*माझी शाळा माझे उपक्रम* ➖➖➖➖➖➖➖ वर्गः पहिली / दुसरी विषयः गणित उपक्रमाचे नावः ओळख अंकाची. 👉उद्दिष्टः एकक दशक व शतकाची संकल्पना समजणे. 〰〰〰〰〰〰 *(ज्ञानरचनावाद) शैक्षणिक साहित्यः* १) एकक साठी सुट्या काड्या व दशक शतकासाठी काड्यांचे गठ्ठे २) सागरगोटे , मण्याची माळ नकली नोटा. .....इत्यादी ... कृतीः विद्यार्थ्यांच्या संख्येच्या लेखनाचा सरावासाठी व वाचनासाठी मुलांना दोन तीन गटात बसविणे. व त्यानंतर त्यांना काड्यांचे गठ्ठे व सुट्या काड्या देणे गटातील प्रत्येकजण आपल्या इच्छेनुसार त्या काड्या घेईल आणि बाजुला ठेवून देईल. त्यानंतर त्याने किती एकक दशक शतक ठेवले ते मोजेल आणि सर्वजण त्याचे निरीक्षण करून ती संख्या आपल्या वहित लिहितील *अंकात आणि अक्षरात* हा सराव घेत असताना विद्यार्थ्यांच्या अचूक लेखन व वाचनाचा सरावासाठी उजळणीचा वापर करण्यात येत आहे. असा सराव सागरगोटे शिरगोळे ह्याच्या साह्याने घेणे चालू आहे. गटाचा आवडीनुसार उपलब्ध साहित्याचा वापर केल्यास मुलांना लवकर समजेल आणि मनोरंजक वाटेल. हा सराव रोज , नेहमी घेणे आवश्यक आहे. *👉निष्पत्ती* - संख्या ओळख होणे. एकक दशक शतक ही संकल्पना स्पष्ट होते. 〰〰〰〰〰〰〰 ✍ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ( स.शि.) जि.प.प्रा.शाळा गोजेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰〰
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment