✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 27/12/2018 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *डॉ. पंजाबराव देशमुख जयंती* 💥 ठळक घडामोडी : १७०३ - पोर्तुगाल व इंग्लंडने मेथुएनच्या तहावर सही केली. १८३१ - चार्ल्स डार्विन एच.एम.एस. बीगल या जहाजातून गॅलापागोसला जाण्यास निघाला. १९४५ - २८ देशांनी जागतिक बँकेची स्थापना केली. १९४५ - कोरियाची फाळणी. १९४९ - इंडोनेशियाला नेदरलँड्सपासून स्वातंत्र्य. 💥 जन्म :- १७९८ - पंजाबराव देशमुख, विदर्भातील सामाजिक नेता, शिक्षण प्रसारक, केंद्रीय कृषिमंत्री. १९६५ - सलमान खान, भारतीय चित्रपट अभिनेता. 💥 मृत्यू :- १९६५ - देवदत्त नारायण टिळक, मराठी साहित्यिक, संपादक, ज्ञानोदय. १९९७ - मालती पांडे-बर्वे, मराठी भावगीत गायिका. २००२ - प्रतिमा बरुआ-पांडे, असमी लोकगीत गायिका. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *दिल्ली : आंध्र प्रदेशमधील नव्या उच्च न्यायालयाला राष्ट्रपतींकडून मंजुरी.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नाशिक : आमदार बच्चू कडू यांचे प्रांत कार्यालयातील आंदोलन मागे, 14 पैकी 10 मागण्या मान्य, उर्वरित 4 मागण्यांवर 4 जानेवारीला बैठक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नंदुरबार : सारंगखेडा येथील पर्यटन महामंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चेतक फेस्टिव्हलचे या दोन वर्षांत आमच्या सरकारने आंतरराष्ट्रीय दर्जाचे ब्रँडिंग केले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *दिल्ली : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची घेतली भेट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *राजस्थानः लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजस्थानचे प्रभारी म्हणून प्रकाश जावडेकर यांची नियुक्ती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *बहुचर्चित 'ठाकरे' सिनेमा सापडला वादाच्या कचाट्यात, या सिनेमातील दोन संवाद आणि तीन दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने घेतला आक्षेप* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दोन बाद 215 धावांपर्यंत मारली मजल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://sharechat.com/post/k6K1bvq Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नामकरण ते अंत्यविधीचा प्रवास* https://prajawani.in/news_page.php?nid=511 दैनिक प्रजावणीमध्ये प्रकाशित लेख. वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक *✍🏻 नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पंजाबराव देशमुख* पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावी झाला. उच्च शिक्षण घेऊन स्वातंत्र्याच्या लढ्यात ते सहभागी झाले. १९३६ च्या निवडणुकीच्या नंतर शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले.त्यांनी उच्च शिक्षण हे एडिनबर्ग व आक्सफर्ड विद्यापीठ येथून पूर्ण केले. तसेच त्यांनी डॉक्टरेट ब्रिटेन येथून केले. त्यांनी अमरावती येथे परत येवून कायदा शिक्षणाची तयारी सुरु केली. १९३0 मध्ये ते प्रांतीय लॉ बोर्डाचे सदस्य म्हणून निवड होऊन ते शिक्षण मंत्री, कृषी व सहकारी विभागाचे मंत्री बनले होते. त स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या विकास समितीचे सदस्यि झाले. १९५२, १९५७ आणि १९६२ रोजी त्यांची खासदार म्हनणून नियुक्तीच झाली. तसेच ते १९५२ ते १९६२ पयर्ंत कृषिमंत्री होते. त्यांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी र्शद्धानंद वसतिगृह सुरू केले. त्यांनी प्रसिद्ध श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज या संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय व इतर शैक्षणिक संस्था आणि वसतिगृहे यांचा समावेश आहे. शेतकरी स्थिती सुधारणा करण्यासाठी त्यांनी भारत कृषक समाज स्थापन केले आणि त्यांनी अधिवक्ता धोरण कायम ठेवण्यातसाठी एक वृत्तपत्र म्हणजे महाराष्ट्र केसरी सुरू केली. स्वतंत्र भारतात कृषिमंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था काढली. या संस्थेच्या पश्चिम विदर्भात म्हणजे अमरावती विभागात अंदाजे १,000 च्या वर शाळा आहेत. महाविद्यालये, अभियांत्रिकी पदवी , तसेच पदविका तंत्रनिकेतन , कृषी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय असे अनेक महाविद्यालये सुरू करून आज शिक्षण क्षेत्रात फार मोठे योगदान देत आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा अधिकाधिक घट्ट होतो, तेव्हा तोच विश्वास आपल्या आयुष्यातही परावर्तित होतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) आशिया खंडातील सर्वात मोठा खत कारखाना कोठे आहे ?* सिंद्री (झारखंड) *२) आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे आहे ?* वॉशिंग्टन *३) कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते ?* जिराफ *४) भारतातील सर्वात लांब धरण कोणते ?* हिराकुंड *५) केळीचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते ?* तामिळनाडू *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● पूजा शिंपी बागुल ● विठ्ठलभाई श्रीगांधी ● शिवाजी अंबुलगेकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वेळ* आयुष्यात जेव्हा आपल्या कठीण वेळ येत असते आपल्या क्षमतेची तेव्हा खरी ओळख होत असते कठीण काळ माणसाला खुप काही शिकवत असतो जीवन जगण्यासाठी तोच आपल्याला टिकवत असतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माणसाने माणसांशी, सर्व प्राणीमात्रांशी आणि निसर्गाशी माणसासारखं वागावं ही आपल्या धर्माची शिकवण आहे. सृष्टीतलं चैतन्य म्हणजे ईश्वर ! सर्वसामान्य माणसाला देवाची उपासना करणं सोपं जाईल म्हणून सगुण साकार म्हणजेच मूर्तीची पूजा सुरू झाली. मंदिरातल्या मुर्तीचं पावित्र्य जपायचं असेल तर स्त्री-पुरूष कोणालाच गाभा-यात प्रवेश द्यायचा नाही, मुर्तीला स्पर्श करू द्यायचा नाही हे समजण्या सारखे आहे. मंदिरातल्या वातावरणाचं पावित्र्य राखलं जावं, कुठले कपडे घालून देवदर्शनाला मंदिरात जावं हे भान प्रत्येकाला असणं आवश्यक आहे. कालबाह्य रूढी-परंपरा सोडून दिल्या तरच पुढच्या पिढीला हा धर्म, ही संस्कृती आपली वाटेल.* *माणिक वर्मा यांनी गायलेलं, ' क्षणभर उघड नयन देवा !' हे गीत आठवतं. या रचनेत कवी देवाला डोळे उघडायला सांगत नाही, तर देवदर्शनासाठी आलेल्या एका अंध व्यक्तिसाठी ही प्रार्थना करीत आहे. त्या अंध व्यक्तिचे क्षणभर तरी डोळे उघडून त्याला तुझं दर्शन दे, अशी प्रार्थना कविराज करत आहे. स्त्रियांवर होणारे आत्याचार, अन्याय थांबव.. ते करणारांचे डोळे क्षणभर तरी उघड, अशी प्रार्थना नवरात्राच्या निमित्ताने दुर्गादेवीपाशी करावीशी वाटते.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• भारी कहौ तो बहु दरौ, हलका कहु टू झूत | माई का जानू राम कू, नैनू कभू ना दीथ || अर्थ महात्मा कबीर निर्गुणाचे उपासक होते. कोणतेही तत्त्व भारी (जड) आहे असे म्हटले तर त्याबद्दल भिती निर्माण होते . जर ते हलके (सहज ) आहे म्हणावे तर ते बावळट पणाचे ठरेल. ज्या तत्त्वाची आपण अनुभूतीच घेतली नाही . केवळ ऐकून त्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करणे हे अततायीपणाचे ठरेल ! राम म्हणजे कर्तव्य निष्ठा व कर्तव्य पालन. राम म्हणजे मर्यादा पुरूषोत्तम . राम तत्त्व विचार आधी आमच्या वर्तनात उतरला पाहिजे. दृढनिश्चयी वृत्तीचा अंगीकार केला पाहिजे. न्यायवृत्ती , लोकादर भावना व बंधुत्व आमच्या ठायी रूजले तरच रामाबद्दल बोलण्याचा अधिकार प्राप्त होतो. केवळ रामाचे नाव घेतले आणि वर्तनात राम उतरवलाच नाही. तर आम्ही राम अनुसरतो म्हणणे योग्य ठरेल का ? राम ही समृद्ध जगण्याची संकल्पना आहे. राम सोशिकतेचा महान विचार आहे. राम विवेक आणि विचाराचा जागर आहे. राम जीवनाचा महन्मंगल आधार आहे. जगताना सर्वव्यापकता नसेल तर जगण्यात राम राहात नाही. संकुचित व स्वार्थीपणे जगण्याने जीवनात राम येत नाही. माणसाने आपापल्या क्षेत्रात कार्य करीत असताना ते ओझे म्हणून रडत अडखळत काम करण्याऐवजी समर्पण भावानं ते हसत हसत पूर्ण केलं तर कार्याला आणि त्या क्षेत्राला एक वेगळीच खुमारी चढते. अन जीवनात राम भरायचा म्हणजे तरी दुसरं काय असतं बरं.... ! एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकाला आपल्या जीवनात आनंद मिळवायचा असेल तर प्रथम एकाकी जीवन व एकांतात राहणे सोडून द्यावे.कारण एकाकी जीवनात नको ते विचार मनात येतात आणि त्रस्त करतात.त्याचा परिणाम स्वत:च्या जीवन जगण्याच्या जीवनशैलीवर होतो आणि त्यामुळे सुखासमाधानाने असलेले जीवन दु:खात जगत असल्याचे वाटते.त्यापेक्षा इतरांच्या सानिध्यात राहून त्यांच्या आनंदी जीवनात आपणही राहावे.असे केल्याने आपल्या मनात आणि मनावर असलेले दडपण थोड्याप्रमाणात कमी होण्यास मदत होते.इतर लोक कसे जगतात याचेही अवलोकन करता येते.आपण दु:खी कशामुळे आहोत याचेही कारण शोधता येईल आणि शेवटी जीवन आनंदी जीवन कसे जगता येईल याचेही आपल्याला कौशल्य प्राप्त करता येईल.खरे जीवन जगण्याचा मंत्र आपल्या एकटेपणात मिळणार नाही तर इतरांच्या सानिध्यात राहिल्याने मिळतो हे आपल्याला नक्कीच मिळेल. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *निर्णय - Decision* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *💥 खरे अपयश :-* एकदा एक रीपोर्टर एका मोठ्या यशस्वी उद्योजकाची मुलाखत घेत होता. त्याने विचारले, "सर, तुमच्या यशाचे रहस्य काय आहे?" यावर तो साठीकडे झुकलेला उद्योजक बोलला, "माझ्या यशाचं रहस्य मी वेळोवेळी घेतलेल्या योग्य निर्णयांत आहे" रीपोर्टर ने ते उत्तर लिहून घेतले आणि आणखीन एक प्रश्न विचारला, "मग मला सांगा सर, योग्य निर्णय घ्यायला तुम्ही कसे शिकलात?" यावर एका क्षणाचाही विलंब न करता त्या व्यावसायिकाने उत्तर दिले, * "अनुभव ( Experience )* . मला आयुष्यात अनुभवाने बरंच काही शिकवलं !" हे ही उत्तर रीपोर्टर ने लिहून घेतलं आणि लगेचच उस्फुर्तपणे पुढचा विचारला, " तुम्ही हे सर्व अनुभव कसे मिळवले ?" यावर उद्योजक मिष्कील हसला, आणि थोडा पुढे झुकत रीपोर्टरच्या कानाजवळ जाऊन म्हणाला, "माझ्या आयुष्यात मी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे !!" *🔸 तात्पर्य - * *आयुष्यात काही निर्णय चुकतात, काही बरोबर ठरतात. कधी यश येतं तर कधी अपयश, पण जर अपयशातून आपण काहीच शिकलो नाही तर ते खरं अपयश असतं !* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment