✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 06/09/2018 वार - गुरूवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १८८८: चार्ल्स टर्नरचा एकाच मोसमात २५० क्रिकेट बळीचा विक्रम. १९५२: कॅनडातील पहिले दूरचित्रवाणी केंद्र माँट्रिअल येथे सुरू झाले १९६८: स्वाझीलँड हा देश स्वतंत्र झाला. १९९३: ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांची कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्कारासाठी निवड. १९९७: अमेरिकेच्या नॅशनल एन्डाऊमेंट फॉर द आर्टस संस्थेची सरोदवादक अमजद अली खाँ यांना नॅशनल हेरिटेज फेलोशिप मिळाली. 💥 जन्म :- १८८९: स्वातंत्र्यसेनानी, सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू बॅ. शरदचंद्र बोस १८९२: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ सर एडवर्ड ऍपलटन १९०१: भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले १९२१: बार-कोड चे सहसंशोधक नॉर्मन जोसेफ व्हाउडलँड १९२९: हिंदी चित्रपट निर्माते यश जोहर १९६८: पाकिस्तानी फलंदाज सईद अन्वर १९७१: भारतीय क्रिकेट खेळाडू देवांग गांधी 💥 मृत्यू :- १९६३: कन्नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक मंजेश्वर गोविंद पै १९७२: जगप्रसिद्ध सरोदवादक व संगीतकार अल्लाउद्दीन खाँ १९९०: इंग्लिश क्रिकेटपटू सर लिओनार्ड तथा लेन हटन *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर द्यावा, त्यांच्याकडील शिक्षणबाह्य काम कमी करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करू शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे प्रतिपादन* --------------------------------------------------- 2⃣ *मुंबई- अभिनेते दिलीप कुमार यांना पुन्हा केलं लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल, छातीच्या संसर्गामुळे तातडीने रुग्णालयात हलवलं* --------------------------------------------------- 3⃣ *विदर्भात पुढील चोवीस तासांमध्ये पावसाची शक्यता, पूर्व-विदर्भात 6, 7 सप्टेंबर रोजी पावसाचा जोर वाढणार* --------------------------------------------------- 4⃣ *मुंबई - प्रसिद्ध चित्रकार सुहास बहुळकर यांना चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर* --------------------------------------------------- 5⃣ *धुळे : बदली प्रक्रियेत अन्याय झाल्याने चिंचखेडे येथील शिक्षक भास्कर अमृतसागर यांचे धुळे जि.प. समोर कंदील लावून बिऱ्हाड आंदोलन सुरू* --------------------------------------------------- 6⃣ *मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचे निधन* --------------------------------------------------- 7⃣ *देशभरात पेट्रोल, डिझेलची दरवाढ सुरुच; पेट्रोल 15 पैसे तर डिझेल 20 पैशांनी महागले* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= खास शिक्षक दिनानिमित्त मनाला भावलेलं *" हाताची जादू ओळखणारा शिक्षक "* लेखक - नागोराव येवतीकर निवेदन - सतीश पाटील https://youtu.be/-R9ZpCSvOok You tube वर एकदा जरूर ऐका. एका मित्राकडून शिक्षक दिनानिमित्त दिलेली खास भेट आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *संत एकनाथ* संत एकनाथ(१५३३-१५९९) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक संत होते. त्यांचा जन्म इ.स. १५३३ मध्ये पैठण येथे झाला. एकनाथांनी देवगिरी (दौलताबाद) च्या जनार्दनस्वामींना त्यांनी गुरू मानले. त्यांच्याकडूनच एकनाथांनी वेदान्त, योग, भक्तियोग यांचे शिक्षण घेतले. बराचसा काळ ध्यान आणि वेदाध्ययनात घालवला. गुरूंबरोबर तीर्थयात्रा केल्यानंतर त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. गिरिजाबाई हे त्यांच्या पत्नीचे नाव. एकनाथांचे मूळ पुरुष भास्करपंत कुलकर्णी, हे प्रतिष्ठान ऊर्फ पैठण नगरीत राहणारे होते. संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा. ते सूर्याची उपासना करीत. श्री संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. आईचे नाव रुक्मिणी होते. एकनाथांचा जन्म शके १४५० ते १४५५ या दरम्यान झाल्याचे मानले जाते. आई-वडिलांचा सहवास फार काळ लाभला नाही. त्यांचे पालनपोषण आजोबांनी केले. चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत. एकनाथांना लहानपणापासून अध्यात्मज्ञानाची व हरिकीर्तनाची आवड होती. एकनाथांचे गुरू सद्गुरू जनार्दनस्वामी हे देवगड (देवगिरी) येथे यवन दरबारी अधिपती होते. हे मूळचे चाळीसगावचे रहिवासी; त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते दत्तोपासक होते. गुरु म्हणून संत एकनाथांनी त्यांना मनोमन वरले होते. नाथांनी परिश्रम करून गुरुसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले, असे म्हणतात. नाथांनी अनेक तीर्थयात्राही केल्या. नाथांनी एका मुलीशी विवाह केला. ही मुलगी पैठणजवळच्या वैजापूरची होती. एकनाथ आणि गिरिजाबाई यांना गोदावरी व गंगा या दोन मुली व हरी नावाचा मुलगा झाला. त्यांचा हा मुलगा हरिपंडित झाला. त्याने नाथांचे शिष्यत्व पत्करले. एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर हरिपंडितांनी नाथाच्या पादुका दरवर्षी आषाढीवारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= शुन्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते, तोच खरा कर्तृत्ववान होय. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) मानवी तस्करी विरोधी दिन कधी असतो ?* ३० जुलै *२) 'द प्रेस' या गाजलेल्या साहित्यकृतीचे लेखक कोण ?* एम. चलपतराव *३) पृथ्वीचे दोन समान भाग करणार्या आणि पूर्व-पश्चिम दिशेने जाणार्या काल्पिनक वृत्ताला काय म्हणतात ?* विषुववृत्त *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= • महेश वडजे • संतोष इनामदार • विठ्ठल तुकडेकर • रितेश पोकलवार • प्रशिक कैवारे • विकास डुमणे • सुनील ठाणेकर • अनिल सोनकांबळे • आनंद गायकवाड • सचिन पाटील • *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *बनवा बनवी* करणारे बरोबर बनवा बनवी करतात बनवा बनवी करून तेच चांगले ठरतात कितीही सफाईने बनवा बनवेगिरी उघडी पडते कुठे तोंड लपवावे बनवणाराला पंचाईत पडते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 11* *साईं आगे सांच है,* *साईं सांच सुहाय |* *चाहे बोले केस रख* *चाहे घौत मुंडाय ||* अर्थ : महात्मा कबीर निर्गुणाचे उपासक आहेत. ते मुर्तीपूजक नाहीत. ते कर्मकांड, कर्मठपणा व पाखंडी भक्तीचं समर्थन करीत नाहीत. ईश्वराचं वास्तव्य ते सत्यात पाहतात. सत्याच्या ठिकाणी ईश्वर वसत असतो. ईश्वराला सत्यच आवडत असते. अलिकडे सत्यापेक्षा ढोंग जास्त वाढलंय. कबीर त्याच्यावर फटकार ओढतात. भक्तिचं अवडंबर माजवून आंतरिक शुद्धी न करता बाह्य देखावे कितीही केले तरी ईश्वर कसा काय भुलेल व प्रसन्न होईल ? काही जण भक्तीच्या नावाखाली भले लांब केस वाढवतात. डोक्यातल्या केसांच्या जटा होवून जातात. दाढीमिशाही लांंबच लांब वाढवतात. कुठे तरी जंगलात जावून गुहेत झाडाखाली वास्तव्य करतात. काही जण मिशा काढून दाढी वाढवतात. कुणी दाढी मिशा काढून टाकतात. तर कुणी मुंडण करतात. काही भक्त मूर्तीपूजा करतात , काही नमाज अदा करतात, काही उपासातापासाच्या नादी लागून शारीरिक क्लेश वाढवून घेतात. ही सर्व मंडळी खरे पाहता खर्या ईश्वराला ओळखतच नाहीत. तो प्रत्येकाच्या आत दडलेला असतो. निसर्गानं आपणास दाढी मिशी केस हे शरीर रक्षणासाठी दिलेले आहेत. आवश्यक तेवढे ठेवणे व अनावश्यक काढले पाहिजेत. जशी शारीरिक स्वच्छता करता तशी मनाचीही स्वच्छता करता आली पाहिजे. मनाने निसर्गतः माणूस म्हणून जन्माला आलात तर माणूस म्हणून माणसाला मुक्तपणे जगता आलं पाहिजे. जाती धर्माचा हा देखावा कृत्रीम आहे. पशु पशुत्व सोडत नाहीत. आपआपसात भेदभाव करत नाहीत. पक्षीही भेदभाव न करता सारे कसे एकत्र राहतात? माणसानेही वरवरच्या देखाव्याला भुलून मानवता धर्मातला आनंद गमावता कामा नये. बनावटी व दिखाऊ धर्मातून सत्य व समाधान मिळत नाही . मिळाल्यासारखं वाटलं तरी ते चिरकाल आनंद देवूच शकत नाही. तेव्हा सत्य जाणून. प्रत्येकात दडलेल्या ईश्वराला नैसर्गिकपणे जपायला ह्रवे. हाच खरा कल्याणकारी मानवता धर्म आहे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= या चराचर सृष्टीतील प्रत्येक जीवाला जीवन जगण्यासाठी एकमेव पाण्याची जशी आवश्यकता आहे, त्याप्रमाणे मनुष्याला आपले जीवन सुखी व समृद्ध वैविध्यपूर्ण मानसन्मानाने जगण्यासाठी, आलेल्या संकटावर मात करण्यासाठी, स्वावलंबी होऊन जीवन जगण्यासाठी ख-या ज्ञानाची आवश्यकता आह े.ज्यांच्याजवळ कोणतेच ज्ञान नाही त्यांचे जीवन अर्थहीन आहे.जसे की जीवांना पाण्याविना जगणे अशक्य आहे तसे माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी ज्ञान नसेल तर ते मनुष्यरुपी जीवन म्हणून जगणे अर्थहीन आहे. जीवनातल्या प्रत्येक संकटातून आपल्याला मार्ग काढायचा असेल तर ज्ञानाची कास धरावीच लागेल.त्याच्याशिवाय कोणतीही प्रगती करणे अशक्य आहे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 📖🎨📖🎨📖🎨📖🎨📖🎨 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रेरणा - Inspiration* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *न्याय सर्वांसाठी* एका राजाने आपल्या महालाबाहेर एक मोठी घंटा बांधून त्याची दोरी खाली सोडली होती. कोणीही सामान्य माणसाने यावे व ती घंटा वाजवून राजाकडे न्याय मागावा अशी त्या न्यायी राजाची व्यवस्था होती. एकदा एक अत्यंत हडकुळा, अशक्त बैल रस्त्याने जाता-जाता महालाबाहेरील हिरव्या वेलीची पाने खाऊ लागला. वेलीच्या बाजूलाच लोंबकळत असलेली त्या न्यायाच्या घंटेची दोरी त्याच्या तोंडात आली व त्याने मान फिरवताच घंटा वाजू लागली. अचानक घंटा वाजलेली पाहून राजाने घंटा वाजवणाऱ्याला दरबारात आणण्याचा फर्मान काढले. पाहातात तर तेथे कोणीच व्यक्ती नव्हती पण तेथे तो बैल होता. त्या बैलालाच शिपाई घेऊन आले. पण बैल तो, तो काय बोलणार? फिर्यादच करू शकला नाही तर त्याला काय न्याय देणार? म्हणून त्याला सोडून देणार तोच मुख्य प्रधान पुढे सरसावला व म्हणाला, “महाराज, या बैलाने घंटा वाजवली म्हणजे नक्कीच त्याची काहीतरी फिर्याद असणार. पहा, तो म्हातारा आहे. म्हणजे मालकाने त्याच्याकडून भरपूर काम करून घेतले व म्हातारपणी त्याला चाराही न देता सोडून दिले. भुकेपोटी हिंडत तो येथे आला व वेल खाऊ लागला. याचा अर्थ त्याच्या मालकाने त्याच्यावर अन्याय केला आहे. महाराज तो आपण दूर करावा.” प्रधानाचे म्हणणे न्यायी राजाला पटले. त्याने तात्काळ बैलाच्या मालकाला बोलावून त्याला दंड केला व बैलाला नीट सांभाळण्यास सांगितले. *तात्पर्य : मुक्या प्राण्यालाही न्याय मिळाला पाहिजे.* *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड.* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment