✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 29/11/2018 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी : १७७७ - सान होजे, कॅलिफोर्नियाची एल पेव्लो दि सान होजे दि ग्वादालुपे या नावाने स्थापना. हे गाव वजा वस्ती अल्ता कॅलिफोर्नियातील (वरचे कॅलिफोर्निया) पहिली नागरी वस्ती होय 💥 जन्म :- १४२७ - झेंगटॉँग, चीनी सम्राट. १८०२ - विल्हेल्म हाउफ, जर्मन कवी. १८०३ - क्रिस्चियन डॉपलर, ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ. १८४९ - सर जॉन अँब्रोझ फ्लेमिंग, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ. १८५६ - थियोबाल्ड फोन बेथमान हॉलवेग, जर्मनीचा पाचवा चान्सेलर. १८९५ - विल्यम व्ही.एस. टबमॅन, लायबेरियाचा १९वा राष्ट्राध्यक्ष. १८९८ - सी.एस. लुईस, आयरिश लेखक. १९०८ - एन.एस. क्रिश्नन, तमिळ चित्रपट अभिनेता. १९३२ - जाक शिराक, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष. १९६१ - टॉम साइझमोर, अमेरिकन अभिनेता. 💥 मृत्यू :- ७४१ - पोप ग्रेगोरी तिसरा. १२६८ - पोप क्लेमेंट चौथा. १३१४ - फिलिप चौथा, फ्रांसचा राजा. १९५९ - गोविंद सखाराम सरदेसाई - मराठी इतिहासकार २०११ - इंदिरा गोस्वामी, आसामी साहित्यिक, कवयित्री *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई - शिक्षणाची वारी चौथ्या टप्याला मुंबईत उत्साहात सुरुवात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मध्यप्रदेश आणि मिझोरममध्ये सरासरी 75 टक्के मतदान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नवी मुंबई : बाजारसमितीमधील माथाडी कामगारांसह व्यापाऱ्यांच्या मागण्या मान्य, पणनमंत्री थोड्यावेळात बाजारसमितीमध्ये येऊन करणार घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नवी दिल्ली- यूपीएसीच्या चेअरमनपदी अरविंद सक्सेना यांची नियुक्ती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *गोवा - आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पटकथाकार सलीम खान यांचा सन्मान; मुलगा अरबाजनं स्वीकारला पुरस्कार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *अरुणाचलमध्ये भूकंपाचे धक्के, 5.5 रेश्टर स्केल तीव्रतेची नोंद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *Hockey World Cup 2018 : भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गोलचौकार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जगाला प्रेम अर्पावे .....!* http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• इंदिरा गोस्वामी इंदिरा गोस्वामी ह्या आसामी लेखिका, कवयित्री व संपादिका होत्या. आसामी साहित्यातील त्यांचे योगदान साहित्य अकादमी पुरस्कार (इ.स. १९८३) व ज्ञानपीठ पुरस्कार (इ.स. २०००) देऊन गौरवण्यात आले. साहित्य वर्तळात या मामुनी रायसोम गोस्वामी या नावाने ओळखल्या जात. 'युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम' (उल्फा) आणि केंद्र सरकारदरम्यान शांतता-करार करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. इंदिरा गोस्वामी यांच्या पित्याचे नाव उमाकांत गोस्वामी आणि मातेचे अंबिकादेवी गोस्वामी. गोहत्तीतल्याच टी.सी. गर्ल्स हायस्कूलमधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. इ.स. १९६२ मध्ये त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले. इ.स. १९६५ मध्ये दाक्षिणात्य अभियंता माधवन रायसोम अय्यंगार याच्याशी त्यांनी विवाह केला. लग्नाच्या अठरा महिन्यांत त्याच्या पतीचे कार अपघातात निधन झाले. इ.स. १९६८ ते १९७१ मध्ये आसामातील गोलपारा सैनिकी शाळेत शिक्षिका म्हणून काम केले. १९७१ मध्ये दिल्ली विश्वविद्यालयाच्याआधुनिक भारतीय भाषा विभागात त्यांनी अध्यापनाचे काम चालू केले. तुलसीदासविरचित रामायण आणि आसामी भाषेतील माधव कंदली यांचे रामायण यांचा तौलनिक अभ्यास करून इ.स. १९७३ साली त्यांनी गोहत्ती विद्यापीठाची डॉक्टरेट मिळवली. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपले सत्यस्वरुप सिध्द करण्यास सोन्याला अग्नीत शिरुन दिव्य करावे लागते व हिऱ्याला घणाचे घाव सोसावे लागते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• १) 'तत्वबोधीनी सभा' या संस्थेचे स्थापना वर्ष कोणते? १८४० *२) अरवली आणि सातपुडा पूर्वघाटाच्या उत्तरेला आणि हिमालयाच्या पायथ्यापासून दक्षिणेला असणार्या भू-भागाला काय म्हणतात ?* मैदानी प्रदेश *३) १९५७ मध्ये तुर्भे येथे कोणत्या संस्थेची स्थापना झाली ?* भाभा अँटॉमिक रिसर्च सेंटर *४) दुसर्या पंचवार्षिक योजनेत कोणत्या क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य देण्यात आलं होतं ?* अवजड उद्योग *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● योगेश खवसे ● साईनाथ बोईनवाड ● पोतन्ना गुंटोड ● प्रमोद पाटील बोमले *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खुळ* एखाद्याच्या डोक्यात एकच एक खुळ असते ते काही निघत नाही मनात पक्क मूळ असते मनातलं काढल्या शिवाय डोक्यातून जात नाही मन शांत झाल्या शिवाय समाधान होत नाही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *या जगात संपूर्ण निष्पाप कोण? तर एकही नाही. या पृथ्वीवर कोणीही नाही. उलट, पापालाच सुखाचे साधन मानणारे सर्वत्र आहेत. सर्व प्रार्थना मंदिरात रोज तथाकथित पुण्यचिंतनात वेळ घालवणारे किंवा भक्तीचे भस्म अंगाला फासणारे यापैकी कुणीही पूर्ण शुद्ध नाही. म्हणूनच की काय गीतापुरूष कृष्ण म्हणतात..... ब-या-वाईटासह अर्थात शिव-अशिवासह जो असतो तो पुर्ण पुरूष. प्रत्येकामध्ये काही ना काही दोष आहेतच, संपूर्ण निर्दोष असा माणूस सापडणे शक्य नाही. या दोषांनाच आपण पाप समजतो. बहुजनांच्या हितासाठी प्रसंगी खोटं बोलावं लागत असेल तर ते पाप नाही, असं सांगितलं जातं.* *राष्ट्रभक्त सैनिकालाही शत्रूच्या तावडीत असताना सतत खोटं बोलून खरी माहिती लपवायची असते. त्यासाठी तो वाट्टेल ते हाल भोगायला सिद्ध असतो. पांडव ज्येष्ठ बंधू धर्मराजाला 'नरो वा कुंजरो वा' असे मोघम उत्तर हेतुपूर्वक द्यावे लागले. युद्धात आणि प्रेमात सारं काही माफ असतं म्हणतात. असो, आपला मुद्दा आहे जगी सर्व निर्दोष असा कोण आहे? कुणीही नाही. काही अतिजागृत देवस्थाने संपत्तीने तुडुंब भरत आहेत. दानातील नोटा आणि सुवर्ण मोजायला यंत्रे लावावी लागत आहेत. कुठून आला हा पैसा, देवळाबाहेर भुकेलं तान्हं घेऊन माय पेलाभर दूधासाठी लोकांच्या पायापोटी पडत आहे. तिला बाजूला हाकलून दगडाच्या देवाचे शुद्ध दूधाने अभिषेकांवर अभिषेक होत आहेत. माझ्या मते हेच महापाप आहे..* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• हिन्दू कहें मोहि राम पियारा, तुर्क कहें रहमाना, आपस में दोउ लड़ी-लड़ी मुए, मरम न कोउ जाना। सारांश महात्मा कबीर चराचरात ईश्वर पाहतात. सर्वांठायी परमात्म्याचा अधिवास असतो. मानवाठायी असणारं चैतन्य म्हणजेच परमात्म्याचं रूप नाही का ? आमच्या उपासनेच्या पद्धती भिन्न आहेत. कोणत्याही धर्म पंथाचा माणूस असो त्याचा जन्म आणि मृत्यू भिन्न असतो का ? माणूस जन्माला आल्यानंतर त्याच्यावर त्या त्या धर्म पंथाचे संस्कार बिंबवले जातात. खरे तर माणूस जन्माला येतो माणूस म्हणूनच परंतु त्याच्यावर जाती, धर्माचे, पंथाचे जे संस्कार केले जातात ती सर्व कृत्रिमता आहे. ती कुठल्या तरी भितीपोटी, समुहाच्या वेगळेपणासाठी निर्माण केलेली ही वरवरची व्यवस्था आहे. तिला कुठलाही शाश्वत आधार नाही आहे. शाश्वत व अंतिम सत्य माणूस हा माणूस व मानवता हाच त्याचा धर्म आहे. सर्वांच्या निर्मिती पासून विसर्जनापर्यंत त्याचा माती हाच आधार आहे. हे शाश्वत सत्य सर्वांना कळतंय पण वळत नाही. अशी वास्तविकता आहे. जे स्वतःला हिंदू म्हणवून घेतात त्यांना राम प्रिय आहे. जे स्वतःस मुसलमान मानतात त्यांना रहिम प्यारा आहे. राम आणि रहिम हे दोन्ही मानव कल्याणासाठी झिजले. त्यांच्या कृर्तृत्वातून आदर्श जीवनाचा बोध मिळतो. त्यांनी माणसामाणसात भेदभाव केल्याचे इतिहास सांगत नाही. तरी त्यांच्या नावावरून दंगली घडणे मानवतेला अशोभनीय आहे. त्यांची नावं घेवून लढाया करणार्यांना विशाल अशा मानवता धर्माचं खरं स्वरूप व मानव कल्याणाचं मर्मच कळलेलं नाही. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्या व्यक्तीच्या मनात संशयाने घर केलेले असेल तर त्याचे जीवन जगणे अवघड होऊन बसते.त्याच्या मनात नेहमी कोणत्याही व्यक्तीबद्दल संशयी दृष्टीनेच पाहतो.अशा पाहण्याने स्वत:च्या जीवनाचे नुकसान तर होतेच पण इतरांच्या जीवनातही संशयाचे विष कालवून त्याचे मनही अस्थिर करुन टाकते.अशा परिस्थितीत मग चांगले जीवन जगायला अवघड जाते.अशा संशयी व्यक्तींच्या सानिध्यात न राहणेच योग्य ठरेल.संशय हा संशयी व्यक्तींचा मित्र असतो तर इतरांचा शत्रू.म्हणून अशा शत्रूला आपल्यापासून चार पाऊले दूरच ठेवायला हवे. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संशय - Doubt* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मानवतेचा धर्म* एकदा एका उंदराने हिरा गिळला. हिऱ्याच्या मालकाने त्या उंदिराला मारण्यासाठी एका शिकाऱ्याला कंत्राट दिले. शिकारी जेव्हा त्या उंदिराला मारण्यास पोहचला तेव्हा सगळे उंदिर एक घोळका करून एका दुसऱ्यावर चढून दाटीवाटीने बसले होते, पण एक उंदिर त्यांच्यापासून वेगळा बसला होता. शिकाऱ्याने सरळ जाऊन त्या वेगळ्या बसलेल्या त्याच उंदिराला पकडले ज्याने हिरा गिळला होता. हिरामालक आश्चर्यचकित झाला त्याने शिकाऱ्यास विचारले, तुम्ही हजारो उंदरातून ज्याने हिरा गिळलाय त्याच उंदराला कसे काय ओळखले? शिकाऱ्याने उत्तर दिले खूप सोपं काम होत, जेव्हा मूर्ख धनवान बनतो तेव्हा तो इतरांशी संपर्क तोडतो..! आयुष्यात धन, दौलत, ऐश्वर्य, संपत्ती,नाव आणि सगळं काही कमवा पण आपण ज्या समाजात वाढलो, जगलो, मोठे झालो, त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. आपण ह्या समाजामुळेच मोठे झालो हे कधीच विसरू नका.. नाहीतर त्या मूर्ख उंदिरामध्ये आणि आपल्यात काहीच फरक उरणार नाही..! माणसे जोडा मानवता हाच धर्म. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment