✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 21/07/2018 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९७० - ईजिप्तमध्ये आस्वान धरणाचे बांधकाम पूर्ण. १९७२ - आयर्लंडच्या बेलफास्ट शहरात दहशतवाद्यांनी २२ बॉम्बस्फोट घडवून आणले. ९ ठार, १३० जखमी. १९७६ - आयर्लंडमधील ब्रिटीश राजदूताची हत्या. 💥 जन्म :- १९३४ - चंदू बोर्डे, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९४७ - चेतन चौहान, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९६१ - अमरसिंग चमकीला, पंजाबी गायक. 💥 मृत्यू :- २००१ - शिवाजी गणेशन, तमिळ अभिनेता. २००२ - गोपाळराव बळवंतराव कांबळे, मराठी चित्रकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली - मोदी सरकार विरोधात दाखविलेला अविश्वास प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मविश्वासाने जिंकला* --------------------------------------------------- 2⃣ *नागपूर : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक मंजूर, जळगाव विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचे नाव* --------------------------------------------------- 3⃣ *कोल्हापूर - राधानगरी धरणाचे ३ व ६ नंबर दरवाजे उघडले, विद्युत विमोचकासह ४४५६ क्युसेक विसर्ग सुरू.* --------------------------------------------------- 4⃣ *नाशिक - जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळील संरक्षण भिंतीलगत असलेले गुलमोहराचे झाड कोसळल्याने दोन कारचे नुकसान.* --------------------------------------------------- 5⃣ *नागपूरः राज्य सरकारने दूध दरवाढीसंबंधी घेतलेला निर्णय स्वागतार्ह दूध दरवाढीचे आंदोलन मागे - राजू शेट्टी यांची घोषणा* --------------------------------------------------- 6⃣ *झामन आणि इमाम उल हक या पाकिस्तानच्या सलामीवीरांनी 304 धावांची भागीदारी रचत विश्वविक्रमाला घातली गवसणी* --------------------------------------------------- 7⃣ *हॉकी 2017च्या आशिया चषक विजेत्या भारतीय संघाला सलामीच्याच सामन्यात यजमान इंग्लंडचा करावा लागणार सामना* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= आंतरराष्ट्रीय पालक दिनाच्या निमित्ताने ....... *गरज पालकांची शाळा भरवायची* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://epaper.ejanshakti.com/m5/1743658/Mumbai-Janshakti/21-07-2018#page/4/1 आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *सिकंदर* महान अलेक्झांडर, अर्थात तिसरा अलेक्झांडर, मॅसेडोन (अन्य नावे : अलेक्झांडर द ग्रेट, सिकंदर ) हा मॅसेडोनियाचा राज्यकर्ता होता. जागतिक इतिहासात तो सर्वांत यशस्वी व कुशल सेनापतींपैकी एक गणला जातो. तत्कालीन ग्रीक संस्कृतीला त्या काळात ज्ञात असलेले संपूर्ण जग त्याने जिंकले आणि त्यामुळे तो जगज्जेता म्हणूनही ओळखला जातो. आपल्या कारकिर्दीत त्याने इराण, सीरिया, इजिप्त, मेसोपोटेमिया, फिनीशिया, जुदेआ, गाझा, बॅक्ट्रिया तसेच भारतातील पंजाबपर्यंतचा प्रदेश जिंकला. फारसी दस्त ऐवजांनुसार त्याला एस्कंदर-इ-मक्दुनी(मॅसेडोनियाचा अलेक्झांडर) म्हटले जाते. तर उर्दू आणि हिंदी दस्तऐवजांत त्याला सिकंदर-ए-आझम म्हटले गेले आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= सत्य पालन हाच धर्म बाकीचे सर्व अधर्म आहेत. - महात्मा ज्योतिबा फुले *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *०१) जगात एकूण किती खंड आहेत ?* सात *०२) जगात एकूण किती महासागर आहेत ?* पाच *०३) जगात सर्वात मोठा खंड कोणता ?* आशिया *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 वृषाली शिंदे 👤 शशी खांडाळकर 👤 व्यंकटराव तोटावाड 👤 विजय वाठोरे सरसमकर 👤 रामचंद्र कडलवार 👤 कवयित्री सोनाली चंदनशिवे 👤 शिवराज मोराडे 👤 रविकांत कुलकर्णी 👤 संजीव गंजगुडे 👤 चिंतामणी जाधव *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *संकल्प स्वच्छतेचा* चला सारे स्वच्छतेचा मनी संकल्प करू स्वच्छता तिथे आरोग्य नेहमी ध्यानी धरू लक्षात ठेवा स्वच्छता असेल जिथे तिथे आनंद अन् आरोग्य नांदेल तिथे तिथे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *सत्याला 'सत्य' म्हणून ओळखा आणि असत्याला 'असत्य' म्हणून, असा संदेश गौतम बुद्धांनी दिला. सत्य या शाश्वत मूल्याचा वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातील आचारासाठी माणसाचं विवेकी मन हाच मूलाधार असतो. वस्तुत: माणसाला सत्य सहज कळतं. सत्य पाहण्याची, बोलण्याची वा कृती करण्याची रूची स्वाभाविक असते. माणूस आसक्तीत अडकला की खोट्या, असत्य, अप्रामाणिकपणाची पुटं मनावर चढतात. विवेक हरपतो. तोंडानं सत्याचा पुरस्कार परंतु आचरण मात्र असत्य. उच्चार-आचार यात पूर्णत: विसंगती. लग्नातील सातवी प्रतीज्ञा आहे, "सखा सप्तपदी भव" म्हणजे विवाहानंतर स्त्री व पुरूष यांच्यात मालक आणि नोकर असा भाव असता कामा नये. पती व पत्नी यांच्यात सख्याची -मैत्रिची भावना हवी. समानतेचा, कधीही न तुटणारा ऐक्याचा सख्य संबंध हवा. परंतु सत्यपालनाचे आचरण किती घडतं.* *सत्यनिष्ठेनं, सत्य आचरणानं खरंतर माणसाचं ह्रदय व्यापक होतं. अंत:करणात प्रेमभाव वाढतो. वैरभावनेचा लोप होतो. आत्म्याचा विकास होतो. सत्य हे सर्व समर्थ असल्यानं जगण्यातील विश्वास बळावत जातो. व्यापक अर्थानं सत्याचं पालन करण्याने स्वत:चं, कुटुंबाचं जगणं अर्थपूर्ण ठरतं, आनंददायी होतं.* *दुष्ट कर्म तुम्ही, अजिबात टाळा !* *पुढे नाही धोका, मुलांबाळा ॥* *सद्यस्थितीत देशात सत्य आचरणाच्या बाबतीत सर्वत्र अंधार दिसतो. सत्याचं पालन करणं हीच सर्वोत्तम समाजसेवा हा विचार रूझला तरच असत्याचा अंधार मिटून सत्याचा सूर्योदय नक्कीच होईल.* ••●🔅‼ *रामकृष्णहरी* ‼🔅●•• 🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= अज्ञानाला दूर घालवायचे असेल, दु:खाला दूर करायचे असेल, आपल्या मनातील रागावर नियंत्रण ठेवावे वाटत असेल, इतरांना आपलेसे करावे वाटत असेल, अवघड समस्येतून मार्ग काढायचा असेल आणि जीवन सुखी व समृद्ध व्हावे असे वाटत असेल तर त्यावर एक आणि एकच सर्वोत्तम मार्ग आहे तो म्हणजे ज्ञानाचा. ज्यांनी ज्ञानाचा मार्ग स्वीकारला आहे त्यांनी ह्या सा-या गोष्टीतून ज्ञानाच्या सहाय्याने सहज मारली काढून जीवन सुखी व समृद्ध केले आहे. ज्यांनी स्वीकारला नाही त्यांना त्यांच्या जीवनात कधीही सुखी होता आले नाही. ते जवळ असलेल्या सुखालाही मुकले आहेत कारण त्यांच्याजवळ ज्ञानाची जोड नव्हती म्हणून या जगात सर्वश्रेष्ठ जर काय असेल तर ते ज्ञान. जीवनातील अज्ञानाला दूर करण्याचे सामर्थ्य केवळ ज्ञानातच आहे हे कधीही विसरुन चालणार नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *अज्ञान - Ignorance* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *शासन* महाभारताच्या शांतीपर्वातील ही गोष्ट. शंख व लिखित नावंचे दोघे भाऊ यज्ञोपवित संस्कार झाल्यावर गुरूगृही विद्याध्यानासाठी गेले. संपूर्ण वेद वेदांगाचा अभ्यास करून गुरूची परवानगी घेऊन हे दोघे घरी परत आले. दोघांनीही दोन वेगवेगळया ठिकाणी आपले आश्रम बांधले. तिथे त्यांचे अध्यापनाचे काम सुरू झाले. बरेच दिवस झाले दोन्ही भावांची भेट नव्हती. लिखिताने शंखाकडे भेटीला जाण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तो गेला पण शंख कामानिमित्त बाहेर गेला होता. निराश झालेला लिखित परत निघाला. दुपारी बाराची वेळ भूक लागली होती. समोर शंखाच्या आश्रमातील आंब्याच्या झाडाला खूप आंबे लागले होते. एक छानसा पिकलेला आंबा लिखिताने तोडला व पुढे चालू लागला. तेवढयात समोरून येणार्या शंखाने ते पाहिले व विचारले. 'आंबा कुठे मिळाला ?' शंख सहज म्हणाला 'अरे ! तुझ्याच झाडाचा छान पिवळा धम्मक दिसला तोडला'. शंख शांतपणे म्हणाला 'म्हणजे लिखिता तू चोरी केलीस झाडाच्या मालकाला न विचारता आंबा तोडलास' लिखिताला आपली चूक कळली. शरमेने त्याची मान खाली झुकली. 'शंखा माझ्या गुन्ह्याबद्दल मला हवी ती शिक्षा कर' 'काहीं गरज नाहीं त्याची जा आता पुन्हा असे घडणार नाही ह्याची खबरदारी घे' शंख एवढे बोलून निघून गेला. लिखित राजाकडे गेला. घडलेली सर्व हकीगत सांगितली. 'राजा मला शिक्षा कर' लिखित म्हणाला. ह्या विचित्र मागणीचे राजाला आश्चर्य वाटले. राजा म्हणाला 'लिखिता तू म्हणतोस ते खरंही असेल पण चोरीची फिर्याद कुणीच केलेली नाही. गुन्हा शाबीत झाला तर शिक्षा'. 'राजे पण गुन्हा शाबीत झाला तर ह्या गुन्ह्याला शिक्षा कोणती ?' लिखिताने विचारले, 'चोरी करणार्याचा हातच आम्ही कापतो' राजा म्हणाला. राजाच्या समोरच लिखिताने राजा शासन करत नाहीं म्हणून आपणच आपला हात कापून टाकला'. स्वत:च स्वत:ला शिक्षा करून घेणारी प्रजा उत्कृष्ट राज्य शासनाचे प्रतीक आहे. *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment