*वाट ही वेडी जराशी*
वाट ही वेडी जराशी
तुझ्या प्रेमळ स्वप्नाची
नित्य मज आठवण
मनात येई उराशी
तुझ्या गोड शब्दांनी
भाव सजले माझा मनी
तुझ्यासारखे नाही कोणी
मज न दिसे जगी जीवनी
असे रुप तुझे गंधाळलेले
श्वासात माझा वसलेले
ध्यासात तू , श्वासात तू
वाट वेडीस लाविलीस तू
तुझ्या शब्द अमृताची
गोडी मज कैसी लागीली
अन् तुला न बोलताही
वाट ही वेडीची जराशी न गेली
ध्यास तुझ्या प्रेमाचा
भक्ती आणि प्रितीचा
मोहन माझा मनातला
जडलाय जीव जीवातला........
〰〰〰〰〰〰〰
दिनांकः३०-१२-२०१८
〰〰〰〰〰〰
*✍प्रमिला सेनकुडे*
*नांदेड (ता.हदगाव)*
No comments:
Post a Comment