✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 04/12/2018 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भारतीय नौसेना दिन* 💥 ठळक घडामोडी : १८२९ - भारतीयांचा कट्टर विरोध असूनही लॉर्ड बेंटिंकने जाहीनामा काढून सतीच्या प्रथेला मदत करणार्यांना खूनी ठरवले जाईल असा कायदा केला. १९७१ - भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध) - भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून संयुक्त राष्ट्रांनी आणीबाणीची बैठक बोलवली. १९७१ - भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध)-ऑपरेशन ट्रायडेंट - भारतीय आरमाराने कराचीवर हल्ला केला. 💥 जन्म :- १९१९ - इंद्रकुमार गुजराल, भारताचे पंतप्रधान. १९४३ - फ्रान्सिस दिब्रिटो, कॅथॉलिक ख्रिस्ती फादर, मराठी लेखक. 💥 मृत्यू :- १९७५ - हाना आरेंट, जर्मन तत्त्वज्ञ, लेखिका. १९८१ - ज.द. गोंधळेकर, मराठी चित्रकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज दोन दिवसांच्या अबूधाबी दौऱ्यासाठी रवाना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई - अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळाप्रकरणी अटक राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *पैशांसाठी खासगी रुग्णालयांकडून सिझेरियन डिलेव्हरी- सर्व्हे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई - मराठा आरक्षणाविरुद्ध हायकोर्टात याचिका, अॅड. गुणवंत सदावर्तेंच्यावतीने याचिका दाखल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *रिलायन्सच्या टीना अंबानी, वित्त मंत्री मुनगंटीवार, पंकजा मुंडे, डॉ. रणजित पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते कॅन्सर केअर हॉस्पिटलचे करण्यात आले उद्घाटन.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *चंद्रपूर : सर्वाधिक पासपोर्ट असलेला भारत देश जगात तिसरा. लवकरच पहिल्या क्रमांकावर येईल- हंसराज अहिर. चंद्रपूर येथे पासपोर्टचे 238 वे पासपोर्ट केंद्र सुरू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *विश्वचषक हॉकी स्पर्धा : स्पेनने फ्रान्सविरुद्ध पुरुष विश्वचषक हॉकीच्या अ गटातील सामना १-१ असा ड्रॉ केला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://sharechat.com/post/jRy75Aw Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बालविवाह* https://nasayeotikar.blogspot.com/2017/05/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आर व्यंकटरमण* रामास्वामी व्यंकटरमण हे भारताचे आठवे राष्ट्रपती होते. ते १९८७ ते ९२ दरम्यान या सर्वोच्च पदावर राहिले. व्यंकटरमण यांचा जन्म तामिळनाडूमधील तंजौरनजीकच्या पट्टकोट्ट या गावात झाला. त्यांचे बहुतांश शिक्षण मद्रास येथे झाले. मद्रास विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी घेतली. नंतर त्यांनी कायद्याचा अभ्यास केला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी वकिली केली. वकिली करत असतानाच त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढय़ातही सहभाग घेतला हेाता. भारत छोडो आंदोलनात ते सक्रिय होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांची योग्यता पाहून भारत सरकारने त्यांना देशाच्या सर्वोत्कृष्ट वकिलांमध्ये स्थान दिले. विद्यार्थी राजकारणात सक्रिय असल्याने ते लवकरच राजकारणात आले. १९५२ ते ५७ दरम्यान ते देशाच्या पहिल्या संसदेचे सदस्य राहिले. १९५३ ते ५४ दरम्यान त्यांनी काँग्रेसचे सचिव म्हणूनही काम पाहिले. खासदार असूनही त्यांनी लोकसभेचा राजीनामा देऊन तामिळनाडू सरकारमध्ये मंत्री म्हणून पदभार स्वीकारला. १९६७ मध्ये ते योजना आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्त झाले. लोकसभेत तर त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणूनही काम पाहिले. इंदिरा गांधी यांच्या सरकारमध्ये त्यांनी अर्थमंत्री म्हणून काम केले. नंतर त्यांना संरक्षण खाते सोपविण्यात आले. ऑगस्ट १९८४ मध्ये ते देशाचे उपराष्ट्रपती झाले आणि २५ जुलै १९८७ रोजी त्यांनी देशाचे आठवे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) पेट्रोलियम तेलाचे सुप्त साठे कोणत्या खडकात आढळतात ?* स्तरित खडकात *२) दामोदर खोरे योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात हाती घेण्यात आली ?* पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळात *३) रोहा ते मंगलोर दरम्यान रेल्वे कधी सुरू झाली ?* २६ जानेवारी १९९८ *४) ग्रीसमध्ये कोणती शासनपद्धती अस्तित्वात आहे ?* अध्यक्षीय शासन पद्धती *५) 'तफसीर-ए-गालिब' चे लेखक कोण ?* ग्यानचंद जैन. *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● नागनाथ चेटलूरे, कुंडलवाडी ● उमाकांत शिंदे ● वैशाली बाळासाहेब भामरे ● शेख आलीम ● प्रभू अण्णा *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दु:ख* अबोल माणूस जेव्हा कुठं बोलकं होतं व्यक्त झालं म्हणजे दुःख हलकं होतं व्यक्त व्हायला हक्काची जागा असावी लागते दुःखी माणसाला यापेक्षा आणखी काय लागते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••a *खरंच, काही 'उपकार' असे असतात, की त्यांची परतफेड होऊ शकत नाही. काही 'उपकार' सदैव स्मरणात ठेवायचे असतात व कोणतेच 'उपकार' विसरायचे नसतात. अलिकडे कृतज्ञतेची जाणिव तरी कितपत शिल्लक राहिलेली आहे ? ज्याचा आधार घेऊन माणूस पुढे सरकतो, त्या आधारालाच नंतर धक्का देऊन बाजूला केलं जातं. यालाच जगरहाटी म्हणण्याची हिणकसता ब-याचवेळी तुम्ही आम्ही आपण सारे स्विकारतो.* *माझ्यावर झालेले माझ्या माता-पित्यांचे, गुरूंचे, व्यक्तिगत वाटचाल करीत असताना सभोवतीच्या असंख्य ज्ञात-अज्ञात लोकांचे 'उपकार' हे माझ्या स्मरणकप्प्यातील एक सुगंधी भाग आहे, ही अगदी सामान्य भावना सातत्याने तेवत ठेवणे, म्हणजेच आपण आपले 'माणूसपण' जिवंत ठेवणे होय. या भावनेचाच जर विसर पडणार असेल, तर आपण पाषाणवत झालो आहोत हे कोणी वेगळे सांगण्याची गरज नाही. 'उपकार' फेडायचे नाहीत, तर ते सदैव स्मरणात ताजे राहतील अशी व्यवस्था करायची, कारण पुढच्या क्षणाचे भविष्य कोण सांगू शकेल ?* ••●‼ *रामकृष्णहरी*‼●•• 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• शीलवंत सबसे बड़ा, सब रत्नन की खान । तीन लोक की संपदा, रही शील में आन।। सारांश- महात्मा कबीर म्हणतात "शीलवान किवा संतुष्ट व्यक्ती जगात सर्वात श्रेष्ठ आहे. शीलवान माणसे रत्ना-मानकांच्या तुलनेत चांगली मानली जातात. ज्या व्यक्तिंच्या अंतरात शालीनता वास्तव्य करते ती व्यक्ती विश्वात श्रेष्ठत्वाला पात्र ठरते . चंद्राची शितलता ,सुर्याची तेजस्वीता सागराची विशालता सज्जनाने अंगी धारण केलेली असते. सर्वावर ते कैवल्याचं चांदणं शिंपित असतात. प्रसंगी प्रखरपणे शिष्य व सोबत्याला परिणामांची जाणीव करून देत असतात. खळ कितीही वाकडा वागला तरी त्याचं वाकडेपण निघुन जावं . अशीच प्रार्थना विशाल हृदयानं ते विधात्याकडं करीत असतात. शीलवंत सज्जन खरं तर रत्नांच्या म्हणजेच सद्गुणांच्या खाणीच असतात . शील म्हणजे विशुध्दीचामार्ग आत्मशुद्धीकरणाचा मार्ग. या विशुधीमार्गानुसार चांगल्या जीवनाची पाच तत्वे आहेत, ज्याला पंचशील म्हणतात. १) कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे, २) चोरी न करणे, ३) व्यभिचार न करणे, ४) खोटे न बोलणे व ५) मादक पदार्थाचे सेवन न करणे. अश प्रकारच्या श्रेष्ठ आचरणापुढे कोणतीही भौतिक वस्तू कितीही मोलाची असौ. ती फिकीच वाटायला लागते ! एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण आपल्या दैनंदिन जीवनात काय केले आहे हे आपण जिथे नोंद करुन ठेवलेली असते.त्यात काल,आज आणि उद्या या तिन्ही काळाचा उलगडा केलेला असतो.आपण आपल्या जीवनात कसे वागलो आहोत त्याचीही नोंद केलेली असते.कधी आपल्याला विस्मरण झालेले असेल तर ते स्मरण करुन देण्याचे काम ती करते.आपण किती खरेखोटे जीवनात इतरांशी बोललो किंवा वागलो त्याचाही हिशोब ती आपणच नोंदवलेल्या शब्दांत आपल्यासमोर आरशासारखे काम करते.ती एक आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेली असते.तिला आपण कधीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी विसरु शकत नाही.एवढे प्रेम ती आपल्यावर करते आणि आपण तिच्यावर करतो.ती आपल्याला आपल्या जीवनात सतत प्रेरणा देते आणि आपल्या जीवनाला तिला पाहून, वाचून सावरतो अशी प्राणप्रिय वस्तू म्हणजे डायरी अर्थात आपली रोजनिशी.जी माणसे जीवनात खरे यशस्वी होतात ती आपल्या जीवनात घडलेल्या, घडून गेलेल्या आणि घडणाऱ्या घटनांची सत्यतेची नोंद करतात आणि त्यासाठी ती डायरी अत्यंत मोलाचे काम करते.तीच आपल्यासाठी कोणत्याही काळात न बदलणारी,सत्य उलगडून आपल्यातील दोष दूर करण्यासाठी जाणीव करून देणारी खरी मैत्रीण असते ती आपल्या जीवनात असायलाच हवी नाहीतर आपल्या जीवनातले दुसरे कोणीही एवढे काम करणार नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०. 📚📝📚📝📚📝📚📝📚📝📚 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *धूर्त - Sly* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *धूर्त कोल्हा* एका शेतकर्याच्या शेतावर एक कुत्रा व एक कोंबडा राहत होते. एके दिवशी कुत्रा कोंबड्याला म्हणाला, ''एकाच ठिकाणी राहून फार कंटाळा आला आहे. आपण सहलीला जाऊन येऊ या का?'' कोंबड्याने होकारार्थी मान हलवली. दुसर्या दिवशी मालकाचा डोळा चुकवून ते दोघे सहलीला निघाले. त्यांनी सोबत काही मांसल हाडे व कुरकुरीत बिया खाण्यासाठी नेल्या. जंगलात दिवसभर सहलीचा आनंद लुटल्यावर रात्र पडल्यानंतर त्यांनी एका डेरेदार वृक्षाचा आसरा घेतला. वृक्षाच्या ढोलीत कुत्रा झोपला तर कोंबडा उंच फांदीवर आराम करू लागला. जेव्हा पहाट झाली तेव्हा कोंबड्याने सवयीप्रमाणे बांग दिली. कोंबड्याच्या बांगेने जवळ राहणार्या कोल्हय़ाला जाग आली. मजेदार मेजवानीच्या आशेने त्याच्या तोंडातून लाळ टपकू लागली. तो त्या वृक्षाजवळ आला व कोंबड्याला म्हणाला, ''नमस्कार महाशय, जंगलात तुमचे हार्दिक स्वागत आहे. येथे एकटा राहून मलाही कंटाळा आला होता. बरे झाले तुमची सोबत मिळाली.'' चतुर कोंबड्याने कोल्हय़ाच्या या खोट्या प्रशंसेमागील कावा ओळखला व तो म्हणाला, '' तुम्हाला भेटून मलाही आनंद झाला, तुम्ही या वृक्षाच्या ढोलीकडे जा. तेथे माझा दारवान तुमचे स्वागत करायला तयार आहे.'' कोल्हय़ाला काही संशय आला नाही. तो ढोलीकडे गेला. तेथे स्वागत करायला उभा असलेला कुत्रा पाहून कोल्हय़ाला घाम फुटला व तो तडक तेथून पसार झाला. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment