✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 27/11/2018 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक ठळक घडामोडी :- १९९५ - तलत महमूद यांना मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर 💥 जन्म :- १८४३ - कॉर्नेलियस व्हान्डरबिल्ट तिसरा, अमेरिकन उद्योगपती. १९०३ - लार्स ऑन्सेगर, नोबेल पारितोषिक विजेता नोर्वेचा रसायनशास्त्रज्ञ. १९८६ - सुरेश रैना, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९७८ - लक्ष्मीबाई केळकर, भारतीय समाजसेविका, राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *राज्यस्तरीय गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेचा आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, 3 कोटी 38 लाख बालकांना लसीकरणाचे उद्दिष्ट; आरोग्यमंत्र्यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *29 नोव्हेंबरला दोन्ही सभागृहात मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक मांडणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नवी दिल्ली - मध्य प्रदेश आणि मिझोराममधील विधानसभा निवडणुकीचा प्रचार काल संध्याकाळी थांबला, 28 नोव्हेंबरला होणार मतदान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नवी दिल्ली: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांचे वय 25 वर्षांवरुन 18 वर्ष करण्याच्या मागणीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *विधीमंडळाचे कामकाज सुरु होताच विरोधक आक्रमक, दुष्काळग्रस्तांना तातडीनं मदत देण्याची मागणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुरबाडच्या हरिश्चंद्रगड गडावर अडकलेल्या 20 पर्यटकांची सुटका* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ * इंग्लंडने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेवर 3-0 ने मात करीत 55 वर्षांनंतर परदेशात प्रतिस्पर्धी संघाला दिली क्लीन स्विप* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://sharechat.com/post/OaJAj9J Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *धार्मिक स्थळी मोबाईलवर बंदी का ?* https://nasayeotikar.blogspot.com/2018/11/blog-post_26.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हरिवंशराय बच्चन* हरिवंशराय बच्चन हे हिंदीतील प्रथितयश कवी, साहित्यिक आहेत. हरिवंशराय यांचा जन्म अलाहाबादनजीकच्या प्रतापगड जिल्हय़ातील बाबूपट्टी या छोट्याशा गावात झाला. त्यांच्या पित्याचे नाव प्रताप नारायण श्रीवास्तव आणि आईचे नाव सरस्वतीदेवी होते. सरस्वतीदेवींच्या पोटी जन्मलेल्या या पुत्राला खरोखर सरस्वतीदेवी प्रसन्न होती, असेच म्हणावे लागेल. त्यांना लहानपणी 'बच्चन' असे म्हटले जात होते. याचा अर्थ 'बच्चा' किंवा 'अपत्य' असा होतो. नंतर मात्र याच नावाने ते ख्यात झाले. त्यांनी कायस्थ शाळेत प्रथम उर्दूमधून शिक्षण घेतले. तसेच प्रयाग विश्वविद्यालयातून इंग्रजीत एम.ए. आणि केंब्रिजमधून इंग्रजी साहित्यातील कवी डब्ल्यू. बी.यीट्स यांच्या कवितांवर संशोधन करून पीएचडीची पदवी घेतली. १९२६ मध्ये वयाच्या १९ व्या वर्षी त्यांचा विवाह श्यामा बच्चन यांच्याशी झाला. त्यावेळी त्या अवघ्या १४ वर्षांच्या होत्या. पण, श्यामा यांचे क्षयरोगाने निधन झाले आणि पाच वर्षांनी हरिवंशराय यांनी पंजाबी तरुणी तेजी सुरी यांच्याशी विवाह केला. त्याचवेळी त्यांनी कवितालेखनाला सुरुवात केली होती. त्यांना अमिताभ आणि अजिताभ असे दोन पुत्र झाले. तेजी बच्चन यांच्यात अभिनयाचा गुण होता. त्यांनी हरिवंशराय यांनी अनुवादित केलेल्या शेक्सपियर नाटकात काम केले होते. साहित्यात हरिवंशराय यांचे योगदान अमूल्य असे मानले जाते. त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवायही त्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले. त्यांची 'मधुशाला' ही साहित्यकृती तर अजरामर ठरली आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) हंगामी राष्ट्रपतीचा कार्यकाळ किती असतो ?* सहा महिने *२) राज्य पुनर्रचना तत्त्वानुसार आंध्र राज्याची स्थापना कधी झाली ?* १ ऑक्टो.१९५३ *३) राज्यसभेत जास्तीत जास्त सभासद संख्या किती असते ?* २५० *४) प्रशासनाचा औपचारिक आणि घटनात्मक प्रमुख कोण ?* राष्ट्रपती *५) सर्वोच्च न्यायालयात न्यायदानाचे काम करणार्या न्यायाधीशांना वकिली करण्याचा किती वर्षांचा अनुभव आवश्यक असतो ?* 10 *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● अनिता जावळे - वाघमारे ● दीपक जाधव ● लिंगन्ना गुंटोड ● लोकडेश्वर बोमले ● पोषट्टी जाजेवार ● पंकज शेठिया ● ओंकार बच्चूवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भरोसा* आपल्या समस्येच आपणच निराकरण करू शकतो स्वतः वर नाही मग दुस-यावर कसा भरोसा धरू शकतो दुसरे फक्त आपल्याला सल्ला देऊ शकतात कोणाचं दु:ख थोडं कोणी वाटून घेऊ शकतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *या पृथ्वीतलावर पर्वत, नद्या , स्थावर-जंगम आहे तोवर लोकसमूहात रामायणाची कीर्ती गाजत राहणार आहे.. या शब्दांत महर्षि वाल्मिकींनी रामायण कथेची कालातीत स्थिरता कोरून ठेवली आहे. या भूतलावरील प्रत्येक मानवी वृत्ती व प्रवृत्तीचं प्रातिनिधिक रूप या महाकाव्यात रंगविलं आहे. आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श सेवक, आदर्श राजा अशा आदर्शांचा प्रतिनिधी म्हणून श्रीरामाचं चरित्र आपल्यापुढं येतं. संतानी, भक्तांनी, कवींनी त्याला देवत्वाला पोहोचवलं आहे.* *रामायणातील अगतिकता नि वेदनांच्या आंतरिक संघर्षाच्या तळाशी पोहचल्याशिवाय श्रीरामाच्या मानव ते 'मर्यादा पुरूषोत्तम प्रभूराम' या देवत्वरूपाशी तादात्म्य पावताच येणार नाही. गदिमांनी गीतरामायणात प्रभूरामाच्या जीवनपटाचा माणूस म्हणून सारांश मांडताना अतिशय उत्कटतेने वलयांकित केलेले-* *'दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा* *पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.'* *हे श्रीरामाचं रूप आधिक यथार्थ वाटतं..* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आंधी आयी ज्ञान की, ढ़ाहि भरम की भीति । माया टाटी उर गयी, लागी राम सो प्रीति । सारांश जेव्हा ज्ञानाची भरती येते. तेव्हा अज्ञानाचे भ्रम चुटकीसरशी गळून जातात. ज्ञानामुळे प्रत्पेक गोष्टीमागील कार्यकारणभाव कळायला लागतात. प्रत्येक घडामोडीच्या मागे वैज्ञानिक दृष्टीने पाहिले तर भौतिक व रासायनिक क्रिया कारणीभूत असतात. त्यामागेच त्या क्रियेचं रहस्य दडलेलं असतं. हे सामान्य माणसाच्या विचार प्रक्रियेच्या बाहेरचं असलं तरी त्या मागील कारणं शोधत गेली तर कार्यकारण मिमांसा होते. प्रक्रियेमागील रहस्य उलगडताच तिच्या बाबतीत मनात निर्माण झालेले अज्ञानी व अचाट संभ्रम नाहिसे होतात. "चालता विज्ञानाची वाट तुटती अज्ञानपाश तटातट हो तसे तिमिरातूनी पहाट पुढे ज्ञानाचा लखलखाट, दाटून आलेल्या आभाळाने सगळीकडे अंधारून यावं ! विजांच्या चमचमाटाने आणि गडगडाटाने आसमंत थरारून टाकावा ! मात्र वार्याची झुळूक लागताच थेंबांचा अमृत वर्षाव होतो. आभाळ आसमंताला शितलता व नवचैतन्यानं भरून टाकावं. मग आभाळी दाटलेल्या मळभाची कणभरही तमा उरत नाही. तशीच अवस्था अज्ञानात चाचपडणार्याला ज्ञान प्राप्तीनंतर निर्माण होत असते. माया व अविचाराचा फसवा भास नाहिसा होतो. आपल्या सुंदर निसर्गाशी, ज्ञानाशी व चराचरारात भरून असलेल्या चैतन्यमय विश्वात्मक शक्तीशी समरस होत आनंदाची निर्मिती व्हायला लागते.. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्यांच्या मुखावाटे निघणारे शब्द जर अडखळत असतील तर त्या शब्दांमध्ये ठाम विश्वास नसतो किंवा मनातले विचार स्पष्टपणे मांडता येत नाहीत.अशी ज्यांची परिस्थिती झालेली असते तेव्हा एकतर मनातून खचलेला असेल किंवा कुणाच्यातरी दडपणाखाली असेल.अशा परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल तर पहिल्यांदा आपल्या मनातली जी काही भीती असेल किंवा दडपण असेल ते काढून टाकायला हवे.अशावेळी आपला आत्मविश्वास आपणच वाढवला पाहिजे.माझ्या मनावर कुणाचेही दडपण नाही किंवा जरी असले तरी ते काहीच करु शकत नाही.आपण त्याला खंबीरपणे प्रत्युत्तर देऊ आणि आपण पूवस्थितीत येऊ अशी धारणा मनामध्ये उत्पन्न करुन पूर्वीसारखे जीवन जगू असा विश्वास जागृत करायला हवा तरच मग आपल्या मुखावाटे निघणारे शब्द स्पष्टपणे यायला लागतील आणि आपले जे काही विचार असतील ते समोरच्या व्यक्तीला समजायला लागतील यात काही संशय नाही.जर आपणच घाबरायला लागलो तर समोरची व्यक्तीही आपल्याला जास्तच घाबरून टाकेल आणि आपला जो काही आत्मविश्वास आहे तोही कमी करुन टाकेल.म्हणून परिस्थिती कशीही असो त्या परिस्थितीला घाबरुन न जाता त्याला तोंड द्यायला शिकले पाहिजे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नुकसान - Damage* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दृष्टी तशी सृष्टी* एकदा भगवान श्रीकृष्णाने मोठय़ा यज्ञाचं आयोजन केलं. त्यांनी धर्मराजाला बोलावून सांगितलं, या यज्ञात एका माणसाचा बळी द्यायचा आहे. त्यासाठी एखादा दुष्ट-दुर्जन माणूस शोधून काढ. आपण त्याचा बळी देऊ. नंतर कृष्णाने दुर्योधनाला बोलावले. श्रीकृष्ण त्याला म्हणाले, 'मी एक यज्ञ करतो आहे. या यज्ञात आपल्याला एका सज्जनाचा सत्कार करावयाचा आहे. तेव्हा शक्यतो एखादा पवित्र-सज्जन माणूस शोध. आपण त्याचा यथोचित सत्कार करू.' धर्मराज एका दुष्ट माणसाच्या शोधात निघाला आणि दुर्योधन एका सज्जन माणसाच्या शोधासाठी नघाला. धर्मराजाला एकही दुष्ट माणूस सापडला नाही. तो परत आला आणि म्हणाला, 'भगवान! आपल्या राज्यात कोणीही दुष्ट नाही. आपल्याला यज्ञात बळी द्यायला माणूस अत्यावश्यक असला तर तुम्ही मलाच बळीच द्या. तुमचा यज्ञ पार पडेल.' थोड्या वेळाने दुर्योधन आला आणि कृष्णाला म्हणाला, 'देवा! मी खूप शोध घेतला पण आपल्या राज्यात मी सोडता एकही सज्जन माणूस आढळला नाही. तेव्हा एक सज्जन व्यक्ती म्हणून माझा सत्कार करावा.' तात्पर्य : विचार तशी दृष्टी *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment