✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 10/09/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९६६ - पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्ये अस्तित्त्वात आली. 💥 जन्म :- १८७२ - रणजितसिंह, विख्यात क्रिकेटपटू. १८८७ - गोविंद वल्लभ पंत, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर नेते. १८९५ - कविसम्राट विश्वनाथ सत्यनारायण, तेलुगू लेखक. १९४८ - भक्ती बर्वे, मराठी अभिनेत्री. १९८९ - संजया मलाकार, अमेरिकन आयडॉलमधील कलाकार. 💥 मृत्यू :- १९८३ - जॉन वॉर्स्टर, दक्षिण आफ्रिकेचा पंतप्रधान. २००६ - टॉफाहाऊ टुपोऊ, टोंगाचा राजा. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मुंबई - भारत बंदच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आज दुपारनंतर गणपती उत्सवाच्या जादा बसेस सुटणार, परिवहन मंत्री, दिवाकर रावते यांनी दिली माहिती* --------------------------------------------------- 2⃣ *चेन्नई - माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची सुटका करण्यासाठी तामिळनाडू सरकार करणार शिफारस* --------------------------------------------------- 3⃣ *जळगाव - रुपयाची घसरण आणि इंधनाच्या वाढत्या दरांचा सोन्यावर परिणाम, सोन्याच्या भावांमध्ये 1200 रुपयांनी वाढ* --------------------------------------------------- 4⃣ *येत्या 31 ऑक्टोबरला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार- गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी* --------------------------------------------------- 5⃣ *हिमाचल प्रदेश - हिमाचल रस्ते परिवहन मंडळाची बस दरीत कोसळून 2 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी* --------------------------------------------------- 6⃣ *जपानची नाओमी ओसाका ठरली अमेरिकन ओपनची विजेती, ओसाका ग्रँड स्लॅमचं विजेतेपद पटकावणारी जपानची पहिली टेनिसपटू* --------------------------------------------------- 7⃣ *भारत वि. इंग्लंड पाचव्या कसोटी सामन्यात भारताचा डाव २९२ धावांवर आटोपला, इंग्लंडकडे ४० धावांची आघाडी* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रत्येक शाळेला संरक्षण भिंत हवे* http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_15.html वरील लेख वाचण्यासाठीनिळ्या अक्षरावर क्लिक करावे आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठीआहार* रोगप्रतिकारक क्षमता किंवा इम्युन सिस्टीम कमजोर झाल्यास विषाणू आणि जीवाणू यांचा शरीरावर हल्ला होता त्यामुळे आपण सतत आजारी पडतो. शरीराला धोकादायक असणारे विषाणू आणि जीवाणू यांच्याशी दोन हात करण्याचे काम शरीराची प्रतिकारशक्ती करत असते. त्यामुळे शरीराची ही संरक्षण व्यवस्था उत्तम ठेवण्यासाठी काही घटकांचे सेवन नक्कीच फायदेशीर ठरते. लसूण : यामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात. त्यामुळे शरीराची प्रतिकार क्षमता मजबूत होते. लसणामध्ये एलिसिन नावाचा घटक असतो जो शरीराला जीवाणू आणि संसगाश्री लढण्याची शक्ती देतो. पालक : पालकाच्या भाजीत मुबलक प्रमाणात फोलेट नावाचा घटक असतो. त्याचबरोबर लोह, तंतुमय पदार्थ, अँटिऑक्सिडंट घटक तसेच ह्यसी जीवनसत्त्व असते त्यामुळे शरीरासाठी या भाजीचे सेवन फायदेशीर ठरते. मशरूम : त्यात सेलेनियम, बी जीवनसत्त्व, रिबोफ्लेविन आणि नायसिन नावाचा घटक असतो. मशरूममध्ये अँटिव्हायरल, अँटिबॅक्टेरिअल आणि अँटिट्यूमर घटक असतात. हे घटक शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता मजबूत करतात. ब्रोकोली : त्यात ए, सी आणि के जीवनसत्त्व असतेच शिवाय त्यात अँटिऑक्सिड.ंटही असते. प्रतिकार शक्ती मजबूत कर्णाया या भाजीत प्रथिने आणि कॅल्शिअम असते. हेही लक्षात ठेवा की आपली दिनचर्या सृदृढ राहील याची काळजी घ्यावी. पुरेशी झोप घ्यावी. योग आणि ध्यान करावे.तंबाखूजन्य उत्पादनांचे सेवन बंद करावे. हिरव्या पालेभाज्या आणि फळांचे सेवन करावे. प्रोबायोटिक आहाराचे सेवन अवश्य करावे.दिवसातून काही वेळ सूर्यप्रकाशात जरूर घालवावा.सर्दी, डोकेदुखी आणि त्वचा रोगांकडे दुर्लक्ष करू नका आणि त्यावर योग्य उपचार करावेत. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= हल्ला करणार्या शत्रूला भिऊ नकोस. पण स्तुती करणार्या मित्रापासून सावध रहा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) कोणती बँक सेवेत रोबो आणणार आहे ?* एचडीएफसी बँक *२) जागतिक क्रीडा दिन कधी साजरा केला जातो ?* २९ ऑगस्ट *३) सर्वांत श्रीमंत देशांमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे ?* सातवा *४) जीएसटी मंजूर करणारे सहावे राज्य कोणते ?* गुजरात *५) यंदाची जागतिक कबड्डी स्पर्धा कुठे होणार आहे ?* अहमदाबाद *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ● ईश्वर येमुल, नांदेड ● विश्वांभर पापुलवाड, धर्माबाद ● प्रवीण भिसे पाटील ● गणेश कोकुलवार, नांदेड ● ज्ञानेश्वर इरलोड ● राजेश्वर बाबुराव चिटकूलवार ● संतोष पांडागळे, नांदेड ● योगेश पोकलवार ● आकाशगाडे ● गंगा पूट्टेवाड ● संभाजी साळुंखे ● अनिरुद्ध वंगरवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *पोळा* पोळा म्हणजे बैलांच्या कृतज्ञतेचा सण आहे पशुंचीही पुजा करतो बळीराजाचे मोठे मन आहे पशुंच्याही कृतज्ञतेचा इथे सोहळा होतो पोळ्याच्या सणाला सारा गाव गोळा होतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 13* *न गुरु मिल्या ना सिष भय* *लालच खेल्या डाव |* *दुनयू बड़े धार में* *छधी पाथर की नाव ||* अर्थ महात्मा कबीर गुरू आणि शिष्य यांच्यातील नाते व त्यांच्याकडील अपेक्षित क्षमतांवर दृष्टीक्षेप टाकतात. गुरू आणि शिष्य लालची असतील तर साधनेतून कोणतेही साध्य साध्य होणार नाही. गुरूचा स्वतःचाच प्रापंचिक मोह सुटलेला नसेल तर तो शिष्याला या मोहमयी दुनियेच्या बंधनातून कसा मुक्त करील? पांडित्य करताना पंडिताचा ताठा , मी एक महा विद्वान आहे. माझ्याशिवाय इथलं पानही हलू शकत हा त्या पंडिताचा अहंकारी स्वभाव त्याला गुरू पदापर्यंत जायला खरा अडसर ठरतो. शिष्याची साधकाची आर्थिक स्थिती पाहून मिळकतीचा विचार करून केवळ दक्षिण्यावर व मिळकतीवर लक्ष केंद्रित करित पूजापाठ व पौरोहित्त्य केलं जाणार असेल तर केलेल्या सेवेला आत्मिक आनंदाची व समाधानाची सर कुठून येणार आहे ? शिष्याने / साधकाने जर स्वार्थी हेतु ठेवून आराधना केली. त्याला जन कळवळ्याची झालर नसेल तर त्याच्या साधनेला अर्थच उरत नाही. असे गूरू आणि शिष्य केवळ भ्रमीत असतात. अशा माणसांचा किवा त्यांच्या कडून इत्तरांचा उद्धार होणे कधीही संभव नाही. कारण ते दोघेही दगडी नावेतले प्रवासी आहेत. दिसायला ती मजबूत दिसत असली तरी पाण्यावरून जाण्यास ती असमर्थ आहे. ती पाण्यावर नेली तर बुडणारच ! गुरू शिष्याचं लालचीपणही हा भवसागर तरायला मदत न करता अर्ध्यातच दोलायमान होवून गटांगळ्या खाऊ लागतं. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎯 विचारवेध............✍🏻 --------------------- नेहमी माणूस म्हणतो की,मी स्वतंत्र आहे मला कुणाचीही गरज नाही,माझे कुणावाचून अडत नाही.हे कितपत सत्य आहे ? परंतु एक सत्य आहे माणूस कितीही आणि कसाही वागला तरी एक लक्षात असू द्यावे की,माणसाची खरी मदार तर मुक्या प्राण्यावरच आहे .हेच पहा ना..दूग्धजन्य पदार्थ बनतात ते दूध देणाऱ्या गाई म्हशी,शेळी आणि इतर प्राण्यांपासून, शेतामध्ये काम करण्यासाठी बैल आवश्यक आहे,ओझे वाहून नेण्यासाठी बैल,गाढव,उंट,हत्ती,पिकावर अळी,कीड पडली तर पाखरे,घर,शेत सांभाळण्यासाठी कुत्रे,घरातल्या उंदरापासून संरक्षण हवे असेल तर मांजर अशा कितीतरी प्राणीजीवनाचा आपण उपयोग करुन आपले जीवन जगत असतो.त्यांच्याबद्दलची कृतज्ञता नेहमीच आपल्या मनात असायला हवी.ते जर नसते तर आपण आपले जीवन सुखावह जगलो असतो का ?आपण यांच्याशिवाय जगू शकलो असतो का ? नाही ना ?मग आपण स्वतंत्र नसून त्यांच्या जीवावर जगत असतो.म्हणून आपल्या जीवनाइतकेच त्यांनाही आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान द्यायलाच हवे.ते देखील तितकेच प्रेम आपल्यावर करत असतात.त्यांच्याही भावना आपल्यासारख्याच असतात.म्हणून भूतदया आपणही करायला शिकली पाहिजे.त्यांनाही आपल्या परिवारातील सदस्य समजून घेऊन प्रेम करायला हवे.जर का असे नाही केले तर आपले जीवन अधुरेच आहे असे समजावे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🐂🐄🐎🐏🐑🐐🐫🐘🐀🐇🕊🕊 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *संरक्षण - Protection* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *🌺परोपकाराची भावना*🌺 एकदा नकळत मुंगी तळ्यात पडली स्वतःला वाचविण्यासाठी झाडाचं पान आणि कबुतराची वाट पाहू लागली मीच का सतत हिला वाचवावे हा कबुतराचा अहंकार आड आला झाडावरच बसून असहाय मुंगीला मरताना पाहू लागला कबुतराने मदत करावी म्हणून मुंगी जिवाच्या आकांताने ओरडली कबुतर आपल्याच विचारात मश्गुल मुंगी असहायतेमुळे गतप्राण झाली कबुतर आपल्याच गर्वात गढून गेलं पारधी येणार हेच विसरून गेलं. पारध्यानेही याच संधीचा फायदा घेत मुंगीच्या अनुपस्थितीत डाव साधला. कबुतर आणि मुंगी दुर्दैवीपणाने गेले. झाड मात्र त्या दिवशी खूप रडले. मुंगी, कबुतर मेल्याचं दुःख होतंच ..... पण त्याहूनही *परोपकाराची भावना मेल्याचं होतं.* अहंकार नाशाकडे नेतो तर सेवा ही आनंदी जिवनाचे सार्थक ठरते. *-----------------------------------* *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड.* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment