*आमची पंढरी*
ज्ञानीयाची पंढरी
आहे आमची शाळा
फुलतो तिथे नित्य
बालकांचा मळा
विठुराया सारखे बालक आहेत आमचे सावळे आणि गोजीरे
फुलतात त्यांच्यानी
आनंदाचे मळे कसे साजीरे
ज्ञानदानाने, प्रेमाने
करुया त्यांची
पूजा आणि भक्ती
विठुरायाचा दर्शनाची
हीच आहे बघा युक्ती
पंढरीचा विठूबाचे दर्शन
आम्हा होणार
सकाळ सकाळी हसरे चेहरे फुलणार
विद्या आमची माऊली
विठोबाची सावली
चिमुकल्यांचा रुपात
अशी आम्हास भावली.
🙏🌹🌹🌹🙏
〰〰〰〰〰〰
✍ ©प्रमिलाताई सेनकुडे
हदगाव जिल्हा नांदेड
➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment