✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 26/09/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- २००१ - 'सकाळ' वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संपादक - संचालक प्रताप पवार यांची इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड. 💥 जन्म :- १९२३ - देव आनंद, भारतीय, हिंदी चित्रपट अभिनेता, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक. १९३१ - विजय मांजरेकर, माजी भारतीय क्रिकेट खेळाडू. *१९३२ - मनमोहन सिंग, भारतीय माजी पंतप्रधान* 💥 मृत्यू :- १९५६ - लक्ष्मणराव किर्लोस्कर, भारतीय, मराठी उद्योगपती. १९७७ - उदय शंकर, भारतीय नर्तक. १९८८ - शिवरामबुवा दिवेकर, गायक. १९९६ - विद्याधर गोखले, मराठी नाटककार, पत्रकार. २००२ - राम फाटक, मराठी संगीतकार व गायक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *डागाळलेल्या नेत्यांबाबत सुप्रीम कोर्टाचा निर्णय, कायदा बनवण्याचे सुप्रीम कोर्टाचे संसदेला निर्देश.* --------------------------------------------------- 2⃣ *भोपाळ- महात्मा गांधी, राममनोहर लोहिया आणि दीनदयाल उपाध्याय यांना कधीही विसरणार नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी* ---------------------------------------------------  3⃣ *नवी दिल्ली: आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टात निर्णय.* --------------------------------------------------- 4⃣ *नवी मुंबई : अण्णासाहेब पाटील महामंडळ अध्यक्षांना कॅबिनेटचा दर्जा देणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* --------------------------------------------------- 5⃣ *दसरा मेळाव्यात भगवान बाबांच्या भव्य स्मारकाचे लोकार्पण होणार, पंकजा मुंडेंची ट्विटरवरुन माहिती* --------------------------------------------------- 6⃣ *आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय टेबल टेनिसपटूंची 18 पदकांची कमाई* --------------------------------------------------- 7⃣ *शेवटच्या षटकापर्यंत रंगलेली भारत आणि अफगाणिस्तानमधील लढत अखेर टाय* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *रांगेत जा ............!* लेख वाचल्यावर एक मिनीट जरूर विचार नक्की कराल https://goo.gl/PuAkYC आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========     *लक्ष्मणराव किर्लोस्कर* लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर हे मराठी, हे भारतीय उद्योजक होते. ते किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक होते. इ.स. १८८८ साली त्यांनी बेळगावात सायकल दुरुस्तीचे दुकान थाटत व्यावसायिक क्षेत्रात आपले पहिले पाऊल टाकले. शेतीसाठी त्यांनी बनवलेले लोखंडी नांगर हे पुढे विस्तारलेल्या किर्लोस्कर समूहाचे पहिले उत्पादन होते. किर्लोस्करवाडी येथे त्यांनी इ.स. १९१० साली कारखाना काढला; तसेच कारखान्यातील कर्मचाऱ्यांसाठी औद्योगिक वसाहत स्थापली. किर्लोस्कर समूहाची धुरा त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र शंतनुराव किर्लोस्कर यांनी सांभाळली. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= कोणीही चोरू शकणार नाही अशी संपत्ती कमवायचा प्रयत्न करा… ते म्हणजे नाव आणि इज्जत *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) 'वन लाइफ' चे लेखक कोण ?* ख्रिस्टीन बर्नाड *२)'विधवा विवाहोत्तेजक मंडळा'चे स्थापना वर्ष कोणते ?* १८९३ *३) रशियाच्या विमान वाहतुकीचे नाव काय ?* एरोफ्लोट *४) जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते ?* सहारा, उ.आफ्रिका *५) 'एफबीआय' चे विस्तारित रूप कोणते ?* फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेिस्टगेशन *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ● सुनील आलूरकर ● विश्वनाथ होले ● सोनाजी बनकर  ● प्रवीण खाटके ● विक्रम रिक्कल ● श्री दासरवार ● अजय मिसाळे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ=========   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  =========ஜ۩۞۩ஜ========= *पाऊस* कुठे धो धो पाऊस कुठे थेंब पडत नाही सर्वोशाम पाऊस झाला असे कधी घडत नाही हल्ली पाऊस खुपच लहरी झाला आहे कमी जास्त पडून कहर केला आहे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ=========         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ=========     *क्रमांक 25* *कबीर हरी सब को भजे* *हरी को भजै न कोई |* *जब लग आस सरीर की* *तब लग दास न होई ||* अर्थ विधात्याची सर्व प्राणी मात्रांवर समदृष्टी असते. सर्व चराचर सृष्टीला कुठल्याही अपेक्षेशिवाय हवा, पाणी,अन्न विधाता निसर्गरूपाने पुरवित असतो. निसर्गच चराचराची सेवा करीत असतो. ही सर्व मोफत सुविधा देवूनही माणूस मात्र निसर्गाला ओरबाडणे , पर्यावरणाची नासधूस करणे, यासारखी स्वतःच्याच विनाशाची करणी तो करतो आहे. तो निसर्गपूजक होतंच नाही. विकासाच्या नावे अमर्याद झाडांची कत्तल होते. त्या बदल्यात तो विकासक झाडे लावीत नाही. वृक्षारोपन फोटोपुरतंच होतं. प्रसिद्भी केली की नीधीची लुट करायला मोकळे . मग वृक्ष संवर्धन व देखरेखीचं काम वागलंच म्हणून समजा ! जिथं माणूस मनाचा गुलाम असतो तिथं बुद्धीचं काय चालणार ! तो षडविकारात गुंतलेला असणार. आंतरिक सौंदर्यापेक्षा शारीरिक बाह्य सौंदर्य जपण्यावरंच माणसाचा भर असतो. असा माणूस विधात्याशी, निसर्गाशी कसा एकरूप होणार ? त्याच्या कडून विवेक व निरामयतेची अपेक्षा कशी करावी ? ही माणसं ईश्वराशी तादात्म्य पावू शकत नाहीत. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्ञानाच्या सानिध्यात राहिल्याने आपल्या अनुभवास बळकटी मिळते आणि नवी दिशा मिळते तर त्याच ज्ञानाचा उपयोग आपल्या जीवनात अंगीकारला तर चांगले समृद्ध जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळते. ज्ञान हे कधीही माणसाला जीवनात आलेले नैराश्य दूर करुन सुख,समृद्ध जीवन जगण्याचा पायाही मजबूत करतो.म्हणून सदैव माणसाने ज्ञानी माणसांच्या, सज्जनांच्या सहवासात राहून आपले ज्ञान वृद्धिंगत करायला हवे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *अतिरेक - Redundancy* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *अतिरेक* एकदा एक राजहंस एका बगळ्यास म्हणाला, 'काय रे तू आधाशी ! पाण्यातला कोणताही प्राणी खायला तू मागेपुढे पहात नाहीस. बरं-वाईट, नासकं हा फरकसुद्धा तुझ्या खादाड जिभेला समजत नाही. माझं पहा, मी फक्त पूर्ण उमललेल्या कमळातले तंतु तेवढे खाईन, दुसरा कसलाही पदार्थ माझ्या घशाखाली जाणार नाही.' त्यावर बगळा म्हणाला, 'माझ्या दृष्टीने असा चोखंदळपणा असणं बरं नव्हे. ज्या वेळी जे मिळेल ते खावं अन् सुखी राहावं. खाण्याचा पदार्थ दिसला की तो खावा हेच शहाणपणाचं. असे म्हणून बगळा उडाला व जवळच्या तलावाकाठी गेला. तेथे कडेला एक मासा दिसला. तेव्हा विचार न करता त्याने तो एकदम गिळला, पण आत असलेला गळ घशाला लागून तो जिवास मुकला. राजहंस आपले आवडते खाणे दुसर्‍या कमळे असलेल्या तळ्यात गेला, पण तेथे हंस धरण्यासाठी जाळे लावले होते, त्यात तो सापडला. तात्पर्य - कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment