✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 31/08/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १८९७ - थॉमस अल्वा एडिसनने कायनेटोस्कोपचा पेटंट घेतला. १९६२ - त्रिनिदाद आणि टोबॅगोलायुनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य. १९६८ - सर गारफील्ड सोबर्सने एका षटकात ६ षटकार फटकावले. 💥 जन्म :- १५६९ - जहांगीर, मुघल सम्राट. १८७० - मारिया मॉँटेसोरी, इटालियन शिक्षणतज्ञ. १९४४ - क्लाइव्ह लॉईड,वेस्ट ईंडीझचे क्रिकेट खेळाडू. १९६९ - जवागल श्रीनाथ,भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९९५ -बियंत सिंग, पंजाबचा मुख्यमंत्री १९९७ - प्रिन्सेस डायना, ब्रिटीश राजकुमारी *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली - चौथ्या BIMSTEC परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय नेपाळ दौऱ्यासाठी रवाना* --------------------------------------------------- 2⃣ *मुंबई - गणेशोत्सव मंडळांना राज्य सरकारचा दिलासा, मंडळांच्या मंडपांना परवानगी देण्याची मुदत 5 सप्टेंबरपर्यंत वाढवली* --------------------------------------------------- 3⃣ *सोलापूर - विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून शासकीय कार्यालयांना वॉटर एटीएम भेट.* --------------------------------------------------- 4⃣ *सिंधुदुर्गः सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील आज सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर, दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला वेग* --------------------------------------------------- 5⃣ *नोटाबंदीनंतर 15 लाख नोकऱ्या गमावल्या, गरिबांच्या खिशात हात घालून पैसे काढण्यात आले आणि विकासदर 1 टक्का घसरला - अरुंधती रॉय* --------------------------------------------------- 6⃣ *नवी दिल्ली - अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 16 सप्टेंबर रोजी 4 हजार ठिकाणी काव्यांजली कार्यक्रम, अमित शाह यांची माहिती* --------------------------------------------------- 7⃣ *Asian Games 2018 : भारताची सुवर्ण हॅट्ट्रिक हुकली, पुरुषांच्या रिलेमध्ये भारताला रौप्यपदक* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *यंदा कर्तव्य आहे* दैनिक जनशक्ती मध्ये प्रकाशित लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. http://epaper.ejanshakti.com/m5/1797019/Mumbai-Janshakti/31-08-2018#page/4/1 आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *भारतरत्न पुरस्कार* भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या भारताची कीर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते. अशा व्यक्तींनी उभी हयात यासाठी घालविलेली असते. अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे. सेवा, कला, साहित्य, विज्ञान व विश्वशांती, मानव विकास, कारखानदारी इत्यादी क्षेत्रांतील लोकांना, सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींना व अन्य अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्यांना, हा अमूल्य पुरस्कार देऊन गौरवायचे, असा निर्णय इ.स. १९५४ मध्ये तत्कालिन भारत सरकारतर्फे घेण्यात आला २ जानेवारी १९५४ रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी त्यावर मान्यतेची मोहर उठवली. १९५५ साली कायद्यात काही बदल करून मरणोपरान्त ‘भारतरत्न’ देण्याची सोय करण्यात आली. त्यानंतर १२ हून अधिक जणांना मरणोपरान्त भारतरत्न दिले गेले आहे. २०१४ मध्ये वरील क्षेत्रांबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारात स्थान देण्यात आले. २०१५ सालापर्यंत ४१ जणांना ‘भारतरत्न’ हा पुरस्कार लाभलेला आहे. त्यात तीन नावे परदेशी व्यक्तींची आहेत. या पुरस्काराचे वैशिष्ट्ये व तो देण्यासंबंधीचे नियम भारत सरकारच्या राजपत्रात नमूद केले आहेत. २ फेब्रुवारी १९५४ साली पहिला पुरस्कार डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते दिला गेला. भारतरत्न हा शब्द नावाआधी लिहिण्याचा एक किताब म्हणून वापरता येत नाही *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= शत्रूंपासून मुक्त होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यांना आपले मित्र बनविणे होय. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) 'बंगदर्शन' या वृत्तपत्राचे संस्थापक कोण ?* बंकिमचंद्र चट्टोपाध्याय *२) भारतीय अवकाश कार्यक्रमाचे पितामह कोण ?* विक्रम साराभाई *३) एएचक्यूचं विस्तारित रूप काय ?* आर्मी हेड क्वार्टर्स *४) छत्तीसगड या राज्यात किती जिल्हे आहेत?* २७ *५) अरवली पर्वत कुठे आहे ?* राजस्थान *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= * रत्नाकर कदम चोळखेकर * संतोष पाटील साखरे * सुभाष जाधव * सचिन वाघ * उदय मोहिते * अशोक जायवाड * साईनाथ वाघमारे * प्रकाश कल्याणकार * अशोक मुदलोड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *विश्वास* आपल्या स्वप्नांवर ज्यांचा विश्वास आहे त्यांचे भविष्य निश्चित खास म्हणजे खास आहे ज्याला कधीही चांगले स्वप्न पडतात त्यांचे स्वप्न कधीतरी नक्की खरे ठरतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 07* *माया छाया एक सी* *बिरला जाने कोय...* *भागत के पीछे लगे,* *सन्मुख भागे सोय...* अर्थ: संपत्ती आणि पडछायेचा स्वभाव एक सारखा असतो. दोन्हीच्याही ठाई चंचलता ओतप्रोत भरलेली आहे. फारच कमी माणसांना दोन्हींचा चल स्वभाव लक्षात येतो. मात्र अज्ञान व हव्यासासापोटी माणसं ऊर फुटेस्तोवर यांच्या मागे लागतात आणि या दोघी जणी पुढे पुढेच धावत असतात. मोहापोटी माणूस आवश्यकतेपेक्षा अधिक संपत्तीच्या संग्रहाच्या मागे लागलेला आहे. चालता चालता माणूस संगत करणार्या सावलीकडे वळून मागे पाहतो तर सोबत असणारी सावली दूर दूर जायला लागते. संपत्तीचेही तसेच आहे. तिच्याकडे वळून पाहिले की तीही दूर जावू लागते. न थांबता आपल्या कर्तव्य पथावर धवणार्या माणसांच्या मागे निमुटपणे संपत्ती आणि सावली पाठीराख्यांसारख्या धावत असतात. म्हणून माणसानं कर्मावर ध्यान देवून संपत्तीचा मोह नाही दाखवला की ती सावलीसारखी आपोआप मागेमागे येत असते. निर्मोही व कर्तव्य तत्पर माणसेच लक्ष्मीपुत्र असतात. धन मोही मात्र लक्ष्मीदासंच समजावेत. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= आपण कुणालातरी नाव ठेऊन त्याचा अपमान करुन स्वत: मी काही वेगळा आहे असे जेव्हा आपल्याला वाटते तेव्हा तुम्ही त्यांच्यातील चुका सुधारण्यासाठी प्रेरीत करत आहात हे निश्चित आहे. परंतू आपल्यातल्या दोषांना किंवा चुकांना वृध्दींगत करण्याची संधी देत आहात हे लक्षात असू द्या. कारण आपल्या दोषांना सुधारण्यासाठी संधीच देत नाही. इतरांचे ऐकून घेण्यासारखी मनस्थिती नसते. इतरांचे दोष काढण्यात धन्यता मानता त्यामुळे इतरांना संधी मिळते तर आपली संधी आपल्याच गर्वापायी सुधारण्याची संधी गमावली जाते. असे न करता पहिल्यांदा आपल्यातील दोष शोधून आपणच सुधारण्याची संधी शोधली म्हणजे इतरांना उपदेश देण्याइतपत हक्क आपल्याला कदाचित मिळेल. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपदेश - Preaching* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *करावं तसं भरावं* उन्हाळ्याचे दिवस होते. सूर्य डोक्यावर आला होता. एक वाटसरू आपल्या गांवाकडे चालला होता. दमलेल्या, थकलेल्या त्या वाटसरूची नजर एका डेरेदार आंब्याच्या झाडाकडे गेली. त्या झाडाची जमिनीवर चांगली सावली पडली होती. झाडाखाली थोडावेळ विश्रांती घ्यावी म्हणून तो झाडाखाली आडवा झाला. थोड्या वेळातच त्याला झोप लागली. त्या झाडावर एक कोकिळा रहात होती. ती परोपकारी होती. वाटसरूच्या तोंडावर ऊन यायला लागले हे पाहून त्या वाटसरूला सावली कशी मिळेल याचा ती विचार करू लागली. तिला एक कल्पना सुचली. आपले पंख पसरून तिने वाटसरूवर सावली धरली. पण एका दुष्ट कावळ्याला हे पहावलं नाही. कोकिळेला त्रास व्हावा या उद्देशाने त्याने तोंडात धरून आणलेला हाडाचा तुकडा त्या वाटसरूच्या तोंडावर टाकला आणि स्वतः त्या झाडाच्या वरच्या शेंड्यावर जाऊन कोकिळेची होणारी फजिती बघत बसला. हाडाचा तुकडा तोंडावर पडताच वाटसरू जागा झाला. त्याने वर पाहिले त्याला कोकिळा दिसली. संतापून त्याने बाजूला पडलेला दगड उचलला आणि जोराने कोकिळेच्या दिशेने फेकला. दगड इतका जोरात गेला की कोकिळेवरचा नेम चुकून तो वरच्या फांदीवर बसलेल्या कावळ्याला लागला आणि तात्काळ त्याचा मृत्यू ओढवला. *तात्पर्य – करावं तसं भरावं.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड.* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment