✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 18/12/2018 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- २०१२ - पुण्यात इमारतीचे बांधका करीत असताना छत कोसळून १३ कामगार ठार 💥 जन्म :- १८८७ - भिखारी ठाकूर – भोजपुरी भाषेचे ’शेक्सपिअर’ १९३० - साहित्यिक व समीक्षक रमेश तेंडुलकर १९३१ - समीक्षक स. शि. भावे १९४६ - स्टीवन स्पीलबर्ग, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक. १९४६ - रे लियोटा, अमेरिकन चित्रपट अभिनेता. १९६३ - ब्रॅड पिट, अमेरिकन चित्रपट अभिनेता. १९७१ - बरखा दत्त, भारतीय पत्रकार 💥 मृत्यू :- १९९३ - राजा बारगीर, मराठी आणि हिंदी चित्रपट दिग्दर्शक. १९९५ - कमलाकरबुवा औरंगाबादकर, कीर्तनकार. २००० - मुरलीधर गोपाळ तथा मु.गो. गुळवणी, भारतीय इतिहास संशोधक, वैदिक संस्कृतीचे अभ्यासक. २००४ - विजय हजारे, भारतीय क्रिकेट खेळाडू *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी सोहळ्यानंतर अवघ्या तासाभरात कमलनाथ यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा घेतला निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *भूपेश बघेल यांनी घेतली छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *माधवी दिवाण यांची केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाच्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरलपदी नियुक्ती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारतीय नागरिक हमीद अन्सारी यांची आज होणार सुटका* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नाशिक : हंगामातील नीचांकी 8.5 इतक्या किमान तपमानाची नोंद. नाशिककर गारठले, थंडीचा वाढता कडाका* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *परिमल राय गोव्याचे नवे मुख्य सचिव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत वि. ऑस्ट्रेलिया- दुसऱ्या कसोटीत भारतासमोर विजयासाठी 287 धावांचं आव्हान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://sharechat.com/post/935eEbv Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• अनुभव लेख *कोल्हापूरचा भरत रिक्षावाला* https://www.facebook.com/100003503492582/posts/1806474019479364/ वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• वर्धा वर्धा हे महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील वर्धा जिल्ह्याचेमुख्यालय व प्रमुख शहर आहे. वर्धा शहर वर्धा ह्याच नावाच्या नदीकाठावर वसले असून ते नागपूरच्या ७५ किमी नैऋत्येस तर अमरावतीच्या १०० किमी आग्नेयेस स्थित आहे. १८६६ साली स्थापित झालेले हे शहर कापूसव्यापाराचे एक प्रमुख केंद्र मानले जाते. २०११ साली शहराची लोकसंख्या सुमारे १.०६ लाख होती. सेवाग्राम हे वर्धा शहराजवळील एक गाव येथील सेवाग्राम आश्रमासाठी प्रसिद्ध आहे. १९३६ ते १९४८ दरम्यान सेवाग्राम आश्रम हे महात्मा गांधींचे निवासस्थान होते. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कोणीही पाहत नसताना आपले काम इमानदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *०१) जगातील सर्वात मोठा महासागर कोणता ?* प्रशांत महासागर *०२) अमरनाथ हे स्थळ कोणत्या राज्यात आहे ?* जम्मू काश्मीर *०३) मध्यप्रदेश ची राजधानी कोणती ?* भोपाळ *०४) वाळवंटातील जहाज कोणास म्हटले जाते ?* उंट *०५) शीख धर्माचे संस्थापक कोण आहेत ?* गुरू नानक *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● रवी यमेवार ● नितीन वंजे ● उदयराज कोकरे ● विजयकुमार भंडारे ● जनार्दन नेउंगरे ● महेश जोगदंड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मतलबी* जो तो इथे मतलबी आहे वरवर निरागस छबी आहे खोटा बुरखा लगेच फाटतो खरा प्रकाशा सारखा स्पष्ट वाटतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खरंतर मनाच्या कुपीत अत्तरासारखा जपून ठेवावा, असा अनमोल ठेवा असतो 'घर.' परस्परांशी लळा लागला की जुळून आलेले जन्माचे ऋणानुबंध घराला घरपण देतात. मग घरच मंदिर होऊन जातं. एकमेकांच्या स्वप्नांसाठी प्रार्थनेच्या स्वरांनी भरलेली घरं कुणालाही हवीहवीशी वाटतात. काही घरांची दारं मात्र सदैव बंद असतात. मनाची कवाडं जिथं बंद असतील, तिथं घराची कवाडं कशी उघडतील? अशा घरांच्या उंचीवरून घरातल्या रास्त आनंदाची मोजदाद होत नसते. तर आनंद हाच घरांचा, तिथल्या माणसांच्या उंचीचा मापदंड असतो. ज्या घरात कटुतेच्या भारानं मनं गुदमरलेली असतात, त्या घरातला प्रपंच सुखाचा कसा होईल?* *कृत्रिम वस्तूंच्या, बेगडी जगण्याच्या मायावी जाळ्यात अडकत चाललो आहोत का आपण? हे जाळं भल्याभल्यांना मोहवतं. घर जर आपुलकीवर, माया-ममतेच्या भिंतींवर उभं असेल तर येत्या जात्या वाटसरूंनाही ते आपलं वाटतं. जिथं तृप्तीची वीणा झंकारत असते. माझ्या घरातली सारी माणसं माझी आहेत ही भावनाच सा-यांना जोडून ठेवते. अशा मनस्वी माणसांच्या अस्तित्वाचं सर्वांना आकर्षण असतं, चुंबकासारखं. सुखी संसार त्याचीच परिणती असते. ही अथांग तृप्तीची गोळाबेरीज संपत्तीच्या पलिकडची असते.* *"साधे गवत फुलण्याला सुख म्हटले मी, सहज भेटलेल्या जगण्याला सुख म्हटले मी, अवती-भवती झगमगती नक्षत्रे होती, पण वातीच्या जळण्याला सुख म्हटले मी."* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ☀☀☀☀☀☀☀☀☀ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कहा सिखापना देत हो, समुझि देख मन माहि सबै हरफ है द्वात मह, द्वात ना हरफन माहि। सारांश महात्मा कबीर ज्ञानानुभव देताना म्हणतात , मी जितका काही उपदेश करतो तो केवळ आपल्या हृदयांतरी साठवून ठेवा. सगळी अक्षरे दौतीत साठलेली आहेत. परंतु दौत अक्षरात थोडीच असणार आहे ! तद्वत हे विश्व परमात्म्यात सामावलेलं आहे. तो परमात्मा या विश्वाच्या बाहेरही सामावलेला आहे. मनुष्य स्वभावाची एक खाशीयत आहे . तो देखल्या देवा दंडवत घालून प्रतिकात्मक मुर्ती, दगड, धोंडे पूजून मोकळा होतो. अशा पूजनानं खरंच देवाचं स्वरूप कळणार आहे का ? ईश्वरी निसर्ग शक्तींच्या कूतुहलातून निर्मित भयापोटी मानवी हतबलतेतून निसर्गशक्तीपुढील शरणागतीच्या अभिव्यक्तीसाठी मानलेल्या प्रतिकात्मक रूपांचं पूजन करून ईश्वराचं आकलन झाल्याचं फसवं समाधान देत भोळ्या भाबड्यांची भौतिक लुट करून त्यांची ईश्वर ही कल्पनाच सीमित करून टाकली गेलीय. चार धाम यात्रा केलेला असो की काबा करून आलेला असो. उगाच का म्हणतो 'अजूनही मला देव पूर्ण कळलाच नाही हो !' विश्व संचललन शक्तीचं स्थुल जरी निरीक्षण केला तरी ती शक्ती अनाकलनीय आहे. भौतिकदृष्ट्या कितीही सुखसंपन्न असला तरी मानवी विचार कक्षेच्या बाहेर हे विश्व संचालन शक्तीचं रूप आहे. ते अनादि अथांग आहे. त्याचा शोध घेता घेता अनेकांनी आपली अनुमानं निरीक्षणं नोंदवलीत. प्रत्येकाचं मत स्शयंसापेक्ष आहे. ईश्वर आत्मचिंतनाशिवाय कसा भेटणार ? त्यासाठी आत्मदृष्टी हवी. त्यातून ईश्वरी साक्षात्कार व्हायला लागतो. ईश्वरीय रूप अर्थात निसर्ग शक्ती दृष्टी-सृष्टीच्याही पलिकडची बाब आहे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जी व्यक्ती स्वत:च्या आणि इतरांच्या जीवनशैलीचा फरक जाणते तेव्हा ती व्यक्ती नक्कीच चिंतनशील आहे असे समजावे.इतरांच्या जीवन जगण्यामध्ये काही उणीवा असतील त्या आपल्या जीवनात तर नाही ना याचा वेध घेऊन त्या सुधारणा करता येतात असाही विचार करण्यास प्रवृत्त होते तर काही चांगल्या गोष्टी असतील तर अनुकरण करायला काहीच हरकत नाही असाही विचार करून चांगले जीवन जगण्यासाठी तयार होते.म्हणजेच चांगले विचार सुधारण्याची संधी देतात तर वाईट विचार मनातून काढून टाकण्याची इच्छा प्रकट करतात.ह्या दोन्ही बाजूंनी विचार करणारीच व्यक्ती आपले सुंदर जीवन जगू शकते.उलट विचार न करणारी किंवा अविचारी व्यक्ती जीवनात कधीही आपल्या चुकांना सुधारण्याची संधी देऊ शकत नाहीत आणि जीवनात कधीही सुधारु शकत नाहीत हे मात्र खरे आहे. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 मुल घडवताना.......... 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• संस्कार म्हणजे नेमकं काय असत? संस्कार संस्कृतीनेच उत्पन्न होतात. तसेच संस्कृती पण संस्कारांवर निर्भर असते. दोन्ही एकमेकावर आधारित असतात. संस्कार म्हणजे मानवाच्या व मानव समाजाच्या चांगल्या सवयी. असे सद्गुण हे मानवात असले पाहिजे. अशा गुणांचा फक्त व्यक्तिगत लाभ नसतो तर सर्व समाज त्यापासून लाभान्वित होतो. निरोगी समाजजीनाकरिता उत्तम संस्कारित मानव आवश्यक आहे. गुंडेवार मा स जि.प.प्रा.शा गोंडेमहागाव ता. किनवट. जि नांदेड़ 9623124594 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कोंबडी आणि कोल्हा* एक कोल्हा एका खोपटात शिरून काही तरी खायला मिळविण्याच्या शोधात असता एक कोंबडी त्याच्या दृष्टीस पडली. पण ती उंच माळ्यावर बसली होती. यामुळे तिच्याजवळ त्याला जाता येईना. मग तिला युक्तीने खाली आणून मारून खावी या हेतूने कोल्हा तिला म्हणाला, ‘कोंबडीताई तुझी हाल हवाल कशी आहे? तू बरेच दिवस आजारी असून घरातच निजून असतेस असं समजलं. तेव्हापासून तुझ्या काळजीनं मला झोप येईना. खरंच ताई, आता तू बरी आहेस का? थोडावेळ खाली उतर म्हणजे मी तुझी नाडी तरी पाहीन.’ याप्रमाणे अघळपघळ बोलून कोल्हा तिची स्तुती करीत असता कोंबडी बसल्या जागेवरूनच म्हणाली, ‘खरच भाऊ, तू जी बातमी ऐकली ती अगदी खरी आहे. असा आजार मला कधीही झाला नव्हता. मी आता खाली उतरून तुझ्याकडे आले असते, पण वैद्याने मला अगदी बजावून सांगितले आहे की, तू आपली जागा सोडून कुठेही जाऊ नकोस. कारण अशक्तपणामुळे जागेवरून हालण्याचे श्रम माझ्याने सोसणार नाहीत, आणि म्हणून माझ्यानं खाली येववत नाही. तरी आता तू यावेळी जा. सध्या मी इतकी अशक्त आहे की, जर मी उतरून खाली असते तर माझे प्राणच जातील.’ तात्पर्य – वाजवीपेक्षा अधिक अगत्य दाखवून एखादा माणूस दुसर्याची विनाकारण प्रशंसा करू लागला की, त्या माणसाला काही तरी स्वार्थ साधावयाचा आहे, असे समजून त्याच्या विषयी शक्य तितकी सावधगिरी ठेवावी. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment