✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 21/09/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९६४ - माल्टाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य. १९६५ - सिंगापूरला संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश. १९७२ - फिलिपाईन्समध्ये लश्करी कायदा लागू. १९८१ - बेलिझला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य. १९८१ - सांड्रा डे ओ'कॉनॉरची अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नेमणूक. १९९१ - आर्मेनियाला सोवियेत संघापासून स्वातंत्र्य. 💥 जन्म :- १९३२ - पंडित जितेंद्र अभिषेकी, भारतीय-मराठी गायक, मराठी संगीतकार. १९६३ - कर्टली ऍम्ब्रोस, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू १९७९ - क्रिस गेल, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू. १९८० - करीना कपूर, भारतीय अभिनेत्री. 💥 मृत्यू :- १७४३ - सवाई जयसिंह, जयपूर संस्थानाचा राजा. १९९९ - पुरुषोत्तम दारव्हेकर, मराठी नाटककार, मराठी नाट्यदिग्दर्शक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *सोलापूर : पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात तुळशीच्या माळेची सजावट* --------------------------------------------------- 2⃣ *मध्य प्रदेशमध्ये गणपती विसर्जनावेळी पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू* --------------------------------------------------- 3⃣ *अकोला - महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे मध्यप्रदेश शासनाद्वारे सन्मानीत* --------------------------------------------------- 4⃣ *केंद्र सरकार छोट्या बचत खात्यांवरचा व्याजदर वाढवणार ; 01 ऑक्टोबरपासून वाढ लागू* --------------------------------------------------- 5⃣ *लखनौ - मायावती यांचा बहुजन समाज पक्ष विधानसभेसाठी जनता काँग्रेसोबत करणार युती, छत्तीसगडमध्ये 35 जागा लढवणार* --------------------------------------------------- 6⃣ *आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताला मोठा धक्का, भारतीय संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार, त्याच्या जागी दीपक चहलला मिळाली संधी* --------------------------------------------------- 7⃣ *भारताच्या पी. व्ही. सिंधूने चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व केला फेरीत प्रवेश.* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= पाच मिनिटं लागतील वाचायला पण वेळ काढून जरूर वाचावे *नोकरी श्रेष्ठ की शेती* https://goo.gl/WJvP4C आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *रांजणगाव - महागणपती* महाराष्ट्रात असलेल्या अष्टविनायकांपैकी चौथा गणपती रांजणगावात आहे. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे-अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे. या स्थानासंदर्भात एक दंतकथा आहे ती अशी की :- त्रिपुरासुर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरूपयोग करून त्रिपुरासुर स्वर्गलोक व पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की, शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला. म्हणून या गणेशाला ‘त्रिपुरारीवदे महागणपती’ असेही म्हटले जाते. अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. हा महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. इंदूरचे सरदार किबे यांनीदेखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आढळतो. त्यांनी या देवळातला लाकडी सभामंडप बांधून दिला आहे. हे महागणपतीचे स्थान इसवी सनाच्या १० व्या शतकातील आहे. श्री गणेशाला दहा हात आहेत आणि प्रसन्न व मनमोहक अशी श्रींची मूर्ती आहे *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे ! *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) २00२ मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्काराचे मानकरी कोण होते ?* संदीप पांडे *२) 'आयएनएस म्हैसूर' ही युद्धनौका देशाला अर्पण केली गेली तो दिवस कोणता ?* २ जून १९९९ *३) आरआरव्हीवायचे विस्तारित रूप काय ?* राष्ट्रीय रेल विकास योजना *४) शृंग घराण्याचा शेवटचा शासक कोण ?* देवभूती *५) इंडियन मुस्लीम लीगचे सा संस्थापक कोण ?* आगाखान, नबाब सलीमुल्ला *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ● जिग्नेश क्रांती बुद्धेवार, धर्माबाद ● विष्णू गंभीरे, धर्माबाद ● निशांत जिंदमवार, धर्माबाद ● स्मिता मिरजकर वडजे, नांदेड ● आशिष कोलपवार ● सचिन तोटावाड, धानोरा खु. ● गोविंद पाटील *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *सरळ मार्ग* सरळ मार्गाने होत असल्यास वाकड्यात कशाला जायचं पुढचा चांगला असुनही पाण्यात कशाला पाहायचं सरळ मार्गाने गेलं की कामं सरळच होतात गरज नसतांना उगीच माणसं वाकड्यात जातात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 21* परनारी रता फिरे , चोरी बिधिता खाही | दिवस चारी सरसा रही , अति समूला जाहि || अर्थ : 'अती तिथं माती ।' हा नियम सर्वत्र लागू होतो. ही बाब सांगताना महात्मा कबीर म्हणतात, परनारीचा मोह बरा नसतो. परनारीच्या आसक्तीनं विषय वासनेत बुडालेला माणूस कामांध होतो. त्या आंधळेपणापुढं त्याला हितचिंतकांनी केलेला उपदेशही तुच्छ वाटू लागतो. घरी त्याची स्वतःची अस्तुरीसमान बायको जी त्याची मनोभावे सेवा करीत असते. तिची अवहेलना करीत दुसर्याच्या उकिरड्यात लोळण्याची त्याची घाणेरडी सवय जात नाही. हा उष्टा घरच्या पतिव्रतेला उपाशी ठेवतो अन शिंदळीसाठी मात्र पदरमोड करू करू स्वतः कवडीमोल होवून रस्त्यावर येतो. ती याला हाकलून बाहेर काढते. याची गत मोकाट कुत्र्यासारखी होते. ना घर ना घाट ! रात्रीला चोरानं चोरी करावी अन काही दिवस त्या चोरीचे द्रव्य संपेतो आस्वाद घेतल्या सारखा वरील प्रकार आहे. चार दिवस सहजतेने विषयानंदात काढलेले. परंतु त्या उपभोगाला व जगण्याला नैतिकतेची कुठंच जोड नसलेली. तोंडावर नसला तरी माघारी कुचेष्ठेचा धनी होण्याचं जगणं वाट्याला आलेलं. हा असला अतिरेक काय कामाचा बरं ! जो माणसाला मुळातूनंच पार उद्ध्वस्त करीत असतो . म्हणून माणसानं विवेक अन विचाराची कास धरलीच पाहिजे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= एखादा आयुष्यातला चांगला क्षण तुम्ही थोडे दुर्लक्ष केल्यामुळे निसटून गेलाही असेल म्हणून पुन्हा आयुष्यात संधी येणार नाही असे नाही.संधी खूप येतात नि जातात त्या येणा-या संधीचे सोने करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनाची तयारी ठेवावी लागेल,पाण्यातील मासा पकडण्यासाठी बगळा जसा पाण्यात एका पायावर उभा राहून प्रतीक्षा करतो तशी एकाग्रता आपल्या मनाची ठेवायला हवी,येणा-या संधीला प्राप्त करून घेण्यासाठी आपले हातही तितकेच महत्वाचे आहेत.तुमच्या हातांनाही चांगले करण्यासाठी प्रोत्साहित करा.मग पहा कधीही कोणतीही संधी जात नाही.आणि एखादी संधी गेली म्हणून येणा-या संधीला दूर करायचेही नाही. एक लक्षात असू द्या,हातात मुठीत घेतलेली वाळू पूर्णच्या पूर्ण मुठीत राहते का ? नाही ना .मग जी काही राहते ती आपली आयुष्यात असणारी संधी म्हणूनच.मग तिला सोडूच नका. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रोत्साहन - Promotion* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *बिट्टी बेडकुळी* सुंदर माझे घर. बिट्टी बेडकुळी कितीतरी वेळ कमळाच्या पानावर लोळत होती. वरून पावसाच्या धारा येत होत्या. सगळ्या तळ्यात टिप..टिप..आवाज येत होता, हवा कशी गार गार झाली होती. बिट्टीला मजेत गाणे गावेसे वाटत होते. तिने त्याप्रमाणे तोंड उघडलेही. इतक्यात पलीकडच्या झाडावरून मंजुळ स्वर ऐकू आले. बिट्टीने तिकडे पाहिले. एक छोटीशी मुनिया आपले घरटे विणीत होती. नाजूक, नाजूक काड्यांचे विणकाम करताना मधेच गाणे गुणगुणत होती. आता मात्र बिट्टीला राहवले नाही. एका उडीतच तिने पलीकडचा काठ गाठला. म्हटले माझे घर पाहिले का केवढे मोठे आहे ते? आत कशी रंगीबेरंगी कमळे फुललीत. ती कौतुकाने तळ्याकडे पाहत म्हणाली. शी! हे कसले सुंदर घर? आत भरला आहे गाळ अन् चिखल! मुनिया नाक मुरडत म्हणाली. बिट्टी मग टुणटुणत पुढे निघाली. आज सगळीकडे कसा मऊ मऊ चिखल पसरला होता. त्यात घसरगुंडी खेळाविशी वाटत होती. बिट्टीला एक भलामोठा दगड दिसला. त्यावर उडी मारताच आतून आवाज आला, कोण आहे? पाठोपाठ कासवदादा मान बाहेर काढून इकडेतिकडे पाहू लागले. अगंबाई! कासवदादा तुम्ही त्यात राहता वाटते? बिट्टीने विचारले. तर काय! हेच माझे घर! पुन्हा आत शिरत ते म्हणाले. मजाच आहे नाही? बिट्टी मनाशी विचार करत पुढे जाऊ लागली. वाटेत झाडावर एक मधाचे मोठ्ठे पोळे लोंबत होते. त्याभोवती मधमाशा उडत होत्या. काही जात होत्या, तर काही येत होत्या. बायांनो! तुम्ही इतक्याजणी छोट्याशा घरात कशा गं राहता? बिट्टीने विचारले. छोटेसे आहे का ते? आत कशा षटकोनी खोल्याच खोल्या आहेत. अगदी आरामात राहता येते सर्वांना. बिट्टीभोवती गुणगुणत एका माशीने उत्तर दिले. बिट्टी तिथेच थांबून इकडची तिकडची मजा बघत होती. किती गंमतीदार घरे आहेत नाही प्रत्येकाची, ती स्वत:शी म्हणत होती. रस्त्यावर फळांनी लगडलेले एक भलेमोठे झाड होते. त्यावर सुगरणींची लोंबती घरे होती. वार्याने ती इकडून तिकडे लत! सुगरणबाई उडत येऊन खालून वर जात होत्या. आपल्या इवल्याशा चोचीने विणकाम करत होत्या. बापरे! एवढय़ा वार्यावादळातही घर कसे पडत नाही? बिट्टी वर पाहत असताना जवळून आवाज आला. माझे घर कित्ती छान आहे! खाऊच्याच घरात मी राहते. बिट्टीने या टोकाकडून त्या टोकाकडे डोळा फिरवत शोधाशोध केली. शेजारी एक भलामोठा पेरू पडला होता. त्यातून एक अळी डोके बाहेर काढून बिट्टीशी बोलत होती. हो! हे बाकी खरेच! बिट्टीने मान डोलावली. इतक्यात आभाळातून पुन्हा गडाड-गुडूम आवाज आला व पाऊस पडू लागला. समोर एक भली मोठी छत्री उगवली होती. बिट्टी पळत पळत जाऊन त्याखाली उभी राहिली. आता मात्र तिला पुन्हा एकदा गाणे म्हणावेसे वाटले व त्या आनंदात ती गाऊ लागली. गार गार वारा अन् पावसाच्या धारा, भिजलेली राने अन् पानोपानी गाणे, झुळझुळणार्या पाण्यात थेंबांची नक्षी, फांदीवर डुलतात भिजलेले पक्षी, ओल्या मातीत सुगंधाची भर, सगळ्यात सुंदर सुंदर माझेच घर!! *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment