✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 10/12/2018 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- *मानवी हक्क दिन* 💥 जन्म :- १८७० - सर जदुनाथ सरकार, इतिहासकार. १८७८ - चक्रवर्ती राजगोपालाचारी, स्वतंत्र पक्षाचे संस्थापक. १८८० - श्रीपाद कृष्ण बेलवलकर, प्राच्यविद्यापंडित. १८९२ - व्यंकटेश बळवंत पेंढारकर, मराठी नाट्य-अभिनेते, गायक. १९०८ - हसमुख धीरजलाल सांकलिया, भारतातील उत्खननविषयक संशोधनाचा पाया रचणारे पुरातत्त्ववेत्ते. 💥 मृत्यू :- १९४२ - डॉ. द्वारकानाथ कोटणीस. २००१ - अशोक कुमार गांगुली ऊर्फ दादामुनी, हिंदी चित्रपट अभिनेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *भोपाळः स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षिततेवरून काँग्रेसची राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *महानगरपालिका निवडणूक : धुळ्यात 60, तर अहमदनगरमध्ये 67 टक्के मतदान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *विजय मल्ल्ल्याच्या प्रत्यार्पण खटल्यासाठी सीबीआय आणि इडीचे पथक संचालक साई मनोहर यांच्या नेतृत्वात ब्रिटनला रवाना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पुणे : राज्यात पडलेल्या दुष्काळाचा मोठा फटका यंदा आवळा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. दुष्काळामुळे उत्पादन तब्बल ७० टक्क्यांनी घटले असल्याचे आवळ्याचे व्यापाºयांनी स्पष्ट केले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *राज्यभरातील दुष्काळी भागातील रुग्णांना इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्र या संस्थेच्या सर्व सदस्य असलेल्या डॉक्टरांकडून सवलतीच्या दरात उपचार दिले जाणार आहेत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *महाराष्ट्राने मिळवले खेलो इंडिया युवा स्पर्धेचे यजमानपद, पुण्यात रंगणार स्पर्धा; देशभरातील ९ हजार खेळाडूंची नोंदणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मलेशियाचा ५-३ ने पराभव करत जर्मनीने निश्चित केला उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सन 1998 मध्ये प्रचंड गाजलेली पुस्तिका खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *चंदर - किशोर कादंबरी* खालील ब्लॉगवर *दुसरा भाग* वाचन करता येईल. https://shabdghar.blogspot.com/2018/12/blog-post_9.html वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक *अरुण वि. देशपांडे, परभणी/पुणे* 9850177342 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जदुनाथ सरकार* जदुनाथ सरकार देशातील प्रसिद्ध इतिहासकार हाते. त्यांनी भारताच्या मोघलकालीन इतिहासाचे लेखन करून मोठे योगदान दिले आहे. त्यांचा जन्म १0 डिसेंबर १८७0 रोजी बांगला प्रांतात झाला. त्यांचे शिक्षण कलकत्ता येथे झाले. १८९८ मध्ये प्रांतीय शिक्षण सेवेसाठी त्यांची निवड झाली. त्यांनी कलकत्ता, पाटणा व उत्क लमध्ये इंग्रजी व इतिहास शास्त्राचे विभागप्रमुख म्हणून काम केले. १९१७ मध्ये त्यांनी निवड काशीच्या हिंदू विद्यापीठाच्या इतिहास विभागप्रमुख म्हणून झाली. मात्र पुढच्या वर्षी त्यांनी काही कारणामुळे हे पद सोडून रेवेंशा काँलेज उत्कल जॉईन केले. ब्रिटिश सरकारने त्यांची प्रतिभा ओळखून त्यांना शिक्षणसेवेत संधी दिली. यानंतर ते कलकत्ता विद्यापीठात उपकुलपती म्हणून नियुक्त झाले. १९२३ मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना आय.ई. तर १९२९ मध्ये सर पदवी बहाल केली. यदुनाथ सरकार यांचे पहिले पुस्तक इंडिया आँफ औरंगजेब, टोपोग्राफी, स्टेटिस्टिक्स अँड रोड १९0१ मध्ये प्रकाशित झाली. औरंगजेब का इतिहास दोन खंडात प्रकाशित झाले. त्यांचेच पुस्तक शिवाजी अँड हिज टाईम्स १९१९ मध्ये प्रकाशित झाले. या पुस्तकांचे फारसी, मराठी, राजस्थानी व युरोपीयन भाषांमधील उपलब्ध सामुग्रीचा सावधपणे उपयोग करून सरकारने ऐतिहासिक संशोधनाचे कार्य केले. सोबतच मुलभूत आधारावर संशोधनाची सुदृढ परंपराही यामुळे सुरू झाली. यासाठी यदुनाथ सरकार यांनी दिलेले योगदान अमूल्य व अतुलनीय आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) केंद्रीय मंत्रिमंडळाने मध्यंतरी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला ?* मल्याळम *२) २0१३ चा मॅन बुकर पुरस्कार कोणाला मिळाला ?* लिडिया डेव्हिस *३) एम. चिन्नास्वामी स्टेडियम कोठे आहे ?* बेंगळुरू *४) कोणत्या भारतीय शहराला 'उगवत्या सूर्याचा प्रदेश' असं म्हणतात ?* इटानगर *५) 'तेज कदम' हे भारताने कोणत्या देशासोबत संयुक्तपणे जारी केलेले निवेदन आहे ?* कझाकस्तान *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● संदीप मस्के ● दशरथ शिंदे ● विठ्ठल जांभळे ● शिवानंद हिंदोळे ● दत्ताहरी भीमरतवार ● अमोल पाटील सलगर ● अनिल यादव ● श्रीकांत मॅकेवार ● संभाजी धानोरे ● प्रवीण वाघमारे ● लक्ष्मण पद्मावार ● दिनेश वाढवणकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••• *कृती* विचाराला कृतीची जोड बसावी लागते कृती होईल एवढी ओढ असावी लागते मनात ओढ असल्यास सहज कृती होते कार्य करण्याची त्यातून तर मनोवृत्ती होते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *'जन्म आणि मृत्यू' या माणसाच्या आयुष्यातील गुंतागुंतीच्या संकल्पना. जन्म म्हणजे काय. मृत्यू म्हणजे काय. ते कसे घडतात किंवा त्यांचेमागे कोण आहे ? त्या दोन संकल्पनांच्या आधी किंवा नंतर म्हणजे त्याच्या आगे-मागे काय असते ? याविषयी काहीसे धुसर धुसर व्यक्त होत असते. परंतु ठामपणे कोणीच काही म्हणत नाही. उमर खय्याम म्हणतात.. 'जन्म आणि मृत्यू' ही माणसाच्या जीवनातील न उलगडणारी कोडी आहेत.* *ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू अटळ आहे, हे मात्र सत्य ! जन्म आणि मृत्यू या दोन टोकांत असणा-या एका मोठ्या व्हरांड्यात माणसाचे येरझारा घालणे म्हणजे जीवन. ही दोन टोके, दोन ध्रुव ठरलेले आहेत. त्यात चालत राहणे एवढे मात्र खात्रीपूर्वक आपल्या हातात आहे, असे मानले तर या चालण्याचा प्रवास, इथला आपला मुक्काम मन:पुर्वक व्हायला हवा; पण तो तसा होत नाही. या दोन टोकांच्यामध्ये येरझारा घालता घालता आपण बरेचदा ठेचकाळतो, भरकटतो, चुकतो, गांगरतो, गोंधळतो, हरतो आणि जिंकतोदेखील ! जेव्हा या चालण्यात काही प्रमाणात यशस्वी होतो तेव्हा त्याचे श्रेय आपल्याकडेच घेतो. पण जेव्हा हरतो तेव्हा मात्र त्याची अनेक कारणे आपल्या तल्लख बुद्धीतून झराझरा बाहेर पडतात.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जब घटि मोह समाईया, सबै भया अंधियार निरमोह ज्ञान बिचारि के, साधू उतरै पार। सारांश जोपर्यंत मनाला मोह चिटकलेला आहे. तो पर्यंत षडविकारांची उत्पत्ती होतच राहाणार. मनाच्या अधिन राहून अज्ञानांधःकाराचा नाश करता येणे अशक्य आहे. कर्मेंद्रिये जर बुद्धि सापेक्ष राहिली व मनाची अवस्था निर्मोही तयार झाली तरच सत्कर्मे संभव आहेत. मोहातून मुक्त व्हायचं असेल मनाला जडलेली आसक्ती दूर सारावी लागेल. मनावर दाटलेलं मोहाचं मळभ फक्त संतंच दूर करू शकतात. संत संगतीत राहून सांसारिक आसक्तीचे पाश दूर सारता येतात. निखळ, निर्मळाची ओळख करून देण्याची किमया संतांठायी असते. ते कधीच माया मोहात गुरफटून पडत नाहीत. संसारी माणसांची अवस्था पतंगासारखी झालेली आहे. दिव्यापासून प्रकाशाची निर्मिती होते. त्याच्यापासून निर्माण होणार्या उजेडातून खरं तर दूरवरचा शोध घ्यायचा असतो. परंतु पतंग दिव्यावरंच झेप घेत असतात. आपल्या अस्तित्वाचा त्यांना विसर पडतो. अग्निशी टकरून स्वतःचे इवले इवले पंख जाळून घेवून ते जायबंदी होवून जातात. व तडफडत आयुष्य संपवून घेतात. दिव्याचा क्षणिक मोह पतंगांची ती अवस्था करीत असेल तर मानवात आसक्ती मुळे निर्माण होणारा मोह काय अवस्थेला नेईल याची ओळख संत करून देतात. षडविकारापासून दूर राहिले तर मानवाला जीवनानंद घेता येईल व जीवनात भव सागर तरून जाईल. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 मुल घडवताना..........✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मुलांचा व्यक्तीमत्त्व विकास करणे म्हणजे त्यांचे अंतरंग विकसित करणे होय. विकासासाठी मुलांमध्ये प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा, नम्रता यांसारख्या नैतिक मूल्यांची ओळख होणे, एवढा एकच उद्देश नसून त्याचे संवर्धन होणेही महत्त्वाचे आहे. खरेतर आपली संस्कृती एवढी महान आहे की, त्यातील विविध गोष्टी, राष्ट्रपुरुषांची उदाहरणे, धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे केले जाणारे आचरण यांप्रमाणे कृती केली आणि ते गुण आपल्यात आणण्याचा प्रयत्न केला, तरी खऱ्या अर्थाने व्यक्तीमत्त्व विकसीत होईल गुंडेवार मा स जि.प.प्रा.शा गोंडेमहागाव ता. किनवट. जि नांदेड़ संपर्क _9623124594 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संवर्धन - Promotion* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माकड , कोल्हा व जंगल* (प्राणी) एकदा एक वानर व कोल्हा यांची जंगलात भेट झाली तेव्हा माकड कोल्ह्याला म्हणाला, 'अरे, तुझ्या झुपकेदार शेपटाचा काही भाग तू मला देतोसका तर तो मी लावून वार्यापासून माझं रक्षण करीन. मला त्याचा उपयोग होईल.तुझे शेपूट खूप झुबकेदार आहे.तुला पुरून उरण्यासारख आहे. नाही तरी तू ते धुळीत मळवतोस. तर त्यातलं थोडं मला दिलस तर तुझी फारशी अडचण होणार नाही अन् माझंही काम होईल. हे ऐकून कोल्हा म्हणाला, 'अरे माकडा तू म्हणतोस त्याप्रमाणे माझं शेपूट कदाचित मोठं असलं, तरी ते मी जन्मभर असंच धुळीत मळवीन पण त्यातला एक केसही तुला देणार नाही.' तात्पर्यः काही स्वार्थी प्रवृत्तीचा माणसांजवळ सर्व असून पण ते दुसऱ्याचा उपयोगी येत नाही.खर तर माणसाने इतरांच्या मदतीला कसे जाता येईल हा विचार नेहमी ध्यानीमनी ठेवून जगावे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment