✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 28/09/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९३९ - दुसरे महायुद्ध - जर्मनीच्या सैन्याने पोलंडचीराजधानी वॉर्सॉ काबीज केली. 💥 जन्म :- १९२९ - भारताची गानकोकिळा लता मंगेशकर 💥 मृत्यू :- १९१४ - रिचर्ड सीयर्स, अमेरिकन उद्योगपती *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली- अयोध्या प्रकरणावर 29 ऑक्टोबरपासून सुनावणी घेण्याच्या निर्णयाचं आरएसएसनं केलं स्वागत* --------------------------------------------------- 2⃣ *राज्यातही सर्जिकल स्ट्राईक दिन साजरा करण्याचे आदेश. शिवसेनेच्या विरोधानंतरही सरकारचा निर्णय. २९ सप्टेंबर हा शौर्य दिन म्हणून साजरा करणार.* --------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली : केंद्र सरकारने टीव्ही, फ्रिजसह 19 ऐशोरामाच्या वस्तूंवरील सीमा शुल्कात केली वाढ, यामुळे परदेशातून भारतात आयात होणाऱ्या वस्तू होणार आणखी महाग* --------------------------------------------------- 4⃣ *स्वच्छ भारत अभियान 2018 च्या स्पर्धेत सातारा देशातील सर्वात स्वच्छ जिल्हा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार गौरव* --------------------------------------------------- 5⃣ *यवतमाळ : राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक विनय गव्हाळे एसीबीच्या जाळ्यात.* --------------------------------------------------- 6⃣ *ख्यातनाम सुप्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांचे पुण्यात अल्पशा आजाराने निधन* --------------------------------------------------- 7⃣ *आज होणाऱ्या आशिया चषकातील अंतिम क्रिकेट सामन्यात बांगलादेशपेक्षा भारताचेच पारडे जड* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= दैनिक देशदूत या प्रसिद्ध दैनिकात प्रकाशितलेख *" रांगाच रांगा "* https://www.deshdoot.com/special-blog-on-discipline-of-line-nagorao-yevatikar-nanded-latest-update/ वरील लेख वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर क्लिक करावे. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *कविता महाजन* कविता महाजन यांचा जन्म नांदेड मध्ये 05 सप्टेंबर 1967 रोजी झाला. त्या मराठी लेखिका, कवयित्री होत्या. कविता महाजनांचे शालेय शिक्षण नांदेडच्या प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयमध्ये झाले. त्यानंतर नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात आणि औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. त्या मराठी साहित्य या विषयाच्या एम.ए. होत्या. त्यांना आजपर्यंत मिळालेले पुरस्कार ● सन 2008 मध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा राज्यस्तरीय पुरस्कार ● कवयित्री बहिणाई पुरस्कार ● साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार (रजई या इस्मत चुगताई यांच्या लघुकथांच्या अनुवादाला) ● मुख्याध्यापिका शशिकलाताई आगाशे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा राज्यस्तरीय बालवाड्मय पुरस्कारासाठी ‘जोयनाचे रंग’ या कथासंग्रहासाठी. अशा या महान साहित्यिक लेखिकेचे आज पुण्यात अल्पशा आजाराने निधन झाले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= संघर्षाशिवाय कधीच, काहीच नवे निर्माण झाले नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *०१) एका बिंदूतून किती रेषा काढता येतात ?* अनंत *०२) भारतातील सर्वात मोठे थरचे वाळवंट कोणत्या राज्यात आहे ?* राजस्थान *०३) जगामध्ये एकूण किती खंड आहेत ?* सात *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ● अरुण जांभळे ● सचिन बावणे ● साईनाथ कानगुलवार ● दिनेश घाटोळ ● सोमनाथ एकांडे ● प्रवीण चव्हाण ● ब्रम्हशंकर म्हात्रे ● अमोल घाटेकर ● विजय मुंडे ● विनोद नागटिळक *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *स्वच्छता* नको तिथे काही कचरा करतात केलेला कचरा काही आनंदाने भरतात कचरा करणाराला नसते काही लाज लज्जा शरम अस्वच्छता झाली म्हणून इतरांवर होतात गरम शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 27* *कुमति कीच चेला भरा* *गुरु ज्ञान जल होय |* *जनम जनम का मोर्चा* *पल में दारे धोय ||* अर्थ महात्मा कबीर मनुष्य जीवनात गुरूचे महत्त्व पटवून देतात. गुरूशिवाय शिष्य अविचाराने भरलेला जणु चिखलाने माखलेला कुंभ आहे. गुरूकडून मिळणारा उपदेश म्हणजे पाण्याचा वाहता झराच ! गुरूकडून मिळणार्या ज्ञानामुळे वर्षानुवर्षाचा जड मतीवर चढलेला मळ खळखळत्या ज्ञानरूपी पाण्यात क्षणार्धात धुवून निघत असतो. वाल्या व अंगुलीमाल पोटाच्या आगीसाठी म्हणजे कुटूंबाच्या निर्वहनासाठी लोकांना लुटण्याचा व्यवसाय करायचे. वाल्याच्या जीवनात मुनी नारदांचा उपदेश म्हणजे त्याच्या डोळ्यात घातलेलं अंजनंच ! सखोल चिंतनातून जगावर गारूड करणारं महाकाव्यंच देवून वाल्याचा वाल्मिकी होतो. दुसरीकडे लोकांना हिंसेच्या जोरावर लुटून पोट भरणारा , सगळीकडे स्वतःच्या नावाच्या दहशतीचा दरारा निर्माण करणारा अंगुलीमाल कारूण्यमयी तथागतांच्या सान्निध्यात येतो. त्यांच्या नेत्रातून वाहणारं कारूण्य व जीवनाच्या अलौकिक चिंतनाचं तेज , जग कसंही वागत असलं तरी स्वतःच्या तटस्थ व निर्विकार वृत्तीच्या तेजात अंगुलीमालाचं अज्ञान गडप होवून आजन्म अहिंसेचा अनुयायी होणं. ही गुरूंच्या कृपाशीर्वादाची अलौकिक उदाहरणे आहेत. एवढ्या महान विचारांची आमची परंपरा असताना आजही पूर्वाश्रमीच्या असंख्य वाल्या व अंगुलीमालाच्पा प्रवृत्ती विविध क्षेत्रात दडून वावरत आहेत. त्यांची लुट केवळ पोटाची भूक भागवण्यासाठी होती. हल्ली यांची मात्र साठवणूक पुढच्या पिढ्यांच्या बेगमी करता धडपड आहे. सगळ्या सुखसोयी असणारेच सुशिक्षित नेते , नोकरशहा आदि लुट व भ्रष्टाचारात माखले जात आहेत . त्यांना नारद व तथागतासारखे सद्गुरू भेटू नयेत. हे आपल्या देशाचं दुर्भाग्यंच ! सद्गुरूंच्या वेषात वावरून समाजाला दिशा देण्याचं काम करण्याऐवजी अबलांच्या असहायतेचा गैरफायदा घेत आश्रमांना वासनापूर्तीच्या कुंटनखान्याचं रूप देवून गुरू परंपरेला डागाळणारे अनेक भामटे गुरू आज गजाआड आहेत. पूर्वी गुरू म्हणजे परीस असायचे. अशा परिसाला ओळखूनच आपण त्यांच्या सान्निध्यात जायला पाहिजे हे शिष्यानं विसरता कामा नये. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जी व्यक्ती आपल्यातील असलेल्या दोषाला खतपाणी घालून पुन्हा पुन्हा त्याचे समर्थन करीत असतो त्यात सुधारणा करत नाही आणि तो आपल्या आयुष्यात कधीही सुधारत नाही अशा व्यक्तीला मुर्खच म्हणावे लागेल.कारण ती व्यक्ती दुस-याच्या जीवनात चांगल्या गोष्टी ऐवजी वाईटच गोष्टी शोधत असतो.चांगल्या गोष्टीही वाईटच दिसायला लागतात.अशा व्यक्ती चांगल्या समाजातील चांगले असलेले वातावरण बिघडून टाकण्यास कारणीभूत ठरु शकतात. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद...९४२१८३९५९०. 🌳💐🌳💐🌳💐🌳💐🌳💐 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *विसर - Forgot* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *दुसऱ्यांनी केलेल्या उपकाराचा विसर पडू नये* एकदा एका जंगलामध्ये एक लांडगा राहत होता. तो अत्यंत खादाड आणि दुष्ट होता. त्याला एकदा खूप जोर्याची भूक लागली, त्याने जंगलातले अनेक प्राणी मारून खाल्ले. पण इथेच तो अडकला. एका प्राण्याला मारल्यानंतर त्याला खाताना त्याच्या घशात त्या प्राण्याचे हाड अडकले. त्याने ते हाड काढायचा खूप प्रयत्न केला, परंतु त्याला यश मिळाले नाही. त्याच्या त्या प्रयत्नांनंतर त्याला खूप त्रास सुरू झाला. त्याला नेमके काय करावे हेच समजत नव्हते. त्याने सुरुवातीला भुरपुर पाणी पिले, परंतु त्याला यश मिळाले नाही. मग त्याने आपल्या इतर मित्रांना आपल्या घशातले हाड काढण्यास सांगितले. परंतु त्याच्या साऱ्या मित्रांनी त्याच्याकडे पाठ फिरवली. शेवटी त्याला त्याच्या डोक्यावरून एक बगळा उडत जाताना दिसला. त्याने त्या बगळ्याला आपली व्यथा सांगितली. तो म्हणाला बगळ्या तू तुझ्या त्या लांब चोचीने जर माझ्या घशात अडकलेले हे हाड काढलेस तर मी तुला बक्षीस देईन, तुझे ते उपकार मी कधीही विसरणार नाही. बगळ्याला त्याची दया आली. त्याने लांडग्याला मदत करण्याचे ठरवले. तो त्या लांडग्या जवळ आला आणि त्याने त्या लांडग्याच्या घशात आपली चोच घालून आपल्या चोचीने ते अडकलेले हाड काढले. यानंतर त्या बगळ्याने त्याला आपले बक्षीस मागितले, परंतु त्या धूर्त लांडग्याने त्या बगळ्याला चकमा देत तो तेथून फरार झाला. यानंतर काही दिवसांनंतर पुन्हा एकदा त्या लांडग्याच्या घशात हाडाचा एक तुकडा अडकला, त्याला पुन्हा बगळा दिसला, परंतु बगळ्याने यावेळेस त्याला मुळीच मदत केली नाही कारण यापूर्वी त्याच्यावर केलेल्या उपकारांना तो लांडगा विसरला होता. म्हणून लक्षात ठेवा *कधीही दुसऱ्यांनी केलेल्या उपकारांना विसरू नका.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment