✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 12/07/2018 वार - गुरुवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १६७४: शिवाजी महाराजांनी इंग्रजांशी मित्रत्त्वाचा तह केला. १७९९: रणजित सिंग यांनी लाहोर ताब्यात घेतले आणि पंजाबचे सम्राट झाले. १९३५: प्रभातचा चन्द्रसेना हा मराठी चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला. १९६१: पानशेत, खडकवासला ही धरणे फुटल्यामुळे पुण्यातील पुरात २,००० लोक मृत्यूमुखी, १,००,००० लोक विस्थापित झाले. १९८२: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (NABARD) स्थापना झाली. १९८५: पी. एन. भगवती भारताचे १७ वे सरन्यायाधीश झाले. १९९५: अभिनेते दिलीपकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. १९९८: १६ व्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत यजमान फ्रान्सने गतविजेत्या ब्राझिलचा ३-० असा पराभव करुन विश्वकरंडक जिंकला. १९९९: महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार सुनील गावसकर यांना प्रदान. २००१: कृषीशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना टिळक पुरस्कार प्रदान. 💥 जन्म :- १८१७: अमेरिकन लेखक व विचारवंत हेन्री थोरो १८६४: अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर १८६४: इतिहासाचार्य वि. का. राजवाडे १९०९: प्रथितयश दिग्दर्शक बिमल रॉय १९१३: इंग्रजी लेखक मनोहर माळगावकर १९२०: सर्वोच्च न्यायालयाचे १६ वे सरन्यायाधीश यशवंतविष्णू चंद्रचूड १९४७: भारतीय क्रिकेट खेळाडू पूचिया कृष्णमूर्ती १९६१: भारतीय अभिनेते, गायक आणि निर्माते शिव राजकुमार १९६५: क्रिकेटपटू संजय मांजरेकर 💥 मृत्यू :- १६६०: बाजी प्रभू देशपांडे १९९४: हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील पटकथाकार वसंत साठे १९९९: हिन्दी चित्रपट अभिनेता राजेंद्र कुमार २०००: मराठी कवयित्री इंदिरा संत २०१२: मुष्टीयोद्धा आणि अभिनेता दारासिंग २०१३: चित्रपट अभिनेता प्राणकृष्ण सिकंद ऊर्फ प्राण २०१३: बोस कॉर्पोरेशन चे स्थापक अमर बोस *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मेडिकल केंद्रीय कोटयात ओबीसी आरक्षण देण्याच्या प्रकरणात हायकोर्टाने केंद्र व राज्य सरकारला बजावली नोटीस* ----------------------------------------------------- 2⃣ *पीक कर्जापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सहकार मंत्री सुभाष देशमुख* ----------------------------------------------------- 3⃣ *आषाढीसाठी येणाऱ्या भक्तांना मिनरल वॉटरची सोय, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षांची माहिती* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई : पावसाचा अंदाज घेऊन शाळांनी सुट्टीचा निर्णय घ्यावा - शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे* ----------------------------------------------------- 5⃣ *महावितरणला 30 हजार कोटी रुपयांचा तोटा. ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता.* ----------------------------------------------------- 6⃣ *जम्मू-काश्मीर- कुपवाडामध्ये दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत लष्कराचा एक जवान शहीद* ----------------------------------------------------- 7⃣ *हॉकीला अच्छे दिन... केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या मिशन ऑलिम्पिक सेलने भारतीय पुरूष हॉकी 18 सदस्यीय संघातील प्रत्येक खेळाडूला 50 हजारांचा मासिक भत्ता देण्याचे केले जाहीर* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *छडी लागे ( ना ) छम छम* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/07/blog-post_11.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *कवयित्री इंदिरा संत* इंदिरा संत या मराठी कवयित्री आणि कथालेखक होत्या. शिक्षकीपेशा स्वीकारलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. १९५० च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आई, पत्नी, मुलगी या नात्यांतून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे. इंदिरा संत आणि त्याचे पती ना. मा. संत या दोघांच्या कवितांचा एकत्रित असा संग्रह 'सहवास' या नावाने १९४० ला प्रसिद्ध झाला. दुर्दैवाने ना. मा. संत यांचे १९४६ साली निधन झाले. वेळीच सावरून या घटनेचा इंदिरा संत यांनी आपल्या कवितेवर परिणाम होऊ दिला नाही. विशुद्ध रूपातील इंदिरा संत यांची कविता टीकाकार तसेच काव्यरसिकांनी उचलून धरली. आजमितीस इंदिरा संत यांची सुमारे पंचवीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. रमेश तेंडुलकर यांनी इंदिरा संत यांच्या निवडक कविता 'मृण्मयी' नावाने १९८२ साली संपादित करून प्रसिद्ध केल्या आहेत. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= "तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची प्रगती होत आहे." *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) ग्लोबल पीस इंडेक्समध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे ?* १३६ वा *२) अंतराळवीर कल्पना चावला यांचे जन्मगाव कोणतं ?* कर्नाल, हरियाणा *३) सोयुझ टी-११ हे कोणत्या देशाचे अवकाशयान आहे ?* रशिया *४) कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक शतके कोणाच्या नावावर आहेत ?* सचिन तेंडूलकर *५) एअरफोर्स अँकॅडमी कुठे आहे ?* अँडमला (केरळ) *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= * दत्ताहरी जगदंबे, सहशिक्षक * हरिहर धुतमल, पत्रकार * माधव उमरे * साई गादगे, सहशिक्षक * दादाराव जाधव * अभिजित राजपूत * नागेश पडकूटलावार * नंदकुमार कौठकर, सहशिक्षक * प्रवीण दाभाडे पाटील, सहशिक्षक * वैभव सकनुरे * हणमंत गुरुपवार * शिल्पा जोशी, साहित्यिक * अविनाश पांडे * सुनील देवकरे * नमन यादव *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= "विचारपुर्वक " जरा काही झालं की लगेचच भिडतात विचार करत पुन्हा खुप वेळ रडतात भिडण्यापूर्वी जरा विचार केला पाहिजे विचारपुर्वक निर्णय अमलात आला पाहिजे =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= ••••●⚜‼ *विचार धन* ‼⚜●•••• *घर..ज्याची अनिवार, आंतरिक ओढ असते माणसाला. संध्याकाळ झाली की पावलं आपोआप वळतात घराकडे. काही अनुबंध जुळलेले असतात. घराशी एक उत्कट नातं असतं, जीव गुंतलेला असतो प्रत्येकाचा, पण घरा-घरामध्ये अंतर असतं. जमीन अस्मानाचं. काही घरं प्रसन्न वाटतात. लहान असो, मोठे असो. प्रश्न घराच्या आकाराचा नसतो. कुणाची झोपडी असो, महाल असो, घर मातीचं असो की विटांचं. काय फरक पडतो ? प्रश्न घरातल्या माणसांचा... त्यांच्यातल्या कटु-गोड नात्यांचा असतो. विचारांची, सुखदु:खांची जिथं मोकळेपणाने देवाणघेवाण असते, ती घरं प्रसन्नतेचं दान देतात. संवादानं आयुष्यातले चढउतार सहज पार होऊन जातात...* *माणसं प्रेमळ असली की झोपडीचा ताजमहल होऊन जातो. एकमेकांच्या आधारानं, वात्सल्याची कस्तुरी जणू घराच्या भिंतीमध्ये मिसळून गेलेली असते. कधीकधी मोठमोठे राजवाडे माणसाला भुरळ पाडतात. पण जवळ गेले की अंतर्बाह्य उदास-भकास वाटतात. सुखचैनीचे चंद्रतारे घरात टांगलेले असताना तिथले चेहरे ताणतणावांनी कोमेजलेले असतात. सुखाचा संबंध संपत्तीशी असतोच कुठे? सुखाचा बाजारही नसतो, ते विकत आणायला. तरीही संपत्तीसाठी का तुटतात परिवार? परिवार जिथे गुण्यागोविंदाने नांदतो त्यालाच तर घर म्हणतात. घर म्हणजे जिथं ह्रदयाच्या तारा जुळून आलेल्या असतात, संसाराच्या सुरेल गाण्यासाठी !* ••●⚜‼ *रामकृष्णहरी* ‼⚜●•• ⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜ *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनात अनेक प्रश्न गुंतागुंतीचे असतात. असे प्रश्न आपण कितीही सोडवण्याचा प्रयत्न केला तरी ते सुटत नाहीत. अशावेळी आपण हतबल होतो. त्यातून आपली सुटका व्हावी.काहीतरी मार्ग निघावा असे वाटते. मग आपण जिथे यावर तोडगा निघणार आहे, आपल्या मनाला समाधान मिळणार आहे. अशा ठिकाणी जाऊन आपण आपला संसारुपी भवसागर तरुण जाण्यासाठी कुणाचातरी धावा करतो अर्थात परमेश्वराचा. पण परमेश्वर काही येत नाही. परंतू परमेश्वराने आपला प्रतिनिधी म्हणून आपल्याकडे गुरुला पाठविले. जीवनाला योग्य दिशा मिळावी म्हणून ज्यांचे आढळाचे स्थान आपल्या जीवनात आहे. ज्यांच्यावर आपली नितांत श्रद्धा आहे अशा ईश्वररुपी गुरुच्या सानिध्यात राहून त्यांचे मार्गदर्शन घेतो आणि आपल्या जीवनाचे कल्याण करुन घेतो. या जगात सर्वात जास्त आणि आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारे गुरू हेच आपले परमेश्वर आहेत. हे कधीही विसरुन चालणार नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *श्रद्धा - Reverence* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *एक छोटीशी संधी* एकदा एका मंदिराच्या पुजाऱ्याच्या गावात पूर येतो. लोक गाव सोडून जायला सुरुवात करतात. जेव्हा ते त्याला आपल्याबरोबर यायला सांगतात तेव्हा तो नाकारतो. तो त्यांना सांगतो, कि त्याचा त्याच्या देवावर विश्वास आहे आणि देव त्याचं नक्की रक्षण करेल. पाणी वाढतं आणि अख्खा गाव त्यात वाहून जातो. एक पट्टीचा पोहोणारा माणूस पुजार्याच्या घरा जवळून पोहत जात असतो. तो पुजार्याला पाठीवरून वाहून न्यायची तयारी दाखवतो; पण पुजारी ते नाकारतो. थोड्या वेळाने एक होडी येते; पण तो त्यातही बसत नाही. शेवटी एक हेलिकाॕप्टर येत आणि त्याच्याकडे शिडी टाकत पण तो तेही नाकारतो. शेवटी पुराचं पाणी वाढतं आणि त्याचं घर बुडतं व तो मरतो. तो पुण्यवान गृहस्थ असल्यामुले सरळ स्वर्गात जातो. देव भेटल्या भेटल्या तो त्याच्याकडे तक्रार करतो, कि त्याचा एवढा भक्त असूनही त्याने त्याला वाचवलं नाही. तेव्हा देव हसून म्हणाला, " मी तुझ्याकडे एक माणूस, एक होडी आणि एक हेलीकाॕप्टर पाठवलं होतं. तू दिलेल्या संधीचा फायदा घेतला नाहीस." पुजार्याने आपल्या हट्टीपणामुळे सर्व संधी गमावल्या होत्या. मित्रांनो 👉तुमच्या आयुष्यात अशा असंख्य संधी येऊन जात असतात पण त्या क्षणाला तुम्हाला त्याची कल्पनाच नसते. एक छोटीशी संधी तुमच्या आयुष्याला एक चांगली कलाटणी देऊ शकते. म्हणून योग्य संधी कधीच हातची जाऊ देऊ नका. *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment