गुरुमहिमा
चिखल मातीचा गोळ्यास
आकार तु देतोस
ज्ञानदिपाची ज्योत पेटवूनी
अंधकार दूर सारतोस
शतशः नमन मी करीते
गुरूवंदन करूनी
आशीर्वाद मी घेते
आयुष्यभर रूणी राहूनी
वंदन मी नित्यनेमाने करीते.
गुरूवर्य आहेत ज्ञानाचा
भांडार अज्ञानाचा नाश करुनी होतील संहार
घडवतील मनुष्यजीवना
अर्पूनी जीवन आपुले.
कर्तव्याचे बिजांकुरण करुनी पेटतील समाजमनाचा उदरी
ज्ञानर्जनाची शिदोरी वाटूनी वसतील शिष्यांचा मनमंदीरी
〰〰〰〰〰〰
✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे
जि.प.प्रा.शाळा गोजेगाव
ता.हदगाव जिल्हा नांदेड.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment