✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 04/09/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १८८२: थॉमस एडिसन यांनी इतिहासातील पहिल्या व्यावसायिक विद्युत ऊर्जा प्रकल्प चालु केले वीजयुगाची सुरुवात म्हणून हा दिवस ओळखला जातो. १८८८: जॉर्ज इस्टमन याने कोडॅक फिल्म कॅमेऱ्याचे पेटंट घेतले. १९०९: लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या स्काऊटचा पहिला मेळावा झाला. १९३७: प्रभातच्या संत तुकाराम या चित्रपटाची जगातल्या तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणून निवड झाली. १९७२: मार्क स्पिटझ हा एकाच ऑलिम्पक स्पर्धेत ७ सुवर्णपदके मिळवणारा पहिला खेळाडू बनला. १९९८: स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज व सर्गेइ ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी गुगलची स्थापना केली. २००१: हेवलेट पॅकर्ड या कंपनीने संगणक क्षेत्रातील कॉम्पॅक कॉर्पोरेशन ही बलाढ्य कंपनी २५ अब्ज डॉलर्सला विकत घेतली. २०१३: रघुराम राजन यांनी रिझर्व्हबँक ऑफ इंडियाचे २३वे गव्हर्नर म्हणून पदभार हाती घेतला 💥 जन्म :- १२२१: महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी १८२५: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय पितामह दादाभाई नौरोजी १९२३: भारतीय वकील आणि राजकारणी राम किशोर शुक्ला १९३७: साहित्यिक व समीक्षक शंकर सारडा १९४१: माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे १९५२: अभिनेता ऋषी कपूर १९६२: यष्टीरक्षक किरण मोरे १९६४: भारतीय गायक-गीतकार आदेश श्रीवास्तव १९७१: दक्षिण अफ्रिकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू लान्स क्लूसनर 💥 मृत्यू :- धर्मयुग साप्ताहिकाचे २७ वर्षे संपादक डॉ. धर्मवीर भारती २०००: खळाळून हसवणारे विनोदी कलाकार मोहम्मद उमर मुक्री २०१२: भारतीय लेखक सय्यद मुस्तफा सिराज २०१२: भारतीय गायक-गीतकार हांक सूफी २०१५: भारतीय सर्जन आणि राजकारणी विल्फ्रेड डी डिसोझा *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *डेहराडून : उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये भाविकांची व्हॅन 100 मीटर खोल दरीमध्ये कोसळली. यामध्ये 9 भाविकांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना गंगोत्री हायवेवर घडली.* --------------------------------------------------- 2⃣ *भारत आणि सायप्रस यांच्यात दोन सामंजस्य करार* --------------------------------------------------- 3⃣ *पाकिस्तान समोरील कर्जाची समस्या सोडवण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान परदेशी अर्थतज्ज्ञांची घेणार मदत* --------------------------------------------------- 4⃣ *सोलापूर : गोकुळाष्टमी निमित्त पंढरपूर येथील पांडुरंगाला पारंपारिक अलंकाराची वेशभूषा, डोक्याला ११० फुटाचे आकर्षक पागोटे, हातात चांदीची काठी* --------------------------------------------------- 5⃣ *जम्मू-काश्मीर- पुलवामातील अनेक गावांमध्ये सर्च ऑपरेशन सुरू; दहशतवादी घुसल्याची शक्यता* --------------------------------------------------- 6⃣ *भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी करता आली नाही म्हणून इंग्लंडचा अनुभवी सलामीवीर आणि माजी कर्णधार अॅलिस्टर कुकने घेतला निवृत्तीचा निर्णय* --------------------------------------------------- 7⃣ *भारत वि. इंग्लंड चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा दारुण पराभव; इंग्लंडचा मालिका विजय; भारतीय खेळाडू १८४ धावांत तंबूत परतले* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= शिक्षक दिनानिमित्त प्रासंगिक लेख *बदलत्या काळात शिक्षकांची भूमिका* वरील लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लिक करावे. https://goo.gl/T2FMmb आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन* भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन याच्या स्मृतीप्रत्यर्थ त्यांचा जन्मदिन संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा करतात. कारण डॉ. राधाकृष्णन यांनी 1909 ते 1948 वर्षं पर्यंत म्हणजे 40 वर्षे शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकाचा कार्यभार सांभाळला . त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1988 साली आंध्र राज्यातील चितुर जिल्ह्यातील तिरूताणी या गावी झाला. प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावी झाले व पुढील शिक्षण तिरुपती या गावी झाले. त्यांचे शिक्षण लुथरम मिशन हायस्कूल मध्ये झाले. नंतर उच्च माध्यमिक शिक्षण मद्रास येथील ख्रिश्चन कॉलेजात. तत्त्वज्ञान विषय घेऊन ते प्रथम क्रमांकाने पास झाले व एम्.ए. साठी नितीशास्त्र विषय घेतला. मद्रास येथे प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये तर्कशास्त्राचे प्राध्यापक म्हणून 1917 पर्यंत कार्य केले. 1939 मध्ये आंध्र विद्यालयाने त्यांना डी. लिट. ही पदवी दिली. 1931 साली इंग्लॅडने डॉ. राधाकृष्णन यांना सर ही मानाची पदवी बहाल केली. त्यांच्या वाढत्या गुणांमुळे, प्रगतीमुळे 1946ते 1949 या काळात भारतीय राज्य घटना समितीचे सभापती म्हणून निवड झाली. 1952 साली भारताचे पहिली निवडणूक होऊन उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. त्याच वेळी ते दिल्ली विद्यापीठाचे कुलपती होते. त्याचप्रमाणे 1939 ते 48 बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे कुलपती होते. 1957 च्या दुसर्या सार्वत्रिक निवडणुकीत ते पुन्हा उपराष्ट्रपती झाले. उत्कृष्ट कार्य कर्तृत्त्वामुळे त्यांना 1958 साली भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला. 13 मे 1962 साली डॉ. राधाकृष्णन यांची राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली. 1967 साली निवृत्त झाले. त्यानंतर आंध्रराज्यातील तिरूपती या गावी 24 एप्रिल 1975 रोजी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= केवळ पुस्तके वाचून ढीगभर ज्ञान साठवणे म्हणजे विद्या नव्हे, ते ज्ञान जीवनात उतरविणे म्हणजे खरी विद्या - डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) 'जंतरमंतर' हे सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ कोठे आहे ?* दिल्ली *२) उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये आढळणारी पाणकोंबडीसारखी कोंबडी कोणती ?* पेलिकल *३) सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?* गुरू *४) निरनिराळ्या खनिजांनी बनलेल्या टणक, घनस्वरुपातील भूपृष्ठाच्या वरील आणि आतील भागास काय म्हणतात ?* खडक *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= • सुनील अस्वले • मुकेश धर्मले • जयेंद्र कुणे • श्रीपाद वसंत जोशी • संगमेश्वर नळगिरे • सायारेड्डी सामोड • मुकेश पटेल • अस्लम शहा • संतोष पेंडकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *अहंकार* पायातला काटा निघाला की चालायला मजा येते जगायला तेंव्हा मजा जेंव्हा मनातून अहंकार वजा होते अहंकार वजा झाला की जगण्यात मजा आहे अहंकारा सोबत जगलात तर जगणं सजा आहे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 09* *साहेब तेरी साहिबी,* *सब घट रही समाय |* *ज्यो मेहंदी के पात में* *लाली राखी न जाय ||* अर्थ : निसर्ग शक्ती अगाध आहे. माणूस कितीही प्रगत झाला तरी निसर्गाविष्कारापुढे थिटा पडतो. पंच महाभुतांना रोखण्याचं सामर्थ्य अद्यापही मानवाला प्राप्त झालेलं नाही. माणूस पक्षागत अंतराळी उडत असला तरी आभाळ दाटल्यावर त्यातून वाट काढणं विमानांना कठीण होतं. धुकं फाकण्याची वाट बघावी लागते. निसर्ग निष्णात जादुगर आहे. इवल्या इवल्पा पंंखावर मखमल पेरून किती नजाकतदार रंगांच्या रांगोळी उमटवतो बरं पंखांवर फुलपाखरांच्या ! या अद्मूत निसर्ग चालक शक्तिलाच तर ईश्वर म्हटलं जातं. जगभर हा ईश्वर विभिन्न नावारूपानं मानल्या जातो. महात्मा कबीर याच शक्तीला साहेब म्हणतात. साहीबी म्हणजे या निसर्ग शक्तीनं सर्व घट म्हणजे सजीवांवर केलेली कारागीरी. त्यांना दिलेले सारखे आकार रंग रूप त्यात भरलेलं चैतन्य. हे सारं अनाकलनीयंच ! या सर्वाठायी तो भरून उरलाय. मेंदीच्या पानाला दिलेला हिरवा रंग. लावण्यापूर्वी दिसणारा तिचा शेवाळारंग हातावर लावला की खुलताना त्यात भरणारी लाली कुठून येते बरं ? ही सारी निसर्ग शक्तीचीच जादुगीरी ! एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्याप्रमाणे सीमेवर लढणाऱ्या जवानांचे एक ध्येय निश्चित केलेले असते. ते ध्येय म्हणजे " जिंकू किंवा मरु..." समोर असलेल्या शत्रूला तोंड दिले तर आपण विजयी होऊ नाहीतर ठरवलेल्या ध्येयापासून थोडेजरी मन डळमळीत झाले तर निश्चित केलेले ध्येय पूर्ण करु शकत नाही. याचा अर्थ असा होतो की,आपण आपल्या ध्येयापासून दूर जात आहोत म्हणजे आपला पराभव निश्चित तर आहेच त्याचबरोबर आपला जीवही गमवावा लागत आहे. आपण आपल्या जीवनात अयशस्वी होत आहोत. त्यामुळे कोणताही जवान ध्येयापासून परावृत होत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या जीवनात जर चांगले ध्येय निश्चित केले तर त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करायला लागा तरच ते ध्येय पूर्ण करु शकाल. नाही तर तुम्ही ठरवलेल्या ध्येयापासून दूर राहाल.नाहीतर आपणच आपले गुन्हेगार ठरु शकू. त्यामुळे आपल्या जीवनात नैराश्य तर येईलच आणि आपल्या जीवनात जगण्याला काही अर्थ राहणार नाही असे वाटायला लागेल. आपणच आपले अपराधी आहोत असे वाटायला लागेल. त्यापेक्षा आपले ध्येय निश्चित करुन आत्मविश्वासाने पुढे आगेकूच करायला लागा.तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका.मनाची सकारात्मकता डोळ्यासमोर ठेवून पुढे पुढे चालायला शिका म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनात खरोखरच यशस्वी होऊ शकाल यात वादच नाही. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🛣☀🛣☀🛣☀🛣☀🛣☀🛣 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *नैराश्य - Depression* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्षमा करून सामंजस्यपणाने चूक सुधारणे* काशीला एक विद्वान पंडित रहात असत. त्यांचा मोठमोठ्या ग्रंथांचा अभ्यास होता त्यामुळे साहजिकच त्यांच्याकडे जुन्या-नव्या ग्रंथांचा खूप मोठा संग्रह होता. त्यात एक अत्यंत प्राचीन असा तत्त्वज्ञानावरील दुर्मीळ ग्रंथ होता. पंडितांच्याकडे कधी सल्लामसलतीसाठी तर कधी धार्मिक किवा तात्त्विक चर्चेसाठी अनेक विद्वान पंडित, धर्मगुरु येत असत. एकदा एका धर्मगुरूंनी तो दुर्मीळ ग्रंथ वाचायला म्हणून घेतला आणि जाताना बरोबर नेला. ग्रंथाची चोरी लगेच लक्षात आली. ग्रंथ कोणी नेला हे पंडितांच्या लक्षात आले होते पण त्याबद्दल ते फारसे कोणाशी बोलले नाहीत. तिकडे त्या धर्मगुरूंनी तो ग्रंथ विकायला काढला. तो दुर्मीळ ग्रंथ त्यांनी एका श्रीमंत शेठजींना विकायच्या उद्देशाने दाखविला. पण ग्रंथ किती महत्त्वाचा आहे हे माहिती करून घेण्यासाठी शेठजी तो ग्रंथ घेऊन त्या पंडितांकडे आले. पंडितांनी तो ग्रंथ पाहिला, ओळखला सुद्धा ! आणि म्हणाले,‘‘ग्रंथ अनमोल आहे.’’ हे ऐकताच शेठजींनी धर्मगुरूंना आपला होकार कळवला. धर्मगुरूंनी शेठजींना विचारले,‘‘तुम्ही हा ग्रंथ कुणाला दाखविलात ?’’ शेठजींनी उत्तर दिले, ‘‘अर्थातच पंडितांना !’’ त्यांचं हे उत्तर ऐकताच धर्मगुरू पंडितांकडे गेले, त्यांचा तो ग्रंथ त्यांना परत करत म्हणाले,‘‘पंडितजी मला क्षमा करा ! मी ग्रंथ चोरला आहे हे माहीत असूनही तुम्ही काहीच बोलला नाहीत. त्यावर पंडितजी हसून म्हणाले,‘‘पश्चातापाची जेव्हा भावना होते त्यावेळेस कोणीच ती चूक पुन्हा करीत नाही. कारण पश्चातापामुळे तो त्या चुकीतून बाहेर पडायला धडपडत असतो. *तात्पर्य – शिक्षेनी नाही तर क्षमा केल्याने चूक सुधारत असते.* *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव. ता.हदगाव, जि. नांदेड. http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment