✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 03/09/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- ठळक घडामोडी - ३०१: जगातील सर्वात जुने प्रजासत्ताक राष्ट्र सॅन मरीनो स्थापित झाले. १७५२: अमेरिकेत ग्रेगरियन कॅलेंडरचा वापर सुरू झाला. १९१६: श्रीमती अॅनी बेझंट यांनी होमरुल लीगची स्थापना केली. १९३५: सर मॅल्कम कॅम्पबेल ताशी ३०० मैल पेक्षा जास्त जोरात ऑटोमोबाईल चालवणारे पहिले व्यक्ति झाले. १९७१: कतारला स्वातंत्र्य मिळाले 💥 जन्म :- १९२३: प्रख्यात तबलावादक किशन महाराज १९२३: टाको बेल चे संस्थापक ग्लेन बेल १९२३: महाराष्ट्र शाहीर कृष्णराव तथा शाहीर साबळे १९२७: बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेते अरुण कुमार चटर्जी तथा उत्तम कुमार १९३१: नाटककार श्याम फडके १९३८: नोबेल पारितोषिक विजेते जपानी रसायनशास्त्रज्ञ रायोजी नोयोरी १९४०: लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार प्यारेलाल शर्मा १९५६: भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक जिझु दासगुप्ता १९६५: अमेरिकन अभिनेता चार्ली शीन १९७१: भारतीय-अमेरिकन लेखक किरण देसाई १९७४: भारतीय क्रिकेटपटू राहुल संघवी १९७६: चित्रपट अभिनेता विवेक ओबेरॉय 💥 मृत्यू :- १९५३: तबला, घुमट व सारंगीवादक लक्ष्मण तथा खाप्रुमामा पर्वतकर १९५८: निसर्गकवी माधव केशव काटदरे १९६७: वार्ताहर, संपादक अनंत हरी गद्रे तथा समतानंद २०००: स्वातंत्र्यसैनिक, गोवा विधानसभेचे पहिले सभापती पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर २०१४: भारतीय राजकारणी ए. पी. वेंकटेश्वरन *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *वॉशिंग्टनः पाकिस्तानला देण्यात येणारी 2100 कोटी रुपयांची आर्थिक मदत अमेरिकेने रोखली.* --------------------------------------------------- 2⃣ *सातारा : कोयना धरणात १०४.६० टीएमसी पाणीसाठा झाला असून पाऊस वाढल्यास कोणत्याही क्षणी कोयनेतील विसर्ग वाढणार, सध्या धरणातून ११४८० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे* --------------------------------------------------- 3⃣ *उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस, 24 तासांत 16 जणांचा मृत्यू.* --------------------------------------------------- 4⃣ *नवी मुंबई : श्री कुलस्वामी को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या नूतन प्रशासकीय कार्यालयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन, केरळमधील पूरग्रस्तांना दिला मदतीचा हात* --------------------------------------------------- 5⃣ *भाजपचे कुरुक्षेत्रचे बंडखोर खासदार राजकुमार सैनी यांनी लोकतंत्र सुरक्षा पार्टीची केली घोषणा* --------------------------------------------------- 6⃣ *ठाणे मॅरेथॉन : 21 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत नाशिकच्या रणजीत पटेल पहिला तर कोल्हापूरचा दीपक कुंभार दुसरा तर वेस्टर्न रेल्वेचा संतोष पटेल तिसऱ्या क्रमांकावर* --------------------------------------------------- 7⃣ *Asian Games 2018: 18 व्या आशियाई स्पर्धेचे सूप वाजले, 2022 मध्ये चीनमध्ये भरणार कुंभमेळा* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *शिक्षकांचा सन्मानाचा दिवस* https://goo.gl/QyLSzf आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *श्री चक्रधर स्वामी* चक्रधर स्वामी यांच्या प्रारंभिक जीवनासंबंधी माहिती लीळाचरित्राच्या एकांक या भागात मिळते. बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात गुजराथमधील भडोच येथे शके ११४२ विक्रम संवत्सर भाद्रपद महिन्याच्या शुक्लपक्षाच्या रविवारी चक्रधर स्वामी यांचा जन्म झाला. त्यांचे वडील विशाळदेव हे भडोचचा राजा मल्लदेव याचे प्रधान होते. त्यांच्या आईचे नाव म्हाळईसा होते. चक्रधरांचे जन्म नाव हरपाळदेव असे होते. तारुण्यात आल्यावर हरपाळदेव यांचा विवाह कमळाईसा यांच्याबरोबर झाला. याच काळात त्यांनी युद्धांतही पराक्रम गाजवला.पुढे हरपाळदेवांना आजारी लोकांची सेवा करायचा छंद लागला. बरेचदा ते राजवाडा सोडून आजारी लोकांबरोबर वेळ घालवू लागले. पुढे त्यांची प्रकृती अचानक खालवली व त्यांचा मृत्यू झाला. परंतु स्मशानात सरणावर ठेवल्यावर हरपाळदेव जिवंत असल्याचे आढळून आले. महानुभावीयांच्या श्रद्धेनुसार यावेळी श्रीकृष्णाने त्यांच्या शरीरात प्रवेश करून अवतार धारण केला. पंचावतारातील तिसरा अवतार श्री चांगदेव यांचा त्याच सुमारास मृत्यू झाला होता. काही मतांनुसार त्यांच्या आत्म्याने हरपाळदेवांच्या शरीरात प्रवेश केला. हरपाळदेवांच्या शरीरात प्रविष्ट होणारा आत्मा स्वतंत्र ईश्वरी आत्मा होता.[२]ही अवतारधारणाची घटना शके ११४२ विक्रम संवत्सर भाद्रपद महिन्याच्या शुक्लपक्षाच्या रविवारी घडली. या घटनेनंतर चक्रधरांचे आयुष्य पूर्वीप्रमाणेच सुरू झाले. कालौघात त्यांना एक पुत्रही झाला. त्यांचे आजारी लोकांना सेवा देणे मात्र तसेच सुरू राहिले. एक दिवस काही रुग्णांना फारच खर्च लागल्यामुळे त्यांना उसने घ्यावे लागले. त्यांनी देणेकर्यांचे पैसे जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत अन्नप्राशन करणार नाही अशी शपथ घेतली. त्यांच्या पत्नीने त्यांना या कारणासाठी दागिने देण्यास नकार दिला. शेवटी त्यांच्या वडिलांनी त्यांच्या नकळत देणेकर्यांचे पैसे परत केले.[३] या घटनेमुळे हरपाळदेव यांना औदासीन्याने ग्रासले. लौकिक प्रपंचातून त्यांचे मन उडाले. त्यांनी राजविलासी भोग, संसार-सुख यांचा त्याग करून लोकसेवा करण्याचा निर्णय घेतला. गृहत्याग करण्यासाठी हरपाळदेवांनी रामाच्या दर्शनास रामटेक येथे जावयाचे आहे अशी सबब घरी सांगितली. त्यावेळी महाराष्ट्रातील यादव व भडोचचे राज्य यांच्यात कलह सुरू होता. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी या कल्पनेस विरोध केला. परंतु शेवटी हरपाळदेवांनी वडिलांचे मन वळविले व त्यांच्या वडिलांनी त्यांना संरक्षणासाठी घोडेस्वार व सेवक यांच्यासह जाण्यास अनुमती दिली. त्यांना आपल्यासोबतचा लवाजमा नको होता. त्यांना सर्वत्याग करावयाचा होता. त्यामुळे त्यांनी एकेका मुक्कामावरून आपले क्षेमकुशल कळवण्यासाठी एकेक सैनिक परत पाठवणे सुरू केले. शेवटी अमरावती जिल्ह्यातील देऊळवाडा येथे काजळेश्वराच्या मंदिरात मुक्कामास असतांना त्यांचे सैनिक निद्राधीन झाल्याचे पाहून आपली राजवस्त्रे तिथेच काढून ठेवून दोन वस्त्रांनिशी ते तिथून निघून गेले. सर्वस्वाचा त्याग करून भ्रमण करत असतांना हरपाळदेव रिद्धपूर येथे आले. तिथे त्यांना विरक्त अवस्थेतील श्री गोविंदप्रभु दिसले. गोविंदप्रभूंपासून हरपाळदेव यांना शक्ती प्राप्त झाल्या. याचवेळी गोविंदप्रभूंनी त्यांना चक्रधर हे नाव दिले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= शरीराला श्रमाकडे, बुध्दीला मनाकडे आणि ह्रदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) गोपाळ हरी देशमुखांनी कोणतं साप्ताहिक सुरू केलं ?* प्रभाकर *२) मेघालय, त्रिपुरा, मणिपूर या नवीन राज्यांची स्थापना कधी झाली ?* २१ जानेवारी १९७२ *३) चाफेकर बंधूंनी कोणत्या ब्रिटिश अधिकार्यांची हत्या केली ?* रँड आणि आयस्र्ट *४) इंडियन नॅशनल युनियनचे संस्थापक कोण ?* अँलन ह्युम *५) इंडिया गेटची उंची किती ?* ४२ मीटर *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 किरण गायकर 👤 राज कुमारे 👤 प्रदीप पंदिलवाड 👤 भीमराव सोनटक्के 👤 आशिष हातोडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *त्यांना अन् यांना* कष्टक-याच्या घामाला अत्तराचा वास येतो कष्ट करतील तेंव्हा त्यांच्या पोटात घास जातो कष्ट करून खाल्लं तरच त्यांना गोड लागतो घास कुदडुस्तोर खाऊन यांना बसल्या जागी उपवास शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 08* *संगती सो सुख उपजे* *कुसंगति सो दुःख होय |* *कह कबीर तह जाइए* *साधू संग जहा होय ||* अर्थ : मराठीमध्ये एक म्हण आहे.' ढवळ्याशेजारी पवळ्या बांधला वाण नाही तरी गुण लागला.' तद्वत संगतीचे परिणाम दिसत असतात. महात्मा कबीर संगतीचे महत्त्व सांगताना म्हणतात . माणसाने सुसंगती धरली तर जीवन सुकर व आनंदी होते. जगण्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन विकसित होवून जगणं उत्साही होतं. जीवनात आनंदाची निर्मिती झाली की समाधानाची आपोआप प्राप्ती होते. हाच तर जीवनाचा खरा उद्देश असतो. कुसंगतीमुळे माणूस वाईट बर्या वाईटाचा विचार करणं सोडून देतो. विविध विकारांनी मन दुषित होऊ लागतं. एकदा मन विखारी झालं की वर्तन दुराचारी व्हायला कितीसा अवकाश लागणार बरं ! म्हणतात ना 'मन चिंती ते वैरी न चिंती.' मनंच स्वत:शी प्रतारणा करू लागलं की माणूस स्वत:च्याच नजरेत कमी पडू लागतो. स्वत:च्याच नजरेतून उतरण्याची वेदना सलू लागते. यातून दु:खाची निर्मिती व्हायला लागते. एकदा का माणूस दु:खाच्या आहारी गेला की त्याचा खेळंच खल्लास ! पुन्हा तो उभारी घेणं महत्प्रयासाचंच. महाज्ञानी असूनही कर्ण दुर्योधनाच्या संगतीमुळे अधर्माची बाजू घेवून कायम अवहेलनेचा धनी बणून राहिला तर अर्जुन कृष्ण संगतीत राहून कर्मनिष्ठ होवून धर्मयोद्धा (न्याय धर्म) म्हणून अजरामर झाला. म्हणून माणसानं खर्या साधूची पारख करून सत्संगी व्हावं. सुसंगतीत स्वत:ला रमवावं. स्वत:च स्वत:च्या जीवनाला चांगलं घडवावं. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जी व्यक्ती आपल्या जीवनात स्वत:च्या जीवनाकडे सातत्याने नकारात्मक दृष्टीने पाहते ती व्यक्ती कोणतीही प्रगती करु शकत नाही. तो दुस-याकडे त्याचदृष्टीने पाहत असल्यामुळे दुस-यांची होणारी प्रगतीही तो चांगल्या दृष्टीने पाहू शकत नाही. अशी माणसे आपल्या सभोवती असणेही आपल्याला आणि आपल्या जीवनात होणा-या प्रगतीला अडसरच आहे. अशा माणसासमोर चांगले सांगणेही वाईटच असते. अशापासून थोडे सावध असायला हवे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *सावध - Cautious* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *ज्याचं काम त्यानीच करावं* एकदा एक राजा आपल्या प्रधानाला बरोबर घेऊन शिकारीला जातो. मधेच थोडेसे ढग गोळा होऊन अंधारल्यासारखे वाटते. राजाबरोबर बराच लवाजमा असतो. पाऊस आला तर सुरक्षित जागा शोधायला हवी म्हणून राजा प्रधानाला विचारतो, ‘‘पाऊस पडेल असे तुम्हाला वाटते का ?’’ प्रधान त्यावर ‘‘काही सांगता येत नाही’’ असे उत्तर देतो. तेवढ्यात समोरून एक गुराखी येत असतो. राजा त्यालाही हा प्रश्न विचारतो. त्यावर गुराखी म्हणतो, ‘‘हो, थोडाच वेळाने पाऊस पडेल.’’ आणि थोडावेळाने खरोखर पाऊस पडतो. ते पाहून राजास प्रधानाचा राग येतो आणि इतके साधे उत्तर देता आले नाही म्हणून त्याचे पद काढून त्या जागी गुराख्याची नेमणूक करतो. काही दिवसांनी शत्रूचे राज्यावर आक्रमण होणार आहे अशी बातमी राजाला हेरांकडून समजते. तो नवीन प्रधानाला म्हणजे गुराख्याला युद्धाची तयारी करा अशी आज्ञा करतो. पण मुळात गुराखी असलेला प्रधान घाबरून ‘‘मला युद्धातले काही कळत नाही. मी काय करणार ?’’ असे राजाला सांगतो. तेव्हा राजाला आपली चूक लक्षात येते आणि तो आपल्या प्रधानाला पुन्हा बोलावून घेतो. :: तात्पर्य – ज्याचं काम त्यानीच करावं. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment