✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 12/12/2018 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९९० - पाकिस्तान अंटार्क्टिकाला अभियान पाठविणारा ३७वा देश ठरला. २००१ - भारतीय हवाई दलासाठी खास विकसित केलेल्या अधिक मोठ्या पल्ल्याच्या पृथ्वी क्षेपणास्त्राची बालासोर येथे यशस्वी चाचणी. २००० - अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयने बुश वि. गोर खटल्यात निकाल दिला. ज्यॉर्ज डब्ल्यू. बुश राष्ट्राध्यक्षपदी. 💥 जन्म :- १८७२ - बाळकृष्ण शिवराम मुंजे, भारतीय-मराठी राजकारणी, हिंदू महासभेचे संस्थापक. १९४० - शरद पवार, भारतीय राजकारणी. १९४९ - गोपीनाथ मुंडे, भाजपा नेते १९५० - रजनीकांत तथा शिवाजीराव गायकवाड, भारतीय अभिनेता. १९८१ - युवराजसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९३० - बाबू गेनु, पुण्यात परदेशी मालाविरुद्ध निदर्शने करताना. १९९२ - पं. महादेव शास्त्री जोशी, भारतीय संस्कृतिकोशाचे लेखक. १९९२ - जसु पटेल, भारतीय क्रिकेट खेळाडू. २००४ - निरंजन उजगरे, मराठी कवी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली - मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसने आघाडी घेतल्यानंतर पक्षाच्या दिल्ली मुख्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *राजस्थानमधील पराभवानंतर वसुंधरा राजे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *शक्तिकांता दास रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *Telangana Assembly Election Results : के.चंद्रशेखर राव यांचा 50,000 मतांनी विजय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नाशिक : नाशिककर गारठले, हंगामात सर्वाधिक नीचांकी 9.4 अंश इतक्या किमान तापमानाची नोंद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *जम्मू काश्मीर : दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी शहीद. शोपियानं जिल्ह्यातील घटना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आयसीसी कसोटी क्रमवारी: अव्वल स्थानासाठी कोहली, विलियम्सन यांच्यात चढाओढ, पुजारा अव्वल पाचमध्ये; बुमराहचीही चमक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सन 1998 मध्ये प्रचंड गाजलेली पुस्तिका खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *चंदर - किशोर कादंबरी* खालील ब्लॉगवर *तिसरा भाग* वाचन करता येईल. https://shabdghar.blogspot.com/2018/12/blog-post_11.html वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक *अरुण वि. देशपांडे, परभणी/पुणे* 9850177342 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• गोपीनाथ पांडुरंग मुंडे गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांचा जन्म (१२ डिसेंबर १९४९ रोजी झाला. ते मराठी, भारतीय राजकारणी होते. ते भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सदस्य होते, त्यांनी इ.स. २००९ पासून भारताच्या लोकसभेत बीड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच भारतीय जनता पक्षाचे(भाजप) लोकसभेतील उपनेते होते (इ.स. २०१२). १४ मार्च इ.स. १९९५ ते इ.स. १९९९ या काळात ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री होते. गोपीनाथ मुंडे हे मूळचे मराठवाड्यातील होते. त्यांचे घराणे राजकीय नसल्याने त्यांना घरून कुठलाही राजकारणाचा वारसा नव्हता. . संघर्ष करीत ते लोकसभेचे सदस्य झाले. तथाकथित उच्चवर्गीयांपुरत्या मर्यादित असलेल्या भाजपला तळागाळातील लोकांपर्यंत नेण्याचे काम मुंडे यांनी केले, असे समजले जाते. १२ डिसेंबर, इ.स. २०१० रोजी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या समारंभात भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांचा गौरव लोकनेता (लोकनायक) असा केला होता *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते. एकतर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रश्न 01 कोणत्या भारतीय नेत्याला को “भारताचे लोहपुरुष” या नावाने ओळखले जाते ?* उत्तर : श्री सरदार वल्लभ भाई पटेल *प्रश्न 02. कन्याकुमारी मध्ये रॉक मेमोरियल (शैल स्मारक) कोणाच्या स्मरणार्थ बांधण्यात आले ?* उत्तर : स्वामी विवेकानन्द *प्रश्न 03. जालीयनवाला बाग कोणत्या शहरात आहे ?* उत्तर : अमृतसर *प्रश्न 04. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ?* उत्तर : मोर *प्रश्न 05. “जय जवान, जय किसान” हा नारा कोणी दिला ?* उत्तर : लालबहादुर शास्त्री *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● गजानन हुस्सेकर ● रमेश वाघ ● समीर मुल्ला ● पवनकुमार वतनदार ● आकाश पाटील ● मधू पाटील ● नागनाथ परसुरे ● शुभानन गांगल ● माधव सोनटक्के ● अशोक पाटील कदम ● विजय केंद्रे ● महेश शिवशेट्टी ● रामकृष्ण पाटील ● पवन खरबाळे ● विलास पाटील आवरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *विचार* सूर्य उगवला की अंधार जळत असतो विचार स्पष्ट झाला की संशय ढळत असतो विचार स्पष्ट झाला की संशयाचा प्रश्न उरत नाही सूर्यासारखी स्पष्टता तिथे संशय ठरत नाही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपलं जग सुंदर आहे. झाडं-झुडं, नदी-नाले, डोंगरद-या, पशू-पक्षी, चंद्र-तारे.. सारंच अनोखं ! त्यात आपला जन्म म्हणजे निसर्गानं दिलेली अनुपम भेट. हे जीवन आधिक सुंदर व्हावं म्हणून माणूस शिकतो, ज्ञानसंपन्न होतो. शिक्षणाच्या चरकातून पिळून निघालेल्या माणसाला नोकरी, पद-प्रतिष्ठा मिळते. प्रमाणपत्र त्याचे मापदंड असतात. यातून समृद्ध समाज घडविणारा व मानव्याची पूजा करणारा माणूस अभिप्रेत असतो. दुसरीकडे मातीत राबणारे, कलांसाठी आयुष्य वाहिलेले आणि जगाला मानवतेचा संदेश देणारे लोक जगण्यासाठी संघर्ष करतात, वणवण भटकतात कारण शैक्षणिक दाखल्यांचे गाठोडे त्यांच्याजवळ नसते.* *खरंतर जीवनाच्या विविध रंगाना, कलागुणांना आपल्यात मिसळून घेतलेला इंद्रधनू असतो माणूस ! माणूस बहुआयामी असतो. अनेकांनी शिक्षणात 'ढ' असूनही नोबेल पुरस्कार मिळवून इतिहास घडविला. आपल्या वाटा आपणच शोधल्या. माणसाचे प्रश्न केवळ गणितानं सुटत नाहीत. पुस्तकी ज्ञानाच्या पलिकडे काही उत्तरं असतात. दु:खाच्या काहिलीतही आपल्या संवेदना जपणारे काही लोक असतात. जगासाठी जळता येत नसलं तरी प्रामाणिक जगणं हातात असतं माणसाच्या. ही माणसं जगाच्या लेखी मोठी नसतात. पण 'माणूस' म्हणून लायक असतात. तीर्थक्षेत्रांच्या पाय-या झिजवणा-यांपेक्षा कुणाच्या वेदनेची फुलं करणारी माणसं महान असतात. ही जीवनमूल्यंच माणसाचा मापदंड असावा.* ••●‼ *रामकृष्णहरी*‼●•• 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर पशु पैसा ना गहै, ना पहिरै पैजार ना कछु राखै सुबह को, मिलय ना सिरजनहार। सारांश माणसाला मायेने आपल्या मोहात असे जखडून ठेवले आहे की माणूस स्वार्थापासून दूर जायलाच तयार नाही. जेव्हा पाहावे तेव्हा मी व मला हीच त्याची हाव हाव चालू असते. कितीही जरी धन संपत्ती मिळाली तरी त्याचंं समाधान होतच नाही. पायी चालणार्याला सायकल हवीशी वाटते. सायकल स्वार मोटार सायकल वाल्याकडे बघून दुःखी होतो. मोटार सायकल वाल्याला कार वाल्याचा हेवा वाटतो. असा हा हावहावीचा न संपणारा दुःखी करणारा मार्ग. या उलट पायी पालणार्यानं रस्त्यानं काठीच्या आधारावर चालणार्या एक पायच नसलेल्या जिद्दी अपंगाकडं पाहिलं, मोटारसायकल वाल्यानं कारऐवजी सायकलवाल्याकडं पाहिलं की आपणाकडं इतरापेक्षा बरं आहे याची जाणीव होते. मनात मत्सराची भावना जागृत होत नाही. इतराकडं निखळ व दयाभावाने पाहाण्याची दृष्टी वाढीस लागते. हीच वृत्ती माणसासाला जगाकडं सकारात्मकतेनं पाहायला शिकविते. महात्मा कबीर जीवन सहज व नैसर्गिकपणे जगण्याचा सल्ला देतात. पशू-पक्षी जीवन जगण्यासाठी गाठीला पैसा बांधून ठेवत नाहीत किवा पायाला पायतन वापरत नाहीत. उद्याच्या दिवसासाठी आजचा दिवस संपताना काही संचितही करून ठेवत नाहीत. म्हणून त्यांना देव काही चोचीत दाना देत नाही किवा जवळ काहीच नाही म्हणून ते काही उपाशी मरत नाहीत. उलट संचय करणार्याला सांभाळणं व हरवण्याची भिती आहे. पशू पक्ष्यांपाशी उद्याची चिंता नाही. पुढच्या पिंढ्यांसाठी संपतीची काळजी नाही म्हणून त्यांच्या पिलांच्या पंखात बळ येतं. ते दूर पर्यंत उड्डान घेत आकाशालाही गवसणी घालतात. माणसानं थोडा विवेक जागा केला तर बर्याच काही गरज नसता सलणार्या ठणका आपोआपच कमी होतील, व धुसर वाटणारा जीवनमार्ग धोपट होईल. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकजण आपल्या जीवनाबद्दल काही ना काही बोलत असतो.जेव्हा तो बोलत असतो तेव्हा त्याच्या जीवनात नव्वद टक्के नकारात्मक भूमिका असते.या जीवनात असे जीवन जगण्यात काय अर्थ आहे ? त्यापेक्षा न दिलेलेच बरे.आता जीवन जगणे असह्य आहे.असा जेव्हा विचार करतात त्यांनी जगण्याला आत्मविश्वास गमावलेला असतो.कोणतीही कृती न करता किंवा हातपाय न हलवता जीवन कसे सुखी बनेल ? हा विचार कधीच ते विसरुन बसले असणार आणि त्यामुळेच त्यांच्या जीवनात सदैव नैराश्याचे डोळ्यांसमोर काळे ढग दिसतात.अशी माणसे स्वत:ही जीवनाचा आनंद घेत नाहीत आणि इतरांच्या जीवनातला आनंदही त्यांना पाहवत नाही.अशा नैराश्ययुक्त व नकारात्मक विचार करणा-या माणसांनी थोडी डोळसपणे दुस-याच्या आनंदाने जीवन जगणाऱ्या माणसाकडे थोडा विचार करून पहायला हवे.त्यांची आत्मविश्वासाने व कृतीयुक्त शैलीने व आपल्यासमोर कितीही आणि कोणताही कठीण प्रसंग असो तो हसत हसत सामोरे जाऊन कसे जीवन जगतात याचे थोडे सूक्ष्म निरीक्षण करायला हवे.तसेच त्यांच्या जगण्याची जीवनशैली कशी आणि आपली जगण्याची जीवनशैली कशी हा प्रश्न स्वत:ला विचारुन पाहिला तर नक्कीच कळेल की,आपल्यामध्येच खरी त्रुटी आहे.आपणही त्यांच्यासारखे जीवन जगायला हवे.इतरांच्या जगण्यापेक्षा आपणही चांगले जीवन आपल्या कर्तृत्वाने, आत्मविश्वासाने जगू शकतो अशी शिकवण मिळाल्याशिवाय राहत नाही.नक्कीच चांगले बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करेल.मग तो नैराश्यमय जीवन जगणारे नाही अशी प्रेरणा घेऊन व कर्तृत्ववान लोकांचे नक्कीच चांगले जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळेल.मग तोच जगाला जीवन कसे जगायचे याचे ज्ञान देण्यासाठी तयार होई.म्हणून इतरांच्या लोकांचे चांगले अनुकरण घ्यायला काय हरकत असा सकारात्मक विचार निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 मुल घडवताना.......🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• संस्कारांनी मनावर योग्य परिणाम होतात. आयुष्य समृद्ध आणि यशस्वी होण्यासाठी मदत होते. जसं एखाद्या रत्नाला पैलू पाडल्यानंतर ते रत्न पूर्वीपेक्षा तेजस्वी होतं किंवा एखाद्या चित्रात रंग भरत गेल्यावर ते जसं उठावदार आणि सुंदर दिसतं, तसं संस्कारांचा मनावर असामान्य परिणाम होउन दिव्य तेजाचा उदय होतो. शेवटी निरोगी, सात्विक, धर्मशील आणि सामर्थ्यवान पीढी घडवणे हेच तर असते संस्कारांचे ध्येय, नाही का गुंडेवार मा स जि.प.प्रा.शा गोंडेमहागाव ता. किनवट. जि नांदेड़ 9623124594 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वैचारिक निर्मळता* गुरु शिष्य भ्रमंतीला निघाले होते. फिरता फिरता ते एका जंगलात येवून पोहोचले. जंगलात काही अंतरावर एक झरा वाहत होता. गुरुजींना तहान लागली होती. त्यांनी शिष्याच्या हाती कमंडलू दिले आणि त्याला पाणी घेवून येण्यास सांगितले. शिष्य झऱ्या पाशी गेला आणि त्याला असे दिसले कि तेथून नुकतेच बैल गाड्या गेल्या आहेत, बैल पाण्यातून गेल्याने पाणी खूप गढूळ झाले आहे. पाण्यात झाडाची पाने पडलेली आहेत. त्याने विचार केला असे घाण झालेले पाणी गुरूंसाठी नेणे योग्य नाही. तो तसाच परत गुरूंकडे गेला आणि म्हणाला,"गुरुजी, पाणी खूप गढूळ आहे, आपल्याला दुसरी काही तरी व्यवस्था पहावी लागेल." गुरुजी म्हणाले," अरे त्यापेक्षा तू असे कर पुन्हा त्या झऱ्यापाशी जा आणि पुन्हा पाणी आणण्याचा प्रयत्न कर." शिष्य गेला, त्याला पुन्हा पाणी गढूळ दिसले, तो परत आला, गुरुनी त्याला परत पाठवले, असे चार पाच वेळेला झाले. शेवटी शिष्य कंटाळला, त्याच्या चेहऱ्यावर नाराजीचे आणि कंटाळलेले भाव दिसू लागले पण शिष्य गुरुज्ञा मोडायला तयार नव्हता. गुरुनी त्याला परत पाणी आणायला पाठवले. आताच्या वेळी त्याला मात्र आश्चर्य वाटले कारण या वेळी पाणी अगदी नितळ, स्वछ नि निर्मळ होते. त्याने ते पाणी कमंडलू मध्ये भरले आणि गुरूंसाठी घेवून आला. गुरुनी पाणी प्राशन केले आणि शिष्याला म्हणाले,"वत्सा ! आपल्या मनात सुद्धा असेच कुविचारांचे बैल धिंगाणा घालत असतात. ते मनाची निर्मळता कमी करून मनाला मलिन करण्याचा प्रयत्न करतात. पण आपण त्यापासून सावध राहिले पाहिजे. कुविचारांचा प्रभाव आपल्या मनावर होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. मनाच्या झर्यातील पाणी शांत होण्याची प्रतीक्षा जर आपण केली तर मनात कायम स्वच्छ, चांगले विचार येतील. भावनेच्या भरात कधीही निर्णय घेवू नये." *तात्पर्य- भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नयेत. मनात कायम स्वच्छ, चांगले विचार कसे येतील हेच पाहावे.कारण विचार खुंटलेकी विकार भडकतात.आणि अविचाराने घेतलेले निर्णय नुकसानकारक ठरतात.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment