✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 30/11/2018 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १८७२ - पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना स्कॉटलंड वि. इंग्लंड हा हॅमिल्टन क्रेसेंट, ग्लासगो येथे खेळला गेला. 💥 जन्म :- १८१७ - थियोडोर मोम्सेन, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन लेखक. १८५८ - जगदीशचंद्र बोस, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ. १८६९ - गुस्ताफ डालेन, नोबेल पारितोषिक विजेता स्वीडिश भौतिकशास्त्रज्ञ. १९१५ - हेन्री टॉब, नोबेल पारितोषिक विजेता कॅनडाचा रसायनशास्त्रज्ञ. 💥 मृत्यू :- २०१२ - विजय देवधर, मराठी लेखक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *पंतप्रधान मोदी जी20 परिषदेसाठी अर्जेंटिनात पोहोचले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण! सरकारचा कृती अहवाल सादर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *सावंतवाडी : परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटीचे खासगीकरण करण्याचा घाट घातला आहे. मात्र हा त्याचा डाव हाणून पाडल्या शिवाय राहणार नाही असा इशारा मनसे एसटी कामगार सेनेचे राज्य अध्यक्ष हरी माळी यांनी दिला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *आंध्र प्रदेश : श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग सॅटेलाइटचे (HysIS) होणार प्रक्षेपण.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *म्हाडाच्या घरांच्या किमती आणखी तब्बल १० टक्क्यांनी होणार कमी, अत्यल्प, अल्प, मध्यम गटातील अर्जदारांना मोठा दिलासा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *लाखो शेतकऱ्यांचा राजधानीत हल्लाबोल; आज घालणार संसद भवनाला घेराव !* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *पुणे ओपन आयटीएफ महिला टेनिस : अंंकिता रैना, करमन कौर यांना दुहेरी मुकुटाची संधी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शिक्षक-विद्यार्थी संबंध* http://nasayeotikar.blogspot.com/2018/05/blog-post_26.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• डॉ. सर जगदीशचंद्र बोस हे एक भारतीयजीवशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञतसेच पुरातत्त्वज्ञहोते. पूर्व बंगालमधील डाक्का जिल्ह्यातील राणीखल या खेडेगावात ३० नोव्हेंबर १८५८ रोजी जगदीशचंद्र बोस यांच्या जन्म झाला. त्यांचे वडील भगवानचंद्र बसू हे सरकारी नोकरीत सब डिव्हिजनला आॅफिसर होते. त्या काळी इंग्रजीत जसे ठाकूरचे टागोर झाले, राय आडनावाचे रे झाले तसेच बसू आडनावाचे इंग्रजी स्पेलिंग बोस झाले. जगदीशचंद्रांचे घराणे हे बंगाल प्रांतातील एक खानदानी घराणे होते. त्यांची आई साध्वी व सुशील होती. लहानपणापासूनच जगदीशचंद्र आजूबाजूचा निसर्ग पहायचे, त्याचे निरीक्षण करायचे. निसर्गातील अनेक गोष्टी पाहून त्या अशाच का, असा प्रश्न त्यांना पडे. भगवानचंद्र सुद्धा न कंटाळता छोट्या जगदीशने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत असे. सर्व झाडे एकाच वेळी का फुले देत नाहीत? एखाद्या झाडाची पालवी पोपटी हिरवी पण दुसर्याची तांबूस? असा फरक का पडतो असे त्यांना वाटे. झाडे, फुले, फुलपाखरे, भोवतीचा निसर्ग यांचे निरीक्षण करणे हा त्यांचा आवडता छंद होता. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या आचरणाचा प्रभाव आपल्या भाषणापेक्षा अधिक होतो . *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) कोंबडी संशोधन केंद्र कोठे आहे ?* हैदराबाद *२) पहिली कापड गिरणी कोठे आणि कधी सुरू झाली ?* मुंबई १८५४ *३) विदर्भातील प्रसिद्ध 'आनंद सागर' कोठे आहे ?* शेगाव *४) आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म कुठला ?* शिरढोण, जि.रायगड *५) 'भारताचे पॅरिस' ही कोणत्या शहराची ओळख आहे ?* मुंबई *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● शंकरराव कुंटुरकर ● राजेश्वर येवतीकर ● राजू दरेकर ● देवराव पिंगळेकर ● विलास वाघमारे ● रवी भुगावार ● उमेश खोकले *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *इमानी* मी शोधले सर्वत्र कुठे इमान आहे भेटलो इमानी म्हणून तोही बेईमान आहे वाटले इमानी जगाला तेही बेइमान आहेत असे हे सारे इमानी इथे गुमान आहेत शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माणसाने माणसांशी, सर्व प्राणीमात्रांशी आणि निसर्गाशी माणसासारखं वागावं ही आपल्या धर्माची शिकवण आहे. सृष्टीतलं चैतन्य म्हणजे ईश्वर ! सर्वसामान्य माणसाला देवाची उपासना करणं सोपं जाईल म्हणून सगुण साकार म्हणजेच मूर्तीची पूजा सुरू झाली. मंदिरातल्या मुर्तीचं पावित्र्य जपायचं असेल तर स्त्री-पुरूष कोणालाच गाभा-यात प्रवेश द्यायचा नाही, मुर्तीला स्पर्श करू द्यायचा नाही हे समजण्यासारखे आहे. मंदिरातल्या वातावरणाचं पावित्र्य राखलं जावं, कुठले कपडे घालून देवदर्शनाला मंदिरात जावं हे भान प्रत्येकाला असणं आवश्यक आहे. कालबाह्य रूढी-परंपरा सोडून दिल्या तरच पुढच्या पिढीला हा धर्म, ही संस्कृती आपली वाटेल.* *माणिक वर्मा यांनी गायलेलं, ' क्षणभर उघड नयन देवा !' हे गीत आठवतं. या रचनेत कवी देवाला डोळे उघडायला सांगत नाही, तर देवदर्शनासाठी आलेल्या एका अंध व्यक्तिसाठी ही प्रार्थना करीत आहे. त्या अंध व्यक्तिचे क्षणभर तरी डोळे उघडून त्याला तुझं दर्शन दे, अशी प्रार्थना कविराज करत आहे. स्त्रियांवर होणारे आत्याचार, अन्याय थांबव.. ते करणारांचे डोळे क्षणभर तरी उघड, अशी प्रार्थना नवरात्राच्या निमित्ताने दुर्गादेवीपाशी करावीशी वाटते.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• निश्चल काल गरासही, बहुत कहा समुझाय । कहे कबीर मैं का कहुॅ, देखत ना पतियाय । सारांश जन्माला आलेल्या जीवाचा मृत्यू अटळ आहे. जन्माला आलेल्या कोणालाही चिरंजीविता अशक्य आहे. कुणाचा नंबर आज लागला तर कोणी उद्या निश्चित जाणार आहे. ही बाब महात्मा कबीर लक्षात आणून देतात. वारंवार मृत्यूची अटळता नजरेसमोर येवूनही लोक विश्वास करत नाहीत. मृत्यू कधी आणि कोणत्या रुपाने पुढ्यात उभा टाकेल ? हे सांगता येणं कठीण आहे, परंतु तो येणार आहे. तेव्हा आपल्याला मिळालेल्या जीवनाचा सदुपयोग केला . सत्कार्यानं खारीचा का होईना वाटा उचलून जीवनानंद निर्माण करता आला. तर आपल्या जगण्याचा सुगंध सर्वत्र दरवळेल. दुसर्याच्या जगण्यालाही उल्हसित करेल. माणूस देहरुपानं जरी गेला तरी त्याच्या विचारानं चिरंजिव राहू शकतो. आपल्या पश्चातही या विश्वात विचाराच्या चैतन्याचं चांदणं देत राहून दुःखी व अज्ञानी जीवाच्या जीवनातील अंधःकार नक्कीच नाहिसा करू शकतो. तेव्हा अमूल्य असा मानव जन्म सार्थकी लावणं सर्वतोपरि आपल्या हातात आहे. त्याचा योग्य सदुपयोग करून घेता आला पाहिजे. सन्मार्ग दाखवणं हे सज्जनाचं काम आहे.शेवटी काय साध्य करायचं ते आपआपल्या विचारधारेवर अवलंबून असतं. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मनुष्याच्या जीवनातला सर्वात मोठा, महत्त्वाचा आणि मौल्यवान जर कुठला दागिना असेल तर तो म्हणजे नम्रता हा आहे. ज्यांच्या अंगी नम्रता असेल ती व्यक्ती महनीय आणि वंदनीय असते.ती व्यक्ती केवळ नम्रतेमुळे इतरांच्या हृदयावर राज्य करु शकते. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नम्रता - Humility* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वार्थी मित्र* दोन मित्र एकदा एकाच गावाकडे जायला एकत्र निघाले होते. जंगलातून जात असताना त्यातील एकाची नजर रस्त्यात पडलेल्या एका रेशमी थैलीकडे गेली. त्याने ती लगेच उचलली. त्याने ती उघडून बघितली तर त्यात काही सुवर्ण मोहोरा होत्या. '' वा! काय नशीब आहे माझे!! मला चक्क सोन्याच्या मोहोरांनी भरलेली थैली सापडली आहे.'' त्याचा मित्र त्याला म्हणाला, '' मला सापडली असे म्हणू नको. आपल्याला सापडली, असे म्हण. जेव्हा दोन वाटसरू एकत्र जात असतात तेव्हा फायद्यात किंवा संकटात दोघांचा समान हिस्सा असतो.'' ''नाही, नाही'', थैली सापडलेला मित्र रागाने म्हणाला. ''ही थैली मला सापडली आहे. ती मी माझ्यापाशीच ठेवणार.'' दुसरा मित्र यावर काही बोलला नाही. ते दोघे काही अंतर चालून गेल्यानंतर त्यांना जंगलातील डाकूंनी घेरले. ज्याच्याजवळ सुवर्ण मोहोरांची थैली होती तो घाबरला व हळूच दुसर्या मित्राला म्हणाला, ''आता जर आपल्याला सापडलेली सोन्याच्या मोहोरांची थैली यांना सापडली तर आपली खैर नाही.'' दुसरा मित्र शांतपणे म्हणाला, ''नाही, नाही आपली नाही, तर तुझी खैर नाही, कारण काही वेळापूर्वी तूच म्हणालास की थैली माझीच आहे.'' *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment