✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 29/12/2018 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक जैवविविधता दिन* 💥 ठळक घडामोडी : १९९४ - माझगाव डॉकने तयार केलेली क्षेपणास्त्र वाहक नौका भा.नौ.द. नाशक भारतीय नौदलात दाखल. २००५ - बंगलोरच्या भारतीय विज्ञान संस्थेत गोळीबार. एक शास्त्रज्ञ ठार, ४ जखमी. 💥 जन्म :- १८४४ - उमेशचंद्र बॅनर्जी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा पहिला अध्यक्ष, वकील. १९०० - मास्टर दीनानाथ मंगेशकर, भारतीय नट, गायक. १९१७ - रामानंद सागर, भारतीय चित्रपट निर्माता-दिग्दर्शक. १९४२ - राजेश खन्ना भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते. 💥 मृत्यू :- १९६७ - पंडित ओंकारनाथ ठाकूर, भारतीय गायक, संगीतज्ञ. १९७१ - दादासाहेब गायकवाड डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *कांदा निर्यातीचं अनुदान 5 टक्क्यांवरुन 10 टक्क्यांवर, केंद्र सरकारचा निर्णय.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *कोरेगाव भीमामध्ये विजयस्तंभ परिसरात 1 जानेवारीला पाच सभांना परवानगी, सोशल मीडियावरही पोलिसांची देखरेख* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *इस्रोच्या 'मिशन गगनयान'साठी 10 हजार कोटी रुपये मंजूर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीतील एक महत्त्वपूर्ण निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याची केंद्र सरकारची तयारी; केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *खामगाव : भारिप बहुजन महासंघाकडून बुलडाणा लोकसभेसाठी बाळापूरचे आमदार बळीराम सिरस्कार यांची उमेदवारी जाहीर.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबई : एसटीच्या 3 हजार 307 कर्मचाऱ्यांना नववर्षाची भेट, इच्छित ठिकाणी होणार बदली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *2017 प्रमाणे यंदाही सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला विराट कोहली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• नांदेड मनपाचे मुख्य लेखाधिकारी श्री संतोष कंदेवार यांच्या वाढदिवसानिमित्त लिहिलेला लेख *प्राथमिक शिक्षक ते मुख्य लेखाधिकारीचा प्रवास* https://prajawani.in/news_page.php?nid=602 वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एच. डी. कुमारस्वामी* एच. डी. कुमारस्वामी हे कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत.ते यापूर्वीसुद्धा २00६-७ दरम्यान कर्नाटकचे १८वे मुख्यमंत्री होते. हे कर्नाटक जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे अध्यक्ष आहेत. कुमारस्वामी कन्नड चित्रपटांचे निर्माता आणि वितरक आहेत. त्यांचे वडील एच.डी. देवेगौडा भारताचे माजी पंतप्रधान आहेत. कुमारस्वामी यांना त्यांची पत्नी अनितापासून निखिल नावाचा मुलगा आहे. निखिल कन्नड चित्रपट अभिनेता आहे. कुमारस्वामी यांना कन्नड आणि तेलुगू चित्रपट अभिनेत्री राधिकापासून शमिका नावाची मुलगी आहे.धर्मनिरपेक्ष जनता दलाचे कर्नाटकातील एक कार्यकर्ते होन्नालोगेरे प्रकाश यांची हत्या झाल्यानंतर जनता दलाच्या कार्यकर्त्याची हत्या करणार्या हल्लेखोरांना गोळ्या घाला, असे वक्तव्य करून कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी नवा वाद निर्माण केला आहे. कार्यकर्त्याच्या मृत्यूनंतर दु:खी होणे समजू शकते, परंतु हल्लेखोरांना अटक करून कठोरातील कठोर शासन करण्याची भूमिका कुणीही घ्यायला पाहिजे. मग ते भले ते विरोधक असले तरी! त्यातही पुन्हा सत्ताधार्यांची जबाबदारी अधिक असते, याचे भान कुमारस्वामी यांना राहिले नाही आणि ते भलतेच बोलून गेले. कुमारस्वामी हे कर्नाटकातील शेतकर्यांचे लाडके मुख्यमंत्री आहेत. त्यांचे व्यक्तिमत्व राकट दिसत असले तरी प्रत्यक्षात ते भावनाशील असल्याचे सांगितले जाते आणि त्याचा प्रत्यय अधुनमधून येत असतो. कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर काही दिवसांतच कार्यकर्त्यांसमोर बोलताना ते भावुक झाले आणि आपण भगवान शंकराप्रमाणे आघाडीचे विष पितोय, कोणत्याही क्षणी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊ शकतो, असे वक्तव्य करून त्यांनी खळबळ उडवून दिली होती. त्याबाबत त्यांनी नंतर घूमजाव केले. हल्लेखोरांना गोळ्या घालण्याच्या वक्तव्याबाबतही त्यांनी ह्यमी भावनेच्या भरात चुकीचा शब्द वापरला, ती केवळ तात्कालिक प्रतिक्रिया होती. आदेश नव्हते, असे स्पष्टीकरण दिले आहे. यातला प्रांजळपणा गृहित धरला तरी कुणाही राज्यकत्यार्ला ही भाषा शोभणारी नाही, तो बेजबाबदारपणा आहे. एकूणच भारतीय राजकारणात वाढत चाललेला हिंस्रपणा सर्व राजकीय विचारधारांच्या लोकांनी आत्मसात केला आहे, हेच यातून दिसते. अधून मधून त्यांचे कर्नाटकमधील सरकार पडणार असल्याच्या चर्चा होतात. आताही त्यांच्या पक्षातील एक मोठा गट भाजपाशी संधान साधून बाहेर पडणार असल्याची चर्चा असून यामुळे या राज्यातील जदसे व काँग्रेस आघाडीचे चर्चा लवकरच पडणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• संघर्षाशिवाय कधीच, काहीच नवे निर्माण झाले नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) निकोबार द्विपबेटात किती बेटे आहेत ?* १९ *२) भारतातील सर्वात जास्त जिल्हे असणारे राज्य कोणते ?* उत्तर प्रदेश *३) पहिली आशियाई क्रीडा स्पर्धा कोठे पार पडली ?* नवी दिल्ली *४) बोरलॉग पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो ?* कृषी क्षेत्र *५) विल्यम शेक्सपिअरच्या निधनाला किती वर्षे पूर्ण झाली ?* ४०० *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● संतोष हणमंतराव कंदेवार मुख्य लेखाधिकारी, मनपा नांदेड ● संजय आंध्रस्कर ● विजय रणभिडकर ● सुरेश सुतार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *काळ* मी मी म्हणणाराला काळ जिंकता येत नाही कितीही मी मी म्हणा काळ गुलाम होत नाही मी मी म्हणणाराला काळाला शरण जावे लागते काळा पुढे सर्वांनाच नतमस्तक व्हावे लागते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दोन पायांवर उभं राहून काटेरी बाभळीची छोटी छोटी पानं लुसूलुसू खाणारी बकरी पाहिलीत का तुम्ही? समोरचे दोन पाय बाभळीच्या झाडाला लावून मागच्या दोन पायांवर अवघड आसनात उभी असते. पोटातल्या भुकेमुळं त्या आसनावरची पकड मजबूत असते. त्यामुळं तोल जात नाही. उलट एक आकर्षक डौल तयार होतो. शिवाय काटे टाळून छोटी छोटी पानं खाण्याचं कसब खासच. एखाद्या योग्याला ध्यान लागावं तसं बकरीने या आसनात मन एकाग्र केलेलं असतं. डोंगराच्या अवघड कपारीत बरेचदा बकरी दिसते. त्या अवघड कपारीत बकरी जाते कशी? हा गहन प्रश्न आहे. त्या कपारीतून पाय घसरला तर खाली खोल दरी असते. म्हणजे त्या बकरीची शेवटची ब्या-ब्या ही कुणाला ऐकू येणार नाही. पण त्या जीवघेण्या कपारीत बकरी जाते, यामागे असते फक्त भूक !* *भक्ष्यावर झेप मारणारा पक्षी किंवा वाळक्या पानांवर पायाचा आवाज न करता दबक्या पावलांनी चालणारा चित्ता डिस्कव्हरी चॅनलवर हमखास दिसतो. आभाळातून नेमकेपणानं भक्ष्य हेरून त्यावर झाप मारून भक्ष्याला अलगद उचललं जातं, यातलं वेळेचं नियोजन कमाल असतं. एक क्षण जरी इकडचा तिकडं झाला तरी शिकार निसटू शकते. पाण्यावर झाप मारून पाण्यातला मासा अलगद उचलणारा पक्षी तर अद्भूत असतो. जेंव्हा पोपट राघू गाभूळ्या कैरीवर उलटा होऊन कैरी टोकरतो..उलटं टांगून घेणा-या राघूची झेंड्यासारखी हलणारी शेपूट भुकेची पताका होऊन फडकत असते.* *"जेंव्हा जेंव्हा कोणी भुकेविरूद्ध संघर्ष करायला पाय रोवून उभा राहतो..तेंव्हा तेंव्हा तो सुंदर दिसू लागतो."* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🦆🦆🦆🦆🦆🦆संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• पाहन पूजै हरि मिलै तो मै पूजूँ पहार । ताते तो चक्की भली पीसि खाय संसार । सारांश : दगड-धोंडे पूजणार्यांचा समाचार घेताना महात्मा कबीर म्हणतात की दगाड-धोंडे पूजल्यामुळे इच्छित साध्य झालं असं होईल, मनोकामना पूर्ण होतील किवा देवाची प्राप्ती होणार असेल तर मी अख्खा पर्वतच पूजायला तयार आहे. त्यापेक्षा दगडापासून बनलेल्या जात्याची काळजी घ्यायला मला आवडेल. कारण हे जातं धान्य भरडण्याच्या कामी येतं. त्यापासून पीठ मिळतं. त्यामुळे जगातील जीवांची भूक तरी भागते. श्रद्धेच्या नावाखाली लोक दगडा-धोंड्याला पूजत राहातात. काही जण रंग फासलेले किंवा हळदी-कुंकू लावलेले दगड दिसताच हात जोडतात. गाडीवरून जाताना मंदिर येताच गाडीचा भोंगा वाजवतात. जसा काही मंदिरातला देव झोपलाय अन आवाज देवून हे त्याला जागं करित आहेत. पहावं ते नवलंच ! एकाचं बघून दुसरा करणार अन ती प्रथाच होणार. आज संगणक युगात वावरताना आंतरजालात दडलेलं जगाचं ज्ञान संगणकावर एका क्लिक मध्ये आपल्यासमोर येतं. संगणक माहिती आदान प्रदानाचं यंत्र आहे. .हे माहित असून सुद्धा त्याला चालू करण्यापूर्वी त्याची पूजा अर्चा करणारे . त्यावर धर्माचे सांकेतिक ठसे उमटवणारे, अज्ञानाचं जोखड वाहणारे ढोंगी बुवा, मौलवी यांचं विज्ञानानंच बणवलेल्या माईकवरून 'ये विज्ञान फिज्ञान सब झुट है । म्हणनं अन विज्ञान शिकलेल्या श्रोतृ समुदायाकडून माना हलवून प्रतिसाद देणं किती ढोंगी व भंकस पणाचा कळस आहे बरं हा ! अशी मानसिकता पाहिली की दया यायला लागते. कोणता संस्कार व शिकवण देत आहेत बरं आपल्या वर्तन अन करणीतून भावी पिढ्यांसाठी ! खरंच का जगू शकत नाही माणूस ढोंगाशिवाय ! का झिडकारत नाही अज्ञानाची काजळी ? विज्ञान आणि मानवतावादाचा मेळ घालत विचारचनं विवेकाचे दीप प्रज्वलित करता आले तर जीवनात दररोजच दिवाळी साजरी होईल. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• इतरांच्या जीवन जगण्याच्या जीवनशैलीशी आपली तुलना करु नका यापेक्षा आपल्या जीवनात कोणता चांगला बदल करायला हवा ते पहा.ज्यामुळे आपल्या चांगल्या बदललेल्या जीवनशैलीचे इतरांना अनुकरण करता येईल.त्यात तुम्हालाही समाधान वाटेल आणि इतरांनाही तुमच्याकडून काहीतरी नवीन शिकायला मिळाले याचा आनंद वाटेल.लोक तुमच्या वाईट गोष्टींचे कधीच अनुकरण करत नसतात हे लक्षात असू द्या.म्हणून सदैव आपल्या जीवनात आपल्यातले असलेले दुर्गुण शोधायला शिका आणि इतरांच्या मध्ये असलेले चांगले गुण शोधून आपल्या जीवनात घेऊन त्यांचे अनुकरण करायला शिका म्हणजे आपणही इतरांसारखे नक्कीच चांगले जीवन बनवू शकू. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रकरण - Episode* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *व्यवहारज्ञानाचे धडे* एका शहरात दररोज संध्याकाळी एक महात्मा प्रवचन देत असे. त्यांची ख्याती एका धान्याच्या व्यापा-यानेही ऐकली होती. तो आपल्या मुलासोबत प्रवचन ऐकण्यास आला. प्रवचन सुरु झाल्यानंतर दोघेही लक्षपूर्वक ऐकत होते. काही ज्ञानाच्या गोष्टी सांगत असताना ते म्हणाले,''या जगात जितके प्राणी आहेत. त्या सर्वांमध्ये आत्मा वावरत असतो.'' ही गोष्ट व्यापा-याच्या मुलाला हृदयस्पर्शी वाटली. त्याने मनोमन हा विचार आचरणात आणण्याचा संकल्प केला. दुस-या दिवशी तो एका दुकानावर गेला तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला काही वेळ दुकान सांभाळण्यास सांगितले. ते स्वत: दुस-या कामासाठी बाहेर निघून गेले. त्यानंतर काही वेळाने तेथे एक गाय आली. दुकानासमोर ठेवलेले धान्य खाऊ लागली. मुलाने त्या गायीला हाकलण्यासाठी लाकूड उचलले पण त्याच्या मनात विचार आला. गाय आणि माणूस दोघांनाही जीव आहे.मग भेदभाव का मानायचा? ती धान्य खात असेल तर खाऊ दे. तेवढयात व्यापारी तेथे आले त्याने गायीला धान्य खाताना पाहून मुलाला म्हणाले,'' अरे तुझ्यासमोर ती गाय धान्य खाते आहे? आणि तू आंधळा झाल्यासारखा गप्प बसून का आहेस? आपले किती नुकसान होते आहे याची काही कल्पना आहे की नाही? तिला हाकलून का दिले नाहीस?'' मुलगा म्हणाला,'' बाबा, काल तर महाराज म्हणाले की, सगळे जीव एकसारखे आहेत, मी गायीमध्ये पण एक जीव पाहिला'' तेव्हा व्यापारी म्हणाले,''मूर्खा, अध्यात्म आणि व्यापार यात गल्लत एकसारखे करायची नसते.'' तात्पर्य :- सारासार बुद्धीचा वापर करून जीवन जगल्यास जीवन सुखदायी होते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment