✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 01/08/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- ॥ १ ऑगस्ट दिनविशेष ॥ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी - भारत. घडामोडी १९९६ - मायकेल जॉन्सनने २०० मीटर अंतर १९.३२ सेकंदात धावून विश्वविक्रम रचला. 💥 जन्म :- १९२० - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे १९१० - मोहम्मद निसार, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९५२ - यजुर्वेन्द्रसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९५५ - अरूणलाल, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९२० - बाळ गंगाधर टिळक, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक, वृत्तपत्र संपादक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *रायगड - आंबेनळी घाट दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पंतप्रधान निधीतून 2 लाख रुपयांची मदत, रायगड जिल्हाधिकारी कार्यालयास मिळाले पत्र.* --------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली - दिवाळखोरी आणि कर्जबाजारीपणा कोड विधेयक (दुसरी घटना दुरुस्ती) 2018 लोकसभेत मंजूर* --------------------------------------------------- 3⃣ *मुंबई : अकरावी प्रवेशाची तिसरी यादी जाहीर, १ लाख १७ हजार २३४ विद्यार्थ्यांपैकी ५४ हजार ७२७ विद्यार्थ्यांना प्रवेश.* --------------------------------------------------- 4⃣ *राज्य मागासवर्ग आयोगाची 3, 4 ऑगस्टला बैठक, पाच संस्थांच्या आलेल्या माहितीचं होणार विश्लेषण* --------------------------------------------------- 5⃣ *मुंबई- परराज्यातील गुंतवणूकदार महाराष्ट्रात यावेत, यासाठी राजाराम महाराजांनी प्रयत्न केले- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* --------------------------------------------------- 6⃣ *बीड - अभिजीत देशमुखच्या कुटुंबीयांना सरकारकडून 10 लाखांची मदत आणि कुटुंबातील एकाला नोकरी* --------------------------------------------------- 7⃣ *World Badminton Championships 2018 : किदम्बी श्रीकांतची विजयी सलामी* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *हमें तो लूट लिया* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2016/12/blog-post_7.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *लोकमान्य टिळक* लोकमान्य बाळ गंगाधर हे थोर भारतीय नेते,भगवद्गीतेचे आधुनिक भाष्यकार व प्राच्यविद्या पंडित. त्यांचा जन्म रत्नागिरीस झाला. त्यांचे जन्मनाव केशव; परंतु बाळ हेच नाव पुढे रूढ झाले. टिळक कुटुंबाचे मूळ गाव चिखली (ता. दापोली, जि. रत्नागिरी). चिखलगावची खोतीदारी त्यांच्याकडे होती. पणजोबा केशवराव यांनी पेशव्यांच्या काळात मानाची जागा मिळवली होती. आजोबा रामचंद्रपंत यांनी उत्तर आयुष्यात संन्यास घेतला. टिळकांचे वडील गंगाधरपंत व आई पार्वतीबाई. गंगाधरपंतांना कौटुंबिक अडचणीमुळे इंग्रजी शिक्षण सोडून पुण्याहून गावी जावे लागले. पुढे त्यांनी मराठी शाळेत शिक्षकाची नोकरी केली. बाळ गंगाधऱ टिळकांचे पारंपरिक संस्कृत अध्ययन घरातच झाले. १८६६ मध्ये गंगाधरपंतांची बदली पुण्यास झाल्यामुळे टिळक आपल्या मातापित्यांबरोबर पुण्यास आले. पुण्यास आल्यावर थोड्याच दिवसांत टिळकांची आई मरण पावली आणि गंगाधरपंतांची बदलीही ठाण्यास झाली. तथापि पुण्यात राहूनच ते १८७२ मध्ये मॅट्रिक झाले. तत्पूर्वी १८७१ मध्येच त्यांचा कोकणातील लाडघर गावच्या बल्लाळ बाळ कुटुंबातील सत्यभामाबाई (माहेरचे नाव तापीबाई) यांच्याशी विवाह झाला. त्यांना तीन मुली आणि विश्वनाथ, रामभाऊ व श्रीधर असे तीन मुलगे होते. त्यांचे नातू ज. श्री. टिळक हे केसरीचे विद्यमान संपादक असून खासदार आहेत. गंगाधरपंत १८७२ मध्ये निधन पावले. मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी काही रक्कम ठेवली होती. त्यामुळे टिळकांनी डेक्कन कॉलेजमध्ये नाव घालते. महाविद्यालयातील पहिल्या वर्षी नियमित व्यायाम करून प्रकृती सुदृढ व निकोप राखण्यावर त्यांनी भर दिला. या कमावलेल्या शरीराचा पुढे दगदगीच्या राजकीय जीवनात व कारावासात त्यांना फार मोठा उपयोग झाला. १८७६ मध्ये ते बी.ए. पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. एम्. ए. मात्र होऊ शकले नाहीत. अखेर त्यांनी एल्एल्.बी. ही पदवी घेतली. डेक्कन कॉलेजमध्येच टिळक आणि आगरकर यांचा स्नेह जमला. दोघांनी देशकार्याला वाहून घेण्याचा संकल्प केला. याच सुमारास निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी सरकारी नोकरी सोडून शाळा काढण्याचे ठरविले होते; तेव्हा टिळक व आगरकर दोघेही त्यांना मिळाले. १ जानेवारी १८८० रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली. टिळकांनी विनावेतन शिक्षकी पेशा पतकरला. चिपळूणकर, टिळक व आगरकर यांनी १८८१ मध्ये आर्यभूषण छापखाना काढला आणि केसरी (मराठी) व मराठा(इंग्रजी) ही दोन वृत्तपत्रे सुरू केली. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= स्वार्थरहीत आणि खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) लॉर्डस हे मैदान कोणत्या खेळाशी संबधित आहे ?* क्रिकेट *२) चौथी महत्त्वाची शासन शाखा म्हणून कशाचा उल्लेख होतो ?* वृत्तपत्रसंस्था *३) पिकातील भुसा स्वच्छ करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात ?* उफणणी *४) ड्यूस, बॅक, हँड, डबल फॉल्ट या संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?* लॉन टेनिस *५) 'मरीनर-९' हे मंगळयान मंगळ ग्रहाकडे कधी झेपावलं ?* ३० मे १९७१ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 मंगेश हनवत्ते 👤 गोविंद पाटील जाधव 👤 एकनाथ डुमणे 👤 शिवसांब गणाचार्य 👤 संजीवकुमार हामंद 👤 शिनू दर्शनवाड 👤 बंडू पाटील मोरे 👤 आनंद पेंडकर 👤 मुखीत अहमद 👤 पवनकुमार भाले 👤 शादूल शेख 👤 विश्वनाथ चन्ने 👤 नागेश टिपरे 👤 दिलीप साळुंके 👤 साईनाथ पाटील मोकलीकर 👤 बालाजी गायकवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *गाजरं* बारा महिने कोणी खात नाही बाजरं दाखवून काय होणार लाल लाल गाजरं पहायला मिळण्या पेक्षा खायला मिळालं पाहिजे बारा महिने कोणी काही खात नाही कळालं पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *कोणताही माणूस दुस-या माणसाला का फसवतो? विश्वासघात का करतो? कारण आहे त्या सुखात, आहे त्या समाधानात माणूस राहू शकत नाही. माणसाला थोडंफार सुख-समाधान मिळत असतंच. पण त्याची जगण्याची, विचार करण्याची बैठक पक्की नसते, कसं जगायचं, हे एकदा निश्चित ठरवलं की आहे त्या सुखा-समाधानातही माणूस छान राहू शकतो.* *आहे त्या आनंदात समाधान न मानणारी माणसे स्वत:ला आणि इतरांनाही छळत असतात. सुख, समाधान कधी कुणाला मिळालेच नाही असे होत नाही. संकटे आली की माणूस म्हणतो, हे माझ्याच वाट्याला काय आले. एक! दु:खाच्या ठोकरीने तो सुखाच्या जागा विसरून जातो. सुखाशी कृतघ्न होतो. पण तो विसरतो, संकटे येण्यापूर्वी तो पावसात भिजला होता. त्याने सुर्योदय पाहिला होता. फुलांनी बहरलेली झाडं पाहिली होती. उन्हाळ्यात जांभळं खाताना एकमेकांना वाकुल्या दाखविल्या होत्या. सुखाच्या जागा आपल्याजवळच असतात.* 🌹 *॥ रामकृष्णहरी ॥*🌹 🍁🍁🍁🍁🍁🍁 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= संकटकाळात आपल्या मदतीस सर्वात प्रथम धावून येणारा जर कोणी असेल तर तो म्हणजे आपला जीवलग मित्र. मित्राशी आपले मैत्रीचे नाते अगदी जीवाभावाच्या पलिकडे असते. कौटुंबिक नाते हे जरी रक्ताचे असले तरी मैत्रीचे नाते आपण निर्माण केलेले असते. या मैत्रीमध्ये एकमेकांच्या सुखदुःखाची जवळीकता साधलेली असते. ती निरपेक्षवृत्तीनेच जोपासलेली असते. कोणत्याही कामासाठी कुठलाही विचार न करता पहिल्यांदा आपण आपल्या ओठांवर नाव असते ते मित्राचे. इतरांवर आपण विश्र्वास एकवेळ ठेवणार नाही, परंतु मित्रावर अधिक विश्वास ठेवतो. मित्रही अशीच निवडायचे की, तो आपल्या जीवनात कधीही, कितीही बिकट परिस्थिती निर्माण झाली तरी तो आपल्या मदतीला धावून आला पाहिजे आणि आपण त्याच्या मदतीला धावून गेले पाहिजे. मैत्रीमध्ये व्यवहार हा नसतोच. असतो तो एकमेकांचे सुखदुःख जाणून घेऊन त्यातून सोडवण्यासाठी सदैव मदतीचा हात पुढे करण्यासाठी. अशाच मित्रांशी मैत्रीचे नाते जोडून आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत टिकवून ठेवून मैत्री या नात्यात अतूट संबंध प्रस्थापित करण्यास सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे. तरच मैत्रीच्या नात्याला अर्थ प्राप्त होईल. स्वार्थापुरती मैत्री काही कामांची नाही किंवा अशा स्वार्थी नात्याला मैत्रीही म्हणता येणार नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= व्यवहार - Behavior =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *संत बहिणाबाई* बहिणाबाई या विख्यात महिला संत होऊन गेल्या.एकदा त्या आपल्या बगीच्यात लावलेल्या रोपट्यांना पाणी घालत होत्या. त्यावेळी ४ विद्वान त्यांचेकडे आले आणि म्हणाले, "आम्ही या जिज्ञासेने तुमच्याकडे आलो आहोत कि आम्ही वेदांचाही अभ्यास केला आहे, विविध शास्त्रांचाही अभ्यास केला आहे. परंतु त्याचा आम्ही उपयोग करण्यास आम्ही असमर्थ आहोत. आम्ही देशाच्या प्रगतीसाठी काही तरी करू इच्छितो. जेणेकरून देशात सर्वत्र सुख,समाधान, विकास होईल. पण हे लक्ष्य गाठण्यासाठी काय करायला हवे हे आम्हाला समजत नाही." बहिणाबाईनी चारही विद्वानांकडून त्यांच्या लक्ष्य प्राप्तीच्या बाबतीत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पहिला विद्वान म्हणाला, मी देशातील सर्वाना साक्षर आणि सभ्य पाहू इच्छितो, तर दुसरा विद्वान म्हणाला,"मी सर्वाना सुखी आणि संपन्न करू इच्छितो" तिसरा विद्वान म्हणाला,"मी सर्वाना एकत्रित करून राष्ट्रऐक्य घडवू इच्छितो" तर चौथा विद्वान म्हणाला,"मला माझा देश प्रगतीशील आणि शक्तिशाली, बलाढ्य राष्ट्र झालेला बघायची इच्छा आहे. तर आता तुम्ही आम्हाला सांगा कि आम्ही काय करू जेणेकरून आमच्या चौघांच्या प्रयत्नाने देश प्रगती करेल." बहिणाबाई म्हणाल्या,"तुम्ही चौघे मिळून शिक्षणाचा प्रसार करा." विद्वान हैराण झाले कि आपण देशाच्या प्रगतीचे बोलतो आहोत आणि बहिणाबाई शिक्षणाबद्दल बोलत आहेत हे कसे होऊ शकते. तेंव्हा त्यांची झालेली वैचारिक कोंडी जाणून बहिणाबाई म्हणाल्या,"शिक्षणाने ज्ञान आणि विवेकाची प्राप्ती होते, शिक्षणाने उद्योगशीलता वाढते, त्यातून देशाची आवक वाढते, आर्थिक सक्षमता आल्याने एकता प्रस्थापित होते, तेंव्हा राष्ट्र शक्तिशाली बनते." बहिणाबाई यांचा संदेश आपल्या हृदयात साठवून चौघे चार दिशेला शिक्षण प्रसार करण्यास निघून गेले. *तात्पर्य- शिक्षणाने सर्व काही साध्य होते, "शिकाल तर टिकाल "* 〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment