✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट *आज या बुलेटीन ला तीन वर्षे पूर्ण, चौथ्या वर्षात पदार्पण* 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 15/08/2018 वार - बुधवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *भारतीय स्वातंत्र्य दिन* घडामोडी १९४७ - भारताला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य. जन्म १८७२ - श्री ऑरोबिंदो, भारतीय तत्त्वज्ञानी. १९४७ - राखी गुलझार, भारतीय अभिनेत्री. १९७५ - विजय भारद्वाज, भारतीय क्रिकेट खेळाडू. मृत्यू २००४ - अमरसिंह चौधरी, गुजरातचे मुख्यमंत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *सध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे प्रतिपादन* ----------------------------------------------------- 2⃣ *राज्यातील 51 अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलीस पदकं जाहीर* ----------------------------------------------------- 3⃣ *स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संसद भवन, नॉर्थ, साऊथ ब्लॉकला आकर्षक रोषणाई* ----------------------------------------------------- 4⃣ *मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे छत्तीसगडच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त प्रभार* ----------------------------------------------------- 5⃣ *पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार* ----------------------------------------------------- 6⃣ *एक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त* ----------------------------------------------------- 7⃣ *गोवारी समाजाची मागणी 23 वर्षानंतर अखेर पूर्ण, गोवारी आदिवासी आहेत, नागपूर खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🔔 🔔 गुगलयान 🔔 🔔* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *स्वातंत्र्य दिन विशेष लेख* विचार बदला ; देश बदलेल http://nasayeotikar.blogspot.com/2018/08/blog-post_14.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *भारतीय स्वातंत्र्य दिन* स्वातंत्र्य दिवस हा प्रामुख्याने संबधित देशाच्या राजकीय स्वातंत्र्य दिवसास संबोधले जाते. भारताचा स्वातंत्र्य दिवस ऑगस्ट १५, १९४७ हा आहे. १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रमुख कार्यक्रम ,नवी दिल्ली येथे लाल किल्याच्या साक्षीने साजरा केला जातो. १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी, भारत ब्रिटीशांच्या जोखड्यापासून स्वतंत्र झाला. प्रतिवर्ष, १५ ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्यात येतो. हे राष्ट्रीय पर्व संपूर्ण देशभरात अमाप उत्साहात साजरा केले जाते. कोणत्याही देशासाठी स्वातंत्र्यदिन म्हणजे एक अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस असतो. या विशेष पर्वणीला, जुलमी ब्रिटिश राजवटीच्या पंज्यापासून मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि आयुष्य वेचणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली जाते. सर्वप्रथम व्यापारासाठी म्हणून आलेल्या ब्रिटिशांनी टप्प्याटप्प्याने संपूर्ण भारताचे शासन काबीज केले.१५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्रीच्या ठोक्यावर भारताने ब्रिटिश राजवटीच्या शृंखला तोडून स्वातंत्र्य मिळवले. ती सबंध देशभरासाठी उत्सवाची रात्र ठरली.१५ ऑगस्ट म्हणजेच भारताने स्वातंत्र्य मिळवलेल्या दिवशी देशभर ध्वजारोहण आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम ठेवून स्वातंत्र्यदिन साजरे केले जातात. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर प्रमुख कार्यक्रम असतो. तेथे पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण होते आणि तोफांनी ध्वजाला सलामी दिली जाते संकलन :- प्रल्हाद कापावार ( स.शि.) विद्या निकेतन प्रा.वि. बिलोली. ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *त्याग जीवनाचा पाया आहे तर मानसिक समाधान जीवनाचा कळस आहे* सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?* 👉🏼 पंडित जवाहरलाल नेहरू *२) भारताला स्वातंत्र्य मिळून यंदा किती वर्षे पूर्ण झाली?* 👉🏼 ७१ वर्षे *३) स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते?* 👉🏼 लॉर्ड माऊंट बॅटन *संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 प्रमोद शेलार, सहशिक्षक, कोहळी ता हदगाव जि नांदेड 👤 अरविंद कुलकर्णी, साहित्यिक अहमदनगर 👤 शिवानंद सुरकुटवार, नांदेड 👤 साईनाथ चपळे, बन्नाळी 👤 किरणकुमार नामेवार, वसमत *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *!!! @@ गुगली @@ !!!* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "अभिमान " भारतीय स्वातंत्र्य आमच्या अस्मितेची गाथा आहे तिरंग्या पुढे आमचा नतमस्तक माथा आहे तिरंगा म्हणजे आमचा जान की प्राण आहे तिरंगी झेंड्या आम्हाला तुझा अभिमान आहे *स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा* शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *गीतेच्या दुस-या आध्ययात दुस-याच श्लोकात भगवंताने असे सांगितले आहे की, " मनुष्य जसा जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्र धारण करतो, त्याप्रमाणे आत्म्याचेही असते." याच विधानात आपल्याला नकारात्मकतेचे वस्त्र फेकून देत सकारात्मकतेचे वस्त्र परिधान करणा-यांना शोधावे, पाहावे लागेल.* *गीतेतला हा विचार सर्वोच्चतेची भाषा बोलणारा आहे; पण जीवन बदलाच्या विचारात तो ताडून बघायला हवा. सामान्यपणे जीवनात दोन मनं कार्यरत असतात. एक चांगले आणि दुसरे वाईट. जर वाईट बाजू प्रबळ झाली, तर षङरिपु घेरू लागतात आणि माणूस इंद्रियसुखाच्या आहारी जातो. उलट चांगली बाजू बलवान झाली, तर व्यक्ती संतोषी, संयमी, निर्व्यसनी, स्थिरचित्त होऊन जीवनाच्या वळणवाटा सहज पार करू शकतो. अशा वळणवाटा सहजसाध्य होणे म्हणजे सुखी होणे. यालाच सुखाची व्यापक व्याख्या म्हणता येईल.* •••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••• 🌹🌹🌹🌹🌹🌹 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ वेळ ही भुतकाळाचा काहीच विचार न करता शांत राहते, वर्तमानात क्रियाशील असते तर भविष्यात जे काही होईल ते आपण स्वीकारु अशा तत्त्वाने काळानुसार चालते. पण माणसाचे तसे नाही. माणूस भुतकाळात जे काही घडून गेले त्या गोष्टीवर विचार करुन वर्तमानात लक्षपूर्वक काळजी घेऊन चालत असतो आणि भविष्यात आपण आजच्यापेक्षा ही अधिक चांगल्या प्रकारे जीवन कसे सुधारता येईल या अपेक्षेने तो जगण्याचे स्वप्न पाहत असतो.हे सारे माणसाने वेळेकडूनच शिकले आहे.वेळ ही आपल्यासाठी आहे आपण वेळेसाठी नाही.त्यामुळे वेळ ही स्वतः च्याच पध्दतीने काळानुसार मार्गक्रमण करीत असते आणि आपण त्या त्या नुसार जीवनात मार्गक्रमण करतो आणि करायला शिकले पाहिजे तरच जीवन सुखी व समृद्धी होईल. * व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद.9421839590/8087917063. 🍃💯🍃💯🍃💯🍃💯🍃💯🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🎯 आजची काव्यसरिता* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *माझा भारत देश महान* अनेक राज्ये अनेक प्रदेश विविध जाती विविध भाष नाही कोणी इथे लहान माझा भारत देश महान तीन रंगाची बात न्यारी निळ्या रंगात चोवीस आरी तिरंगा आमुची आहे शान माझा भारत देश महान दिल्ली आहे देशाची राजधानी सर्वांचे लक्ष घेतो वेधूनी कारभार चालतो एकदम छान माझा भारत देश महान इथे नांदतो सर्वत्र समानता एकमेकामध्ये आहे बंधुता सर्वच गातात एकच गान माझा भारत देश महान जगाच्या कोपऱ्यांत कुठेही एक तरी भारतीय राही कष्टाने राखतो देशाची मान माझा भारत देश महान - नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *आजची फ्रेश बोधकथा*🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *विस्मरण* एकदा इंद्रदेव सर्वांवर कोपले. त्यांनी शाप दिला *पुढची 12 वर्षे पाऊस पडायचा नाही* व तशी आकाशवाणी हि केली. पृथ्वीवर सर्वदूर हाहाकार माजला. सर्वजण हताश झाले, पाऊस 12 वर्षे येणार नाही म्हणजे सर्व जण दुःकाळाने मरणार या विचाराने घाबरून गेली. एक शेतकरी जंगलातून रोज पाणी भरून आणायचा आणि आपली गुरे व कुटुंबाला पाणी द्यायचा. थोड्याच दिवसात जंगलातील पाणी साठाही संपून गेला. शेतकरी पाण्याच्या शोधात जंगलात फिरू लागला असता त्याला एक विलक्षण दृश्य दिसले... *एक मोर आपल्या पिलांना नाचायला शिकवत हॊता.* त्या पिलांनी मोराला विचारले की जर 12 वर्षे पाऊस पडणार नसेल तर आपण नाचून किंवा नाच शिकून काय फायदा? मोर म्हणाला, पण *आपण आता पासून नाचणे किंवा नाच शिकणे बंद केले तर जेव्हा 12 वर्षांनी पाऊस पडू लागेल तेव्हा आपण सारे नाचणे विसरूनच गेलो असेल.* शेतकरी हा संवाद ऐकून अवाक झाला. तो धावतच घरी आला, शेतीची अवजारे गोळा केली आणि दुसऱ्या दिवशी आपल्या मुलांना घेऊन शेतावर गेला. आणि कोरडे शेत नांगरु लागला. मुलांना शेतिची कामे शिकवू लागला. मुले चकित होऊन बापाकडे पहात होती. त्यांनी त्याला विचारले, बाबा जर 12 वर्षे पाऊस पडणार नसेल तर आपण आता शेत नांगरून मशागत करून काय फायदा ? शेतकरी म्हणाला, आपण शेतीची कामे शिकलो नाही किंवा करणे बंद केली तर 12 वर्षांनी पाऊस पडेल तोपयंत आपण सर्व कामे विसरून जाऊ. आणि पुनः कमाला लागला. इंद्रदेव आकाशातून या कुटुंबाला व शेतकऱ्याला काम करताना बघून अचम्बित झाला. त्याने एका ब्राम्हणाचे रूप घेऊन त्या शेतात आला आणि शेतकऱ्याला विचारले, *तू आकाशवाणी ऐकली नाहीस का?* शेतकरी म्हणाला, होय ऐकली. *पण जर मी काम केलं नाही किंवा माझ्या मुलांना शेतीची कामे शिकवली नाही तर माझ्या पुढच्या पिढीला शेतीचे काहीच काम येणार नाही मग जेव्हा पाऊस पडेल तेव्हा ते उपाशी राहतील.* इंद्र सुन्न झाला, स्वर्गात आल्यावर विचार करु लागला कि 12 वर्षे मी पाऊस पाडला नाही तर मी सुद्धा पाऊस कसा पाडायचा ते विसरून जाईन, मग सर्व सृष्टी करपुन जाईल, जैव सृष्टी नष्ट होईल. देवाने लगेचच विचार बदलला. आपला शाप मागे घेतला आणि भरपूर पाऊस पाडायला सुरुवात केली. तात्पर्य - *बाह्य परिस्थिती कशीही असो आपण न चुकता आपले कर्तव्य करीत राहायला हवंय. कठीण परिस्थिती मध्येच आपल्या कर्तव्यनिष्ठतेची परीक्षा असते. मंदी व चणचण असली तरी, किती ही अडचणी आल्या तरी* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment