✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 24/07/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९४३ - दुसरे महायुद्ध - दोस्त राष्ट्रांच्या विमानांनी जर्मनीतील हांबुर्ग शहरावर तुफान बॉम्बफेक सुरू केली. १९६५ - व्हियेतनाम युद्ध - उत्तर व्हियेतनामने अमेरिकेचे लढाउ विमान पाडले. 💥 जन्म :- १९१७ - जॅक मोरोनी, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. १९४५ - अझीम प्रेमजी, भारतीय उद्योगपती. 💥 मृत्यू :- १९७० - पीटर दि नरोन्हा, भारतीय उद्योगपती. १९८० - पीटर सेलर्स, ब्रिटीश अभिनेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी एकादशीनिमित्त वर्षा येथील शासकीय निवासस्थानी केली सपत्नीक विठ्ठलपूजा* --------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथीन फरझाना या महिलेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून निकाह हलाला संपुष्टात आणण्याची केली मागणी* --------------------------------------------------- 3⃣ *पटणा - लालूप्रसाद यादव यांच्या राजद पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शंकर चरण त्रिपाठी यांची पक्षातून हकालपट्टी, मोदींसोबतच्या गळाभेटीवरुन राहुल गांधींवर केली होती टीका.* --------------------------------------------------- 4⃣ *पटणा - बिहार विधानसभेत दारुबंदी विधेयक मंजूर, मुख्यमंत्री नितिशकुमार यांनी केले सडेतोड भाषण.* --------------------------------------------------- 5⃣ *नवी दिल्ली - राजर्षी शाहू महाराज यांना भारतरत्न सन्मान द्या, खासदार धनंजय महाडिक यांची लोकसभेत मागणी* --------------------------------------------------- 6⃣ *राज्य शासनाकडून ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार डॉ. किसन महाराज साखरे यांना जाहीर.* --------------------------------------------------- 7⃣ *श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेवर 199 धावांनी विजय मिळवत दोन कसोटी सामन्यांची मालिका 2-0 अशी खिशात टाकली.* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *छडी लागे ( ना ) छम छम ....!* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://epaper.ejanshakti.com/m5/1747581/Mumbai-Janshakti/24-07-2018#page/4/1 आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *अझीम हशिम प्रेमजी* अझीम हशिम प्रेमजी (जन्म २४ जुलै १९४५) हे भारतीय उद्योगपती व विप्रो कंपनीचे अध्यक्ष आहेत. फोर्ब्सने जाहीर केलेल्या भारतीय श्रीमंतांच्या यादीमध्ये ते तिसऱ्या स्थानावर आहेत व जगातील श्रीमंतांच्या यादीमध्ये ४१ व्या स्थानावर आहेत. गेल्या चार दशकात त्यांनी विप्रो कंपनीचा विविध क्षेत्रात विस्तार केला व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी म्हणून उदयास आणली. २००० साली एशियावीक ने त्यांची जगातील २० सर्वाधिक शक्तिशाली पुरुषांच्या यादीत निवड केली. टाईम नियतकालिकाने दोनदा त्यांचा जगातील १०० सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत स्थान देऊन गौरव केला. २००५ साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. तसेच २०११ साली त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) अलाहाबाद कोणत्या संगमावर वसले आहे ?* गंगा-यमुना संगम *२) आकाशस्थ ग्रहगोलातील अंतर मोजण्याचे एकक कोणते ?* प्रकाश वर्ष *३) अन्नाचे रक्तात रूपांतर करण्यासाठी मदत करणार्या पाचक द्रव्यांना काय म्हणतात ?* एन्झिम *४) मेंदूकवटीशास्त्रात कशाचा अभ्यास केला जातो ?* मेंदू आणि कवठी रचनाशास्त्राचा *५) कोर्बिलियन कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?* टेबल टेनिस *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 संतोष लवांडे 👤 विष्णू रामोड, धर्माबाद 👤 गोविंद कोकुलवार, नांदेड 👤 राजेश पाटील मनूरकर 👤 सचिन टेकाळे, कुपटी, 👤 संतोष मुलकोड, 👤 धिरजसिंग चौहान 👤 दीपक पांचाळ 👤 प्रमोद फुलारी 👤 कल्याण बागल *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ======== *सावज* सावज थकलं की शिकार करता येते थकलेल पाहून आशा धरता येते सावज मिळे पर्यंत काही शाश्वती नसते काहींची महत्वाकांक्षा फार मोठी असते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'सहजस्थिती किंवा नीजस्थिती' कशी असते यासाठी एक साधे मोटारचे उदाहरण घेऊन स्पष्ट करू. मोटार चालकापाशी क्लच, ब्रेक, आणि अॅक्सिलेटर या तीन गोष्टी महत्वाची भूमिका बजावत असतात. चालकाचे काम संतुलित, संयमित मोटर चालविणे हे असते. त्याच्या पायाखालच्या अॅक्सिलेटरमुळे गाडीचा वेग वाढतो. आपल्या आयुष्यात सुखकारक, आनंददायक घटना घडल्या की आपल्या चित्तवृत्ती उचंबळून येतात. मन था-यावर रहात नाही... आणि प्रतिकूल, क्लेशकारक, घटना घडली की तेच मन काळवंडते, कोमेजते, मलूल, उदास आणि खिन्न होते. गाडीसमोर कोणी अनपेक्षित आले की आपण कचकन् ब्रेक दाबतो. तेव्हा होते तशी ही अवस्था असते.* *पण गाडी तर चालू राहिली पाहिजे आणि इंजिनशी तिचा असलेला थेट संबंध काही इच्छित काळापुरता तुटला पाहिजे, तेव्हा आपण क्लच दाबतो. ही जी अवस्था ती स्थिर, शांत, आणि समधात अवस्था. म्हणजे आपण जिवंत आहोत आणि आपले मन स्वच्छ, नितळ, पारदर्शी, भाव-विकाररहित झाले आहे. लिंग-देह-सुख-दु:ख यांच्या पलिकडील ही अवस्था. यावेळी आपल्याला येणारी आनंदाची अनुभूती केवळ शब्दातीत - ती चिदानंद स्वरूपाची. हे क्षण प्राप्त व्हावे, असे वाटत असल्यास सर्व संतानी सांगितलेला उपाय म्हणजे नामस्मरण...* *'नामापरते सुख नाही रे सर्वथा !'* *--हाच तो सदगुरूपदेश...* ••●⚜‼ *रामकृष्णहरी* ‼⚜●•• 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्यांच्या अंगात,विचारात आणि कृतीत सर्व मानवतावादी मूल्ये रुजलेली आहेत ह्यांनाच आपण खरे विद्वान म्हणावे.केवळ वरवर ज्ञान मिळवून चार लोकांत आपलाच उदोउदो करुन घेणारे महाभागही या जगात पुष्कळ आहेत.त्यांच्या ओठांवर एक आणि पोटात एक असते.अशी माणसे तेव्हाच काळाबरोबर लुप्त होतात.ते कधीच नंतरच्या काळात टिकत नाहीत अर्थात ते अल्पायुषी ठरतात.ज्यांना काळाबरोबर आणि काळाप्रमाणे पुढे पुढे जायचे आहे ते मात्र कशाचाही विचार न करता जगतात.तेच खरे मानवतेची मूल्य जोपासत कोणत्याही कालप्रवाहात चिरंजीव असतात हे मात्र सत्य आहे *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *सुगंध - Fragrance* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *गुरू ,परीक्षा ,शिष्य* गुरुकुलातून तीन शिष्य उत्तीर्ण होणार होते. त्यांच्या अंतिम परीक्षा सुरू होत्या. गुरू म्हणाले, “एक परीक्षा तुम्हाला न सांगता होईल. तीच तुमची खरी अंतिम परीक्षा असेल.. आणि या परीक्षेत तुम्ही पास झाला तर तुमचे जीवन यशस्वी व सत्कारणी लागेल. आता आपल्या गुरुकुलातल्या सगळ्या परीक्षा झाल्या. ती विशेष परीक्षा काही झाली नाही. गुरुकुलात सत्कार सोहळाही झाला. प्रथेप्रमाणे तिन्ही विद्यार्थी पुढील जीवनातील आयुष्य यशस्वी करण्यासाठी बाहेर पडले. एके दिवशी ते संध्यासमयी जंगलातुन जात होती.आणखी काही क्षणांमध्ये काळोख पसरणार होता .राञ होणार अंधार पडणार आणि त्या काळोखातुन त्यांना जंगल पार करून गावी परतायचे होते . झपझप चालून पुढचं जंगल पार करायचं होतं, मुक्कामाचं गाव गाठायचं होतं. अचानक पुढे चालणारा विद्यार्थी थबकला. वाटेत एक काटेरी झुडूप आडवं पडलं होतं. तो दोन पावलं मागे आला आणि धावत पुढे जाऊन त्याने एका झेपेत ते झुडुप पार केलं. दुसऱ्याने अंदाज घेतला आणि रस्ता सोडून खाली उतरून त्याने काटे पार केले आणि तो पलीकडच्या बाजूला पुन्हा वाटेवर आला.. तिसरा मात्र थांबून काटे वेचू लागला. बाजूला एका छोट्या खड्ड्यात ते लोटू लागला. दोघे मित्र म्हणाले, “अरे, ही काटे वेचायची वेळ आहे का? कोणत्याही क्षणी अंधार पडेल.आता सांज होत आहे.अशा या संध्यासमयी आपल्याला लवकरात लवकर मुक्कामाचं गाव गाठायचं आहे. रस्त्यात कुठे वाट चुकलो, तर जंगलात भटकत राहू. चल लवकर.. तिसरा युवक म्हणाला, अंधार पडणार आहे, म्हणूनच हे काटे वेचले पाहिजेत. आपल्याला ते दिसले तरी. आपल्यामागून जो वाटसरू येईल, त्याला काटे दिसणारच नाहीत. त्याच्या पायात काटा घुसला तर त्याची इथे या भयाण जंगलात काय अवस्था होईल, विचार करा. तुम्ही पुढे निघा. मी हे काटे बाजूला करून गाठतोच तुम्हाला धावत.. ते दोघे पुढे निघतात, तोच शेजारच्या झाडामागून गुरू बाहेर आले आणि म्हणाले, तुम्हा दोघांना पुन्हा गुरुकुलात यावं लागेल तुमचं शिक्षण अजून अपूर्ण आहे. तात्पर्य : अंतिम परीक्षा ज्ञानाची नव्हती, प्रेमाची होती,भावनिकतेची होती , अनुकंपेची होती, सहवेदनेची होती,दुःख वाटून घेण्याची होती.तुम्ही दोघेजण ज्ञान खूप शिकलात, प्रेम अजून शिकणं बाकी आहे.भावनिकतेची जोपासना होणे बाकी आहे.बस तेवढी जोपासयला शिका.मगच जीवनात सर्वोतोपरी यशस्वी व्हाल *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment