✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 10/08/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १५१९ - फर्डिनांड मेजेलन पाच जहाजे घेउन पृथ्वी-प्रदक्षिणेसाठी निघाला १८४६ - जेम्स स्मिथसनच्या ५,००,००० डॉलरच्या देणगीने स्मिथसॉनियन इंस्टीट्युटची स्थापना. १९२० - पहिले महायुद्ध-सेव्ह्रेसचा तह - दोस्त राष्ट्रांनी ओस्मानी साम्राज्य आपसांत वाटून घेतले. १९८८ - दुसर्या महायुद्धात बेकायदेशीरपणे बंदिवासात टाकलेल्या जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना अमेरिकेने प्रत्येकी २०,००० डॉलर देण्याचे कबूल केले. 💥 जन्म :- १८६० - पंडित विष्णू नारायण भातखंडे, भारतीय संगीतकार, संगीततज्ञ. १८७४ - हर्बर्ट हूवर, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष 💥 मृत्यू :- मृत्यू: १९७६ - बर्ट ओल्डफील्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. १९८० - याह्या खान, पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष. २००० - गिल्बर्ट पार्कहाउस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नांदेड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला उस्फूर्त प्रतिसाद ; अनेक ठिकाणी रास्ता रोको* --------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली - राष्ट्रीय निवडणूक आयोगाने 27 ऑगस्ट रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे, ईव्हीएम मशिनसंदर्भात होणार चर्चा.* --------------------------------------------------- 3⃣ *गडचिरोली - सीआरपीएफच्या 889 जवानांचा गडचिरोलीत देहदानाचा संकल्प.* --------------------------------------------------- 4⃣ *नवी दिल्ली : राज्यसभेत राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ विधेयक मंजूर* --------------------------------------------------- 5⃣ *राज्यसभेच्या उपसभापतीपदी एनडीएचे हरिवंश नारायण सिंह ; यूपीएचे उमेदवार बी. के. हरिप्रसाद यांचा पराभव* --------------------------------------------------- 6⃣ *सातवा वेतन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, महागाई भत्त्याची थकबाकी त्वरीत लागू करा, जुनी पेंशन योजना लागू करावी, रिक्त जागांची त्वरित भरती करा, तसेच पाच दिवसांचा आठवडा.. आदी मागण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने पुकारलेला दिवसांचा संप मागे* --------------------------------------------------- 7⃣ *लॉर्डस : भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना, पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= येत्या 15 ऑगस्ट रोजी फ्रेश मॉर्निंग बुलेटीन तीन वर्षे पूर्ण करून चौथ्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्ताने वाचकांच्या काही प्रतिक्रिया श्रीपाद राऊतवाड यांची प्रतिक्रिया http://fmbuleteen.blogspot.com/2018/08/blog-post.html आपण ही आपल्या प्रतिक्रिया खालील क्रमांकावर कळवावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *करुणानिधी* तामिळनाडू चे माजी मुख्यमंत्री एम.करुणानिधी यांचा जन्म 3 जून 1924 रोजी तामिळनाडूच्या नागापट्टीणम जिल्हात झाला.ते एकूण 13 वेळा विधानसभेवर निवडून आले.1957 ला ते पहिल्यांदा आमदार झाले तर 1969 ला पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले.आतापर्यंत त्यांनी एकूण 5 वेळा मुख्यमंत्री होण्याचा मान मिळविला.गोरगरीबांसाठी त्यांनी विशेष कार्य केले.हाथ रिक्षा त्यांनी बंद केल्या,महिलांना वडीलोपार्जित मिळकतीत त्यांनी अधिकार मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. काल दि.7/8/2018 रोजी त्यांचे निधन झाले.मृत्यूसमयी ते 94 वर्षाचे होते. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) सरदार पटेलांनी मठाचा सत्याग्रह कुठून सुरू केला ?* बारडोली सत्याग्रह *२) नोव्हाक जोकोव्हिच हा खेळाडू कोणत्या देशाचा आहे ?* सर्बिया *३) तिन्ही सेनादलांचा सर्वोच्च सेनापती कोण ?* राष्ट्रपती *४) 'इंडिपेंडंट' या वृत्तपत्राचे संस्थापक कोण ?* सच्चिदानंद सिंह *५) फ्रान्सची राजधानी कोणती ?* पॅरिस *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= * व्यंकटेश पुलकंठवार * हेमंत पापळे * संतोष येवतीकर * गणेश मोहिते * तुकाराम यनगंदलवाड * डॉ. चंद्रकांत पांचाळ * राहुल मगरे * माधव परसुरे * सचिन सुरबुलवाड * अशोक मगरे * अविनाश गायकवाड * रामदास देशमुख * गोविंदराव शिवशेट्टे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *मौन* रागाला जिंकण्याचा उपाय मौन आहे थोडे दुर्लक्ष करा राग गौन आहे मौन पाळून रागावर विजय मिळवता येतो कितीही मोठा राग मौनाने पळवता येतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'उन्नती आणि यश' ही प्रक्रीया सोपी नाही. त्यात खाचखळगे असतातच. एक साधा न्याय आपण लक्षात घेतला पाहिजे की, जो परिक्षेत पास होण्याची अपेक्षा बाळगुन असतो त्याचीच परिक्षा घेतली जाते. हेच उदाहरण जीवनात सर्वत्र आहे. एक परिक्षा पास झालात, की पुढची परिक्षा अशी ही श्रृंखला न संपणारी असते. जो हरला तो संपला. हा नैसर्गिक न्याय आहे. ज्याला याची जाणीव झाली तो समाजजीवनात उडी घेतो. कोणतेही आवडीचे क्षेत्र आपलेसे करणे, त्यात प्राविण्य मिळविणे, त्यातून आसपासच्या लोकांचे कल्याण साधने हे त्याच्या अंगवळणी पडते.* *हे सगळे ज्याला समजते त्या समाजपुरूषांच्या ठिकाणी तुम्हाला कधी दु:ख दिसत नाही. त्याच्या चेह-यावरचे भाव प्ररेणादायी असतात, ते प्रेरणेचे क्षण निर्माण करतात. अशा व्यक्ति अल्पसंख्येत असतात, त्यांचे पीक फारसे येत नाही. एखादा समाजचिंतक असणे हे सामाजिक आरोग्याचे लक्षण आहे. आज सर्वत्र एकच ओरड असते, की मोठी माणसे राहिली नाहीत. मला वाटते की ती आहेत पण आपल्याला दिसत नाही. त्यासाठी आपली दृष्टी स्वच्छ हवी..!* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🔹🔹🔹🔹🔹🔹 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जेव्हा आपल्या मनाची घालमेल होऊन जाते तेव्हा आपल्याला कोणते निर्णय घ्यावे काही सुचत नाही. अशावेळी मनाची घालमेल होऊ न देता मन स्थिर ठेवण्यासाठी तुमची ज्यांच्यावर श्रध्दा आहे अशा परमेश्र्वराचे किंवा संत सज्जनाचे किंवा आपल्या गुरुंचे नामचिंतन, ध्यानस्मरण केल्यास त्यातून नक्कीच काही ना काही मार्ग सापडतो आणि आपल्या होणा-या मनाची घालमेल थांबू शकेल. होणारा संभाव्य धोका किंवा आपल्या हातून होणारी चूक नक्कीच टळू शकेल आणि चांगला मार्ग मिळू शकेल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *निर्णय - Decision* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *तीन वाटसरु* तीन वाटसरू एका धर्मशाळेत रात्रीसाठी एकत्र आलेले असतात. तिथे स्वयंपाकासाठी एकच चूल आणि एकच भांडं असतं... तिघांनाही भूक लागलेली असते, मग ते एकत्र स्वयंपाक करायचा असं ठरवतात. चुलीवर भांडं ठेवून त्यात पाणी उकळायला ठेवतात आणि त्यात प्रत्येकानं आपापल्या जवळच्या तांदुळाची एक एक मूठ टाकायची असं त्यांचं ठरतं... पाण्याला उकळी फुटल्यावर त्यात तांदूळ टाकायची वेळ येते. पहिला वाटसरू विचार करतो तसंही बाकीचे दोघं एक एक मूठ तांदूळ टाकतीलच, तेवढा भात तिघांना पुरेल. मी कशाला माझे तांदूळ वाया घालवू...?? म्हणून तो स्वतःच्या पिशवीत हात घालून रिकामीच मूठ घेऊन येतो आणि पातेल्यावरचं झाकण बाजूला सारून तांदूळ आत टाकल्याचं नाटक करतो... गंमत म्हणजे exactly असाच विचार बाकीचे दोघंही करतात आणि पातेल्यात तांदूळ टाकल्याचा नुसता अभिनयच करतात... थोड्या वेळानं ते झाकण दूर करून बघतात तेंव्हा अर्थातच पातेल्यात फक्त गरम पाणी असतं, भाताचा पत्ताच नसतो...!! तिघेही चडफडत आणि एकमेकांना शिव्या देत उपाशीच झोपतात....!!!!! स्वतःचा वेळ, पैसा किंवा कष्ट अशी कोणत्याही प्रकारची तांदुळाची मूठ contribute न करता, ह्या समाजातले सर्व प्रश्न, इतर कोणाच्या तरी प्रयत्नातून आपोआप सुटतील असं ज्यांना वाटतं आणि प्रश्न सुटत नाहीत म्हणून जे तावातावानं फक्त चर्चा करतात... *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment