याचे. असे स्पर्श हवेच असतात प्रत्येकाला... कुठल्याही गंधानं लिप्त नसणारे, फक्त अनुभूतीनं गोडी वाढवणारे नि संजीवनी ठरणारे...मानवी स्पर्श !!* ••●🔰‼ *रामकृष्णहरी* ‼🔰●•• 🌷🌷🌷🌷🌷🌷 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= तुम्हाला यशाच्या दिशेने जायचे असेल तर पहिल्यांदा अपयश पचवावे लागेल आणि त्याची कारणेही शोधावी लागतील. असे असेल तर यश तुम्हाला सहज प्राप्त करता येऊ शकेल. अपयशानंतर मिळालेले यश तुमच्या जीवनाची उत्कर्षाकडे जाणारी वाट असेल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उत्कर्ष - Flourish* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *🐍नागरुपी भाऊ* पाच युगांपूर्वी सत्येश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला. दुसर्या दिवशी सत्येश्वरीला नागराज दिसला नाही. तेव्हा ती रानात सैरावैरा भटकू लागली आणि शोधता शोधता झाडांच्या फांद्यांवर चढून पाहू लागली. त्यानंतर नागराजाने तिला दृश्य स्वरूपात समोर येऊन सत्येश्वराचे रूप प्रकट केले. तेव्हा तीचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि ती आनंदाने झाडांच्या फांद्यांवर उंच उंच झोके घेऊ लागली. त्यामुळे स्त्रिया त्या दिवशी झोका खेळतात. झोका खेळण्यामागील उद्देश असतो – *जसा झोका वर जातो, तसा भाऊ प्रगतीच्या शिखरावर जाऊ दे आणि झोका खाली येतो, तशा भावाच्या आयुष्यात आलेल्या सर्व अडचणी आणि दुःखे खाली जाऊ देत.बहीण भावाची माया ह्या कथेतुन स्पष्ट होते.* *महत्त्व* वरील भाव ठेवून जेव्हा बहीण प्रत्येक विचार आणि कृती करते, तेव्हा भावाची ५ टक्के आध्यात्मिक आणि ३० टक्के व्यावहारिक उन्नती होते. ‘श्रावणमासातील नागपंचमीच्या दिवशी स्त्रियांनी झोका खेळणे, म्हणजे आनंद अनुभवणे होय. स्त्री झोका खेळतांना तिच्या दिशेने ईश्वरी आनंदाचा प्रवाह आकृष्ट होते *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment