✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 26/12/2018 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- २००४ - हिंदी महासागरात इंडोनेशियाजवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ९.३ तीव्रतेचा भूकंप. यानंतर आलेल्या त्सुनामीत भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, मालदीव, इ. देशात ३,००,०००हून अधिक मृत्युमुखी. 💥 जन्म :- १९१४ - बाबा आमटे कुष्ठरोग्यांसाठी कार्यरत समाजसेवक. १९१७ - प्रभाकर माचवे मराठी व हिंदी साहित्यिक. १९३५ - डॉ. मेबल आरोळे मॅगसेसे पारितोषिक विजेत्या.(रजनीकांत आरोळे यांच्या पत्नी). 💥 मृत्यू :- १९७२ - हॅरी ट्रुमन, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष. १९९९ - शंकर दयाळ शर्मा, भारताचे राष्ट्रपती. २०११ - सरेकोप्पा बंगारप्पा, कन्नड-भारतीय राजकारणी, कर्नाटकाचे मुख्यमंत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, राज्यपाल आनंदी बेन पटेल यांनी नवीन 28 मंत्र्याना दिली पद आणि गोपनीयतेची शपथ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *इंडोनेशिया : त्सुनामीमुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 373 वर पोहोचला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *अंदमान-निकोबार समूहातील बेटाला देण्यात येणार सुभाषचंद्र बोस यांचं नाव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *आंध्रप्रदेश : भाजपा आमदार पी. एम. राव यांचा राजीनामा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *पालघर नगरपरिषदेतील राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ. श्वेता मकरंद पाटील-पिंपळे यांचा नगरसेवक पदाचा राजीनामा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पद्मश्री पुरस्कार विजेत्या सुलागिट्टी नरसम्मा यांचं वयाच्या 98 व्या वर्षी निधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *बॉक्सिंग डे' कसोटीसाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी आपले संघ केले जाहीर, यजमान ऑस्ट्रेलियाने संघात एकच बदल केला, तर भारताने आपल्या संघात केले दोन बदल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://sharechat.com/post/xpz1vPX Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सन 1998 मध्ये प्रचंड गाजलेली पुस्तिका खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *चंदर - किशोर कादंबरी* खालील ब्लॉगवर *भाग सातवा* वाचन करता येईल. https://shabdghar.blogspot.com/2018/12/blog-post_20.html वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक *अरुण वि. देशपांडे, परभणी/पुणे* 9850177342 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बाबा आमटे* थोर समाजसेवक मुरलीधर देवीदास आमटे ऊर्फ बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या सुश्रुषेसाठी त्यांनी चंद्रपूर, महाराष्ट्र येथे आनंदवन नावाचा आश्रम सुरू केला. याशिवाय वन्य जीवन संरक्षण, नर्मदा बचाओ आंदोलन अशा इतर सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. बाबा आमटे यांना हे आधुनिक भारताचे संत या नावाने गौरवले जाते. गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमात राहत असताना गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन बाबांनी स्वातंत्रप्राप्तीच्या चळवळीत स्वत:ला झोकून दिले. १९४३ मध्ये वंदेमातरमची घोषणा दिल्याबद्दल त्यांना २१ दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यासह त्यांनी इतरही राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्नांवर विविध मार्गांनी आंदोलने केली व आपली प्रतिक्रिया नोंदवली. पंजाब दहशतवादाने वेढलेला असताना तेथील नागरिकांना इतर राज्यांतील भारतीय त्यांच्याबरोबर असल्याचा आत्मविश्वास देण्यासाठी बाबांनी पंजाबला भेट देण्याचे धाडस केले होते. त्यावेळी त्यांनी अनेक नेत्यांशी व प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधला होता. राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी बाबांनी १९८५ मध्ये भारत जोडो अभियान योजले होते. यानिमित्त त्यांनी भारत भ्रमण करून जनतेपर्यंत एकात्मतेचे तत्त्व पोहोचवण्याचा प्रयत्न केला. नर्मदा बचाव आंदोलनात तब्बल एक तप (१२ वर्षे) नर्मदाकाठी मुक्काम करून त्यांनी आंदोलनाला पाठबळ दिले होते. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• “खोटारडा जेव्हा खर बोलतो, तेव्हा कुणीही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही.” *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला भारतीय बॉक्सर कोण ?* शिवा थापा *२) कोपनहेगन देशाची राजधानी कोणती ?* डेन्मार्क *३) भारतात दूरदर्शनचे प्रथम प्रसारण कधी झाले ?* १५ डिसेंबर १९५९ *४) ब्रिटिश पार्लमेंटचे पहिले भारतीय सदस्य कोण ?* दादाभाई नौरोजी *५) अभिनव भारत संघटनेचे संस्थापक कोण ?* स्वातंत्र्यवीर सावरकर *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● आकाश सरकलवाड ● नरसिंग जिड्डेवार ● शेख शादूल ● कपिल जोंधळे ● अशोक लांघे ● नागराज डोमशेर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सुंदर मन* सुंदर विचार येतात जिथे सुंदर मन आहे सुंदर विचाराला थोडच महत्त्वाच धन आहे सुंदर मन असले की सुंदरच विचार येतात मनाच्या सौंदर्यानेच सारे विकार जातात शरद ठाकर सेलू जि.परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दारुच्या व्यसनात गुरफटलेल्या माणसाला दारूच आवडते. त्याच्या समोर अनमोल असा अमृताचा कुंभ ठेवला तरी त्याला त्याची काहीच किंमत वाटणार नाही. कारण तो व्यसनाधीनतेमुळे सदैव विषाचाच शोध घेत फिरत असतो. मुर्ख माणसाला समजावायला साक्षात ईश्वर जरी आला तरी मुर्खाच्या मुर्खपणासमोर बिचार्या ईश्वराचं काय खरं ठरणार नाही. व्यसनाधीनतेत बुडालेला माणूस बुद्धी प्रामाण्य वागत नाही. तो त्याने जी नशा केलेली असते. त्या नशेच्या पूर्णपणे अमलाखाली जावून त्या क्षणी सुचेल त्याप्रमाणे इष्ट-अनिष्ट वर्तन करून बाजुला होत असतो.* *गांजाडू झोपडीत गप्पागोष्टी करत चिलीम फुकत बसलेले असतात. एकाने धुंदीत चिलीम शिलगावून जळती काडी भिरकावलेली. हे महाशय झुरक्यात गुंग. झोपडी पेट घेते. तिथे बर्याच जीवनपूरक वस्तू आहेत. अरे जाळ लागलाय पळा, म्हणत ते केवळ चिलीमच घेवून पळतात. त्यांना तीच हवी असते.* *"गंजेटी बैठे गांजा पिने* *झोंपडी मे लागी आग,* *चल रे निकल जोगी* *अपनी चिलम ले भाग।* *असं असतं व्यसनी माणसांचं वर्तन ! मनात घेतलं असतं तर बर्याच मौल्यवान वस्तू वाचविता आल्या असत्या. परंतु नशेत बुद्धी शाबूत राहातेच कुठं ! नको त्या मर्कट लिला करून बघणार्यांच्या विनोदाचा किवा दयेचा भाग बनून ही व्यसनी माणसं जगत असतात.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर जीवन कुछ नहीं, खिन खारा खिन मीठ कलहि अलहजा मारिया, आज मसाना ठीठ। सारांश जीवन क्षणभंगूर आहे. क्षणापूर्वी ते होते अन क्षणानंतर ते असेल अशी कोणीही खात्री देवू शकत नाही. जीवनाची नश्वरता पटवून देताना महात्मा कबीर म्हणतात, जीवन म्हणजे काहीही नाही. या क्षणाला ते खारट अनुभव देत असेल तर दुसर्या क्षणी ते कडवटपणाला गोडीमध्ये बदलू शकते. जीवनाचा मधूर अनुभव देवु शकतं. जो वीरयोद्भा काल युद्धामध्वे आपलं नैपुण्य पणाला लावून बाजी प्राणपणाने लढून आपल्या बाजूने ओढून आणण्यामध्ये यशस्वी झाला म्हणून त्याचे सर्वत्र कौतुक सोहळे साजरे झाले. सर्वांनी जयमाला गळ्यात घालून त्याचा जय जयकार केला गेला. ज्याने काल मैदान मारले तो स्वतःच आज चितेवर स्मशानी निपचित अचेतन पडला आहे. मृत्यूने भल्याभल्यांना सोडलेले नाही. तिथे सामान्य जीवांचं काय खरं आहे. घारीने भक्ष्यावर झडप घालावी तशी काळ कोणत्याही क्षणी झडप घालू शकतो, म्हणून माणसानं आपल्या हाती जे काही आयुष्य शिल्तक राहिले आहे. त्याचा सदुपयोग करून घ्यायला हवा व जीवन सत्कारणी लावायला हवे , म्हणजे सत्कर्माच्या किर्तीने मृत्यू पश्चातही जीवनाचा परिमल दरवळत राहातो. मृत्यू साक्षात पुढ्यात उभा राहिला तरी त्याचे भय राहात नाही एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• काळजी केल्याने कोणतेच प्रश्न मिटत नसतात तर अनेक प्रश्न तुमच्यासमोर उभे टाकतात.त्या काळजीमध्ये तुमच्या आजच्या कामावर लक्ष नसल्यामुळे तुमचे काम निकृष्ट दर्जाचे होऊ शकेल.त्यामुळे तुम्ही अधिक काळजी करायला लागाल.त्यापेक्षा काळजी न करणे सर्वात मोठा शहाणपणा आहे.ज्याची तुम्हाला काळजी वाटते त्याकडे लक्ष न घालणे सगळ्यात चांगले.आजच्या कामात अधिक लक्ष घातले आणि मन लावून काम केले तर त्या कामात गढून जाल.चांगले काम झाल्याचे समाधान तर वाटेलच आणि काळजी पण दूर होईल.काळजी कोणतीही असो.आजची असो की उद्याची.तो काळ तुमच्या काळजीमुळे थांबणार का ? नाही ना.मग आपले मन प्रसन्न ठेवा.येणा-या आणि हाती असलेल्या कामात अधिक लक्ष घाला मग तुम्हाला तुमचे समाधान मिळेल.समाधान हे काळजीला उत्तम पर्याय आहे हे कधीही विसरु नका. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०. 💠🌹💠🌹💠🌹💠🌹💠 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡.... मूल घडवताना........... 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• .मुले तुमच्याशी कोणत्याही विषयावर मनमोकळेपणाने बोलू शकतात हे त्यांना कळू द्या. त्यांना बोलायचे असते तेव्हा तुम्ही ऐकण्यास तयार असता असे त्यांना वाटले पाहिजे. कोणताही संकोच न बाळगता मुलांना मनातले बोलता यावे असे खेळीमेळीचे, निवांत वातावरण तयार करा. आई-वडिलांना मनातले सांगितल्यास ते रागावतील किंवा आपल्यालाच दोष देतील असे जर मुलांना वाटले, तर ते कदाचित मनातले बोलणार नाहीत. तेव्हा, मुलांशी धीराने वागा आणि तुमचे त्यांच्यावर प्रेम आहे याचे त्यांना वेळोवेळी आश्वासन द्या. गुंडेवार मा स जि.प.प्रा.शा गोंडेमहागाव ता. किनवट. जि नांदेड़ 9623124594 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संकटातून शोधामार्ग* *एके दिवशी एका शेतकऱ्याचा घोडा शेतातल्या कोरड्या विहिरीत पडला, जखमी झाल्यामुळे तो मोठ्याने ओरडत होता.लोकं जमा झाले शेतकरी धावत आला त्याने बराच विचार केला फार प्रयत्न केले.* *त्या घोड्याला त्या विहीरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले,पण काही करता त्याला बाहेर काढणे जमत नव्हते.दिवस मावळायला आला होता.शेतकरीही आता थकला होता आणि कंटाळला होता त्याने विचार केला.आता हा घोडातर तसाही म्हातारा झाला आहे असेही निरुपयोगी आहे.आणि ती विहिरही कोरडीचं आहे ...* *त्याला बाहेर काढण्या पेक्षा त्याला बुजून द्यावे... विहीरीत माती लोटावी...घोड्याचा प्रश्न ही सुटेल आणि शेतातली ही विहीरही बुजली जाईल......."* *मग काय जमलेल्या सर्व लोकांकडून त्याने मदत मागीतली.आणि सगळे कामाला लागले,कुदळ फावड्यांनी माती टाकायला सुरुवात झाली.....मध्ये* *पडलेल्या त्या जखमी घोड्याला काही कळेनासे झाले ...विहीरीत पडल्याने शरीराला झालेल्या जखमांची वेदना आणि त्यात भर म्हणजे आयुष्यभर ज्या मालकाची चाकरी केली.त्याची ओझी वाहीली आज तोचं मालक जिवावर उठला...ते दुखा:ने अजून मोठयाने ओरडू लागला* *वरुन माती पडतचं* *होती...काही वेळाने घोड्याचा ओरडण्याचा आवाज थांबला.....सागळ्यांना वाटले घोडा मेला बहुतेक शेतकर्याने सहज विहीरीत डोकावून* *पाहीले,तर तो पहातचं राहीला...अंगावरची माती झटकत घोडा उभा राहीला होता.* *लोकांनी अजून पटापटा माती टाकणे सुरु केले...परत पाहीले तर घोडा त्याचा तोच मग्न होता तो वरुन माती पडली की, झटकायचा आणि त्या पडलेल्या मातीच्या थरावर उभा रहायचा.....* *असं करता करता कोरडी विहीर बरीचं भरली आणि कठडा जवळ येताचं तो घोडा तो कठडा ओलांडून बाहेर आला....* *आयुष्यात वेगळे तरी काय होतं ???* *आपण खड्यात पडलो तर, आपणास काढायला कोणीतरी एकचं येते पण आपल्यासाठी खड्डे खणणारे आणि खड्यात पडल्यावर माती लोटणारे आपल्याला गाडण्याचा प्रयत्न करणारे बरेचं भेटतात.* *म्हणून स्वतःवर नेहमी विश्वास ठेवा ....आपले डोके नेहमी शांत ठेवा समस्या कीतीही मोठी असो....शांत मनाने ती हाताळा.... खड्ड्यात,पडलो आणि कोणी पाडलं ह्या बद्द्ल दुखः करण्यापेक्षा,त्यातून बाहेर कसे पडायचे हा विचार करा.....* *झटका ती माती आणि त्या मातीची एक एक पायरी करत... हळूहळू यश प्राप्ती करीता वर या.* *मस्त रहा,आनंदी जगा....हेच जीवनाचे सार आहे.*. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment