✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 29/09/2018 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *सर्जीकल स्ट्राइक डे* 💥 ठळक घडामोडी :- २०१० - आधारकार्ड वाटपासाठी प्रारंभ, महाराष्ट्रातून सुरुवात 💥 जन्म :- १९३० - रामनाथ केणी, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९८७ - हेन्री फोर्ड दुसरा, अमेरिकन उद्योगपती. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली- सर्व वयोगटातील महिलांना आता केरळ मधल्या सबरीमाला मंदिरात करता येणार प्रवेश - सर्वोच्च न्यायालय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *परभणी : केंद्र सरकारच्या एफडीआय व ऑनलाइन खरेदी-विक्री धोरणाविरुद्ध अनेक शहरातील बाजारपेठ बंद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *इंडोनेशियाला 7.5 तीव्रतेचा भूकंप, सुनात्मीचा इशारा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल ज्येष्ठ संगीतकार रामलक्ष्मण यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नवी दिल्ली- राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव तारिक अन्वर यांनी लोकसभेतल्या खासदारकीसह पक्षाचा ही दिला राजीनामा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *आधारशिवाय डिजिटल अर्थव्यवस्था कोलमडणार; कंपन्यांनी नवा कायदा करण्याची केली मागणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आशिया चषकच्या अंतिम सामन्यात अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक लढतीत अखेर भारताने बांगलादेशवर तीन विकेट्स राखून मिळविला विजय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *आधारकार्डचा इतिहास* http://epaper.ejanshakti.com/m5/1834777/Pune-Janshakti/29-09-2018#page/6/1 आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *बनगरवाडी* व्यंकटेश माडगुळकरांची बनगरवाडी माणदेशच्या परिसरातील धनगरवस्तीच्या पार्श्वभूमीवर घडते. या कादंबरीचा नायक राजाराम विठ्ठल सौंदणीकर नव्यानेच शिक्षक म्हणून बनगरवाडीत दाखल होतो. नोकरीवर पहिल्यांदाच रुजू होण्यासाठी आलेल्या राजारामाला बालट्यांच्या धमकीशी सामना करावा लागतो. त्यामुळे आपण बरे आणि आपले काम बरे असा हेतू ठेवून तो गावात राहायला लागतो. जेमतेम पन्नासेक घरांची वस्ती असलेल्या या गावात त्याला शाळा सुरु करण्यासाठी कारभार्याची समर्थ साथ मिळते. शाळा नियमित सुरु होते आणि स्वत:च्या नकळत राजाराम गावातल्या लोकांमध्ये आरामात मिसळून जातो. गावात विविध समस्यांच्या सोडवणूकीत त्याला कारभार्याबरोबर मान मिळायला लागतो. संसाराच्या प्रश्नांबरोबरच गावातले इतरही तंटे तो कारभार्याबरोबर सोडवायला लागतो. दर आठवड्याला गावाकडे जाताना लोकांची कामेही तो करायला लागतो. लोकांची लिहून दिलेली पत्रे पोस्टात टाकणे, मनिऑर्डरी करणे अशा प्रकारची तो कामे करतो. मास्तरला काहीच अशक्य नाही असा भोळाभाबडा विश्वासही या गावाकर्यांमध्ये असतो. यामुळेच शेकूसारखा माणूस पेरणीसाठी गावातून कोणाकडून तरी बैल घेउन दे अशीही विनवणी करतो. पण ती मागणी तो पूर्ण करू शकत नाही. शेकूची गरज आपण भागवू न शकल्यामुळे त्याची बायको नांगराला दुसर्या बैलाच्या जागी जुपूंन घेते हे ऐकल्याने मास्तर हताश होतो. ही येडीबागडी धनगरं आपल्यावर किती विश्वास टाकतात याने तो अस्वस्थ होतो. गावात रहायचे तर गावकर्यांना होईल तेवढी मदत करायला हवी. याच हेतूने रामा धनगराचे राणीच्या पैशाची तालुक्याला जाऊन मोड आणण्याच्या परोपकारात त्याला पैसे चोरीला गेल्याने मनस्तापही भोगावा लागलेला आहे. अशी मदत करत असतानाच कारभार्याच्या अंजीने दिलेली चोळी शिवून आणण्याचे कामही मास्तर करतो. ’मास्तर आपलेच आहेत’ त्यांना काम सांगितले तर बिघडले कोठे ?या भुमिकेतून अंजी काम सांगते. मास्तरही गावातल्यांच्या उपयोगी पडायचे या भुमिकेतून तिचे काम करतात. बालट्याला हे माहित होते आणि कारभार्याकडे तो मास्तराची कागाळी करतो. कारभारी मास्तराशी अबोला धरतो. अखेर आठवड्याभराने काराभारी आपल्या मनातील शंका बोलून दाखवतो. आपल्या आतापर्यंतच्या वागणुकीतून कारभार्याला आपल्याबद्दल विश्वास वाटत नाही हे समजल्यावर मास्तराला सात्विक संताप येतो. आपण चांगल्या भावनेने लोकांच्या उपयोगी पडतोय हाच आपला मूर्खपणा झाला असे त्याला वाटते. आपण बदलीच करून घ्यावी असे त्याला वाटते. पण कारभार्याचे समाधान होते आणि दोघांमधील अबोला दूर होतो. एकीकडे शाळा सुरळीत चालत असतानाच गावात एखादी कायम स्वरूपी वास्तू असावी असा विचार करून मास्तर गावकर्याच्या मदतीने तालीम बांधून घेतो. पंत सरकारांच्या हस्ते तालीमचे उद्घाटन होते. मास्तरमुळेच आपल्या गावात राजा आला आपल्या आयुष्याचे सार्थक झाले याचे कारभार्याला समाधान वाटते. काही दिवसानंतरच कारभा-याचे निधन होते. कारभार्याच्या निधनानंतर गावाचे रूपच पालटते. गावात दुष्काळ पडतो. सारी वस्ती गावातून बाहेर पडते. दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन मास्तरची गावातून बदली होते. तो रिकाम्या गावातून बाहेर पडतो. माडगुळकरांनी कादंबरीत या मुख्य कथानकाबरोबर इतर उपकथानकेही रंगवली आहेत. सताचे लांडगा मारणे, जगन्याचे प्रेमप्रकरण, शेकू-अंजीचे प्रेमप्रकरण, आयुब, आनंदा रामोशी यांचे मास्तरांचे प्रेम, तालीम बांधत असतानाच बाळा धनगराचा आडमुठेपणा, बालट्याला झालेली मारहाण अशा अनेक प्रसंगांनी धनगरांच्या विविध स्वभावाचे चित्रण केले आहे. याचबरोबर धनगरांचे खडतर जिवनही यात येते. सुगीच्या काळातले त्यांचे जगणे आणि दुष्काळ पडल्यानंतरची त्यांची झालेली वाताहत कादंबरीत अनुभवायला मिळते त्यामुळे शिक्षक आणि गावकर्यांमधील जिव्हाळा हा अशाच बनगरवाडीसारख्या कादंबर्यांमधून पहायला मिळणार. बनगरवाडीचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे या कादंबरीचा १२ भांषांमध्ये अनुवाद झालेला आहे. मध्यंतरी अमोल पालेकरांनी बनगरवाडीवर चित्रपट देखिल काढला होता *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा अधिकाधिक घट्ट होतो, तेव्हा तोच विश्वास आपल्या आयुष्यातही परावर्तित होतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) गोबीचं वाळवंट किती क्षेत्रफळावर पसरलं आहे ?* १,२९५,000 चौ.कि.मी. *२) बहिष्कृत हितकारिणी सभेचं स्थापना वर्ष कोणतं ?* १९२४ *३) चौथ्या पंचवार्षिक योजनेचा आराखडा कोणी तयार केला होता ?* डॉ. धनंजयराव गाडगीळ *४) 'ओआयएल'चे विस्तारित रूप काय ?* ऑईल इंडिया लिमिटेड *५) 'हरारे' हे कोणत्या देशातील एक प्रमुख शहर आहे ?* झिम्बाब्वे *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ● प्रथमेश नागोराव येवतीकर ● सतीश चव्हाण ● मनीष साबळे ● शिवाजी मुपडे ● महेश गायकवाड ● नीलम येसमोड ● राजेश सामला ● संदेश जाधव ● महेश राखेवार, नांदेड ● गणेश पेटेकर, धर्माबाद ● मारोती वाघमारे ● अजय मिसाळे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *अनर्थ* उसवलं की लगेच शिवता आलं पाहिजे पांगत चाललेलं दो-यात ओवता आलं पाहिजे थोडं फाटल की लगेच पटकन टाका घालावा भविष्यातला अनर्थ सहजा सहज टाळावा शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 28* *गुरु सामान दाता नहीं* *याचक सीश सामान |* *तीन लोक की सम्पदा* *सो गुरु दीन्ही दान ||* अर्थ गुरूसारखा दानशूर त्रीखंडात कोणीही नाही. सर्व दात्यांचे काहीतरी उद्देश असू शकतात. मात्र ज्ञानदान करताना सर्व विद्यार्थ्यांच्या कल्याणाचा पवित्र उद्देश गुरूच्या ठायी असतो. म्हणूनच दातृत्त्वाची श्रीमंती त्यांच्याइतकी कुणाजवळही नसते. शिष्यासारखा (विद्यार्थी) याचकही जगात कोणीच असू शकत नाही. गुरूने कितीही ज्ञानदान दिले तरी खर्या विद्यार्थ्याची ज्ञानतृप्ती होणे अशक्य असते. एक लोक प्रत्यक्ष जगता येतो व दोन लोक काल्पनिक असले तरी त्यांच्यातला विहार असो की तिथली जीवनकल्पना , पुरान, कुरान , वेदाचे तत्वज्ञानावरची चिकित्सा असो. रूढी, परंपरा ,श्रद्धा, ज्ञान विज्ञानाकडे विवेकाने पाहाण्याची दिव्य दृष्टी गुरूच देत असतात. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= चित्रातले रंग आपल्या कल्पकतेने भरुन चित्र चांगले काढता येते, पण जीवनाचे सुंदर चित्र बनवण्यासाठी कुठे, कसे रंग भरावे हे लवकर लक्षात येत नाही. जीवनाच्या चित्रात रंग भरण्यासाठी कल्पकतेबरोबर, कठोर परिश्रम लागतात, त्याचबरोबर कोणत्या वेळी कोणता रंग भरावा याचाही प्रसंगानुरूप विचार करावा लागतो. कधीकधी घाई केली तर रंगांमध्ये एखाद्या रंगाचे प्रमाण कमी जास्त झाले तर रंग बेरंगही होऊन जातात. सांगण्याचा तात्पर्य हा की, परिस्थितीनुसार रंग बदलण्याचीही आपली तयारी ठेवायला हवी आणि समयसुचकतेनुसार विचार करुन जीवनाचे सुंदर चित्र काढता आले पाहिजे. नाहीतर जीवनच रंगहीन बनून जाते. जीवन सुंदर बनवण्यासाठी वेगवेगळ्या रंगरुपी छटांचेही ज्ञान ज्यांना अवगत आहे आणि ते ज्यांना साध्य करता येते तोच आपल्या जीवनाचे चित्र छान आणि सुंदर बनू शकतो, हे मात्र खरे आहे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *अविश्वास - Unbelief* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *कर्म म्हणजे काय ?* एकदा एक राजा हत्तीवर बसुन आपल्या राज्यात निरीक्षण करण्यास फिरत होता. फिरत फिरत तो एका गावातील दुकानासमोर थांबला. प्रधानाला बोलाऊन म्हणाला, कां कोण जाणे मी या दुकानदाराला पूर्वी कधी पाहीले नाही, त्याला ओळखतपण नाही पण मला या दुकानदाराला फाशी द्यावे वाटते आहे. प्रधान बुचकळ्यात पडला तो कांही बोलण्याच्या अगोदरच राजा तेथून पुढे निघाला. प्रधान विचारात पडला. त्यान तेे दुकान पाहून ठेवले व तो राजामागे निघाला. दुस-या दिवशी प्रधान गावातल्या त्या दुकानाशी साध्या वेशात पोहोचला. दुकानात दुकानदाराशिवाय कोणीच नव्हते. आजुबाजुला चौकशी करता तो चंदनाचा व्यापारी असल्याचे समजले. तो दुकानात गेला. त्याच्याकडे सुवर्णवर्णाचे सुगंधी चंदन होते. मात्र कोणी खरेदीदार नसल्याने मालक वैतागला होता. चौकशी करता कळले की लोक नुसते येतात वास घेतात आणि साधा दरही न विचारता निघून जातात. रिकाम्या बसलेल्या दुकानदाराला ब-याचवेळा वाटे की किमान राजा तरी मरावा. तो मेला तर त्या आसमंतात दुसरा कोणी चंदनाचा व्यापारी नसल्याने राजाच्या अंत्य संस्काराला तरी मोठ्या प्रमाणात चंदन खरेदी होईल. माल विकला जाईल. चार पैसे तरी मिळतील. प्रधानाला मग राजाला या अनोळखी व्यापा-याला फाशी कां द्यावे वाटले याचा उलगडा झाला. व्यापा-याच्या मनातील राजाविषयीच्या वाईट विचारांच्या तरंगलहरीनी दुषीत वातावरणात राजा आल्यावर राजाच्या मनात दुकानदाराला फाशी देण्याचे विचार उद्भवले होते. त्याने त्या दुकानदाराकडे थोडी चंदन खरेदी केली. दुकानदाराला ब-याच दिवसांनी गि-हाईक मिळाल्याने आनंद झाला. प्रधान निघाला आणि राज दरबारात राजापुढे ते चंदन ठेवले. राजाने कागद उघडून चंदन पाहिले आणि त्याच्या सुवर्ण वर्णाने आणि सुगंधाने मोहित झाला. त्याने प्रधानाला विचारले कोठून आणले हे चंदन ? प्रधानाने त्या व्यापा-याचे नांव सांगितले. राजा म्हणाला, अरे काल उगाच मला त्याला फाशी द्यावे वाटले ! त्या व्यापा-याला कांही सुवर्णमुद्रा देण्याचा आदेश दिला. राजा अध्ये मध्ये इतरांना अनमोल भेटी देण्यास चंदन खरेदी करु लागला. राजाच्या खरेदीने आनंदित व्यापा-याच्या मनात आता राजा मरावा हे येईनासे झाले. चांगल्या दर्जाचा चंदन व्यापारी म्हणून राजाचा तो मित्र झाला. आपल्या मनात इतरां विषयी चांगले विचार, दयाळुपणा आणला तर इतरांच्या मनातुनही चांगले विचार चांगल्या भावना आपल्यापर्यन्त येतील व आपला उत्कर्ष होईल. मग कर्म म्हणजे काय ? अनेकजण म्हणाले, आपले शब्द, आपली कृती, आपली भावना...पण खरे हेच आहे की, आपल्या मनात येणारे विचार हेच आपले खरे कर्म होय !!! सुडाची भावना, राग आणि अहंकार युक्त भावना त्यागून क्षमाशील राहण्यात जीवनाचे खरे मर्म आहे.. अन्यथा ते न संपनारे दुष्टचक्र आहे. खूप प्रश्न सोडून दिल्याने सुटून जातात।। तेव्हा सहकार्याची भावना आणि करुणामय मन ठेवा.. आनंदी जीवन जगा...। *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment