✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ●●●●●●●●●●★●●●●●●●●●●● 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ●●●●●●●●●●★●●●●●●●●●●● *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ●●●●●●●●●●★●●●●●●●●●●● 📅 दि. 01/10/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *जेष्ठ नागरिक दिवस* 💥 ठळक घडामोडी :- १८६९ - ऑस्ट्रियामध्ये पहिल्यांदा पोस्टकार्डचा वापर १९५८ - नासाची स्थापना. 💥 जन्म :- १९१९ - गीतरामायणकार ग.दि. माडगूळकर, मराठी कवी व साहित्यिक 💥 मृत्यू :- १४०४ - पोप बॉनिफेस नववा १९४२ - अँट्स पीप, एस्टोनियाचा पंतप्रधान. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *प्रत्येक भारतीयाला आपल्या सशस्त्र दलांवर आणि सैन्यातील जवानांवर गर्व आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मन की बातमधून जनतेशी संवाद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *इंडोनेशियातील त्सुनामीत 832 नागरिकांचा मृत्यू, हजारो जण जखमी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *फिजीला 6.6 रिश्टरस्केल तीव्रतेच्या भुकंपाचा धक्का.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नांदेड : संविधान बचाओ, देश बचाओ या मोहिमे अंतर्गत राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने मनुस्मृती आणि ईव्हीएम मशीनचे नांदेडला दहन करण्यात आले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *जेट एअरवेजच्या विमानात तांत्रिक बिघाड, 96 प्रवाशांसहित इंदूर विमातळावर इमरजन्सी लँडिंग* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नागपूर : 270 दिव्यांग व्यक्तींना अत्याधुनिक प्रकारच्या कृत्रिम हाताचे नागपुरात नि:शुल्क वाटप करण्यात आले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *नवी दिल्ली : वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा, धडाकेबाज सलामीवीर शिखर धवनला डच्चू तर पृथ्वी शॉ ला मिळाली संधी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *आधार झाले पुन्हा निराधार* http://dainikyashwant.com/epaper/edition/323/october/page/4 आधारकार्ड ने बऱ्याच गोष्टी सुरळीत केल्या आहेत. त्याची चर्चा या लेखात केली आहे. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *ज्येष्ठ नागरिक* आई-वडिलांना टाकणाऱ्यांना दट्टा जी मुलं वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करत नाहीत. त्यांची रवानगी वृद्धश्रमात करतात, अशा मुलांना 'डिफॉल्टर' ठरवून त्यांची नावं ठळकपणे प्रसिद्ध करण्याचं राज्य सरकारनं ठरवलं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज ज्येष्ठ नागरिक धोरणाला मंजुरी देण्यात आली. या धोरणात ही बाब अधोरेखीत करण्यात आली आहे. महाराष्ट्रात एक कोटींहून अधिक ज्येष्ठ नागरिक असून १ ऑक्टोबर रोजी असलेल्या ज्येष्ठ नागरिक दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पदरी अनोखी भेट पडली आहे. ज्येष्ठ नागरिक धोरणाला अपेक्षेप्रमाणे आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार ६५ वर्ष वा त्यापेक्षा जास्त वयाचे नागरिक या धोरणातील सुविधांसाठी पात्र धरले जाणार आहेत. जात, वंश, पंथ, लिंग, शैक्षणिक किंवा आर्थिक दर्जा यापासून हे धोरण स्वतंत्र असेल. ज्येष्ठ नागरिकांच्या विविध सामाजिक, आर्थिक, आरोग्य, निवास व सुरक्षा विषयक समस्यांची सोडवणूक करण्याचा या धोरणाचा उद्देश आहे. वृध्दापकाळामध्ये आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळण्यासाठीच हे धोरण बनवण्यात आले आहे. झोपविले तुम्हास कोरड्या जागी ।. आईच्या त्या प्रेमळ नेत्रांमध्ये , चुकुनही अश्रु आणु नका ।. जिने फुले आच्छादिली होती , क्षणोक्षणी तुमच्या मार्गात ।. त्या मार्गदर्शकाच्या मार्गातील काटे कधी बनु नका! पैसे तर चिकार मिळेल, पण आई-वडील नाही मिळणार ... *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= अभ्यासामुळे आनंद वाढतो, भूषण प्राप्त होते व कार्यक्षमता वाढते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) हरीतक्रांती कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली ?* १९६५ मध्ये *२) काळा कायदा म्हणून कोणता कायदा ओळखला जातो ?* रौलेट ऍक्ट *३) मूळ रेखावृत्त कोणत्या शहरातून जाते ?* ग्रीनीच *४) भारतात पहिली वन संशोधन संस्था कुठे स्थापन करण्यात आली ?* देहरादून *५) परम महासंगणकाची निर्मिती कोणी केली ?* विजय भटकर *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ● डॉ. कु. सारीका रमेश शिंदे ( प्रमिलाताई सेनकुडे यांची कन्या ) ● अर्जुन वाकोरे, नांदेड ● विशाल मस्के, साहित्यिक, बीड ● निलेश पंतमवार, नांदेड ● व्यंकट रेड्डी मुडेले ● गोविंदराव इपकलवार, नांदेड ● आनंद पेंडकर, ग्रामसेवक, येवती ● व्यंकटेश काटकर, साहित्यिक, नांदेड ● गजानन काळे, नांदेड ● सुभाष टेकाळे, माहूर ● श्रीकांत भोसके ● माधव शिंदे, सहशिक्षक ● साईनाथ पलीकोंडावार, येवती ● राहुल कुंटोजी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *काकस्पर्श* प्रयत्न करून हल्ली काकस्पर्श होत नाही तेच ते खाऊन त्यांना थोडाही हर्ष होत नाही त्यांनाही वाटतं जरा भेटावं काही नवे नवे जीवंतपणीच पितरांवर नीट लक्ष द्यायला हवे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 29* *संत न बंधे गाठ्दी* *पेट समाता तेई |* *साईं सू सन्मुख रही* *जहा मांगे तह देई ||* अर्थ संत सज्जनांचं एक महत्वाचं लक्षण महात्मा कबीर सांंगतात. सामान्य माणूस हावरटपणा करीत असतो. धन संपती भौतिक बाबींच्या संचयाच्या मागे लागतो. सत्ता आणि पदं ज्यांच्या हाती आहेत. ती बहुतांश मंडळी सत्तेचा दुरूपयोगंच करते.त्यांच्याशी संबंधितांचं विविध प्रकारे शोषण करते. कोणतीही सत्ता स्वतःच्या स्थान बळकटीकरणा इतका प्रजेच्या बळकटी करणाचा विचार करीत नाही. कोणी विरोध केला तर त्यावर डुख धरून वेळोवेळी त्याला अडचणीत आणलं जातं. परिणामस्वरूप प्रजा देशोधडीला लागते. राजा व सेवक मात्र गब्बर होतात. संत सज्जन कधीच संचय करीत नाहीत. मग तो धन संपतीचा असो की कुणाप्रति वाटणार्या चिडीचा असो. त्यांच्या ओटात एक अन पोटात एक नसतेच कधी. सदैव सदाचार अन सद्वर्तनाचाच मार्ग ते चालत असतात. कधीही अविचार करून विवेकाला ते दूर सारत नाहीत. त्यांना भविष्याची चिंता करण्याची गरजंच काय? विवेकातून निरामयतेची भावना वाढीस लागते. सब्ब भवतु कल्याणम ही वृत्तीच जगाचं कल्याण करू शकते. सर्वेत्र् सुखीनः सन्तु निरामय । ही भावना सज्जन, कलावंत व विचारवंताठायीच असते. म्हणूनच त्यांच्या चरणी नतमस्तक व्हावसं वाटतं. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जे स्वप्न तुम्ही पाहिले आहे ते पूर्ण करु शकत असाल तर मग थांबता कशाला ? ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील रहा.काही व्यत्यय आला तरी थांबू नका. जर तुम्ही थांबलात तर तुम्ही पाहिलेले सर्वप्रथम कधी पूर्ण कराल. जिद्द, चिकाटी, मेहनत,सातत्य ह्यामध्ये कधीच माघार घ्यायची नाही.ती तेवढ्याच जोमाने पुढे चालू ठेवावी की, तुम्ही सुरवातीला स्वप्न पाहताना केली होती. मग थांबता कशाला ?लागा तुमच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने....उठा,जागे व्हा आणि स्वप्नपूर्तीच्या मार्गाला लागा. आता माघार घ्यायची नाही असंच ठरवा. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 💐🍃💐🍃💐🍃💐🍃💐🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *मेहनत - Hard work* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *दृष्टिकोन* एकदा एक अनुभवी आणि वृध्द गुरू आपल्या शिष्याच्या तक्रारींना कंटाळून गेले होते. एके दिवशी सकाळी त्यांनी त्या शिष्याला थोडे मीठ आणायला सांगितले. तो शिष्य मीठ घेऊन परतला तेव्हा गुरूंनी त्या दुखी तरूणाला त्यातील मूठभर मीठ एका एका पाणी भरलेल्या पेल्यात टाकून ते पिण्यास सांगीतले. ’पाणी चवीला कसे लागले ?‘ गुरूंनी विचारले.'खारट', ‘कडु’ असे म्हणून शिष्याने ते पाणी थुंकले. गुरूंनी मंद हास्य केलं आणि पुन्हा त्या शिष्याला मुठभर मीठ त्या तळयात टाकण्यास सांगितले. ते दोघे तळयाजवळ आले. शिष्याने मूठभर मीठ त्या तळयात मिसळल्यानंतर ते वृध्द गुरू म्हणाले, ‘आता या तळयातील पाणी पिऊन पहा.‘ त्याच्या हनुवटीवरून पाणी खाली ओघळल्यावर गुरूंनी त्याला विचारलं, आता यापाण्याची चव कशी आहे ?‘ ‘ताजी आणि मधुर !‘ शिष्याने सांगितले. ‘आता तुला मिठाची चव लागतेय ?‘ ‘नाही‘. गुरू त्या शिष्याच्या जवळ बसले आणि त्यांनी त्याचा हात आतात घेतला. ते म्हणाले, ‘आयुष्याची चवही अगदी मिठासारखीच असते. आयुष्यातील दुखही तेवढच असतं, परंतु आपण ते दुख कशात मिसळतो यावर त्याचा खारटपणा, कडवटपणा अवलंबुन असतो. म्हणून जेव्हा आापण दुखात असतो तेव्हा आपण एकच गोष्ट करू शकतो. ती म्हणजे, आपण आपल्या भावना व विचार व्यापक ठेवल्या पाहिजेत. पेला होणं थांबवून तळं होण्याचा प्रयत्न केला पाहिजे.‘ तात्पर्यः नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ●●●●●●●●●●★●●●●●●●●●●● *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ●●●●●●●●●●★●●●●●●●●●●● *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ●●●●●●●●●●★●●●●●●●●●●●
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment