✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 24/09/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९३२ - पुणे करारावर स्वाक्षर्या करण्यात आल्या. १९९५ - मृत्युंजय या कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना 'भारतीय ज्ञानपीठ' या संस्थेतर्फे 'मूर्तिदेवी पुरस्कार' जाहीर. 💥 जन्म :- १९२१ - स.गं. मालशे, लेखक व समीक्षक. 💥 मृत्यू :- १९९८ - वासुदेव पाळंदे, दिग्दर्शक व संघटक. २००२ - श्रीपाद रघुनाथ जोशी, शब्दकोशकार, अनुवादक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करत राज्यभरात भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप, भाविकांचा उत्साह शिगेला* --------------------------------------------------- 2⃣ *जळगाव : पहूर ता.जामनेर येथे कापूस खरेदीस शुभारंभ, सहा हजार एकावन्न रुपयांचा मिळाला भाव* --------------------------------------------------- 3⃣ *झारखंड: पंतप्रधान मोदींकडून प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचं लोकार्पण* --------------------------------------------------- 4⃣ *गोव्यात नेतृत्त्वबदलाच्या विषयाला पूर्णविराम ; मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकरच, अमित शहा यांचा निर्णय* --------------------------------------------------- 5⃣ *दिल्ली: राफेल कराराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी - अखिलेश यादव* --------------------------------------------------- 6⃣ *चंद्रपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांचे निधन.* --------------------------------------------------- 7⃣ *आशिया चषकमध्ये भारताने पाकिस्तानला नऊ गडी राखून नमविले, शिखर धवन सामनावीर* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *शाळेचा कणा : मुख्याध्यापक* http://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_87.html वरील निळ्या अक्षरावर क्लिक करून लेख पूर्ण वाचावे. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *शिवाजी सावंत* शिवाजी गोविंदराव सावंत हे मराठी कादंबरीकार होते. त्यांनी लिहिलेली मृत्युंजय ही पौराणिक कादंबरी मराठी कादंबर्यांत मानदंड मानली जाते. शिवाजी सावंत त्यासाठीच मृत्युंजयकार सावंत म्हणून ओळखले जातात. शिवाजी सावंत यांचा जन्म सामान्य शेतकरी कुटुंबात, कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा गावात झाला. सावंत उत्कृष्ट कबड्डीपटू होते. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आजऱ्यात झाल्यावर त्यांनी कोल्हापुरात बी.ए.चे प्रथम वर्ष पूर्ण केले आणि मग वाणिज्य शाखेतील पदविका (GCD) घेतली. टायपिंग, शॉर्टहँडचा कोर्स करून त्यांनी कोर्टात कारकुनाची नोकरी केली, आणि नंतर ते कोल्हापुरातील राजाराम प्रशालेत १९६२ ते १९७४ या काळात शिक्षक होते. पुण्यात स्थायिक झाल्यावर १९७४ ते १९८० अशी सहा वर्षे त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाच्या ’लोकशिक्षण’ या मासिकाचे सहसंपादक, व नंतर संपादक म्हणून काम केले. १९८३ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि पुढील आयुष्यात फक्त लेखनावरच पूर्ण लक्ष केंद्रित केले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) 'एससी'चे विस्तारित रूप काय ?* सिक्युरिटी कौन्सिल *२) 'भिल्लसेवा मंडळ' या संस्थेची स्थापना कधी झाली ?* १९२२ *३) भारतातील पहिल्या पेट्रोलियम तेलविहिरीसाठी प्रसिद्ध असणारं ठिकाण कोणतं ?* दिग्बोई *४) श्रीलंकेची राजधानी कोणती ?* कोलंबो *५) उत्तर ध्रुवासभोवतालच्या भू-भागाला काय म्हणतात ?* आर्टिक प्रदेश *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ● डॉ. तोफिख खान पठाण ● सारंग दलाल ● राजू यादव ● विरेश भंडारे ● सतीश आरेवाड ● रोहित शिंदे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *पाऊस* ढगा आडून पाऊस पहातो आपली दशा पशू पक्षांच्या भावना त्याला कळत नाहीत कशा पशू पक्षी प्राण्यांसाठी जरा मनमोकळा पड कष्टकरी कष्ट करून चार घास खातील धड शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 23* *जिस मरने यह जग डरे* *सो मेरे आनंद |* *कब महिहू कब देखिहू* *पूरण परमानन्द ||* अर्थ जन्माला आल्यानंतर मृत्यू हा ठरलेलाच. प्रत्येक प्राण्याला मृत्यूला सामोरं जावंच लागतं. हे जरी शाश्वत सत्य असलं तरी मृत्यूबद्दल सर्व प्राण्यांच्या ठायी भीती दडलेली. जीवन अनेक , विकारांनी , व्याधींनी, अवहेलनेने भरलेले जरी वाट्याला आले . जीवनभर संसारात इत्तरांना गांजून लुटून अमाप संपत्तीचा संग्रह केलेला. त्या संपत्तीला सांभाळताना जीवनाच्या खर्या आनंदाला मात्र पारखा झालेला. भरपूर अन्न व पैसा असूनही हवे ते खाण्यावर मर्यादा पडलेल्या. जीवनभर कमवून, राबूनही मुलांनी आधाराची काठी व्हावं तिथंच एकाकी टाकून दिलेलं ! तरी सामान्य मानसाची जगण्याची आसक्ती संपत नाही. या मायावी चक्रव्युहातून बाहेर निघावेसे वाटत नाही. खरे तर मरणाने जीवनाचे वर्तुळ पूर्ण होते. थोर साहित्यिक जी.ए, कुलकर्णी मृत्यूला सर्वात जवळचा मित्र माणायला सांगतात. कारण मृत्यूच सर्व व्याधी व दुःखातून आपणास मुक्त करतो. ज्यावेळी सर्वांना आपणनकोसे वाटायला लागतो. तेव्हा आपले दोन्ही बाहू समोर करून आपली कडकडून गळाभेट घेणारा व चिरशांती देणारा एकमेव मित्र म्हणजे मृत्यू ! ज्यांनी आपल्या वाट्याला आलेलं जगणं भरभरून जगून घेतलं. इतरांसाठी ते जगणं म्हणजे एक मार्गदर्शक पायवाट झालेली असते. जीवनाला एक विशिष्ट उंची प्राप्त झालेली असते. अशी उंची असामान्य माणसंच साध्य करू शकतात. ती आभाळ उंची माणसाला मरणानंतरही कायम जीवंत ठेवते. तुकोबाच्या जीवन विषयक चिंतन मननापुढं आपलं थातूरमातूर लोकांना फसवणारं तत्त्वज्ञान टिकाव धरीना म्हणून धर्माच्या (अधर्मी) ठेकेदारांनी डोही बुडवून तुकोबा सदेह वैकुंठाला गेल्याची लबाडी केली. तुकोबा देहिक मारले गेले परंतु लौकिकानं मात्र तुकोबा आभाळाएवढे ठरले. संत, सज्जन, कलावंतांना मरणाचं भय कसलं ? त्यांनी कृतीतून स्वतःचा अमीट ठसा उमटवलेला असतो. त्यांच्या मरणातही जग जगते हे माहित असतं. ते मृत्यूला कवेत घ्यायला सदैव तयार असतात. त्यांच्या मृत्यूचाही उत्सव होत असतो. त्या परमानंदाचं स्वागत करायला संत सदा तयारंच असतात. एकनाथ डुमणे, मुखेड =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्या व्यक्तीचे मन प्रसन्न,उदार अंतःकरण, जगाकडे प्रेमाने आणि आपुलकीने पाहण्याचा दृष्टिकोन, प्रसन्न आणि हसरा चेहरा,मनात दुसऱ्या विषयी कोणतीही वाईट भावना नसलेली आणि इतरांच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांच्यात समरस होणारी इ.गुण वैशिष्ट्ये आहेत आणि अशी गुणवैशिष्ट्ये असलेली व्यक्ती ही जनमाणसात अधिक लोकप्रिय असते.अशांच्या सहवासात राहणे किंवा अशांचा सहवास लाभने म्हणजे एक आपल्या आयुष्यातली सुसंधीच म्हणावी लागेल.क्वचितच अशी माणसे आपल्या जीवनात येतात. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०. 🌳🍃🌳🍃🌳🍃🌳🍃🌳🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *सहवास - Coitus* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= परिस पदयात्रा करीत असताना मनोहर पंतांना एका जंगलात एक व्यक्ती भेटली. तिच्या सर्व अंगावर लोखंडी साखळ दंड होते. रस्त्याने चालत जाताना ती व्यक्ती रस्त्यातील प्रत्येक दगड उचलून हातात घेत होती आणि तो दगड अंगावरील साखळदंडाला लावून पाहात होती. त्या व्यक्तीचा हा उद्योग बराच काळपर्यंत सरू होता.मनोहरपंत है सगळं टक लावुन पाहात होते त्यांना त्याच्या या कृतिचा अर्थ त्यांना लागेना. शेवटी न राहून मनोहरपंतांनी त्यांना विचारले, ‘आपण हे काय करीत आहात? काही शोधत आहात का?” त्यावर ती व्यक्ती म्हणाली, ‘हा दगड लोखंडाला लावून बघण्यामागे एक कारण आहे. ते म्हणजे, मी गेले बारा-पंधरा वर्षे परीस शोधतो आहे; पण अजून काही मला सापडला नाही. ” हे ऐकून त्या व्यक्तीच्या बुद्धीची किव करत .तो मूर्ख आहे असं समजून मनोहरपत चालू लागले. मधल्या काळात बरीच वर्षे गेली. पुन्हा एकदा त्याच रस्त्यावर मनोहरपंतांना ती व्यक्ती भेटली आणि .त्यांना धक्काच बसला. त्या व्यक्तीच्या अंगावरील साखळदंड सोन्याचे होते; पण तरीही त्यांच्या सर्व क्रिया मागील प्रमाणेच सुरू होत्या. मनोहरपंतांनी त्याला विचारले, ‘ ‘अंगावरील साखळदंड तर सोन्याचे झाले आहे. याचा अर्थ तुम्हाला परीस सापडला आहे. मग आता शोध कशासाठी सुरू?” त्यावर ती व्यक्ती म्हणाली, ‘ ‘जमिनीवरचा दगड उचलणे, साखळीला लावुन पाहणे आणि टाकून देणे ही क्रिया सतत घडत राहिल्यामुळे परीस हातात आला कधी, तो साखळ्याना लागून त्याचं सोनं झालं कधी आणि नेहमीप्रमाणे मी तो दगड टाकून दिला कधी? हे मला कळलं सुद्धा नाही. आता टाकून दिलेला परीस मी पुन्हा शोधतो आहे. ” *तात्पर्य : परीसासारखी आलेली संधी सोडून दिली तर पुन्हा संधी मिळत नाही.* * *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड. http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment