✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 03/07/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- ॥ ३ जुलै दिनविशेष ॥ घडामोडी १८५२ - महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली. २००४ - थायलंडची राजधानी बँगकॉकची भुयारी रेल्वे सुरू. २००६ - २००४ एक्स.पी.१४ हा लघुग्रह पृथ्वीच्या जवळून (साधारण चंद्राइतक्या अंतरावरून) गेला. 💥 जन्म :- १९०९ - भाऊसाहेब तारकुडे, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, कायदेतज्ज्ञ. १९२४ - सेल्लप्पन रामनाथन, तमिळवंशीय सिंगापुरी राजकारणी, सिंगापुराच्या प्रजासत्ताकाचा ६वा राष्ट्राध्यक्ष. १९८० - हरभजनसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १३५० - संत नामदेव (पंढरपूर येथे समाधिस्थ). १९१८ - महमद पाचवा, ओट्टोमन सम्राट. १९३३ - हिपोलितो य्रिगोयेन, आर्जेन्टीनाचा राष्ट्राध्यक्ष. १९३५ - आंद्रे सिट्रोएन, फ्रेंच अभियंता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मुंबई : एसबीआय लाईफ चे माजी सीईओ अर्जित बसू यांची स्टेट बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली - इंधनाचे दर पुन्हा वाढणार, खनिज तेलाच्या दरात वाढ* ----------------------------------------------------- 3⃣ *दहा दिवसांत लोकपाल नियुक्त करा, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश* ----------------------------------------------------- 4⃣ *उत्तराखंड: आठ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन.* ----------------------------------------------------- 5⃣ *पुणे - प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत राज्यातील प्रत्येक शाळा डिजिटल करणार शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली माहिती* ----------------------------------------------------- 6⃣ *भारतीय क्रिकेट संघाचा 'द वॉल' म्हणजेच माजी कर्णधार राहुल द्रविडचा आयसीसीच्या प्रतिष्ठित 'हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश, हा सन्मान मिळवणारे राहुल द्रविड बनले पाचवे भारतीय खेळाडु* ----------------------------------------------------- 7⃣ *आयर्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेत २-० ने विजय मिळवताच भारतीय संघाने टी-२० क्रमवारीत दुसर्या स्थानी घेतली झेप* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *सर्वांना मोफत शालेय गणवेष द्यावे* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/06/blog-post_30.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *आळस* आलसस्य कुतो विद्या, अवद्यस्य कुतो धनम। अधिनस्य कुतो मित्रम, अमित्रस्य कुत सुखम॥ अर्थ - आळस हा माणसाचा शत्रू आहे असं म्हटलं जातं. लहानपणापासून ही शिकवण मनावर रूजवण्याचा प्रयत्न केला जातो. तरिही आळशी लोकांची संख्या कमी दिसत नाही. वर दिलेल्या संस्कृत श्लोकामध्ये आळशी लोकांना कोणत्या दुष्परिणामांचा सामना करावा लागतो, याचं सुंदर विवेचन केलं आहे. आळशी माणूस नीट शिक्षण घेऊ शकत नाही. योग्य ज्ञान न मिळाल्यानं अशा व्यक्तीला सर्वांगिण प्रगती साधता येत नाही. पुरेसं ज्ञान, पुरेशी शैक्षणिक योग्यता नसल्यामुळे अशा व्यक्तीला उत्तम कारकिर्दीपासून वंचित रहावं लागतं. साहजिक उत्तम कारकिर्द नसल्यानं ही व्यक्ती उत्तम धन मिळवू शकत नाही. त्याला आर्थिक पातळीवरही समाधान प्राप्त होत नाही. या शिवाय अशी कोणतीच योग्यता नसलेल्या व्यक्तीला वाईट प्रसंगी साथ देणारे चांगले मित्र लाभू शकत नाहीत. त्यामुळे एकटेपण वाट्याला येतं. प्रतिकूल परिस्थितीत खंबीर साथ देणारे, प्रसंगी योग्य सहकार्य तसेच मार्गदर्शन करणारे जिवाभावाचे मित्र नसल्यानं जीवनात एक प्रकारची पोकळी जाणवते. ही सारी परिस्थिती केवळ आळसामुळे निर्माण होते. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= जो काळानुसार बदलतो तोच नेहमी प्रगती करतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) जगातील सगळ्यात छोटा पक्षी कोणता ?* हमिंगबर्ड *२) पहिली अखिल भारतीय किसान सभा कुठे आयोजित केली होती ?* लखनौ *३) रामकृष्ण शिनची स्थापना कुणी केली होती ?* स्वामी विवेकानंद *४) आम आदमी पार्टीची स्थापना कधी झाली ?* २६ नोव्हेंबर २०१२ *५)'गदर पार्टी'चं मुख्यालय कुठे आहे ?* सॅन फ्रान्सिस्को *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 लंके विजय 👤 श्रीराम पाटील 👤 गोविंद सागर 👤 बालाजी मुंडलोड 👤 उत्तमराव नरवाडे 👤 सविता सावंत 👤 संतोष नलबलवार 👤 दिगंबर माने 👤 साहेबराव कांबळे 👤 लक्ष्मीकांत गिरोड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *अफवा* हल्ली अफवांचे पेव खुप फुटले आहेत चोर सोडून संन्याशीच जास्त लुटले आहेत खरं काय खोटं काय पडताळा घेतला पाहिजे मगच काय तो सारा गोंधळ घातला पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= ••••●☀‼ *विचार धन*‼☀●•••• *जसा एखाद्या देशाला शत्रू असतो तसा प्रत्येक माणसालाही असतो. खरंतर माणूसच स्वत:चा एकमेव शत्रू असतो. आळस हा त्याचा सर्वात मोठा शत्रू. आळसाला जिंकल्याशिवाय माणसाची प्रगती होत नाही. त्यासाठी प्रत्येक काम वेळेवर करावे. 'एकच ध्यास, एकच ध्येय' मनात बाळगून धडपडणारी माणसं आशावादी असतात. अवगुणी माणसे आळशी असतात. जिथं अवगुण तिथं फजिती. संत तुकोबा म्हणतात,'अवगुणांचे हाती आहे अवघी फजिती.' आळशी माणसे आपल्या हातांनी स्वत:ची फजिती करून घेतात. ती ध्येयशून्य तसेच समाजवृक्षावर उगवलेली बांडगुळं असतात.* *माणसांच्या जीवनातील खरा आनंद म्हणजे एखाद्या मोठ्या ध्येयासाठी चाललेली अखंड धडपड. त्यासाठी अंतरीचा ज्ञानदीप सतत तेवत ठेवावा लागतो. सोहिरोबा अंबिये सांगतात की, 'अंतरीचा ज्ञानदीप मालवू नको रे' आपल्या अंतरंगात उत्कटतेला, भव्यतेला, उदात्ततेला आणि उत्तुंगतेला महापूर आला की, त्यामध्ये आळसाचे महावृक्ष कोसळून वाहत जातात. ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्न करणारांना परमेश्वरसुद्धा मदत करतो. ध्येयासक्त माणसांच्या हाती माती दिली तर त्याचे तो सोने करून दाखवितो. मात्र, आळशी माणसाच्या हाती सोने दिले तर तो त्याची माती करून टाकतो. खरे उद्योगी विश्रांती घेण्याचे विसरतात. आळशी माणसे इतकी आळशी असतात की, ते आळशीपणा करायलाही आळस करतात.* ••●☀‼ *रामकृष्णहरी* ‼☀●•• ☀☀☀☀☀☀☀☀☀ *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= सुख आणि दुःख हे प्रत्येक मानवी जीवनातले दोन वेगवेगळे रंग आहेत.सुखाच्या रंगात सारेच मिसळून जातात.त्यात एवढे रंगून जातात की,दुस-याची आठवणसुद्धा येत नाही.इतरांना आपल्यामध्ये सामावून घेण्याच्या प्रयत्नातही नसतात.एवढा अपार आनंद होतो.पण दु:खाचे तसे नाही.दु:खात मात्र त्याला सगळ्यांचीच आठवण येते.आपल्याला अशावेळी आपल्याजवळ कुणीतरी यावं आणि दिलासा द्यावा असं वाटतं.दु:ख पचविण्याची ताकत त्याच्यामध्ये कमी असते.म्हणून अशावेळी आपल्या मदतीला कुणीतरी यावं यासाठी धावा करतो.अशावेळी मात्र आपल्यापासून आपले आणि इतरही लोक दूर जातात.परंतू एक लक्षात ठेवायला हवे,सुखाच्यावेळी आपण कुणाला विचारले नाही मग दु:खाच्यावेळी कसे बरे विचारतील ? म्हणून माणसाने सुख असो वा दु:ख असो दोन्ही समान मानून सदैव पाठीशी रहावे.एकमेकांच्या मदतीला धावून जावे.हाच सुखदु:खाचा मानवी जीवनव्यवहार आहे.हा व्यवहार आपल्या व इतरांच्या जीवनात समानतेने व्हावा एवढेच ज्ञात असावे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रगत - Advanced* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *कोल्हा आणि नाग* एक कोल्हा एकदा त्याला राहण्यासाठी एक बीळ खणीत होता. खणत असताना तो बराच खोल गेला तर तेथे एक म्हातारा नाग त्याला दिसला. त्याला पाहाताच कोल्ह्याला फार भीती वाटली. तो नम्रपणे नागास म्हणाला, 'आजोबा, आपली मी झोपमोड केली याबद्दल मी आपली क्षमा मागतो. पण आपण इथं जे रात्रंदिवस बसून राहता त्यात आपल्याला काय सुख मिळतं ?' नाग त्यावर म्हणाला, ' बाबा, माझं नशीबच तसं त्याला काय करणार ?' कोल्हा म्हणाला, 'पण इथे खूप धन असूनही तुम्हाला चैन करताना मी पाहात नाही, किंवा आपण एक पैसासुद्धा कोणाला देत नाही. तर या धनाचा उपयोग काय?' नाग म्हणाला, 'ते मला समजत नाही. पण मला त्याचं रक्षण करायला देवानं सांगितलं आहे. नशिबात असेल ते भोगल्यावाचून सुटका नाही.' कोल्हा म्हणाला, 'तर मग मी धनवान नाही हे देवाचे माझ्यावर मोठे उपकारच आहेत. कारण तुमच्या इतका दुःखी प्राणी सगळ्या जगात कोणी नसेल !' *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment