✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 24/08/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *संत बहिणाबाई चौधरी यांची 139 वी जयंती* * 💥 ठळक घडामोडी :- १९९१ - युक्रेनला सोवियेत संघापासून स्वातंत्र्य. १९९२ - चीन व दक्षिण कोरियाने राजनैतिक संबंध पुनःप्रस्थापित केले. १९९२ - हरिकेन अँड्रु हे कॅटेगरी ५चे वादळ फ्लोरिडाच्या किनार्यावर आले. १९९५ - मायक्रोसॉफ्टने विन्डोज ९५ ही संगणकप्रणाली प्रकाशित केली. २००६ - आंतरराष्ट्रीय खगोल संघाने प्लुटो हा ग्रह नसल्याचे ठरवले 💥 जन्म :- १८३३ - नर्मदाशंकर दवे, गुजराती साहित्यिक व समाजसुधारक १८७२ - न. चिं. केळकर (नरसिंह चिंतामण केळकर), मराठी साहित्यिक; 'मराठा', केसरी वृत्तपत्रांचे संपादक. १९०८ - हुतात्मा शिवराम हरी राजगुरु, भारतीय क्रांतिकारक. 💥 मृत्यू :- १९२५ - डॉ. रा. गो. भांडारकर (रामकृष्ण गोपाळ भांडारकर), प्राच्यविद्या संशोधक, शिक्षणतज्ज्ञ १९९३ - प्रा. दि. ब. देवधर, भारतीय क्रिकेट खेळाडू *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *पाटणा- लालजी टंडन यांनी स्वीकारला बिहारच्या राज्यपालपदाचा पदभार* --------------------------------------------------- 2⃣ *पुणे - 12 वीच्या पुरवणी परीक्षेचा आज दुपारी 1 वाजता ऑनलाइन निकाल* --------------------------------------------------- 3⃣ *जालना - शहरातील मोंढा मार्केटमध्ये नगरपालिकेच्या कारवाईत ५ लाख रुपयाचे तीन टन प्लास्टिक जप्त* --------------------------------------------------- 4⃣ *सोलापूर - श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची केरळसाठी २५ लाखांची मदत, पूरग्रस्तांसाठी पंढरपूरचा पांडुरंग पावला* --------------------------------------------------- 5⃣ *मुंबई - एसटी महामंडळाकडून केरळ पूरग्रस्तांसाठी 10 कोटींचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द* --------------------------------------------------- 6⃣ *ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचे निधन, नवी दिल्लीमध्ये त्यांच्या पार्थिवावर झाले अंत्यसंस्कार.* --------------------------------------------------- 7⃣ *आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली अव्वल स्थानी* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *कथा - कानमंत्र* http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_67.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *रामेश्वरम* रामेश्वरम हे भारताच्या तमिळनाडू राज्याच्या रामनाथपुरम जिल्ह्यामधील एक लहान शहर आहे. रामेश्वरम शहर तमिळनाडूच्या आग्नेय भागात मन्नारच्या आखातामध्ये स्थित असलेल्या रामेश्वरम द्वीपावर वसले आहे. रामेश्वरम श्रीलंकेच्या मन्नार द्वीपासून ५० किमी अंतरावर आहे. रामेश्वरममध्ये १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले रामनाथस्वामी मंदिर स्थित आहे. ह्यामुळे रामेश्वरम हिंदू धर्मामधील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक मानले जाते. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= नियम अगदी थोडा असावा, पण तो प्राणपलीकडे जपावा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) व्हॉलीबॉलच्या मैदानाची लांबीरुंदी किती असते?* 👉 १८× ९ मीटर *२) खो-खो च्या मैदानाची लांबी रुंदी किती असते?* 👉 २७× १६ मीटर *३) फूटबॉलच्या मैदानाची लांबी रुंदी किती असते?* 👉 १२०×९० मीटर *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 श्रीकांत भुजबळ, तहसीलदार 👤 श्याम ठाणेदार, पुणे 👤 सुनीलकुमार बावस्कर 👤 गोपाळ ऐनवाले, धर्माबाद 👤 संजय पाटील 👤 हणमंत बोलचेटवार, धर्माबाद 👤 ऋषिकेश शिंदे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *अपेक्षा* मोठ्यांच्या सावलीत छोटं वाढत नाही मोठ्याने वाढवले असे कुठे घडत नाही मोठयांची अपेक्षा मोठी मोठी असते मोठा वाढवली ही अपेक्षा खोटी असते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 03* *जो तू चाहे मुक्ति को* *छोड़ दे सबकी आस |* *मुक्त ही जैसा हो रहे* *सब कुछ तेरे पास ||* अर्थ : माणसाला जर या मायावी जगात मुक्त जीवन जगायचे असेल तर मोहविणार्या बाबींचा मोह धरून चालणार नाही. त्या बाबींबद्दलची आसक्ती सोडावीच लागेल. गरजेपुरत्या वस्तूंचा संचय करायला शिकले पाहिजे. उगाच संचय वाढवला तर त्या वस्तू जवळ असूनही त्यांचा मनमुराद आस्वाद घेणंही जमणार नाही. त्यांच्या रक्षणातच जीवनाचा आनंदही गमावून बसावे लागेल. अनाठायी संचय करणे सोडून देता आले पाहिजे. तरच जीवन सुखी व समाधानी होईल. जीवनातल्या हावरट गरजा कमी केल्या की जगणं हलकं फुलकं व सोपं होतं. त्या गोष्टींसाठी माणसाला अनाठायी संघर्ष करण्याऐवजी तो जरा मुक्त राहू लागला तर त्या गोष्टी आपसुकंच माणसाच्या पुढ्यात आलेल्या असतील. मुक्ती आणि प्रबळ आसक्ती एकत्र नांदूच शकत नाहीत. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= तुमच्यापैकी किंवा तुमच्यातलीच एखादी व्यक्ती एखाद्या क्षेत्रात खूप काही चांगले काम करत असेल तर त्यांना तुम्ही प्रोत्साहन देऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा म्हणजे ते अधिक जोमाने काम करतील आणि त्या निवडलेल्या क्षेत्रात अधिक, अद्वितीय कामगिरी करुन ते स्वत:चे आणि तुमचेही नावलौकिक करतील. तुमची प्रेरणा हेच त्यांच्या यशाचे खरे रहस्य असेल. पण तुम्ही असे करु नका की, तो आपल्यापुढे चालला आहे त्याचा आपल्याला काय फायदा ?असं म्हणून त्यांचे पाय मागे खेचू नका किंवा त्यांच्या प्रगतीत अडथळा ही आणू नका.कारण त्यांच्या होणा-या प्रगतीमध्ये अडथळा आणण्याचे कारण तुम्ही बनू नका.असे न करता केव्हाही जर कोणी चांगले काम करत असेल तर त्यांना पुढे जाण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून थोड्यातरी तुमच्या अंत:करणातून शुभेच्छा द्या म्हणजे त्यांना त्यांच्या क्षेत्रात अधिक जोमाने काम करण्यासाठी मूठभर मांस चढेल हे निश्चित *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *खंबीर - Steadfast* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *चाणक्यनीती* एके दिवशी एक व्यक्ती महान चाणक्याला भेटली आणि म्हणाली, 'मी तुमच्या मित्रा बद्दल जे काय ऐकले ते तुम्हाला मी सांगूं का? 'एक मिनिट थांबा' चाणक्ने उत्तर दिले. 'काही सांगण्या पूर्वी मी थोडाशी तुमची परीक्षा घेतो, परीक्षेत उत्तीर्ण झालात तरच सांगा, आपण याला.' ट्रिपल फिल्टर चाचणी असे म्हणू...... चालेल? ती व्यक्ती म्हणाली, 'तिहेरी फिल्टर?' ठीक आहे. चाणक्य पुढे म्हणाला. 'माझ्या मित्रा बद्दल माझ्याशी बोलण्या पूर्वी, तुम्ही जे काय म्हणणार आहात, ते फिल्टर करणे चांगले आहे, म्हणूनच मी त्याला तिहेरी फिल्टर चाचणी म्हणतो, आता पहिला फिल्टर, तुम्ही जे सांगणार आहात, ते सत्य आहे का? ' थोडस थांबून ती व्यक्ती म्हणाली 'नाही,' 'खरंच मी त्याबद्दल ऐकले आणि .......' 'ठीक आहे,' चाणक्य म्हणाले तुम्ही जे मला सांगणार आहात ते खर आहे, याची खात्री नाही तुम्हाला?, आता दुसरा फिल्टर, आता चांगुल पणाचे फिल्टर वापरून पाहूया. आपण माझ्या मित्रा बद्दल काही तरी सांगणार आहात ते त्याच्या बद्दलचे चांगले विचार आहेत काय?' ती व्यक्ती म्हणाली 'नाही, उलट ........' 'मग, मधेच तोडत चाणक्य पुढे म्हणाले,' तू मला त्याच्या बद्दल काही तरी वाईट सांगू इच्छित आहेस आणि ते खरे आहे की नाही याची शाश्वती नाही, ठीक आहे, आता उपयुक्तता फिल्टर हा शेवटचा फिल्टर..... जे तू मला माझ्या मित्राबद्दल सांगणार आहेस ती माहिती मला उपयोगी असणार आहे काय?' 'नाही, तशी तुम्हाला ती उपयुक्त खरंच नाही' ती व्यक्ती ओशाळत म्हणाली. 'ठीक आहे,' म्हणजे 'जर तुम्ही मला सांगू इच्छिता, *ते ना सत्य आहे,* *ना चांगले आहे ,* *ना मला उपयोगी आहे,* तर मला ते का सांगता आहात?' प्रत्येक वेळी आपल्या जवळच्या प्रियजना बद्दल, मित्रा बद्दल ऐकताना या तिहेरी फिल्टरचा वापर करा. मैत्रीवर भरवसा ठेवा, *हे तिहेरी फिल्टरचे शास्त्र खरोखर खूप उपयुक्त आहे. आपसातील गैरसमज दूर ठेवायचे असतील तर प्रत्येक व्यक्तीने हे तिहेरी फिल्टर आचरणात आणा.* *हीच आहे चाणक्य-नीती* खूपदा आपण कोणाच्या सांगण्यावरून कुठल्याही व्यवसायिकां बाबत अशीच भावना व्यक्त करतो ,त्या व्यक्ती बाबत अथवा त्याच्या सेवेबाबत आपल्याला स्वतःला काहीच अनुभव अथवा स्वतः डोळ्याने पाहिलेले पण नसते ,आणि एक समज मनात घर करून घेतो ..त्यामुळे कित्येक चांगल्या गोष्टी समोर येऊन किंवा त्यांच्या समवेत राहून त्याची महती कळत नाही म्हणून ही नीती वापरा स्वतः बरोबर इतरांचे पण हित जोपासा. *माणसे जोडुया* *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment