✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 13/12/2018 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- २००१ - पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला. पाचही अतिरेकी व सुरक्षा कर्मचार्यांसह ८ अन्य व्यक्ती ठार. २००२ - ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांना २००१ चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. २००२ - सायप्रस, चेक प्रजासत्ताक, एस्टोनिया, हंगेरी, लात्व्हिया, लिथुएनिया, माल्टा, पोलंड, स्लोव्हेकिया व स्लोव्हेनिया या देशांना युरोपीय संघात मे १, २००५ ला प्रवेश देण्याचा ठराव मंजूर. २००३ - इराकी अध्यक्ष सद्दाम हुसेनला तिक्रीतजवळ पकडले. २००३ - प्रसिद्ध बंगाली लेखिका महाश्वेता देवी यांना ऑफिसर ऑफ आर्टस ऍन्ड लिटरेचर हा फ्रान्सचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी किताब जाहीर 💥 जन्म :- १८९९ - पांडुरंग सातू नाईक, मराठी सिनेमॅटोग्राफर. १९१३ - आर्ची मूर, मुष्टियोद्धा. १९२४ - विद्याधर पुंडलिक, साहित्यिक. १९२८ - सरिता पदकी, बालवाङ्मय लेखिका. १९५५ - मनोहर पर्रीकर, गोव्याचे मुख्यमंत्री 💥 मृत्यू :- १९८६ - स्मिता पाटील, हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेत्री. १९९४ - विश्वनाथ अण्णा ऊर्फ तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक. १९९६ - श्रीधर पुरुषोत्तम ऊर्फ शिरुभाऊ लिमये , भारतीय स्वातंत्र्यसैनिक व क्रांतिकारक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *भोपाळ : काँग्रेस पक्षाच्या पाच सदस्यीय शिष्टमंडळाने राज्यपाल आनंदीबेन पटेलांची भेट घेऊन मध्य प्रदेशात सत्ता स्थापनेचा दावा केला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *इंग्लंडच्या पंतप्रधानपदी थेरेसा मे कायम राहणार; अविश्वास ठरावाविरोधात 63 टक्के मतं* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *हज यात्रेसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ, 19 डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *संग्रामपूर : धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार चालढकल करीत असल्याचा आरोप करत धनगर समाज बांधवांकडून घरावर काळे झेंडे उभारून करण्यात आला निषेध* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 डिसेंबरला महाराष्ट दौऱ्यावर; मेट्रोसह विविध विकासकामांचे करणार भूमीपूजन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ * दिल्ली- कालपासून हिवाळी अधिवेशनाला झाली सुरुवात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *तेलंगणा राष्ट्र समितीचे चंद्रशेखर राव आज घेणार तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, तेलंगणा राष्ट्र समितीनं जिंकल्या 88 जागा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• दैनिक प्रजावाणीच्या ई पेपर मध्ये प्रकाशित लेख " डॉक्टर देव की दानव " https://prajawani.in/news_page.php?nid=212 वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625768 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मनोहर पर्रिकर* गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री असणारे मनोहर पर्रिकर हे भारताचे संरक्षणमंत्री राहिले आहेत. ते उत्तरप्रदेशातून राज्यसभेचे खासदारही राहिलेले आहेत. त्यांनी १९७८ मध्ये आयआयटी मुंबई येथून पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. आयआयटी झालेले ते पहिलेच मुख्यमंत्री म्हणविले जातात. या कामगिरीसाठी त्यांना आयआयटीतर्फेही २00१मध्ये विशिष्ट माजी विद्यार्थी ही उपाधी देऊन सन्मानित करण्यात आले. एवढेच नाही तर गोव्याचे मुख्यमंत्रीपद भूषविणारे ते भाजपाचे पहिले नेतेआहेत. २४ ऑक्टोबर २000 रोजी ते गोव्याचे मुख्यमंत्री बनले पण, त्यांचे सरकार २७ फेब्रुवारी २00२ पर्यंतच चालू शकले. जून २00२ मध्ये ते पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. २0१७ मध्ये ते चौथ्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदावर आसीन झाले. राज्यपाल मृदूला सिन्हा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. गोव्यात भाजपाची सत्ता आणण्याचे संपूर्ण श्रेय पर्रिकर यांनाच जाते. अत्यंत तडफदार अशा या नेत्याला कर्करोगाने ग्रासले असून नुकतेच ते विदेशातून उपचार घेऊन परतले आहेत. याही स्थितीत ते गोव्याचा कारभार पाहतात, हे विशेष *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुमची भीती तुमच्या समोर उभी ठाकेल तिच्यावर आक्रमण करा आणि तिला संपवुन टाका - चाणक्य *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) 'एन बी सी सी'चे विस्तारित रूप काय ?* नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन *२) भारताचे पंतप्रधान म्हणून एच.डी.देवेगौडा यांचा कार्यकाल कोणता ?* १ जून १९९६ ते २१ एप्रिल १९९७ *३) भारतीय रेल्वेच्या उत्तर विभागाचे व्यवस्थापन केंद्र कोठे आहे ?* दिल्ली *४) अमेरिकेमध्ये कोणती शासन पद्धती अस्तित्वात आहे ?* अध्यक्षीय प्रजासत्ताक *५) कुन्नूर हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?* तामिळनाडू *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● राजेश वाघ ● अनिल गायकवाड ● शरद नवले ● रोहन कुरमुडे ● उज्वल मस्के ● राजेश पाटील *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शिक्षण* शिक्षणाने माणसाचे जीवन फुलत असते अंधकारमय मार्ग त्यानेच टळत असते शिक्षण घेऊन जीवन फुलवता आले पाहिजे घेतलेल्या शिक्षणाचे सार्थक झाले पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मानवी जीवन अनमोल आहे. पण ते फुकट मिळालेलं आहे. न मागता आणि फुकट मिळालेल्या गोष्टीची किंमत कुठे असते ! आपण केवळ श्वास घेत राहतो सवयीनं. दिवस येतात, जातात. जीवन मात्र अडगळीत असतं. खरंतर माणूस जगतो कशासाठी? तर जगण्यासाठीच ! जीवन जटील नाहीच. पण व्यवस्थेच्या बाजारात हे जगणंच का हरवून बसतो आपण? का आयुष्यभर इतरांशी तुलना करत... त्याचं वैभव, त्याची प्रतिष्ठा बघत स्वत:ला ठेंगणं करून घेतो. माणूस वयानं जसजसा वाढू लागतो, तसतसा एक मुखवटा चढत राहतो त्याच्या चेह-यावर. साध्यासुध्या आयुष्यात किती भटकतो आपण जगरहाटीच्या वाळवंटात ! एवढं सुंदर जीवन हातात असताना झूटया भविष्याची झूल पांघरून चालतो. ही झूल कधी पद-प्रतिष्ठेची तर कधी धनदौलतीची असते.* *माणूस धावत राहतो अखेरच्या श्वासापर्यंत. सारी शक्ती पणाला लावून आयुष्य गमावत रहायचं. मन कधी तृप्त होत नाही. समृद्धही होत नाही. या धापाधापीत जीवन वजा होतं आणि माणूस खंगतो. जीव गुदमरून टाकणा-या या चढाओढीत सिकंदर होता येईल माणसाला, डोक्यावर सम्राटाचा मुकुट असलेला. पण जगण्याचे सोनेरी क्षण कुठे हातात असतात ! काळ मोठा कठोर असतो. मृत्यूच्या उंबरठ्यावर सम्राटाचा मुकुट उतरवून ठेवावा लागतो आणि सोबत रिकाम्या हातांचे प्रायश्चित्त असते. सारा अहंकार गळून पडतो. या शेवटच्या प्रवासात एकाही पावलापुरता सुखशांतीचा सिकंदर नाही होता येत माणसाला.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• उदर समाता अन्न ले, तन ही समाता चीर अधिक ही संग्रह ना करें, तिस्का नाम फकीर। सारांश संन्याशी कसा असावा ? याबद्दल महात्मा कबीर सांगतात की जो पोट भर अन्न घेतो आणि काया झाकण्यापुरती वस्त्र मिळाली की संतुष्ट व समाधानी धारण करतो. यापेक्षा अधिकचे द्रव्य,कपडेलत्ते जमा करीत नाहीं किवा त्यांचा संग्रह ही करीत नाही तोच खरा फकीर किवा संन्यासी असतो . अध्यात्म सांगण्याच्या नावाखाली लोकांना लुटण्याचे प्रकार केले जातात. पूर्वी सामान्य माणसाला अध्यात्म किवा वेद पुराण कळायचं नाही. ते समजून घेण्यासाठी एखाद्या ज्ञानी पंडिताकडं जावं लगायचं. तो पंडितही भलता भाव खायचा .समोरच्याला माहिती सांगणे किवा मजकूर वाचण्याच्या मोबदल्यात त्या गरजू व्यक्तीकडून अंगमेहनतीची कामे फुकट करून घेणे. द्रव्यादी उकळणे असा प्रकार सर्रास चालायचा. आजही थोतांडी कर्मकांडाची भिती दाखवून लुबाडणूक होताना दिसते. भोळे भाबडे भक्तगण जादू छू मंतर हात चालाखीला भुलून बुवाबाजी व ढोगाला आहारी पडतात. ढोगी नाटकी सन्याशांचे आश्रम जागोजागी थाटले जातात. धर्म व पंथांच्या नावाखाली साध्या भोळ्या भक्तांना लुटून संन्यस्तपणाच्या बुरख्याआडून अधर्म करणार्यांना वेळीच ओळखून दूर राहावं. ऐसे कैसे झाले भोंदू| कर्म करूनी म्हणती साधू॥ अंगी लावुनिया राख| डोळे झाकुनिया करती पाप॥ दाखवुनिया वैराग्याची कळा| भोगी विषयाचा सोहळा॥ तुका म्हणे सांगो किती| जळो तयाची संगती॥ जगद्गुरू तुकोबांचा वरील अभंग ध्यानात घेतला तरी अशा ढोंगी सन्याशांपासून अलिप्त होता येईल. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुमच्या विचारात आणि तुमच्या विरोधकांच्या विचारात खूप फरक आहे.तुमचा विचार हा सर्वसाधारण पणे त्रास होऊ नये,आपल्या बोलण्यामुळे मन दुखवू नये,तो जरी आपल्याकडे काकदृष्टीने पाहत असला तरी आपण त्याच्याकडे चांगल्या दृष्टीनेच पाहणे.आपले एखादेवेळी नुकसान झाले तरी चालेल पण त्याचे नुकसान होऊ नये अशी आपली धारणा असते आणि यामुळेच समोरच्यापेक्षा आपले जीवन सुखावह जगण्याचे मंत्र्यांनी शिकवते.हाच जगण्याचा मंत्र समोरच्या व्यक्तीच्या बाबतीत नसतो आणि त्यामुळे त्यांच्या जगण्याचे चित्रच बदलून जाते.शेवटी त्यांच्या जगण्यात आणि जीवनात तुमच्यासारखा अर्थच नसतो.म्हणून तुमची जगण्याची जीवनशैली ही खरोखरच सर्वसमावेशक आणि आदर्श आहे हे विसरु नका.आज नाही उद्या तरी तुमच्या जीवनशैलीचा नक्कीच स्वीकार करतील. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 मुल घडवताना.......... 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येक गोष्ट वेळेवर करण्यास शिकवणे मोठ्यांच्या कृतींतूनच लहान मुले शिकतात; म्हणून मोठ्यांनीच आपले वागणे, बोलणे, इतरांना मान देणे, हे सर्व केले पाहिजे. तसेच प्रत्येक गोष्ट वेळेवर करावी. ‘मग करू’ म्हटले की, पुन्हा ती गोष्ट केली जात नाही. त्यासाठी शरीराला म्हणण्यापेक्षा मनालाच शिस्त लावायला पाहिजे. पुष्कळांच्या घरी कपाटात, रॅकमध्ये कपडे कोंबलेले किंवा अस्ताव्यस्त लटकलेले असतात. तसेच घरही अव्यवस्थित असते. मग घरात कोणी अचानक आले, तर धांदल उडते. एकदा हाताला वळण लावले की, मनाला ते नीट केल्याशिवाय स्वस्थता लाभत नाही. घर स्वच्छ व नीटनेटके ठेवण्यामध्ये आळस नको. आळस हा आपला पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे, हे मुलांच्या मनावर बिंबवावे गुंडेवार मा स जि.प.प्रा.शा गोंडेमहागाव ता. किनवट. जि नांदेड़ संपर्क _9623124594 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपल्या माणसाकडून मिळालेले दुःख* एक सोनार होता. त्याच्या दुकानासमोरच एका लोहाराचे दुकान होते. सोनार जेव्हा काम करत असे तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज होत असे पण जेंव्हा लोहार काम करत असे तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने मोठा आवाज होत असे. तो आवाज मोठा कर्णकर्कश असे. एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण कसा कोण जाणे पण लोहाराच्या दुकानात जावून पडला. त्या सोन्याच्या कणाची भेट एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप दिवसांची ओळख असल्यासारखे ते एकमेकांशी बोलू लागले. सोन्याच्या कणाने लोखंडाच्या कणाला म्हंटले,"दादा, आपले दुःख तर खरे एकसमान आहे. दोघानाही आगीत तापवले जाते आणि हातोड्याने ठोकले जाते. मी तर बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे काय?" लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून दुःखी स्वरात म्हणाला,"अरे ! तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. दोघानाही तापवणारी आग एकच आहे आणि ठोकणारा हातोडाहि एकाच धातूचा आहे. पण खरे दुःख याचे आहे कि तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच लागत नाही पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने माझा भाऊच लागतो. दुसऱ्याने दिलेल्या दुःखापेक्षा स्वकीयांनी दिलेला त्रास हा अगदी हृदयात वार करून जातो." *तात्पर्य- आपल्या माणसांकडून होणारा त्रास हा कायमच दुःखदायक वाटतो.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment