संशयाच भूत
संशयाच भूत मानगुटीवर
बसतं अन् काय सांगू तुम्हाले
भल्याभल्यांचा ते जाळ्यात
फसतं
असा संशय लेकाचा
जीव घेतो दुसऱ्याचा
अन् ह्याले तुम्ही जागा
नाही द्यायची
अन् संशयाचा भूताची जागा मनामंदी नाही ठेवायची
म्हणून मनतो तुमाले
करु नका कोणावर संशय
जिवावर होऊन उठतील अन् जीवनभर पेटतील
संशयाच भूत मानगुटीवर
बसवतील
अशा भूतास जागा नाही द्यायची
अन् संशयाची भीती मनामंदी नाही ठेवायची
कुढत बसणं आणि
रूसत बसणं ह्याले
जागा नाही द्यायची
उद्याचा दिसाची
काळजी नाही करायची
अन् संशयाचा भूताला जागा नाही द्यायची अन् संशयाची भीती
मनामंदी नाही ठेवायची
〰〰〰〰〰〰〰
✍ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे(हदगाव) जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰
No comments:
Post a Comment