✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 13/08/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ=========          *जागतिक देहदान दिवस* 💥 ठळक घडामोडी :- १९४३ - रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय संचालक म्हणून सी.डी. देशमुखांची नियुक्ती. १९९१ - कन्नड साहित्यिक विनायक कृष्ण गोकाक यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर २००२ - के.के. बिर्ला या उद्योगपतीस कांचीपूरम येथे विद्यासेवारत्न सन्मान प्रदान केला गेला 💥 जन्म :- १८८० - जॉन लोगी बेअर्ड, दूरचित्रवाणीसंचशोधक १८९० - त्र्यंबक बापूजी ठोंबरे तथा बालकवी, मराठी कवी १८९८ - आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, मराठी साहित्यिक. १८९८ - विश्राम बेडेकर, मराठी साहित्यिक. १९२३ - पंडित काशिनाथशास्त्री जोशी, भागवत अभ्यासक, प्रवचनकार. 💥 मृत्यू :- १७९५ - अहिल्याबाई होळकर. १९८० - पुरुषोत्तम भास्कर भावे मराठी साहित्यिक. १९८८ - गजानन जागीरदार, हिंदी चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नासाची ऐतिहासिक झेप, सोलर प्रोब यान सूर्याच्या दिशेनं झेपावल.* --------------------------------------------------- 2⃣ *केरळ : केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केरळमधील पुरग्रस्त भागाची केली पाहणी, 100 कोटीचे पॅकेज जाहीर* ---------------------------------------------------  3⃣ *सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धेचा पारिताेषिक वितरण समारंभ पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलता पार पडला, साताऱ्याच्या टाकेवाडीने पटकावला वाॅटर कप* --------------------------------------------------- 4⃣ *रक्षाबंधन आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने देशातील सामान्य जनतेला मोठा दिलासा, राखी आणि गणेश मूर्तींना जीएसटीतून वगळण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी दिली.* --------------------------------------------------- 5⃣ *हैदराबाद - आयसिस दहशवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन हैदराबादे येथून दोघांना अटक, एनआयएची कारवाई* --------------------------------------------------- 6⃣ *बीसीसीआयमध्ये होऊ शकते ‘दादागिरी’, अध्यक्षपदावर सौरव गांगुली येण्याची चर्चा* --------------------------------------------------- 7⃣ *लॉर्ड्स कसोटीत भारताचा पराभव, इंग्लंडची भारतावर एक डाव आणि 159 धावांनी मात* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= जागतिक देहदान दिवस *अवयवदान संकल्प करू या* http://nasayeotikar.blogspot.com/2018/08/blog-post_11.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========           *शिवराम हरी राजगुरू* शिवराम हरी राजगुरू हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातहौतात्म्य पत्करलेले क्रांतिकारक होते. ते हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी या संघटनेच्या क्रांतिकार्यात सहभागी झाले होते. राजगुरूंचा जन्म पुण्या़जवळ  खेड येथे ऑगस्ट २४, इ.स. १९०८ रोजी एका मराठीभाषक, देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांना ‘रघुनाथ’ या नावानेही ओळखले जात असे. लाहोर खटल्याचा निकाल लावण्यात आला व शिवराम राजगुरू यांच्यासह भगतसिंग व सुखदेव यांना अतिशय गुप्तता राखत फाशी देण्यात आले. २३ मार्च, १९३१ च्या सायंकाळी राजगुरू, भगतसिंग व सुखदेवहसत हसत फाशीला सामोरे गेले. या तिघांच्या बलिदानाचा २३ मार्च हा दिवस, भारतात शहीद दिन म्हणून पाळण्यात येतो. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ=========         🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= "जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते, पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही." *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) मार्च २०१९ पर्यंत राज्यभरातील सगळ्या खेड्यांमध्ये शौचालये  उभारण्याचं उद्दिष्ट कोणत्या राज्याने जाहीर केलं आहे ?*          पश्‍चिम बंगाल *२) मौर्य साम्राज्याचा शेवटचा शासक कोण ?*            बृहद्रथ *३) संस्कृतचं व्याकरण कोणी लिहिलं ?*            पाणिनी *४) लोदी घराण्याचा संस्थापक कोण ?*           बहलोल लोदी *५) फिलिपिन्सची राजधानी कोणती ?*             मनिला *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ=========    🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 सुयोग पेनकर, पुणे 👤 प्रशांत सब्बनवार, कुंडलवाडी 👤 गणेश धाकतोडे 👤 नागेश गुर्जलवार 👤 नरेंद्र रेड्डी, बाळापूर 👤 योगेश येवतीकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*      [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ=========       *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ=========     *जुगार* पेरणी करून शेतकरी दरवर्षी जुगार खेळतो अस्मानी संकटांशी तो हारतो म्हणजे  हारतो रात्रंदिवस फक्त कष्ट कष्टाला कमी नाही  तरीही यश मिळेल याची मात्र हमी नाही   शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌟! !  *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *आपण व्यक्ति म्हणून समाजाचे काही देणे लागतो. आपले कुणाकडेही लक्ष नसले, तरी समाजाचे आपल्याकडे लक्ष असते. त्यामुळे आपल्या जगण्या-वागण्यावर अनेकदा मर्यादा येतात. आपण कुठेही आणि कसेही वागू शकत नाही. सामाजिक उत्तरदायित्व नावाची गोष्ट सतत आतुन ढुसण्या देत असते. त्यामुळे आपले वर्तन हे सामाजिक जीवनाला साजेसे असावे लागते, कारण व्यक्ति जर यशाच्या शिखरावर जात असेल, तर लोकांच्या नजरा त्याच्यावर खिळलेल्या असतात. तो जे सांगतो त्या उपदेशापेक्षा तो जे वागतो त्याचे अनुकरण समाज करतो.* *एक साधा दृष्टांत असा आहे की, कोणतेही नितीशास्त्र पुस्तकामधून शिकविल्यानंतर ते जेवढे रूजते त्यापेक्षा ते आधिक एखाद्याच्या वर्तनातून दिसले, तर परिणामकारक ठरते. त्यामळेच संत ज्ञानेश्वरांपासून अनेकांनी वर्तनावर भर दिला आहे. ज्ञानेश्वर म्हणतात, 'मार्गाधारे वर्तावे' संत तुकाराम म्हणतात, "बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले' याचाच अर्थ व्यक्ति जीवनात वर्तनाला महत्व आहे. समाजातले प्रतिष्ठित, थोर लोक जे आचरण करतात, त्यांच्या अनुकरणाचे प्रतिबिंब जागोजागी पडत असते.*      ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••           🌹🌹🌹🌹🌹🌹         *--संजय नलावडे, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ=========   आपल्या जीवनात खरे यशस्वी व्हायचे असेल,आपले जीवन सुखी, समृद्ध आणि समाधानी व्हायचे असेल तर तुम्ही तुमच्या दररोजच्या कामात तुमचे हात सदैव क्रियाशील ठेवा, मन स्थिर ठेवा, कामातले लक्ष्य विचलित होऊ देऊ नका, कुणाचीही स्पर्धा करु नका की, ज्यामुळे तुमच्या कामात व्यत्यय निर्माण होऊन मन अस्थिर होईल आणि कामामध्ये निष्क्रियता येईल,दुस-या चे काम पाहून, त्याची होत असलेली प्रगती पाहून त्याबद्दल मनामध्ये द्वेषाला जागा देऊ नका.आपण आपल्या कामात सदैव कार्यरत रहा त्यातच तुमच्या जीवनात खरे यशस्वी होऊन तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार व्हाल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ=========        *व्यत्यय - Interruption* =========ஜ۩۞۩ஜ=========     🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 =========ஜ۩۞۩ஜ=========                      *प्रेरणा* संत राबिया रोज पक्ष्यांना धान्याचे दाणे टाकीत असत. हा त्यांचा रोजचा नियम होता. उर्वरित वेळेत त्या अध्ययन आणि अध्यात्मिक चर्चा करीत असत. एके दिवशी त्या सकाळी कबुतरांना दाणे टाकीत असताना, पाच-सहा तरुण तेथे फिरत फिरत आले आणि संत राबिया यांच्याजवळ येऊन उभे राहिले. संत राबियानी त्याच्यांकडे पाहून स्मितहास्य केले आणि नंतर मोठ्याने हसू लागली. ती का हसते? हे त्या तरुणांना कळले नाही. त्यांनी तिच्याजवळ तिच्या हसण्याचे कारण विचारले असता ती म्हणाली,"मी यामुळे हसले कारण या धरतीवर तुमच्यासारखे सजलेले, सुंदर आणि बलशाली तरुण आहेत. ती धरतीमाता किती भाग्यशाली आहे.                माझे हसू हे देवाप्रती आभाराचे आहेत." हे ऐकून ते तरुण तिथेच उभे राहिले. राबियांचे कबुतराला दाणे टाकण्याचे कामही चालूच होते. त्या त्यांच्या कामात मग्न होत्या. मग काही वेळाने त्या रडू लागल्या. तरुणांना कळेना कि काही वेळापूर्वी हसणारी हि स्त्री अचानक का बरे रडू लागली. ते त्यांच्याजवळ गेले व पुन्हा त्यांना रडण्याचे कारण विचारले. त्यावेळी राबिया त्यांना म्हणाल्या," आधी मी हसले होते धरतीवर किती बलशाली तरुण आहेत पण हे तरुण त्यांच्या इच्छाशक्तीचा, बलाचा वापर सेवेसाठी करत नाहीत. तरुणांनी या बलाचा वापर जर सृजनासाठी केला तर जगाचे किती कल्याण होईल. असे होत नाही आणि त्यांची बुद्धी त्यांना हे करण्याची का प्रेरणा देत नाही या गोष्टीने मला रडू आले." तरुणांना आपली चूक लक्षात आली. राबियाने त्यांना प्रेरित केले.त्यांच्याकडून सेवा करून जरी घेता आली नाही तरी तहानलेल्याना पाणी, भुकेलेल्याना अन्न आणि मायेचे दोन शब्द प्रत्येकासाठी द्यायला हवे हे त्यांना समजावले. *तात्पर्य - प्रत्येकाने जर थोडे थोडे सत्कार्य केले तर जग सुंदर दिसण्यास वेळ लागणार नाही. दुसरा कोणी करण्याची वाट पाहण्यात आयुष्य संपून जाते.त्यापेक्षा सुरूवात आपल्यापासूनच करावी.* *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment