✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 05/09/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= _*शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना हार्दीक शुभेच्छा*_ 💥 ठळक घडामोडी :- १९६१: अलिप्त राष्ट्रांची पहिली परिषद बेलग्रेड येथे सुरू. १९६७: ह. वि. पाटसकर पुणे विद्यापीठाचे ७वे कुलगुरू झाले. १९७७: व्हॉयेजर १ या अंतराळयानाचे प्रक्षेपण. २०००: ऋषिकेश मुखर्जी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. 💥 जन्म :- १६३८: फ्रान्सचा राजा लुई (चौदावा) १८७२: भारतीय वकील आणि राजकारणी व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई १८८८: भारताचे दुसरे राष्ट्रपती, तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन १८९५: भाषा व इतिहास संशोधक, लेखक अनंत काकबा प्रियोळकर १९०७: शिक्षणतज्ञ, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ एज्युकेशनचे संस्थापक, नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग चे संस्थापक जयंत पांडुरंग तथा जे. पी. नाईक १९१०: भारतीय क्रिकेट खेळाडू फिरोझ पालिया १९२०: बालसाहित्यिका लीलावती भागवत १९२८: सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना दमयंती जोशी १९८६: भारतीय क्रिकेटर प्रग्यान ओझा 💥 मृत्यू :- १९१८: उद्योगपती सर रतनजी जमसेठजी टाटा १९७८: कवी, संवादलेखक, नाटककार व पत्रकार रॉय किणीकर १९९१: हिन्दी कवी, लेखक व उपहासकार शरद जोशी १९९२: उद्योगपती अतूर संगतानी १९९५: हिंदी व बंगाली चित्रपट सृष्टीतील संगीतकार सलील चौधरी १९९६: भारतीय बिशप बॅसिल सालदवदोर डिसोझा २०१५: भारतीय गायक-गीतकार आदेश श्रीवास्तव *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली - कोलकाता येथील पूल दुर्घटनेबाबत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केली पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा, संपूर्ण मदतीचे दिले आश्वासन* --------------------------------------------------- 2⃣ *पुणे - डॉ नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी आरोपी शरद कळसकरला १० सप्टेंबरपर्यंत सत्र न्यायालायाने पोलीस कोठडी सुनावली* --------------------------------------------------- 3⃣ *केरळमध्ये 1 ऑगस्टपासून 372 जणांना लेप्टोस्पायरोसिसची लागण झाल्याची माहिती.* --------------------------------------------------- 4⃣ *ब्राझीलमधील राष्ट्रीय संग्रहालयाला भीषण आग, 2 कोटींहून अधिक ऐतिहासिक वास्तू भस्मसात* --------------------------------------------------- 5⃣ *नाशिक - शहरातील 71 बेकायदा धार्मिक स्थळे हटविण्यास उच्च न्यायालयाची स्थगिती, 2009 नंतरची ही धार्मिक स्थळे असून बहुतांश मंदिरे खुल्या जागेत आहेत.* --------------------------------------------------- 6⃣ *देवस्थानांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण द्या : भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांचे प्रतिपादन* --------------------------------------------------- 7⃣ *भारताच्या ओम प्रकाश मिथर्वालने जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत 50 मीटर पिस्तुल प्रकाराचे सुवर्णपदक जिंकले* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= शिक्षक दिनानिमित्त खास कथा वाचा प्रतिलिपिवर *" हाताची जादू ओळखणारा शिक्षक "* https://goo.gl/ZNKytm अमर्याद रचना वाचा, लिहा, आणि मित्रांसोबत शेयर करा आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *संत नामदेव महाराज* संत नामदेव हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ते मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी पंजाबीव व्रज भाषांमध्येही काव्ये रचली. शिखांच्यागुरू ग्रंथसाहिबात त्यांच्या बासष्ट काव्यरचना समाविष्ट आहेत. नामदेव हे ‘मराठीतील'पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते. त्यामुळे आज त्यांच्या जन्म स्थानी पंजाबी मंडळी त्यांवया जन्म स्थानी नर्सी या गावाचा विकास करण्यासाठी धडपडत आहेत. भक्तशिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले .वारकरी संप्रदायाचे प्रचारक नामदेव महाराज नामवेदाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील हे एक थोर संत होत. आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती. संत नामदेव प्रत्यक्ष श्रीविठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता, असे मानले जाते. संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी त्या बाबतीत भावनिक एकात्मता साधली. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= मौन म्हणजे परिस आहे, ज्याला त्याचा स्पर्श होईल त्याचे जीवन सुवर्णमय होऊन जाते. - डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१)'यंग इंडिया' हे वृत्तपत्र कोणी सुरू केले ?* महात्मा गांधी *२) पुण्यातील हिंगणो येथे विधवा अनाथ महिला आश्रमाची स्थापना कोणी केली ?* महर्षी धोंडो केशव कर्वे *३) 'सीएनएस' चे विस्तारित रूप काय ?* चीफ ऑफ नेव्हल स्टाफ *४) सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून श्री. मेहरचंद महाजन यांचा कार्यकाल कोणता ?* ४ जाने.१९५४ ते २२ डिसें.१९५४ *५) विधानसभेतील सभासदांची संख्या किती ?* कमीत कमी साठ, जास्तीत जास्त पाचशे *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= • सौरभ सावंत, नांदेड • एस. व्ही. माडेवार, धर्माबाद • नितीन शिंदे • रत्नाकर चिखले • राजकुमार काळे, बिलोली • रत्नजित शिवाजी पटारे • धोंडोपंत मानवतकर • नरेश रेड्डी • पांडुरंग बोमले • गंगाधर मरकंटवाड • बालाजी आरेवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *गुरू* जगावे कसे वागावे कसे शिकवतो तो गुरू ज्ञान ग्रहणाचा प्रयत्न अखंड असतो सुरू माणूस घडवतो तो खरा शिक्षक असतो संस्कृती संस्काराचा तो म्हणजे रक्षक असतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 10* *कबीरा ते नर अन्ध है,* *गुरु को कहते और ।* *हरि रूठे गुरु ठौर है,* *गुरु रुठै नहीं ठौर ॥* अर्थ: महात्मा कबीर गुरूंची महत्ती सांगताना म्हणतात की जो माणूस गुरुचे जीवनातील महत्व जाणत नाही , जो गुरूचा अनादर करतो. तो डोळे असूनही आंधळाच समजला पाहिजे. कठीण समयी आपणास देव व दैवाची साथ मिळत नसली तरी आपणास त्या कठीण व नाजूक अशा विपरित परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी गुरूच मदत करीत असतात. जर का गुरूनेच साथ सोडली तर मात्र भूतलावर कोणीही साथ देत नाही. कारण ईश्वराकडे जाण्याचा मार्गच गुरूपासून सुरू होतो, तर गुरूकडे जाण्यासाठी ईश्वराची मदत घ्यायची गरज असतेच कुठे ? मात्र ईश्वर जाणायचा असेल तर गुरूचे महत्व अनन्य साधारण आहे. दाखलेच पाहायचे झाले तर इथल्या व्यवस्थेनं ज्याचं शिक्षण नाकारलं, त्या महाभारतातील एकलव्याचं उदाहरण पहा. गुरूचा पुतळा करून त्याच्यासमोर स्वयं अध्ययनाचे धडे गिरवून सर्वोत्कृष्ट धनुर्धर म्हणून लौकिकास पात्र होतो. रामकृष्ण परमहंस आणि नरेंद्र दत्त ही गुरू शिष्याची जोडी पाहता विज्ञान शाखेचा विद्यार्थी असणार्या नरेंद्राला अध्यात्माचा बोध देवून विज्ञानाला अध्यात्माची जोड देणारे विवेकवादी भारतीय तत्त्वज्ञान जगाला देणारा नरेंद्राचा विवेकानंंद परमहंसानी घडवला. हे गुरूचं अदृश्य सामर्थ्य असतं. आदर्श विद्यार्थी एकलव्याचं शिक्षण नाकारणं, इथल्या खेकडा प्रवृत्तीच्या धर्माच्या ठेकेदारांनी विवेकानंदांच्या भाषणाला विरोध करणं ही इथल्या व्यवस्थेच्या तोकडेपणाचीच उदाहरणे म्हणावी लागतील. गुरू मात्र आपल्या शिष्याला मजबुतीनं उभं करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असतात. हे विसरून कसं जमेल. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= शिक्षक हे ज्ञानरुपी सागरातले ज्ञानहंस आहेत ते सदैव ज्ञानसागरात स्वच्छंदपणे विहार करत असतात. ज्ञानरुपी सागरात समृद्ध जीवन जगण्यासाठी मन, बुद्धी आणि विश्वास विद्यार्थ्यांच्या अंगी उतरवून सन्मार्गाला लावणारी एकमेव विश्वासपात्र व्यक्ती म्हणजे शिक्षक. जो आजही समाज मानसन्मान आणि आदरणीय उच्च स्थानी बसवून त्यांना विनम्र अभिवादन करतो. अशा आदरणीय आणि वंदनीय पूज्य स्थानी फक्त आणि फक्त शिक्षकच आहेत.ज्यांच्याकडून संस्काराचे, चारित्र्यसंपन्न जीवन घडवण्याचे, विज्ञानाधिष्ठित दृष्टिकोन आणि आदर्श ध्येय समोर ठेवून राष्ट्राच्या उभारणीसाठी पायाभरणीचे कार्य शिक्षकांकडूनच केले जाते. अशा शिक्षकवृंदाना शतशः नमन करून त्यांचा ज्ञानरुपी वारसा सर्वांनी अखंड चालू ठेवायला पाहिजे. ते आपल्या ज्ञानरुपी मंदिरातील देवता आहेत. आजही त्यांचे स्थान शुक्रता-यासारखे अढळ आहे. अशा शिक्षकांना आपल्या जीवनात कधीही अंतर देऊ नये. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०. 📚🌸📚🌸📚🌸📚🌸📚🌸 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *अंतर - difference* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *मन निर्मळ तर प्रत्येक गोष्ट निर्मळ* ‘‘भिक्षां देही’’ म्हणत एक साधू महाराज मंगलाबाईंच्या घरासमोर येऊन उभे राहिले. त्यांचा आवाज ऐकून मंगलाबाई भिक्षा घेऊन आल्या. त्या फार अस्वस्थ दिसत होत्या. बाहेर येऊन साधू महाराजांना म्हणाल्या, ‘‘महाराज, मी फार अस्वस्थ आहे मला काहीतरी उपदेश करा.’’ साधू महाराज म्हणाले, ‘‘माई, आज नाही, पण मी तुला उद्या उपदेश करीन.’’ महाराजांचे हे शब्द ऐकून मंगलाबाईंना अतिशय राग आला व त्या फणकार्याने म्हणाला, ‘‘मग तुम्हाला मी भिक्षाही उद्याच घालीन.’’ दुसर्या दिवशी साधू महाराज भिक्षा मागण्यासाठी पुन्हा त्या घराकडे निघाले. येताना त्यांनी आपल्या भिक्षापात्रात थोडी माती घेतली. साधू महाराज आज येऊन उपदेश करणार म्हणून मंगलाबाई सुद्धा चांगले दान घेऊन त्यांची वाट पहात होत्या. साधूमहाराजांनी घरासमोर येऊन ‘‘भिक्षां देही’’ अशी आळी दिली. मंगलाबाई भिक्षा घेऊन आल्या. भिक्षा घालणार तितक्यात त्यांच्या लक्षात आले की भिक्षा पात्रात माती आहे. त्या पटकन साधूमहाराजांना म्हणाल्या, ‘‘महाराज, भिक्षापात्रात माती आणि कचरा आहे तर मी भिक्षा कशात घालू ?’ महाराज म्हणाले, ‘‘ मला चालेल. तुम्ही भिक्षा घाला.’’ त्यावर मंगलाबाई म्हणाल्या, ‘‘भिक्षापात्रात माती असताना त्यावर मी अन्न घालणार नाही.’’ हे ऐकून महाराज म्हणाले, ‘‘भिक्षापात्र स्वच्छ केल्यावरच तुम्ही भिक्षा घालणार ना. मग तोच तुम्हाला उपदेश आहे. काल तुम्ही दुःख आणि चितेनी ग्रासलेल्या होतात, तुमचे मन अस्वस्थ होते; मग मी तुम्हाला कसा उपदेश केला असता ?’’ गुरुचा उपदेश घेताना मन अगदी निर्मळ असायला हवे. तात्पर्य – मन निर्मळ असेल तर त्यात भर घालणारी प्रत्येक गोष्ट निर्मळच होते. *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड. http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment