✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 27/08/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९६२ - नासा चे मानव-विरहित यान मरिनर २ चे शुक्राकडे प्रस्थान 💥 जन्म :- १९२५ - नारायण धारप, मराठी लेखक १९७२ - दिलीप सिंग राणा उर्फ द ग्रेट खली, भारतिय मल्ल १९८० - नेहा धुपिया, भारतीय अभिनेत्री 💥 मृत्यू :- १९७६ - मुकेश, भारतीय पार्श्वगायक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *2019ची लोकसभा निवडणूक आणि 2018मध्ये होणा-या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार आता सोशल मीडियावर ठेवणार करडी नजर* --------------------------------------------------- 2⃣ *आर. के. स्टुडिओ होणार इतिहासजमा, कपूर कुटुंबाने घेतला विकण्याचा निर्णय !* --------------------------------------------------- 3⃣ *अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने नॅशनल हेरॉल्डविरोधात 5 हजार कोटी रुपयांचा मानहानीचा दावा केला दाखल.* --------------------------------------------------- 4⃣ *डेहराडून- बेबी राणी मौर्य यांनी स्वीकारला उत्तराखंडच्या राज्यपालपदाचा पदभार* --------------------------------------------------- 5⃣ *रत्नागिरी - केरळ पुरग्रस्तांसाठी आनंदवनातील कुष्टरोग्यांच्यावतीने डॉ. विकास आमटे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला दिला रामगिरी येथे पाच लाख रुपयांचा धनादेश* --------------------------------------------------- 6⃣ *आशियाई स्पर्धेत महिला एकेरीत पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय खेळाडूचा मान सायना नेहवालला.* --------------------------------------------------- 7⃣ *Asian Games 2018: भारताच्या हिमा दासने 400 मीटर शर्यतीत 50.79 सेकंदाची वेळ नोंदवून रौप्यपदकाची कमाई केली. पुरुष गटात भारताच्या मोहम्मद अनासने 45.69 सेकंदाची वेळ नोंदवली.* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= राखीपौर्णिमा दिनानिमित्त प्रासंगिक कथा *रक्षाबंधन* https://goo.gl/ZUSUiy वरील कथा वाचल्यावर आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *काशी विश्वेश्वर* विश्वेश्वर हा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. शंकराचे हे रूप काशीत पूजले जाते. पूर्वी वाराणसी काशी विश्वनाथ मंदिर होते. अनेक वर्षे दुर्लक्षित राहिल्यावर अकबराच्या काळात तोरडमल या अभिमानी राजाने या मंदिराचे पुनर्निर्माण केले. परंतु क्रूर आणि धर्मांध औरंगजेब याने हे मंदिर पाडून टाकले. अनेक शतके तशीच गेल्या नंतर तेथे अहिल्याबाई होळकर यांनी विश्वनाथ मंदिर बांधले. राजा रणजितसिंग या हिंदू देशाभिमानी राजाने त्याच्या मुख्य शिखरावर सोन्याचा मुलामा चढविला होता. १६ व्या शतकात येथेच संत एकनाथानी " श्रीएकनाथी भागवत" हा वारकरी सम्प्रदायाचा महान ग्रंथ लिहीला. येथे याची हत्तीवरुन मिरवणूक निघाली. कैलासावर भस्म फासून रहाणाऱ्या शंकराची सर्व टिंगल करावयाचे म्हणून पार्वतीने 'मला कुणी चिडविणार नाही अश्या ठिकाणी घेऊन चला' अशी विनंती शंकराला केली.त्यामुळे शंकर येथे येउन राहू लागला.तेथे दिवोदास राजाने मंदिर बांधल्यावर ते त्यात रहावयास गेले. अशी आख्यायिका सांगितली जाते. या शहरात सुमारे १६५४ मंदिरे आहेत.त्यामुळे यास मंदिराचे शहर असेही म्हणतात. त्यात प्रमुख मंदिर काशी विश्वेश्वराचेआहे. विश्वनाथाचे दर्शनाअगोदर धुंडीराज किंवा ढुंढीराज विनायकाचे दर्शन घेण्याचा येथे प्रघात आहे. या मंदिराचे सभोवताल अष्ट दिशांचे अष्टविनायक आहेत. साक्षी विनायक, पश्चिमेला देहली विनायक, उत्तरेला पापशार्थी विनायक, दक्षिणेला दुर्गा विनायक, नैऋत्येला भीमचंद विनायक, वायव्येला उदंड विनायक आणि ईशान्येला सर्व विनायक. काशी विश्वनाथाचे मंदिरात मुख्य पिंडी गाभाऱ्याचे एका टोकाला आहे. त्यावर गंगाजल व बिल्वपत्रे वाहण्यात येतात. ते काळ्या पाषाणाचे व सोन्या-चांदीने मढविले आहे. तेथे दर्शन घ्यावयाचे तर तीन हार न्यायची पद्धत आहे. एक हार शंकराला, दुसरा पार्वतीला तर तिसरा हार तेथील पूजारी त्या भक्ताचे गळ्यात घालतो. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= प्रसिध्द व्यक्ती होण्यासाठी आयुष्यातला क्षण न क्षण कोणत्यातरी एका क्षेत्रात सतत उगळावा लगतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) पाकव्याप्त काश्मीरची राजधानी कोणती ?* मुझफ्फराबाद *२) 'सेव्हन सिस्टर्स' म्हणून भारतातील कोणत्या भागाला संबोधले जाते ?* ईशान्य भारतातील सात राज्यं *३) दक्षिण चीन समुद्रावरील चीनचा हक्क अमान्य करून आंतराष्ट्रीय लवादाकडे कुठल्या देशाने धाव घेतली होती ?* फिलिपिन्स *४) केळीचं सर्वाधिक उत्पादन कुठे होतं ?* तामिळनाडू *५) लष्करातील सर्वोच्च हुद्दा कोणता ?* जनरल *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 अतुल वैद्य 👤 दत्तप्रसाद सुरकूटवार 👤 प्रशांत रुईकर 👤 बोसू वंगरा 👤 दिगंबर सोळंखे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *अस्सल* सोन्यालाच अग्निची परीक्षा द्यावी लागते सोन्याला संकटात खंबीर व्हावे लागले अस्सल ते कोणत्याही कसोटीवर तरले जाते जे खरे आहे ते कुठेही खरे ते खरे ठरले जाते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 04* *तीर तुपक से जो लादे* *सो तो शूर न होय |* *माया तजि भक्ति करे* *सूर कहावै सोय ||* अर्थ : भात्यात ठेवुनी तीर बनतो का कुणी शुर पाश मायेचे त्यागिता भक्ता देव नसे दूर उगाच पाठीवर भात्यात बाण भरले. खांद्यास धनुष्य अडवून फिरले म्हणून कोणीही महान योद्धा होत नाही. त्यासाठी मरणाचे भय दूर सारून हाती तीरकमटा घ्पावा लागतो. प्रत्यंचा ओढून वेध घेण्यासाठी लक्ष्यावर शर सोडता आला पाहिजे. वेळ प्रसंगी समोरून येणार्या बाणांना छातीवर झेलण्याची तयारी ठेवतो तोच खरा योद्धा . मोह मायेचे फसवे पाश फेकून देवून निरपेक्ष भावनेतून जो ईश्वराची भक्ती करतो. सत्कार्यासाठी तत्पर असतो.त्यालाच ईश्वर प्राप्ती होत होत असते. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्यांच्या अंगी नम्रता आहे त्यांच्या जीवनात समाधान नांदत असते. त्याचे कारणही तसेच आहे.अशी माणसे दुस-यांच्या जीवनात कधीही ढवळाढवळ करीत नाहीत, दुस-यांबद्दल वाईट विचार आपल्या मनात आणत नाहीत, राग-द्वेष-मत्सर ही भावना दुस-याबद्दल करीत नाहीत, ते स्वत: प्रांजळ मतांचे असल्यामुळे त्यांच्याकडून कोणतेही अधम कृत्य घडत नाही. सदैव इतरांचा आदर सन्मान करत असतात. अशा सद्गुणी माणसांच्या सहवासात राहिल्याने आपल्यातील असणारे दोष दूर तर होतीलच त्याचबरोबर आपल्यामध्ये नम्रताही हळूहळू वृध्दींगत होऊन आपल्या जीवनात खरे जीवन जगत आहोत ही सकारात्मक उर्जा निर्माण होण्यास मदत होईल. जीवनात सुखी व समृध्द व्हायचे असेल तर नम्रता ही अंगिकारली पाहिजे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🏕🌸🏕🌸🏕🌸🏕🌸🏕🌸 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *संशय - Doubt* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *सत्याचा विजय* गोविंदा एका चांगल्या कुटुंबात जन्माला आलेला होता. पण लहान वयातच वडिलांचे छत्र हरपल्यामुळे आपले व आईचे पोट भरण्यासाठी त्याला एका सरदाराच्या घरी चाकरी करावी लागली. गोविंदाला त्या घरात घराची साफसफाई करणे, देवघर साफ करणे, पूजेची तयारी करणे याशिवाय कावडीने विहिरीचे पाणी भरायचे कामसुद्धा त्याच्याकडेच होते. सर्व कामं होता होता दिवस संपत असे त्याला रिकामा असा वेळच मिळत नसे. पण आज वडिलांच्या पश्चात त्याचा आणि आईचा उदारनिर्वाह त्यावरच अवलंबून होता. त्यामुळे काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. एक दिवस वाड्यात गोंधळ झाला होता. सरदार अतिशय रागवलेले होते. वाड्यात प्रत्येकजण कांहीतरी शोधत होता. सरदारांची हिऱ्याची अंगठी हरविली होती. आजपर्यंत वाड्यात कधी वस्तू हरविली नव्हती. गोविदा नवीनच वाड्यात यायला लागला होता त्यामुळे त्याच्यावरच संशय होता. त्याला बोलावून त्याबद्दल विचारले असता, ‘‘मी चोरी केलेली नाही’’ ठामपणे त्याने उत्तर दिले. पण सरदारांनी गोविंदाला देवघरात नेले व देवावरील फूल उचलून खरे बोलण्यास सांगितले. फूल उचलत गोविंदा म्हणाला, ‘‘देवा मी चोरी केलेली नाही. आता खरं काय ते तूच सांग’’ तेवढ्यात सरदारांचे लक्ष देवघरातल्या तीर्थ असलेल्या ताम्हनात गेले. त्यांना त्यात कांहीतरी चमकल्यासारखे वाटले. पाहातात तो अंगठी पूजा करताना त्यात गळून पडली होती. सरदारांनी गोविंदाला, ‘‘तू चोर नाहीस !’’ अशी कबुली दिली. त्यावर गोविदाने देवाला हात जोडले आणि त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले, ‘‘सत्याचा वाली परमेश्वर !’’ *तात्पर्य – शेवटी सत्याचाच विजय असतो.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड.* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ======= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment