✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 05/12/2018 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी सोहळा* *जागतिक माती दिन* * 💥 ठळक घडामोडी : १९४५ - फ्लाइट १९, फोर्ट लॉडरडेल, फ्लोरिडा येथून निघालेली अमेरिकन नौदलाच्या ५ टी.बी.एम.ऍव्हेन्जर जातीच्या विमानांची स्क्वॉड्रन बर्म्युडा त्रिकोनात गायब. १९८९ - फ्रांसच्या टीजीव्ही रेल्वेने ताशी ४८२.४ कि.मी.ची गती गाठून विश्वविक्रम रचला. 💥 जन्म :- १३७७ - ज्यान्वेन, चीनी सम्राट. १४४३ - पोप ज्युलियस दुसरा. 💥 मृत्यू :- १५६० - फ्रांसिस दुसरा, फ्रांसचा राजा. १७९१ - वोल्फगांग आमाडेउस मोझार्ट, मध्यकालीन युरोपियन शास्त्रीय संगीतकार. १९२६ - क्लोद मोने, फ्रेंच चित्रकार. २०१३ - नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रपिता, वर्णद्वेषविरोधी नेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मराठा आरक्षणासाठी स्थगित करण्यात आलेली मेगा भरती आता पुन्हा सुरू होणार, ७२ हजार पदांसाठी ही भरती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात बोलतांना दिली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *स्टेट बँकेच्या एटीएममधून हवे तेवढे पैसे काढण्याची दिली मुभा मात्र त्यासाठी खात्यामध्ये मिनिमम बॅलेन्स ठेवण्याची अट.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *सरकारकडून शाळांमध्ये राबवल्या जाणार्या मध्यान्ह भोजन योजनेच्या देखरेखीत चालढकल करणार्या सहा राज्यांवर सुप्रीम कोर्टाने दिले दंडात्मक कारवाईचे आदेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *महिलांना संसदेत 33 टक्के आरक्षण द्या, ओरिसाचे मुख्यमंत्री पटनाईक यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नागपूरच्या महाराजबाग प्राणी संग्रहालयाची मान्यता रद्द* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *10 डिसेंबरला दुपारी 11 वाजता सरकारनं बोलावली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक; पंतप्रधान नरेंद्र मोदीही राहणार उपस्थित* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारतीय संघातील सलामीचा फलंदाज गौतम गंभीरने घेतला क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://b.sharechat.com/Lxhf0ZN5nS Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *डॉक्टर देव की दानव* https://nasayeotikar.blogspot.com/2018/12/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *योगी अरविंद घोष* अरबिंदो ऊर्फ ( अरविंद) योगी अरविंद घोष हे विसाव्या शतकातील एक महान क्रांतिकारी व युगप्रवर्तक तत्त्वज्ञ आणि महायोगी होते. ते स्वातंत्र्य-सेनानी, शिक्षणतज्ज्ञ, आणि महाकवी या विविध भूमिकांनी ओळखले जातात. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १८७२ रोजी कलकत्ता येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव कृष्णधन घोष आणि आईचे नाव स्वर्णलता होते. केंब्रिजला शिकत असताना त्यांच्या मनात देशप्रेमाची भावना जागृत झाली. अल्पावधीतच ते एक जहाल देशभक्त म्हणून ओळखले जाऊ लागले. ते स्वातंत्र्य चळवळीकडे ओढले गेले. त्यांनी वर्तमानपत्रात लेख लिहून आपली राजकीय मतेही मांडली. अल्पावधीतच ते हिंदुस्थानातील अग्रगण्य नेत्यांपैकी एक बनले. त्यांनी मांडलेल्या शिक्षणविषयक विचारांमुळे ते शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. त्याच वर्षी त्यांनी मातरम् हे वृत्तपत्र सुरू केले. बंगालमधील क्रांतिकारक चळवळीचे प्रवर्तक असताना,इंग्रज सरकारने त्यांना एका खटल्यात गोवले. त्यांना १९0७ मध्ये एका वर्षाची कैद झाली. त्यांना अलिपूर येथे कारावासात ठेवण्यात आले होते. मानवाची प्रगती आणि आध्यात्मिक उत्क्रांती याविषयी त्यांचे स्वतंत्र चिंतन नंतर प्रसिद्ध झाले. त्यांनी कर्म, ज्ञान, आणि भक्ती यांच्या समन्वयावर आधारित ह्यपूर्णयोगाची मांडणी त्यांनी केली. माणूस हा उत्क्रांतीतील शेवटचा टप्पा नाही, त्यानंतर अतिमानसाचा उदय व्हायचा आहे; यासंबधीची तार्किक आणि तात्त्विक मांडणी त्यांनी केली आहे *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा, कृतघ्न होऊ नका *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) भारतात कोळशाचे किती टन सुप्त साठे उत्पादनक्षम आहेत ?* ६०००० दशलक्ष टन *२) ओडिशात औष्णिक वद्युत केंद्र कोठे आहे ?* तालचेर *३) दुसर्या पंचवार्षिक योजनेत वाहतूक आणि दळणवळण क्षेत्रावर केलेला खर्च एकूण खर्चाच्या किती टक्के होता ?* २८ *४) कंबोडियात कोणतं चलन वापरात आहे ?* रियाल *५) संपूर्ण आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी कोणती ?* धारावी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● श्रीहरी अंभोरे, पत्रकार ● राजेश गटलावार ● साईनाथ कल्याणकर ● संतोष रामराव शिंदे ● अशोक चिंचलोड ● सूर्यकांत स्वामी ● राज डाकोरे ● प्रल्हाद गड्डपवार ● अविनाश सुभेदार ● योगेश पडोळे ● राजू अलमोड ● सुनील पांचाळ ● शंकर भंडारे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कामापुरता मामा* कामापुरता मामा अन् ताकापुरती आजी असते काम होईपर्यंत ती कशात ही राजी असते काम झालं की लगेच राजीची नाराजी होते बोलकी आजी एकदम मुकी बहिरी आजी होते शरद ठाकर सेलू जि परभणी •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *मूल घडवताना....*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आर्थिक विचार, आर्थिक मूल्य, आर्थिक वर्तन आणि आर्थिक दृष्टिकोन ह्या साऱ्या बाबी पाल्य बहुतांशी पालकांकडे बघूनच शिकतात. त्यामुळे वयाच्या प्रत्येक टप्प्यावर पाल्याला अनुभव मिळेल अशी संधी आणि वातावरण उपलब्ध करून देणे हे पालकाचे काम आहे. एक अनुभव हा शंभर उपदेशांपेक्षा श्रेष्ठ असतो. कोणत्याही गोष्टींचा आत्मविश्वास हा अनुभवातूनच येत असतो. म्हणून मुलांना प्रत्येक बाबीचे अनुभव द्यायला हवे. गुंडेवार मा स जि.प.प्रा.शा गोंडेमहागाव ता. किनवट. जि नांदेड़ 9623124594 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर मन मिरतक भया, इंद्री अपने हाथ तो भी कबहु ना किजिये, कनक कामिनि साथ। सारांश महात्मा कबीर सांगतात की तुम्ही इच्छा व आसक्तिवर विजय मिळविलेला असेल. तुमचं मन निर्विकार असेल. विषयभोगी इंद्रियावर पूर्णपणे विजय मिळविला असेल. भौतिक बाबींचा प्रभाव पडून मनाचं विचलन होत नाही . अशी अवस्था जरी तुम्ही धारण केलेली असेल तरी तुम्ही धन आणि नारी संग टाळला पाहिजे. मनाची स्थिर अवस्था किती काळ राहिलं हे निश्चितपणे कोणी सांगू शकत नाही. जो पर्यंत मनावर संस्कार व सत्संगतीचा प्रभाव आहे. तो पर्यंत मनाचा तोल ढळणार नाही. धनाच्या ठायी चंचलता असते. ते भौतिक सुख व श्रीमंतीची स्वप्न दाखवायला लागतं. नारीच्या संगतीतही विषय विकार उत्पन्न होवू शकतात. मनाचं संतुलन राहील की नाही ? याची खात्री कशी देणार बरं ! म्हणून कबीर धनासोबत स्त्रीसंगही टाळण्याचा सल्ला देतात. संत तुकारामांनीही अभंगातून उपदेश करताना 'स्त्रीयांचा तो संग नको नारायणा । काष्ठा या पाषाणमृत्तिकेच्या । नाठवे हा देव न घडे भजन । लांचावले मन आवरेना ।।' असे म्हटले आहे. महान तपस्व्यांची दीर्घकालीन तपस्या नारी सहवासामुळे क्षणार्धात भंग पावल्याचे दाखले असताना सज्जनानं अशा बाबींची परीक्षा द्यायचा यत्न करण्यात सुद्धा जोखीम आहे. चारित्र्य निर्माण करण्यासाठी जीवनातली कित्येक वर्षे गेलेली असतात. एकदा का चारित्र्यावर शिंतोडे उडाले की ते धुण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते संशयाच्या भोवर्यातून आणि अफवांच्या लाटेतून सावरू म्हणता सावरता येत नाही. जवळचे, दुरचे सर्व जण उगीच संशयाने बघायला लागतात. म्हणून कनक आणि कामिनीपासून अंतर ठेवून राहिले तर बिघडतं कुठं ! एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• एखाद्या व्यक्तीमध्ये एखादा जरी अवगुण असेल तर तोच एखादा गुण त्याच्या जीवनाच्या अधोगतीकडे वाटचाल सुरु झाली आहे असे समजावे. पण त्याच व्यक्तीला त्या अवगुणाला थांबवता आले तर नक्कीच समजावे की, त्याची हळूहळू यशस्वी जीवनाकडे वाटचाल सुरु आहे. जीवनात अवगुणाला शून्य महत्त्व देऊन त्याला जीवनातून हद्दपार करुन त्या ठिकाणी चांगल्या संस्कारक्षम गुणांची भरती करावी तरच जीवन समृद्ध बनेल. © व्यंकटेश काटकर,नांदेड. 🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *धडपड - Trick* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नदी, मासा आणि युक्ती* एका नदीच्या तिरावर एक कोळी मासे पकडायला गेला. फार मोठे मासे नदीत सापडतील असे त्याला वाटले नाही म्हणून त्याने मोठे जाळे बरोबर घेतले नाही. त्याच्या मनात एक विचार आला आणि त्याने एका काठीच्या टोकाला एक बारीक दोरी बांधून गळ वर ओढू लागला, पण मासा बराच मोठा असल्याने गळ लवकर ओढला जाईना. कोळी बराच वेळ विचारात पडला.त्यानंतर त्याला सूचले की, गळ लवकर ओढला तर मासा आपल्या वजनाने व चळवळीने आपली बारीक दोरी तोडून पळून जाईल तेव्हा त्याने बराच वेळपर्यंत गळ पाण्यात राहू दिला व नंतर अगदी हळूहळू तो पाण्याच्या बाहेर काढला. तोपर्यंत मासा धडपड करून अगदी निर्बळ झाला होता. त्यामुळे दोरी तोडण्याची शक्ती त्यात उरली नव्हती. कोळ्याची ही युक्ती कामी आली. तात्पर्य :- युक्तीने सर्व प्रकारच्या अडचणीतून पार पडता येते.काही बाबीसाठी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते.आणि कमी वेळेत कार्य सार्थकी लागते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment