✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 15/09/2018 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *राष्ट्रीय अभियंता दिवस* 💥 ठळक घडामोडी :- १९६८ - सोवियेत संघाच्या झाँड ५ या अंतराळयानाचे प्रक्षेपण १९३५ - भारतातील दून स्कूलची स्थापना १९८१ - सांड्रा डे ओ'कॉनोर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सर्वप्रथम महिला, न्यायाधीश झाली. १९८१ - व्हानुआतुला संयुक्त राष्ट्रांचे सदस्यत्व मिळाले. १९९८ - एम.सी.आय. कम्युनिकेशन्स आणि वर्ल्डकॉम या कंपनीचे एकत्रीकरण. एकविसावे शतक संपादन करा २००८ - लेहमान ब्रदर्स या कंपनीने दिवाळे काढले. २०१३ - नीना दावुलुरी पहिली भारतीय वंशाची मिस अमेरिका झाली 💥 जन्म :- १८६० - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया, भारतीय अभियंता. १८७६ - शरदचंद्र चट्टोपाध्याय, बंगाली साहित्यिक. 💥 मृत्यू :- ६६८ - कॉन्स्टान्स दुसरा, बायझेन्टाइन सम्राट. १८५९ - इझाम्बार्ड किंग्डम ब्रुनेल, ब्रिटिश अभियंता. १९७३ - गुस्ताफ सहावा ॲडॉल्फ, स्वीडनचा राजा *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांची तब्येत खालावली, गोव्यात नेतृत्वबदलाच्या हालचालींना वेग* --------------------------------------------------- 2⃣ *जगाच्या तुलनेत भारतात महागाई कमी; अर्थमंत्री अरुण जेटली यांचा दावा* --------------------------------------------------- 3⃣ *मुंबई - प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्षपदी विजयी झालो याचा आनंद आहे, आता जबाबदारी आणखी वाढली - सत्यजीत तांबे* --------------------------------------------------- 4⃣ *मुंबई : नवी मुंबईत विनापरवानगी लाऊडस्पीकर लावण्यात आलेल्या प्रार्थनास्थळांवर कारवाई न केल्याप्रकरणी पोलीस आयुक्त संजीव कुमार यांना हायकोर्टाची 'कारणे दाखवा' नोटीस* --------------------------------------------------- 5⃣ *मुंबई: गणपती विसर्जनाच्या मिरवणूकीतील डीजे आणि डॉल्बीच्या वापरास तूर्तास परवानगी नाहीच - हायकोर्ट* --------------------------------------------------- 6⃣ *सोलापूर : राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा सोलापूर ते पुणे रेल्वेने प्रवास, प्रवाशांच्या अडचणी जाणून घेतल्या.* --------------------------------------------------- 7⃣ *जपानमध्ये सुरू असलेल्या जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या श्रीकांत किदम्बीला पत्करावा लागला पराभव* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *वाचाल तर वाचाल* http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_6.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *मोरगावचा मोरेश्वर* मोरेश्वर (मोरगाव) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. अष्टविनायकातील सर्वांत पहिला गणपती म्हणून मोरगावचा मयूरेश्वर ओळखला जातो. मोरेश्वराचे मंदिर म्हणजे एक प्रशस्त गढीच आहे. मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असन ते बहामनी काळात बांधले गेले. गावाच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूंनी मनोरे आहेत. मोगल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे. देवळाच्या बाजूने ५० फूट उंचीची संरक्षण भिंत आहे. गाभार्यातील मयूरेश्वराची मूर्ती बैठी, डाव्या सोंडेची, पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे. मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले आहेत. मस्तकावर नागराजाचा फणा आहे. मूर्तीच्या डाव्या- उजव्या बाजूस ऋद्धिसिद्धीच्या पितळी मूर्ती असून पुढे मूषक व मयूर आहेत. असे मानले जाते की, पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वीतलावर उत्पात माजवला होता, त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली, तेव्हा गणपतीने मयूरावर आरूढ होऊन येथे सिंधू असुराचा वध केला. त्यामुळे गणपतीला येथे मयूरेश्वर असे नाव पडले. या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे त्याला मोरगाव असे म्हणतात. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= " आपल्याला न आवडणारे विचार देखील आपल्यावर हुकुमत गाजवून जातात " *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) 'थिऑसॉफकल सोसायटी' या आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक संस्थेचं मुख्यालय कोठे आहे ?* चेन्नई *२) बल्लारपूर हे शहर कशासाठी ओळखलं जातं ?* कागदाचा कारखाना *३) लोकांनी निवडून दलेल्या शासनव्यवस्थेला काय म्हणतात ?* लोकशाही *४) बिहार राज्याची राजधानी कोणती ?* पाटणा *५) सुपरसॉनिक आवाजाचे एकक कोणते ? मॅश *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ● श्रीनाथ येवतीकर ● डॉ. हंसराज वैद्य ● मनोज साळवे ● अभिमन्यू चव्हाण ● शीतल वाघमारे ● विजय धडेकर ● एकनाथ जिंकले ● माधव पांगरीकर ● राजेंद्र होले *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *काम क्रोध मोह* काम क्रोध मोह हे विनाशाचे द्वार आहेत जेवढे वाढतील तेवढे डोक्यावर भार आहेत काम क्रोध लोभाने डोक्यावर भार होतो अती झाले म्हणजे केवढाही गार होतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 17* *सुखिया सब संसार है* *खावै और सोवे |* *दुखिया दास कबीर है* *जागे अरु रावे |* अर्थ महात्मा कबीर मानवाच्या विचित्र वागण्यावर टिप्पणी करताना म्हणतात की, ' प्राणी सुलभ स्वभावानुसार मणुष्य प्राणीही खाणे, पिणे आणि झोपणे यातच धन्यता मानत असेल. माणसाला इत्तर प्राण्यांपेक्षा बोली आणि बुद्धीचं जे आगळंवेगळं वैभव प्राप्त झालेलं आहे. त्याचा पुढच्या पिढीला फायदा करून देणार की नाही ? मानवाने बुद्धी चातुर्याच्या बळावर आपल्या पुढील पिढ्यांना संस्कार म्हणून अनुभवाची शिदोरी द्यायला हवी. सामान्य माणूस स्वतःतच गुंग असतो. मनुष्य जन्माचं सार्थक व्हावं.हा मानव रूपी अनमोल जन्म विश्व कल्याणासाठी आपणास प्राप्त झाला आहे. या संपूर्ण जगाची चिंता वाहण्याचं काम संत सज्जनंच करीत असतात. अज्ञानात आनंद मानणार्या सकल जणांना जागृत करण्याचं व माया मोहातून उद्भवणार्या दुःखाप्रति सर्वांना सजग करण्याचं महान कार्य संत करीत असतात. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= आपण जर पाहिले असेल तर मुंगी आणि कासव या दोघांची चालण्याची आणि धावण्याची गती ही सारखीच असते. त्यांच्यामध्ये कधीच हावरेपणा नसतो. त्यामुळेच ते त्यांच्या जीवनात यशस्वीच होतात. ते कुणाचीही बरोबरी करता नाही किंवा जो कोणी एखादा पुढे जात असेल तर त्यांची बरोबरीही करीत नाही. फक्त ते एवढेच करतात की, आपल्या जीवनाचे ध्येय हे एखादे काम फत्ते करायचे असेल तर मनाची पूर्ण तयारी आणि आपल्या कृतीत सातत्य असले की, आपण चालत असलेल्या मार्गावरुन कोणीही रोखू शकत नाही त्यामुळे जीवन जगण्याची यशस्वीता त्यांना निश्चितपणे साधता येऊ शकते. ते कधीच अति मोहाला बळी पडत नाही किंवा इतरांची ही बरोबरी करता नाहीत. अशा संयमीवृत्तीचे या पृथ्वीतलावर हे दोनच जीव पहायला मिळतात. यांचे गुण जर आपण घेतले तर आपणही आपल्या जीवनात खरी प्रगती करु शकतो. आपणही कुणाबद्दल आपल्या मनात वाईट चिंतू नये. आपण जे ध्येय डोळ्यासमोर ठेवले आहे त्याच ध्येयाने आपण चाललो तर आपलीही यशस्वीता आपल्या जीवनात सहजपणे आपल्याकडे आणता येते तेही आपल्या शांत, संयमी आणि निगर्वीपणामुळे. एखादी वरकरणी पुढे जात असेल तर जाण्यासाठी आठवायचे नाही. फक्त एक करायचे त्यांना यश कशामुळे मिळाले हा विचार करायचा आणि आपणही त्यांच्या पध्दतीने पुढे कसे जाता येईल आणि जीवन सुखी व समाधानी कसे होता येईल याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. पुढे जाणारी व्यक्ती मागच्याला नक्कीच प्रेरणा देऊन जातो. त्यांची प्रेरणा ही आपल्या यशस्वीतेकडे घेऊन जाणारी योग्य दिशा ठरू शकेल. * व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌹☘🌹☘🌹☘🌹☘🌹☘🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *सातत्य - Continuity* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *सर्वस्वाचा त्याग* देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीवावर उदार होऊन प्राणपणाने लढणाऱ्या देशभक्त क्रांतिकारकांची भूमिका ‘की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने अशी असते. देशासाठी सर्वस्वाचा त्याग करण्यास सिद्ध झालेल्या क्रांतिकारकांना स्वातंत्र्याच्या पुढे अन्य कशाचेही मोल नसते. तळहातावर शिर घेऊन प्राणपणाने झुंजणाऱ्या, दोन क्रांतिकारक भावांना जुलमी सत्तेने फाशीची शिक्षा सुनावली. प्रत्यक्ष फाशीच्या वेळेला दोघेही क्रांतिकारक बंधू निश्चल होते. त्यांनी माफीपत्र लिहून दिल्यास त्यांची शिक्षा सौम्य करण्यात येईल, पुढे कधीही उठाव न करण्याच्या बोलीवर सारी शिक्षाही माफ केली जाईल, असे प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवण्यात आले. ते सारे त्यांनी झिडकारले. आणि ‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही फासावर जात आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. ‘ असे त्यांनी गौरवाने सांगितले. धाकट्या भावाला अगोदर वधस्तंभाकडे नेण्यात आले. निघून त्याने पाहिले तर मोठ्या भावाच्या डोळ्यात असू दाटलेले त्याला दिसले. त्याचा निरोप घेत तो म्हणाला, ‘दादा वाईट .कशाचे वाटून घेतोस? अखेरची घडी आली म्हणून?’ त्यावर ताठ मानेने तो मोठा भाऊ म्हणाला, ‘अरे, नाही रे बंधुराजा डोळ्यात आलेले असू हे प्राण जाणार म्हणून आलेले नसून ते आनंदाश्रू आहेत. हुताम्य पत्करण्याची संधी तू धाकटा असूनह्री तुला प्रथम मिळते आहे, ह्याचा मला आनंद वाटला. *तात्पर्य : देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या क्रांतिकारकांना आपल्या प्राणाची आहुती देण्यातच धन्यता असते.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment