✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 28/12/2018 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हुतात्मा शिरीषकुमार जयंती* 💥 ठळक घडामोडी : १६१२ - गॅलेलियोने नेपच्यून ग्रहाची नोंद केली परंतु त्याचे वर्गीकरण स्थिर तारा असे केले. १८३६ - स्पेनने मेक्सिकोचे स्वातंत्र्य मान्य केले. १८४६ - आयोवा अमेरिकेचे २९वे राज्य झाले. १८७९ - डंडी, स्कॉटलंड येथे टे रेल्वे पूलावरून गाडी जात असताना गाडीसह कोसळला. ७५ ठार. 💥 जन्म :- १९२६- शिरीषकुमार यांचा जन्म. १९३२ - धीरूभाई अंबाणी, भारतीय उद्योगपती. १९३७ - रतन टाटा, भारतीय उद्योगपती. १९४०- ए के अँटनी माजी मंत्री १९५२- अरुण जेटली केंद्रीय मंत्री . 💥 मृत्यू :- १९६७ - द.गो.कर्वे, अर्थशास्त्रज्ञ; कुलगुरू, पुणे विद्यापीठ; प्राचार्य, बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय. १९७१ - नानकसिंग, पंजाबी साहित्यिक. १९७७ - सुमित्रानंदन पंत, हिंदी कवी. २००० - मेघश्याम पुंडलिक रेगे, भारतीय विचारवंत. २००० - उस्ताद नसीर अमीनुद्दीन डागर, ध्रुपदगायक, डागरबंधूंपैकी एक. २००३ - चिंतामणी गणेश काशीकर, कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ. २००३ - कृष्णाजी सुंदरराव तथा कुशाभाउ ठाकरे. २००६ - प्रभाकर पंडित, मराठी संगीतकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर, राज्यसभेतही मंजूर होईल- गृहमंत्री राजनाथ सिंह* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई- ९९वे नाट्यसंमेलन होणार नागपूरमध्ये, २२ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०१९ ला होणार नाट्यसंमेलन, ९९ व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली; ११ वर्षात तुकाराम मुंढे यांची १४वी बदली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *राज्यातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू, 25 लाख कर्मचाऱ्याना मिळणार याचा फायदा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *उत्तर प्रदेशातील महाकुंभमेळ्यासाठी दीड वर्षात उड्डाणपुलांसह ६७१ विकास प्रकल्प'* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *गाझीपूर येथे कचरा आणि टाकाऊ प्लास्टिकपासून वीज निर्मितीचा प्रयोग येथे राबवला जात आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मेलबर्न - बॉक्सिंग डे कसोटीमध्ये भारताने आपला पहिला डाव 7 बाद 443 धावांवर डाव घोषित केला असून,भारताचा भेदक मारा, ऑस्ट्रेलियाचे तीन फलंदाज माघारी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://sharechat.com/post/MXaGlNn Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सन 1998 मध्ये प्रचंड गाजलेली पुस्तिका खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *चंदर - किशोर कादंबरी* खालील ब्लॉगवर *भाग आठवा* वाचन करता येईल. https://shabdghar.blogspot.com/2018/12/blog-post_25.html वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक *अरुण वि. देशपांडे, परभणी/पुणे* 9850177342 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हिवाळ्यातील आहार* हिवाळ्यात पचनशक्ती उत्तम राहते. त्यामुळे या दिवसात काहीही खाल्लं तरी पचतं, असं म्हटलं जातं. मात्र, या दिवसातही आहाराकडे विशेष लक्ष दिलं जायला हवं. त्या बाबतचा हा कानमंत्र.. ४ थंडीत मिळणार्या गाजर, नवलकोल आदी भाज्या पौष्टिक असतात. थंडीपासून शरीराचं रक्षण करणार्या असतात. थंडीतल्या सर्दी, खोकला, फ्लू आदी आजारांना दूर ठेवण्यासाठी त्यांच्या सेवनाचा लाभ होतो. ४ थंडीत ग्रीन टीचं सेवनही उपयुक्त ठरतं. ग्रीन टी मध्ये भरपूर अँटी ऑक्सिडंट्स असतात. यामुळे घातक बॅक्टेरियांचा प्रभाव कमी होतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास अँटीऑक्सिडंट मदत करतात. ४ हिवाळ्यात लसूण खाणं चांगलं. लसणामुळे शरीराला उर्जा मिळते. ४ गरम दुधात मध घालून प्यायल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. थंडीत दुधात साखरेऐवजी मध घालावं. ४ हिरव्या भाज्यांमधली अ आणि क ही जीवनसत्त्वं थंडीत आरोग्यासाठी लाभदायी ठरतात. ४ संत्री, दाक्ष आदी फळातील क जीवनसत्त्वामुळे त्वचेचं पोषण होतं. कोलेस्टरॉॅल कमी करण्यासोबत ही फळं चयापचय क्रिया वाढवतात. ४ या दिवसात प्रथिनयुक्त आहार घ्यावा. कबरेदकांचं प्रमाण जास्त असणारे ब्रेड, पांढरा भात असे पदार्थ टाळावे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• राष्ट्र जगायचे असेल तर व्यक्तीने मरण पत्करले पाहिजे, आत्म्याचेही तंत्र याप्रमाणेच असते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) इंडियन अँग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्युट कोठे आहे ?* पुसा (नवी दिल्ली) *२) सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री कोण ?* आदिल अल जुबेर *३) 'द इंडियन स्ट्रगल' हे पुस्तक कोणी लिहिले ?* नेताजी सुभाषचंद्र बोस *४) संगमरवर खडक कोणत्या राज्यात आढळतो ?* राजस्थान *५) जागतिक दूध दिन कधी साजरा केला जातो ?* १ जून *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● साई पाटील जुन्नीकर ● व्यंकटेश माडेवार ● वृषाली वानखडे ● अजय तुमे ● योगेश शंकर ईबीतवार ● नंदकिशोर सोवनी ● ओमसाई गंगाधर सीतावार ● सचिन आठवले ● रुकमाजी कट्टावाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *विचार* आवड अन् उत्साहाने काम उत्कृष्ट बनते उगीच विचार कशाला की जग काय म्हणते जगाचा विचार केल्यास कोणी काही करू शकत नाही जगाचा विचार करणारा कधी महान ठरू शकत नाही शरद ठाकर सेलू जि.परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *'सहजस्थिती किंवा नीजस्थिती' कशी असते यासाठी एक साधे मोटारचे उदाहरण घेऊन स्पष्ट करू. मोटार चालकापाशी क्लच, ब्रेक, आणि अॅक्सिलेटर या तीन गोष्टी महत्वाची भूमिका बजावत असतात. चालकाचे काम संतुलित, संयमित मोटर चालविणे हे असते. त्याच्या पायाखालच्या अॅक्सिलेटरमुळे गाडीचा वेग वाढतो. आपल्या आयुष्यात सुखकारक, आनंददायक घटना घडल्या की आपल्या चित्तवृत्ती उचंबळून येतात. मन था-यावर रहात नाही... आणि प्रतिकूल, क्लेशकारक, घटना घडली की तेच मन काळवंडते, कोमेजते, मलूल, उदास आणि खिन्न होते. गाडीसमोर कोणी अनपेक्षित आले की आपण कचकन् ब्रेक दाबतो. तेव्हा होते तशी ही अवस्था असते.* *पण गाडी तर चालू राहिली पाहिजे आणि इंजिनशी तिचा असलेला थेट संबंध काही इच्छित काळापुरता तुटला पाहिजे, तेव्हा आपण क्लच दाबतो. ही जी अवस्था ती स्थिर, शांत, आणि समधात अवस्था. म्हणजे आपण जिवंत आहोत आणि आपले मन स्वच्छ, नितळ, पारदर्शी, भाव-विकाररहित झाले आहे. लिंग-देह-सुख-दु:ख यांच्या पलिकडील ही अवस्था. यावेळी आपल्याला येणारी आनंदाची अनुभूती केवळ शब्दातीत - ती चिदानंद स्वरूपाची. हे क्षण प्राप्त व्हावे, असे वाटत असल्यास सर्व संतानी सांगितलेला उपाय म्हणजे नामस्मरण...* *'नामापरते सुख नाही रे सर्वथा !'* *--हाच तो सदगुरूपदेश...* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जाति न पुछो साधु की पुछ लिजिए ग्यान । मोल करो तलवार का पडा रहने दो म्यान । अर्थ महात्मा कबीर ज्ञानविषयक विवेचनात सांगतात की, विद्वान जाती धर्म किवा कुळावरून ठरवू नये किवा त्याची जात, धर्म, कुळ विचारू नये. असे सांगतात. तलवारीचं श्रेष्ठत्त्व तिच्या धारेवरून ठरत असतं. तलवार ठेवण्यासाठी कोणतं म्यान वापरलं जातं. ते फार किमती आहे का? हे फार महत्वाचं नसतं. तलवारीला चमकण्यासाठी म्यानाबाहेरंच काढावं लागतं. म्यान रिकामंच पडून राहातं. लोकबोलीत एक म्हण आहे. नदीचं मुळ आन ऋषीचं कुळ विचारू नये. किती विचारपूर्वक ही म्हण जपलीय बरं आपल्या पुर्वजांनी ! रामायणाचा रचिता पूर्वायुष्यात वाटमारी करणारा लुटारू म्हणून हिणवल्या जायचा. एकादा प्रसंग जीवनात घडून जातो अन सुरू होतं जीवनाचं आरपार चिंतन. पार धुवून जातो लुटारूपणाचा कलंक. प्रकटतो जीवन अन नात्यांच्या आदर्शत्वाची अनुभूती देत तत्वचिंतक वाल्मिकी . वेळेचा सदुपयोग करीत स्वतःला सदैव वाचन चिंतनात गुंतवून वर्षानुवर्ष गुलामीत खितपत पडलेल्या माणसांना स्वाभिमानाची जाणीव करून देणारा मानव मुक्तीचा एल्गार ही एक क्रांतीच आहे. जीवनोद्धाराचा शिक्षण हाच महामार्ग सांगणारे प्रज्ञासूर्य डाॅ.भीमराव आंबेडकर जगाच्या औत्सुक्याचा विषय ठरणे ही जाती ,धर्म किवा कुळाची किमया नव्हती. ती विद्वतेची किमया होती. तलवारीला पाहाताना म्यानाला काढून टाकावंच लागतं तसं विद्वानाची उंची त्याच्या विद्वत्तेवरून पहावी लागते, जातीवरून नव्हे ! एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण सर्वसाधारणपणे ज्यांच्याजवळ धनसंपत्ती,पैसा अडका,गर्विष्ठपणा आहे अशा माणसांना श्रीमंत असे म्हणतो.तर ज्यांच्याजवळ ह्या गोष्टी नाहीत अशी माणसे गरीब आहेत असे म्हणतो.परंतु श्रीमंत माणसाजवळ सगळ्या गोष्टी उपलब्ध असूनही त्यांच्याजवळ माणुसकीचा थोडाही लवलेश नसेल तर तो श्रीमंत कसला ? त्याला श्रीमंत म्हणण्यापेक्षा तो रंकही म्हणण्याच्या लायकीचा नाही. उलट जो माणूस परिश्रम करतो,आहे त्या परिस्थितीत समाधान मानतो, इतरांबद्दल आपुलकीने,प्रेमाने वागतो, कठीण प्रसंगी इतरांच्या वेळेला धाऊन जातो, इतरांसाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे अशी भावना मनात बाळगतो,ज्याचे मन शुद्ध आणि पवित्र आहे,मनामध्ये कोणतीही स्वार्थी भावना नाही,कोणत्याही गोष्टीचा गर्व नाही अशी माणसे श्रीमंतापेक्षाही अधिक श्रीमंत असतात हे लक्षात असू द्यावे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लायक - Worth it* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *इतरांचीही दुःख पाहणे* एकदा एका झाडाखाली सशांनी आपली एक तातडीची सभा बोलावली. सर्वच ससे दु:खी आणि घाबरलेले होते. एक ससा उभा राहून म्हणाला, ''मित्रहो, आपलं जीवन फारच दु:खी आहे आणि या दु:खातून आपली सुटका होणे कधीही शक्य नाही. आपल्याला मनुष्य, कुत्रा, गरूड आणि इतरही अनेक लहान मोठ्या प्राण्यांपासून धोका आहे. तेव्हा आपण सर्वचजण एखाद्या तलावात जाऊन जीवन देऊया. जिवंतपणी या अनंत यातना भोगण्यापेक्षा मरण परवडले. शिवाय आपण एकत्र मरू. म्हणजे दुसर्याच्या मरणाचे दु:खही करायला नको.'' त्या सशाचे बोलणे सर्व सशांना पटले. त्या सर्वांनी एकाच वेळी प्राणत्याग करण्याचे ठरवले. प्राणत्याग करण्याचा दिवसही ठरविला गेला. ठरलेल्या दिवशी सर्व ससे आपल्या कुटंबातील लहानथोरांसह एकत्र जमले. थोड्याच वेळात सशांचा एक मोठा समूह तळ्याकाठी आला. त्या तळ्याकाठच्या चिखलात बरेच लहानमोठे बेडूक खेळत होते. सशांना पाहून ते घाबरले आणि त्यांनी भराभर तळ्यात उड्या टाकल्या. ते पाहून एक हुशार ससा म्हणाला, ''मित्रांनो, थांबा. घाई करू नका. आता तुम्ही पाहिलंत ना. आपल्याला घाबरणारे प्राणीही या जगात आहेत. त्यांचं दु:ख आपल्यापेक्षाही मोठं आहे. तरीही ते हिंमत बाळगून जगताहेत ना मग आपण कशाला दु:खी आणि निराश व्हायचं! या प्राण्यांपेक्षा आपण सुखी आहोत. तेव्हा आपल्यापेक्षा सुखी प्राण्यांकडे न पहाता दु:खी प्राण्यांकडे पाहून आपण जगायला हवे. म्हणजे आपले दु:ख आपल्याला जाणवणार नाही. तेव्हा चला आता आपआपल्या घरी आणि आनंदाने जगा.'' त्या सशाचे बोलणे सर्वांनाच पटले. आनंदाने उड्या मारीत ते आपापल्या घरी परतले. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment