✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ (फ्रेश शालेय परिपाठ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 07/09/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- 💥 ठळक घडामोडी :- ● १८१४: दुसर्या बाजीरावाने पांडुरंग कोल्हटकराच्या साहाय्याने उंदेरी-खांदेरी किल्ल्यांचा ताबा परत मिळवला. ● १८२२: ब्राझिलला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले. ● १९०६: बँक ऑफ इंडिया ची स्थापना झाली. ही भारतात स्थापन झालेली पहिली स्वदेशी व्यापारी बँक आहे. ● १९२३: इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन (इंटरपोल) ची स्थापना झाली. ● १९३१: दुसर्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली. ● १९७८: मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडणारे इन्सुलिन प्रथमच जनुक अभियांत्रिकी पद्धतीने तयार करण्यात यश. ● २००५: इजिप्तमधे पहिल्यांदाच बहुपक्षीय सार्वत्रिक निवडणुका 💥 जन्म :- ◆ १७९१: आद्द क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक ◆ १८२२: प्राच्यविद्या पंडित, समाजसेवक आणि धन्वतंरी रामकृष्ण विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड 💥 मृत्यू :- ◆ १६०१: विल्यम शेक्सपियर यांचे वडील जॉन शेक्सपियर ◆ १८०९: थायलंडचा राजा बुद्ध योद्फा चुलालोके ◆ १९५३: मराठी कवी आणि लेखक भगवान रघुनाथ कुळकर्णी ◆ १९७९: कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक जे. जी. नवले ◆ १९९१: कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सहसंस्थापक रवि नारायण रेड्डी ◆ १९९४: इंग्लिश दिग्दर्शक आणि पटकथाकार टेरेन्स यंग ◆ १९९७: हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक मुकूल आनंद *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *साैरऊर्जा प्रकल्प सुरु करणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ठरले देशातील पहिले विद्यापीठ* --------------------------------------------------- 2⃣ *हैदराबाद - तेलंगणामध्ये मुदतपूर्व विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार, विधानसभा बरखास्तीच्या प्रस्ताव मंजूर* --------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली- पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यात इंटरपोलनं मिहिर रश्मी बन्साली यांना बजावली रेड कॉर्नर नोटीस* --------------------------------------------------- 4⃣ *मुंबई - नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण : अविनाश पवार आणि श्रीकांत पांगारकर यांची सत्र न्यायालयाने केली १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी* --------------------------------------------------- 5⃣ *दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरण, हायकोर्टानं तपास यंत्रणांना खडसावलं. सतत माध्यमांसमोर न जाण्याचा सल्ला.* --------------------------------------------------- 6⃣ *कोहली आणि रुट सध्याचे सर्वोत्तम फलंदाज ; ब्रायन लाराची स्तुतीसुमने* --------------------------------------------------- 7⃣ *us open tennis: नोव्हाक जोकोव्हिच उपांत्य फेरीत* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= आंतरराष्ट्रीयसाक्षरता दिन त्यानिमित्ताने प्रासंगिक लेख *साक्षर भारत ; समर्थ भारत* https://goo.gl/31q7e5 आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *संत तुकाराम महाराज* संत तुकाराम (ऊर्फ तुकोबा) हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. त्यांचा जन्म वसंत पंचमीला-माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हे तुकारामांचे आराध्य दैवत होते. तुकारामांना वारकरी 'जगद्गुरु ' म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी - ' पुंडलीक वरदे हरी विठ्ठल , श्री ज्ञानदेव तुकाराम , पंढरीनाथ महाराज की जय , जगदगुरु तुकाराम महाराज की जय' असा जयघोष करतात. जगद्गुरु तुकाराम लोककवी होते. तुकाराम महाराज हे साक्षात्कारी, निर्भीड व एका अर्थाने बंडखोर संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकोबांचाच’ (अभंग तुकयाचा) एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत. आजही ही लोकप्रियता ‘अभंग’ आहे, वाढतेच आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं आयुष्य जास्त सुंदर वाटत…!!! *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाचं नाव काय ?* तेहरिक-ए-इन्साफ *२) मदुमलाई व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?* तामिळनाडू *३) यंदाची विम्बल्डन महिला एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलं ?* अँजेलिक किर्बर *४) 'जागतिक हेपेटायटिस दिवस' कधी साजरा केला जातो ?* २८ जुलै *५) बंगालचे पहिले गव्हर्नर कोण होते ?* वॉरन हेस्टींग्ज *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ● गजानन जाधव ● सुमित पेटेकर ● पवन धांडू ● दशरथ याटलवार ● प्रवीण कुमार ● गोविंद पटेल ● प्र. श्री जाधव ● हणमंत गायकवाड ● भारत पाटील *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= @@ गुगली @@ *झुला* प्रत्येकाच्या मनात एक आठवणींचा झुला असतो मनमोकळ झुलायला ज्याचा त्याला खुला असतो आठवणींच्या झुल्यावर प्रत्येकाला झुलता येत कटू आठवणी टाळून आनंदाने फुलता येत शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 12* *लकड़ी कहे लुहार की* *तू मति जारे मोहि |* *एक दिन ऐसा होयगा* *मई जरौंगी तोही ||* अर्थ : लोहाराचा धंदा म्हटला की भट्टी आणि भाता आलाच. कठीण वाटणार्या लोखंडाला आकार देण्यासाठी लोहार त्याला भट्टीत टाकतो. भट्टीत इतका गरम करतो की ते लालबुंद होवून जातं अन् त्याच्या घनाच्या/ हातोड्याच्या दणक्या सरशी पाहिजे तसा आकार घेवू लागतं. मात्र त्याच्यामागं खरं समर्पण असतं लोहाराकडच्या लाकडांचं ! जसजसा लोखंडाला ताव चढू लागतो तसं तसा लोहार चेव चढतो. भट्टीत लाकडे टाकून भात्याने वार्याला फुस देत लाकडांना लाल इंगळ करीत संपवून टाकतो. त्याचा जोस लाकडांचा कर्दनकाळ असतो. ते पाहून लाकूड म्हणतं की आज मी तुझा अंकित आहे. माझा तुला हवा तसा वापर करून घे. एक दिवस माझाही असेल. त्यावेळी तू निचेष्ट पडलेला असशील. त्यावेळी मी तुला असेच बेमुर्वतपणे भस्मसात करीन. त्यावेळी तुझ्या अस्तिवाच्या खुणाही मागे असणार नाहीत. तात्पर्य: कार्य कर्तृत्त्वासाठी प्रत्येकाला काळ संधी देत असतो. बलशाली माणसे कमकुवतांवर हुकूमत गाजवतात. त्या हुकूमतीला कळवळ्याचा आधार असेल तर ती हुकूमत हवीहवीशी वाटू लागते. परतु ती अतिरेकी मनमानी करणारी असेल तर एक दिवस सहज पत्त्यांचा डाव कोसळावा तशी ती कोलमडते अन अन तिच्या अस्तित्वाच्या खुणाही शेष राहात नाहीत. मगधच्या धनानंद व आॅस्ट्रियाचा राजा सोळावा लुई ही उदाहरणं पाहता सर्वकाही कळून जातं. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= निद्रानाशाची अनेक कारणे जरी असली निद्रा लागण्याचे एकमेव कारण म्हणजे तुम्ही जे काही काम केले आहे ते तन आणि मन स्थिर ठेवून व मनात कोणताही वाईट विचार न आणल्यामुळे ते शक्य झाले. त्यात तुम्ही केलेल्या कामात कसलीही कुचराई केली नाही तसेच तुम्ही कामाच्या व्यतिरिक्त जास्त काही मिळेल याचीही अपेक्षा न केल्यामुळे ते शक्य झाले. नाही तर एखाद्यावेळी तुमच्या मनात एक आणि कृतीमध्ये एक असेल तर तेच कारण तुमच्या निद्रानाशाचे होऊ शकते. असे करण्यापेक्षा दैनंदिन जीवनात आपण ठरवूनच टाकायचे जे काही करणार ते प्रामाणिकपणे करणार त्यात कसलीही बनावट कृती करणार नाही मग तुम्हाला हवी तेवढी निद्रा शांतपणे लागेल. ठराविक वेळेत तुम्ही तुमची निद्रा घेऊन पुढील कामासाठी तेवढ्याच जोमाने कामाला लागाल आणि शारीरिक व मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी तत्पर राहाल यात शंकाच नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌾🍃🌾🍃🌾🍃🌾🍃🌾🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *कुचराई - Scouring* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *निसर्गाने नटवूया सृष्टी सारी* गोपीचंद नावाचे एक व्यापारी होते. त्यांचं आधी छोटंसं दुकान होतं. नंतर हळूहळू मोठं दुकान झालं. तिजोरी भरली. मग त्यांनी राहण्यासाठी मोठी जागा घ्यायचं ठरवलं. मग एक जागा बघून तिथे त्यांनी मोठी हवेली बांधली; पण अवतीभोवती दलदल व तुंबलेल्या गटारांमुळे येणार्या दुर्गंधीने ते कंटाळले. लाखो रुपये खर्च करून हवेली बांधली खरी; पण घराभोवतीच्या दुर्गंधीमुळे ती सोडावी लागणार याचं त्यांना दुःख झालं. त्यांचा रमणचंद नावाचा एक घनिष्ट मित्र होता. तो कल्पक होता. त्याने गोपीचंदांस सांगितले, ‘या दुर्गंधीच्या त्रासाने हवेली सोडण्यापेक्षा एक वर्षभर ती माझ्या ताब्यात दे. मी तुला चमत्कार करून दाखवतो.’ त्याप्रमाणे हवेली रमणचंदकडे व पेढीचा कारभार मुनिमाकडे सोपवून गोपीचंद एक वर्षभर तीर्थयात्रेला गेले. इकडे रमणचंदने तो संपूर्ण दलदलीचा परिसर स्वच्छ करून तिथे माती आणून टाकली व निरनिराळ्या प्रकारच्या सुगंधी फुलांची झाडे लावली. बांधावर मोठी झाडं लावली. एक वर्षाच्या आत चमेली, मोगरा, गुलाब, तुळस या सर्वांनी बाग फुलून गेली. आता दूरवरून दुर्गंध आला तरी झाडे तो थोपवू लागली आणि वार्याच्या झोताबरोबर येणार्या सुगंधाने हवेली भरून गेली. गोपीचंद यात्रेहून परतले तेव्हा मध्यरात्र होती. त्यावेळी त्यांना काहीच दिसलं नव्हतं; पण पहाटे जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा ते सुगंधाने मोहून गेले. अरुणोदयाला त्यांना बागेचं मोहक दृश्य दिसलं. गोपीचंदने कमाल केली होती. आता हवेलीत उदबत्या लावण्याची गरज नव्हती; कारण गोपीचंदने फुलझाडांच्या कितीतरी उदबल्या लावल्या होत्या. *तात्पर्य: कृत्रिम उपायांपेक्षा नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करावा.निसर्गालाच आपले दैवत मानून निसर्गातील झाडांची जोपासना व लागवड करावी.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment