✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 21/12/2018 वार - वार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वर्षातील सर्वात मोठी रात्र* 💥 ठळक घडामोडी :- १९५८ - चार्ल्स दी गॉल फ्रांसच्या अध्यक्षपदी. युनियन देस् देमोक्रातेस् पुर ला रिपब्लिक पक्षाला ७८.५%चे बहुमत. १९६८ - अपोलो ८चे केनेडी स्पेस सेंटरहून उड्डाण. फ्रँक बॉर्मन, जेम्स लोव्हेल आणि विल्यम ऍंडर्स अंतराळात. १९८७ - फिलिपाईन्सच्या तब्लास सामुद्रधुनीत प्रवासी फेरी दोन्या पाझ आणि तेलवाहू जहाज व्हेक्टर १ मध्ये टक्कर. १,०००हून अधिक ठार. 💥 जन्म :- १९०३ - भालचंद्र दिगंबर गरवारे उद्योगपती. १९२१ - पी.एन. भगवती भारताचे सतरावे सरन्यायाधीश 💥 मृत्यू :- १८२४ - कंपवाताचा मानवी मेंदुशी संबंध आहे हे सिद्ध करणारे जेम्स पार्किन्स १९४५ - जनरल जॉर्ज पॅटन दुसऱया महायुद्धातील यूरोपमधील अमेरिकन सेनापती. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिक बंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सोलापुरातील नऊ उद्योगांना उत्पादन बंदीचे आदेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *गडचिरोली : कडाक्याच्या थंडीने एटापल्ली तालुक्यात दोन दिवसात 44 जनावरांचा मृत्यू.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *कांद्याला 200 रुपये प्रति क्विंटल अनुदान; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *महाराष्ट्रात भाजपा व शिवसेनेची युती,144-144 जागा लढवण्याचा निर्णय- अधिकृत सूत्र* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई : अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे कामदेखील सुरू झालेलं नाही. खर्चात तब्बल 1 हजार कोटींची वाढ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *भारताचे माजी सलामीवीर डब्ल्यू व्ही. रमण यांची महिला संघाच्या प्रशिक्षकपदी करण्यात आली निवड.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आयसीसीची क्रमवारी जाहीर ; विराट कोहलीचं अग्रस्थान कायम* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सन 1998 मध्ये प्रचंड गाजलेली पुस्तिका खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *चंदर - किशोर कादंबरी* खालील ब्लॉगवर भाग सातवा वाचन करता येईल. https://shabdghar.blogspot.com/2018/12/blog-post_20.html वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक *अरुण वि. देशपांडे, परभणी/पुणे* 9850177342 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *के. श्रीकांत* भारतीय क्रिकेट संघातील उत्कृष्ट फलंदाज आणि कर्णधार म्हणून ख्यात असणारे कृष्णमाचारी श्रीकांत यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये तामिळनाडूचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांचा जन्म मद्रास येथे झाला. त्यांच्या मित्रमंडळात ते चिका आणि क्रिश या टोपण नावाने ओळखले जातात. दक्षिण विभागातून त्यांनी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्यांनी पहिला आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामना १९८१ मध्ये अहमदाबाद येथे इंग्लंडच्या विरुद्घ खेळला. त्याच्या दोनच दिवसांनी पहिला कसोटी सामनाही इंग्लंडच्याच विरुद्घ मुंबईत खेळला. त्यावेळी त्यांचे वय अवघे २१ वर्षे होते. सलामीचा फलंदाज म्हणून त्यांनी सुनील गावस्कर यांच्यासोबत खेळण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांचा खेळ अतिशय आक्रमक राहिला. त्यामुळे आगामी काळात ते सलामीच्या फलंदाजांसाठी आदर्श ठरले. काळानुरूप त्यांच्या फलंदाजीमध्ये एक लय आली. १९८३ मध्ये ज्या भारतीय चमूने विश्वचषक जिंकला त्याचा ते महत्त्वाचा घटक होते. त्यात अखेरच्या सामन्यात वेस्ट इंडिजविरोधात सर्वाधिक धावा करणारे श्रीकांतच होते. १९८९ मध्ये त्यांना कर्णधारपदाची धुरा सोपविण्यात आली. क्रिकेटमधून नवृत्तीनंतर त्यांनी टीमचे प्रशिक्षकपद स्वीकारले. एवढेच नाही तर २0१३ मध्ये 'झलक दिखला जा' या नृत्याच्या स्पर्धेवर आधारित शोमध्ये स्पर्धक म्हणून झळकले होते. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मैत्रीच्या रोपट्याला नेहमी प्रेमरूपी पाण्याचे सिंचन आवश्यक असते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) नागरिकांना मतदानाचा नकाराधिकार बहाल करणारा पहिला देश कोणता ?* बेल्जियम *२) तेलंगणा राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण ?* के. चंद्रशेखर राव *३) ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्हय़ात आहे ?* चंद्रपूर *४) महाराष्ट्रातील काळवीटासाठी प्रसिध्द अभयारण्य कोणते ?* रेहेकुरी *५) लिबियाची राजधानी कोणती ?* त्रिपोली *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● मन्मथ खंकरे ● श्रीमती माणिक नागावे ● गजानन गायकवाड ● संभाजी तोटेवाड ● जयश्री सोनटक्के *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपलेपणा* आपलेपणा म्हणजे मैत्रीतला धागा असतो विश्वासाने व्यक्त होण्याची हक्काची जागा असतो जिथे आपलेपणा तिथे पक्का विश्वास असतो लक्षात ठेवा मैत्री म्हणजे जगण्यातला श्वास असतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••8 *परिस्थिती कितीही कठीण असली तरी तोंड लपवून, मस्तक झुकवून जगू नका. दु:खांचे युग आले तरी हसतमुख राहून जगा. प्रसंग कितीही वाईट असला तरी हिंमतीने सामोरं जाता आलं पाहिजे....* *न मुंह छुपाके जियो* *और न सर झुकाके जियो...* *गमोंका दौर भी आये* *तो मुस्कुरा के जियो...* *ढगांनी झाकले गेले तरी तारे नष्ट होत नाहीत. संकटांच्या अंधाररात्री ह्रदयाचे दिप उजळून जगा. जीवनातील कुठला क्षण मृत्यूची ठेव म्हणून आरक्षित झाला आहे हे कोणीही जाणू शकत नाही, म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने जगा. मानवी जीवन अखंड प्रवाही असून ते कोणत्याही टप्प्यावर कायमचे थांबू शकत नाही. म्हणून प्रत्येक मुक्कामानंतर पुढे पुढे जातच जीवन जगलं पाहिजे....!* *ये जिंदगी किसी मंजिल पे* *रूक नही सकती.....* *हर एक मकाम के आगे* *कदम बढा के जियो...*. ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर गाफील क्यों फिरय, क्या सोता घनघोर तेरे सिराने जाम खड़ा, ज्यों अंधियारे चोर । सारांश महात्मा कबीर मृत्यूची आठवण करून देतात. हे मानवा तुला असा दुर्मिळ मनुष्य जन्म मिळालेला असताना तू असा गाफिलासारखा का फिरत आहेस ? कोणत्या घणघोर अंधार्या काळ कोठडीत तू स्वतःला जखडून घेत आहेस ? कुठल्याही संपत्तीच मोल देवूनही हा जन्म परत मिळणारा नाही . तुला मिळालेले ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये तुझ्या मुक्तीसाठीच विधात्याने दिलेली सर्वात महान भेट आहे. इत्तर प्राण्यांपेक्षा तू विधात्याला अधिक प्रिय म्हणून बुद्धी व बोलीचं अधिकचं वरदान तुला दिलं तर तू त्या वैभवाचा वापर करून या सृष्टीचा स्वर्ग करण्यासाठी धडपडायला पाहिजेस ! स्वर्ग निर्माणाचं जाऊ दे , किमाण या सृष्टीला तरी विद्रुप करण्याचं कुकर्म करू नकोस ! हे वैविध्पाने भरलेले जग तुझ्याचसाठी आहे .याच्याकडे डोळे उघडे ठेवून पाहिलेस. त्याच्या रचनेला धक्क् न देता त्याचा मानव कल्याणासाठी वापर करून घेतलंस तर भविष्य सुंदर नाही तर निसर्ग प्रकोप ठरलेलाच. तू कितीही सावध वागण्याचा प्रयत्न करीत असलास तरी हा मृत्यू रूपी चोर तुझ्यावर सारखी पाळत ठेवून आहे. तू भौतिक सुखसोयींचा कितीही इधार घेतलास तरी काचाच्या बंदिस्त महालातूनही तुझ्यातल्या चैतन्यरूपी आत्म्याला तो कोणत्याही क्षणी उचलल्याशिवाय राहाणार नाही. तेव्हा तू ज्या शरीर व रूपाला मोहवून हुरळून जातोस त्यापेक्षा सृष्टीकडं पाहाण्याची दिव्य दृष्टी देणार्या आत्मदृष्टीची जडणघडण चांगली होण्यासाठी मनाचा निकोप विकास होणे गरजेचे आहे. सुंदर मनेच सुंदर सुष्टी देवू शकतात. तेव्हा अज्ञानाचा अंधःकार दूर करून सत्यरूपी ज्ञान जाणून घे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकजण आपल्या जीवनाबद्दल काही ना काही बोलत असतो.जेव्हा तो बोलत असतो तेव्हा त्याच्या जीवनात नव्वद टक्के नकारात्मक भूमिका असते.या जीवनात असे जीवन जगण्यात काय अर्थ आहे ? त्यापेक्षा न दिलेलेच बरे.आता जीवन जगणे असह्य आहे.असा जेव्हा विचार करतात त्यांनी जगण्याला आत्मविश्वास गमावलेला असतो.कोणतीही कृती न करता किंवा हातपाय न हलवता जीवन कसे सुखी बनेल ? हा विचार कधीच ते विसरुन बसले असणार आणि त्यामुळेच त्यांच्या जीवनात सदैव नैराश्याचे डोळ्यांसमोर काळे ढग दिसतात.अशी माणसे स्वत:ही जीवनाचा आनंद घेत नाहीत आणि इतरांच्या जीवनातला आनंदही त्यांना पाहवत नाही.अशा नैराश्ययुक्त व नकारात्मक विचार करणा-या माणसांनी थोडी डोळसपणे दुस-याच्या आनंदाने जीवन जगणाऱ्या माणसाकडे थोडा विचार करून पहायला हवे.त्यांची आत्मविश्वासाने व कृतीयुक्त शैलीने व आपल्यासमोर कितीही आणि कोणताही कठीण प्रसंग असो तो हसत हसत सामोरे जाऊन कसे जीवन जगतात याचे थोडे सूक्ष्म निरीक्षण करायला हवे.तसेच त्यांच्या जगण्याची जीवनशैली कशी आणि आपली जगण्याची जीवनशैली कशी हा प्रश्न स्वत:ला विचारुन पाहिला तर नक्कीच कळेल की,आपल्यामध्येच खरी त्रुटी आहे.आपणही त्यांच्यासारखे जीवन जगायला हवे.इतरांच्या जगण्यापेक्षा आपणही चांगले जीवन आपल्या कर्तृत्वाने, आत्मविश्वासाने जगू शकतो अशी शिकवण मिळाल्याशिवाय राहत नाही.नक्कीच चांगले बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करेल.मग तो नैराश्यमय जीवन जगणारे नाही अशी प्रेरणा घेऊन व कर्तृत्ववान लोकांचे नक्कीच चांगले जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळेल.मग तोच जगाला जीवन कसे जगायचे याचे ज्ञान देण्यासाठी तयार होई.म्हणून इतरांच्या लोकांचे चांगले अनुकरण घ्यायला काय हरकत असा सकारात्मक विचार निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नैराश्य - Depression* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दानाचे मोल*💐 राज्यात ओला दुष्काळ पडला होता. राजा प्रतापरावांनी सार्या शेतकर्यांचा सारा माफ केल्याचे जाहीर केले. अन्नही मोफत दिले जाईल, अशी दवंडी दिली. त्यांना वाटले की, आता सगळे खूश होऊन जातील, आपली स्तुती करतील. ती स्तुती ऐकावी म्हणून धान्य घेण्यासाठी आलेल्या शेतकर्यांच्या रांगेत जाऊन ते उभे राहिले. त्यांच्या पाठीमागे दोन शेतकरी येऊन उभे राहिले. ते शेतकरी आपापसांत कुजबुजत होते. आपले महाराज शूर आहेत. दानशूरसुद्धा आहेत पण त्यांना व्यवहार समजत नाही. दुसरा शेतकरी दबल्या आवाजात म्हणाला, का रे ? फुकटचं धान्य खाऊन वर मस्तीला आलास का ? राजांना नावं ठेवतोस ? पहिला शेतकरी म्हणाला, अगदी बरोबर बोललास. गेले महिनाभर मला काही काम न करता असं फुकटंच खाण्याची सवय लागली आहे. मस्ती आल्याशिवाय कशी राहील ? यापेक्षा महाराजांनी आपल्याकडून श्रमदानाची कामे करुन घ्यायला हवी होती. काम मगच दाम हे धोरण त्यांनी राबवायला हवं होतं. राजा प्रतापरावांनी हा सल्ला मानला. त्यामुळे दानाचा दुरुपयोग टळला. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment