✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 01/01/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा* 💥 ठळक घडामोडी :- १८४८- पहिली मुलींची शाळा भिडे वाड्यात सुरू. १८६२ - इंडियन पीनल कोड अस्तित्वात आले. 💥 जन्म :- १८९२ - महादेव हरिभाई देसाई गांधीवादी कार्यकर्ते. १८९४ - सत्येंद्रनाथ बोस भारतीय भौतिकशास्त्रज्ञ. १९०२ - कमलाकांत वामन केळकर भारतीय भूवैज्ञानिक. १९३६ - राजा राजवाडे साहित्यिक. १९४३ - रघुनाथ माशेलकर . 💥 मृत्यू :- १७४८ - योहान बर्नोली, स्विस गणितज्ञ. १९५५ - शांतिस्वरूप भटनागर भारतीय रसायनशास्त्रज्ञ. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *राष्ट्र सेवा दलाकडून ‘सावित्रीच्या लेकी’ पुरस्कारांची घोषणा, प्रतिभा शिंदे, अनिता ढोले व प्रियांका तमायचीकर यांचा समावेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *विनाअनुदानित गॅस सिलेंडर 120 रुपयांनी स्वस्त; अनुदानित गॅस सिलेंडरमध्ये 5.11 रुपयांची कपात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *सुधीर भार्गव यांची मुख्य माहिती आयुक्तपदी निवड, मंगळवारी राष्ट्रपती भवनात घेणार शपथ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला राज्यात सर्वोत्कृष्ट जिल्हा बँक पुरस्कार, राज्य सहकारी बँक असोसिएशनने केले जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नवी दिल्ली : तिहेरी तलाकवर राज्यसभेत विरोधकांचा गोंधळ, गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाज 2 जानेवारीपर्यंत स्थगित.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *बंगळुरू - कर्नाटकमधील ज्येष्ठ अभिनेते सी.एच. लोकनाथ यांचे निधन, 350 चित्रपटात केलं होतं काम.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *महाराष्ट्राच्या स्मृती मानधानाचा ICC कडून गौरव, 11 वर्षांनंतर भारतीय खेळाडूला मिळाला मान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://b.sharechat.com/Bks4qsAT6S Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नवीन वर्ष सुखाचे जावो* *🄷 🄰 🄿 🄿 🅈* *🄽 🄴 🅆 🅈 🄴 🄰 🅁* 2⃣0⃣1⃣9⃣ https://prajawani.in/news_page.php?nid=647 वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वर्ष नवे स्वप्न नवे* प्रत्येक वर्षाच्या डिसेंबरच्या पहिल्या दिवसापासूनच नूतन वर्षाची चाहूल लागलेली असते. पुढच्या वर्षी कुठला नवीन संकल्प करावा, असा विचार सुरू होतो. काहींच्या मनात सुरू असलेले विचार 'थर्टी फर्स्ट'च्या रात्रीच रंगबिरंगी मद्याच्या सुंगधात तर काहींचे सिगारेटच्या धुरात विरून जातात. परंतु, काहींचे संकल्प मात्र काळ्या दगडावरील रेघेप्रमाणे असतात. हे लोक आपले संकल्प कृतीतही आणतात. त्यांचे हे संकल्प एक- दोन दिवसासाठी नव्हे तर वर्षानुवर्ष पाळले जातात. मग त्यांची प्रेरणा घेऊन आपणही यावर्षी काही संकल्प करूया आणि ते पाळूयाही. *ह्या परीपाठाच्या प्रसारणा सोबतच* नूतन वर्ष सुरु होत आहे.धावत्या जगासोबत धावत असताना जीवनरूपी प्रवासात आपल्याला विविध प्रवृत्तीचे लोक भेटतात. आपण त्यांना गुणदोषांसहीत स्वीकारत असतो. त्यामुळे आपण काही अशा गोष्टींच्या इतके आहारी जातो, की त्याचा आपल्याला तर मन:स्ताप तर होतोच. परंतु, त्याच्या दुपटीने आपल्या कुटुंबाला होत असतो. आपण आपली नैतिक जबाबदारी लक्षात घेऊन अशा गोष्टींपासून पिच्छा सोडवून घेण्यासाठी निमित्ताची वाट बघत असतो. परंतु, त्या निमित्तासोबत आपल्या मनावरही आपला ताबा असला पाहिजे. स्वत:साठी वेळ काढा - घरातील कामकाज व नोकरीतील टेन्शन यात 'सॅंडविच' होत असते. त्यामुळे व्यक्तीचा स्वत:कडे लक्ष द्यायला फारसा वेळ मिळत नाही. दिवसभरातून किमान 10 ते 15 मिनिटे स्वत:साठी काढून ठेवली पाहिजे. या पंधरा मिनिटात आपण एखादा छंद जोपासू शकता. व्यायाम करून फिट राहू शकता. सकारात्मक विचार करायला शिका - एखाद्या चांगल्या गोष्टीचा उलटा अर्थ काढणे, त्यामुळे विनाकारण अधिक विचार करणे व त्या गोष्टीचा उगाच बाऊ करणे, हा आपला स्वभाव बनून जातो. त्यामुळे आपल्या मनावर तसेच आरोग्यावर विपरित परिणाम होत असतो. त्यासाठी नवीन वर्षात सशक्त व सकारात्मक विचारसरणीचा संकल्प केला पाहिजे. आपला विचार सकारात्मक असला म्हणजे भविष्यात आपले कोणीच वाईट चिंतणार नाही, हे ठामपणे ठरविले पाहिजे. अशा गोष्टी आपला आत्मविश्वास वाढवत असतात. अगदी कठिण परिस्थितीत आपल्याला सामना करण्याची हिंमत देतात. स्वत:ची कामे स्वत: करा - आपल्याला सगळ्यात जास्त त्रास स्वत:मुळेच होतो. कुठली ना कुठली वाईट सवय आपल्याला जडलेली असते. त्यात आपला आद्य शत्रू म्हणजे आळस. आपण किमान स्वत:ची तरी कामे स्वत: केली पाहिजेत. नियोजन आखून कामे उरकली पाहिजे. त्यामुळे आपल्याला कामाची शिस्त लागते.. *नव-वर्षाची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी वाट, नवा आरंभ, नवा विश्वास, नव-वर्षाची हीच तर खरी सुरुवात* *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही…! *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे पहिले राज्य कोणते ?* पश्चिम बंगाल *२) रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोठे आहे ?* मुंबई *३) ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कधी झाली ?* १९६५ *४) स्मार्ट सिटी स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे शहर कोणते ?* भुवनेश्वर *५) इस्त्रोची स्थापना कधी झाली ?* १९६९ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● सुरेश सावंत, नांदेड ● नंदन नांगरे ● भास्कर रेड्डी ● बालाजी वरगंटवार ● अतुल चव्हाण ● दिलीप धामणे, हिंगोली ● अनिकेत भारती, नांदेड ● राज जयस्वाल, माहूर ● धोंडिबा गायकवाड, धर्माबाद ● शेख बिस्मिल्ला सोनेशी ● मनमोहन कदम, धर्माबाद ● पांडुरंग कोकुलवार, नांदेड ● संजय पाटील शेळगावकर ● सतीश शिंदे ● मधुकर गिरमे ● सविता धर्माधिकारी, लातूर ● चंद्रकांत दामेकर, नांदेड ● सुनेत्रा बेल्लूरकर ● लक्ष्मीकांत बेंकट, करखेली *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• @@ *गुगली* @@ *नववर्षाभिनंदन* मावळत्याचा आदर नव्याचे स्वागत आहे अशांचीच किंमत जे या न्यायाने वागत आहे मावळत्याकडून धडा नव्या कडून शिकायला हव सर्वांना सुखा समाधानाच आनंदाच जावं हे वर्ष नव *नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा* शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 〰 ‼ *विचार धन* ‼ 〰 *एक छोटी कथा सांगितली जाते. एका दुष्काळी प्रदेशातील एक दुष्काळी गाव. नद्या, विहिरी आटलेल्या, पाण्यासाठी दशदिशा, आम्हा फिरविशी जगदीशा...अशी अवस्था. पावसाळा सुरू होतो. पाऊस काही येईना. शेवटी सगळा गाव एकत्र येतो. गंभीर परिस्थितीवर गंभीर चर्चा होते. उपाय सुचविले जातात. शेवटचा प्रयत्न म्हणून गावालगतच्या डोंगरावर जाऊन पावसासाठी देवाची प्रार्थना करायचे ठरते. सारा गाव ठरल्याप्रमाणे एकत्र येतो. थकलेली, तहानलेली पावलं नव्या उमेदीनं डोंगराकडे चालायला लागतात.* *या सर्व मोठ्या माणसांमध्ये एक मुलगा हातात छत्री घेऊन चालत असतो. या मुलाकडे बघून सर्वांना आश्चर्य वाटते. पावसाचा टिपूस नाही. येण्याची शक्यताही नाही आणि हा चिमुरडा सोबत छत्री घेऊन आलाय. शेवटी एकजण त्या चिमुरड्याला विचारतो..'बाळा, तू ही छत्री सोबत आणलीस?' छोटा मुलगा उत्तरतो. 'पावसासाठी प्रार्थना करायला आपण डोंगरावर जात आहोत आणि मी प्रार्थना केल्यावर पाऊस येणारच आहे. म्हणून मी छत्री सोबत घेतलीय.' हा स्वत:च्या प्रार्थनेवरचा ठाम विश्वास! एकूण दुसरं पाऊल पडणार आहे. या विश्वासावरच पहिलं पाऊल उचलावं लागतं.* 〰 ‼ *रामकृष्णहरी* ‼ 〰 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• नर नारी के सूख को, खांसि नहि पहिचान त्यों ज्ञानि के सूख को, अज्ञानी नहि जान। सारांश ज्ञानी माणसाला सुखाचा खजिना प्राप्त झालेला असतो. तो सुखाला कधीच पारखा होत नाही. सुखाच्या शोधासाठी स्वतःचं अस्तिव गमावून तो फसव्या मृगजळाच्या मागं धावत सुटत नाही. आपल्या कडच्या उपलब्ध साधनातून तो आनंदाची निर्मिती करतो. त्यात त्याला त्याच्या आनंद लहरी समाधान देत असतात. मात्र अज्ञानी माणूस सुखाच्या शोधात कस्तुरी मृगासारखा स्वतःची व स्वतः जवळील कस्तुरीची ओळख नसल्यामुळे धाव धाव धावतो अन ऊरी फुटून आत्मघात करून घेतो. सुखाचे कारंजे स्वतःच्या ठायीच दडलेले असूनही ते उजागर करता न आल्याने तो सुखाला पारखा होत असतो. त्याचे कारण म्हणजे अज्ञान. अज्ञानी माणूस केवळ भ्रमात जगत असतो. त्याला इच्छित गोष्ट साध्य झाली नाही की तो हताश व खिन्न होतो. हे हताशपण त्याला नैराश्याकडेही नेऊ शकते. मात्र ज्ञानी माणसाचं तसं नसतं तो भ्रमात जगत नाही. आपल्या आवाक्यातल्याच गोष्टी साध्य करण्याची त्याची कोशिश असते. त्यात तो यशस्वी नाही झाला तरी हिमत हारत नाही. अपयशाची कारणे शोधतो व नव्या उमेदीने पूनर्रभरारी घेत असतो. नपुंसकाला समागमाचे सुख काय कळणार ? तसे अज्ञान्याला ज्ञानी माणसाच्या सुखाची काय लज्जत चाखता येणार बरे ! एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• अज्ञानाला दूर घालवायचे असेल,दु:खाला दूर करायचे असेल,आपल्या मनातील रागावर नियंत्रण ठेवावे वाटत असेल,इतरांना आपलेसे करावे वाटत असेल,अवघड समस्येतून मार्ग काढायचा असेल आणि जीवन सुखी व समृद्ध व्हावे असे वाटत असेल तर त्यावर एक आणि एकच सर्वोत्तम मार्ग आहे तो म्हणजे ज्ञानाचा. ज्यांनी ज्ञानाचा मार्ग स्वीकारला आहे त्यांनी ह्या सा-या गोष्टीतून ज्ञानाच्या सहाय्याने सहज मारली काढून जीवन सुखी व समृद्ध केले आहे.ज्यांनी स्वीकारला नाही त्यांना त्यांच्या जीवनात कधीही सुखी होता आले नाही.ते जवळ असलेल्या सुखालाही मुकले आहेत कारण त्यांच्याजवळ ज्ञानाची जोड नव्हती म्हणून.या जगात सर्वश्रेष्ठ जर काय असेल तर ते ज्ञान. जीवनातील अज्ञानाला दूर करण्याचे सामर्थ्य केवळ ज्ञानातच आहे हे कधीही विसरुन चालणार नाही. ©व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद...९४२१८३९५९०. 🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अज्ञान - Ignorance* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मन करारे प्रसन्न* एक खूप प्राचीन कथा आहे. श्वेतकी नावाचा एक राजा होता. तो खूप यज्ञ करत असे. त्यामुळे त्याची खूप ख्याती झाली होती. त्याने एकदा सलग बारा वर्षे अग्नीदेवाला अखंड शुद्ध तुपाची आहुती दिल्याने अग्नी देवाची पाचनशक्ती वाढली. याचा वाईट परिणाम असा झाला, की अग्नीदेवतेचे तेज कमी झाले आणि तो मंद पडला मग त्याने ब्रह्मदेवाकडे धाव घेतली आणि त्यांना तेज परत मिळविण्याचा मार्ग विचारला. तेव्हा ब्रह्मदेवाने त्याला खांडव येथील जंगल जाळून टाकण्याचा सल्ला दिला. त्याने तसे केले, परंतु इंद्रदेवाने पाणी टाकून ती आग विझवली. मग त्याने कृष्ण आणि अर्जुनाला आपल्या साह्यतेचे आवाहन केले. अर्जुनाने अग्नी देवाला विनंती केली, की मला देवेंद्राशी युद्ध करण्यासाठी तू शस्त्रे पुरवायची. अग्नी देवाने त्याला गांडीव धनुष्य आणि दिव्यास्त्र दिले, तर कृष्णाला एक चक्र भेट दिले. यानंतर अग्नी देवाने आपल्या शक्तीद्वारे पुन्हा खांडव जंगल जाळण्यास सुरुवात केली. वाढत्या आगीने पृथ्वीवर मात्र हाहाकार माजला. त्यावर परत देवेंद्राने आपल्या शक्तीने पाऊस पाडण्यास सुरुवात केली, परंतु अर्जुन आणि कृष्णाने पावसाला रोखले. यावेळी इंद्राच्या मदतीला देव, असुर, यक्ष, राक्षस, सर्प असे अनेक जण धावून आले, परंतु या साऱ्यांचा कृष्ण आणि अर्जुनापुढे निभाव लागला नाही. अखेर अग्नी देवतेने आपली आग पसरवल्याने त्यांची तब्बेत पूर्ववत झाली. आणि त्यांच्या चेहऱ्यावर तेज परतले. तात्पर्य इतकेच की, जर शरीर सुखी असेल, तर मनही प्रसन्न राहते. आणि मन प्रसन्न तर चेहऱ्यावर आपोआप तेज दिसते. तुम्हाला ताजेतवाने दिसायचे असेल तर तुम्हाला आपले शरीर तर स्वस्थ ठेवायलाच हवे. परंतु, याच सोबत आपले मनही प्रसन्न ठेवणे गरजेचे आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment