✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 31/12/2018 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वर्षातील शेवटचा दिवस* 💥 ठळक घडामोडी :- २0१२: अनुदानाचे पैसे रोख स्वरूपात लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करण्याची अभिनव योजना देशातील २0 जिल्ह्यांमध्ये सुरू होणार. २0१३ : घरकुल घोटाळ्यातील संशयित आमदार गुलाबराव देवकर यांना अटक. २0१५ : सरकारी नोकर्यांमध्ये श्रेणी तीन आणि चारच्या पदांसाठी मुलाखती घेण्याचा प्रघात बंद करण्याची पंतप्रधानांची घोषणा. 💥 जन्म :- १९१0 श्रेष्ठ गायक मल्लिकार्जुन मन्सूर यांचा जन्म. 💥 मृत्यू :- १९२६ इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे निधन. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली - सिक्किम येथील बर्फाच्छादित प्रदेशात अडकलेल्या 2500 नागरिकांची भारतीय सैन्याकडून करण्यात आली सुटका* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हॅवलॉक द्वीपचं नामकरणं स्वराज द्वीप, नील द्वीपचे शहीद द्वीप तर रॉस द्वीपचं नाव नेताजी सुभाषचंद्र द्वीप असं केलं.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *जळगाव : जामनेरमध्ये राज्यस्तरीय तावडी बोली साहित्य संमेलनास ग्रंथदिंडीने सुरुवात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *कोलकाता - दादासाहेब फाळके पुरस्कारप्राप्त चित्रपट दिग्दर्शक मृनाल सेन यांचे निधन, ते 95 वर्षांचे होते* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष लोकसभेची निवडणूक स्वतंत्र लढणार- नारायण राणे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पुणे - पहिल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या 65 किलो गटात महाराष्ट्राच्या सोनबा गोंगणेला सुवर्ण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मेलबर्न कसोटीत विजय मिळवून विराट कोहलीने परदेशात सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या भारतीय कर्णधाराच्या विक्रमाशी केली बरोबरी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://b.sharechat.com/3j1UDW5e5S Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 31 डिसेंबरला वर्ष संपते तसे कॅलेंडर देखील संपते आणि खुंटीला नवीन कॅलेंडर लटकविली जाते. त्याविषयीचा लेख *हर कॅलेंडर कुछ कहता है ।* https://nasayeotikar.blogspot.com/2018/12/blog-post_30.html वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक *नागोराव सा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचा जन्म १२ जुलै १८६३ रोजी पुण्यात झाला.ते मराठी इतिहास-संशोधक होते. त्यांनी संपादित केलेले मराठ्यांच्या इतिहासाची साधने ह्या ग्रंथाचे २२ खंड हे मराठा साम्राज्याच्या इतिहासाच्या अभ्यासासाठीचे महत्त्वाचे साधन मानले जाते. बी.ए. पयर्ंतचे शिक्षण झाल्यावर त्यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये काही दिवस शिक्षक म्हणून काम केले. इंग्रजी भाषेतील उत्कृष्ट ग्रंथांचे भाषांतर करून ते प्रकाशात आणण्यासाठी त्यांनी भाषांतर नावाचे मासिक सुरू केले हाते.१८९८ साली त्यांनी लिहिलेल्या मराठ्यांच्या इतिहासाची साधने या ग्रंथाचा पहिला खंड प्रकाशित झाला. जुलै ७, १९१0 रोजी भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना त्यांच्या पुढाकाराने झाली. राजवाडे म्हणायचे, ज्ञानार्जनाची हौस असेल तर माझी मराठी भाषा पाश्चिमात्य लोक शिकतील; माझ्या ग्रंथांची पूजा करतील. मी परकीय भाषेत माझा ग्रंथ लिहिणार नाही. मी कीर्तीला हपापलेला नाही. महाराष्ट्राच्या विचारविश्वात इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचा मोठा दरारा, दबदबा आणि धाक होता. राजवाडे आपल्या हयातीतच एक आख्यायिका बनून गेले होते.त्यांच्यावर भरपूर टीका झाली. त्यांच्या हयातीतच प्रबोधनकार के.सी. ठाकरे, विठ्ठल रामजी शिंदे, जिवाजी मंगेश तेलंग यांनी त्यांना चांगलंच धारेवर धरले होते. नंतरही इतिहाससंशोधक त्र्यं.शं. शेजवलकर यांनी राजवाडे यांच्या र्मयादा स्पष्ट केल्या. तथापि, राजवाडे यांचे वाक्य न वाक्य ब्रह्मवाक्य मानणारा एक वर्ग अस्तित्वात राहिलाच. विशेष म्हणजे मराठी विचारविश्वात याच वर्गाचे वर्चस्व असल्यामुळे राजवाडे यांचे स्थान अबाधित राहिले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• “विचार करा निर्णय घ्या, आणि तुम्हाला जे योग्य वाटत तेच करा.” *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) मुख्य निवडणूक आयुक्त आणि सहआयुक्ताची नेमणूक कोण करतात ?* राष्ट्रपती *२) कोणत्या वनस्पतीची पोषण पद्धती परजीवी प्रकारची असते ?* अमरवेल *३) 'द कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स'ची स्थापना कधी करण्यात आली ?* १९२६ *४) तामिळनाडूच्या पश्चिमेकडील १0 जिल्ह्याचा भाग कोणत्या नावाने ओळखला जातो ?* कोंगुनाड *५) युरोप खंडाची राजधानी म्हणून ओळखलं जाणारं शहर कोणतं ?* माश्रेलिस *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● सचिन चव्हाण ● शशांक पुलकंठवार ● ताहेर पठाण ● अमोल बुरुंगुळे ● प्रकाश तामसकर ● रामचंद्र रेड्डी सामोड ● किरण अबुलकोड ● शिवाजी खुडे ● राजेश्वर रामपुरे ● रेहान खान ● मारोती बोलेवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *विश्वास* नाती टिकवायला महत्त्वाचा विश्वास आहे विश्वास म्हणजेच नात्यातला श्वास आहे श्वासावीना जसे माणूस जगत नसतो अविश्वासाने कोणी प्रेमाने वागत नसतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपण मित्राला बोलतो, 'उद्या मला सकाळी फोन कर, मग आपण ठरवू या.' असं म्हणताना आजची रात्र सुखरूप पार करून उद्याची सकाळ आपण अनुभवणार आहोत यावर आपला ठाम विश्वास असतो. असे छोटे छोटे विश्वास ठेवल्याशिवाय गाडा पुढे हाकता येत नाही.* *एक बस स्टँडच्या फलाटाला लागते. आपण गावाच्या नावाची पाटी वाचून खात्री करून घेतो आणि बसमध्ये चढतो. तिकीट काढतो. सोबतचा घडी केलेला पेपर उघडून वाचायला लागतो किंवा डोळे बंद करून डुलक्या घेतो. हलणा-या बसमध्ये निवांतपणे खिडकीतून बाहेर बघत बसतो. काही वेळा चिल्लर पैशांवरून कंडक्टरशी वाद होतात. वळण घाटाचा रस्ता पार करून आपल्या थांब्यावर बस आणून सोडते. या सगळ्या प्रवासात बस चालवणा-या ड्रायव्हरचा चेहराही आपण पाहिलेला नसतो. त्या ड्रायव्हरच्या भरोशावर आपण बसमध्ये निवांतपणे बसलेलो असतो. कंडक्टरशी रुपया आठाण्यावरून वाद करणारा प्रवासी स्वत:चा जीव, चेहराही न पाहिलेल्या ड्रायव्हरच्या हवाली करतो. किती विश्वास ठेवतो आपण अनोळखी माणसावर.. 'विश्वास' फार महत्वाचा असतो.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ☘☘☘☘☘☘☘☘☘ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• दूजा हैं तो बोलिये, दूजा झगड़ा सोहि दो अंधों के नाच मे, का पै काको मोहि। सारांश विधाता निर्गुण निराकार आहे. तो सर्व विश्व व्यापून उरलेला आहे. तरी त्याची विभिन्न मुर्त रूपे उभी करून एकमेकात विनाकारणंच भांडून घेणार्यास उद्देशून महात्मा कबीर म्हणतात परमात्मा वेगवेगळा असता तर तुमचं म्हणणं मान्य केलं असतं. माझाच देव श्रेष्ठ आहे व इत्तरांचा चुकीचा आहे असे माणण्यातच तर भांडणाचं मुळ दडलेलं आहे. तेच भांडणाला कारण ठरतं. दोन अंधांच्या नाचण्यावर कोण अांधळा कोणत्या कारणाने त्या अंधावर मुग्ध किवा प्रसन्न होईल ? लिळाचरित्रात आंधळ्यांचा दृष्टांत सांगितलेला आहे. एका गावात सहा आंधळे असतात. त्यागावी एक हत्ती येतो. आंधळ्यांना हत्ती पाहाता येत नाही. प्रत्येक आंधळा आपआपल्या परीने हत्तीला चाचपून घेतो. त्यांना झालेल्या स्पर्श ज्ञानावरून ते हत्तीच्या रूपाचं वर्णन करायला लागतात. ज्याच्या हाती कान लागला, तो हत्ती सुपासारखा असल्याचे सांगतो. ज्याने सोंड चाचपली, तो हत्ती मुसळासारखा आहे म्हणतो. ज्याने पाय चाचपले, तो हत्ती खांबासारखा असल्याचे सांगतो. ज्याचा स्पर्श हत्तीच्या पोटाला झाला, त्याचे म्हणणे असते हत्ती पोत्यासारखा आहे. ज्याने पाठ चाचपून घेतली, तो हत्ती भिंतीसारखा असल्याचे सांगतो. ज्याने शेपटीला स्पर्शलेले असते, त्याला हत्ती खराटा म्हणजे झाडूसारखा भासतो. शेजारीच त्यांचा संवाद ऐकणारा एक डोळस असतो. त्याने पूर्ण हत्ती पाहिलेला असतो. तो संवाद ऐकून म्हणतो, तुम्ही तर फक्त हत्तीच्या अवयवांनाच हत्ती समजत आहात . प्रत्यक्षात हत्ती तर महाकाय आहे. तसं विधात्याचं स्वरूपही विश्वात्मक आहे.तो सर्वव्यापी आहे. त्याला जाणण्याची आत्मदृष्टी जवळ असायला हवी. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• संकल्प करा अथवा करु नका शेवटी निर्णय तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी सज्ज रहा.कारण ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या गोष्टीसाठी सातत्याने प्रयत्न करा म्हणजे तुमचे तुम्हाला निश्चितच मिळेल.मी असे करणार आहे मी तसे करणार आहे असे जगाला सांगत सुटू नका.जग काही म्हणतील त्यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही किती दिवस चालणार ?चार दिवस तुम्ही त्यांच्यासमोर करणार आणि काही दिवस निघून गेले की, पुन्हा तेच करणार.म्हणजे तुमचा तुमच्यावर विश्वास नाही असेच होईल ना ! संकल्प असे करा की,ते आयुष्यभर आपल्या जीवनासाठीच आहेत.मग तुम्हाला वर्षाची किंवा वर्ष संपल्यानंतर नवीन वर्षाच्या प्रारंभी करायची काही गरजच नाही.दिवस,महिने,वर्ष येतात जातात याकडे लक्ष देऊ नका,पण आयुष्य हे एकदाच येते आणि ते अमर्यादित म्हणजेच आयुष्याच्या शेवटपर्यंत असेल.आपण केलेले संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्या मनाचा ठाम निर्धार असला की,काही दर वर्षी शेवटी सोडायचे आणि नवीन धरायचे किंवा करायचे असेही करायचे नाही.काळ आणि वेळ कुणासाठी थांबत नाही तर आपण काळाची पावले ओळखून आपण आपले जीवन आनंदमय आणि सुखमय कसे जाईल याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.तुम्ही निर्माण केलेले आणि प्रत्यक्ष जीवनात अनुसरलेले संकल्प हे इतर लोक आपोआपच अनुकरण करतील आणि करायलाही लागतील.हा तुमचा तुम्ही सुरवातीपासून केलेला आदर्श संकल्प नवीन वर्षासाठी इतरांना अनुकरणीय ठरेल यात शंकाच नाही. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अपघात - Accident* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वरपांगी पाहून निर्णय न घेणे* एका प्रवासी बोटीला भर समुद्रात अपघात होतो. त्यावर एक जोडप प्रवास करत असत. ते दोघेही जीवरक्षक बोटीपाशी येतात. त्यांना दिसत की बोटीत एकच जागा शिल्लक आहे. पती,पत्नीला बुडत्या बोटीवर मागे ठेउन जीवरक्षक बोटीत उडी मारतो! पत्नी बुडत्या बोटी वर थांबते! बोट पाण्याखाली जाण्याआधी ती पतीकड़े पाहून जीवाच्या आकांताने काही तरी ओरडून सांगते! शिक्षक गोष्ट सांगायचे थांबून विचारतात, "पत्नी पतीला काय म्हणाली असेल? बहुतेक विद्यार्थी म्हणतात, मला तुम्ही धोका दिलात! मी तुम्हाला ओळखलेच नाही!!" एक मुलगा मात्र गप्पच असतो. शिक्षक त्याला विचारतात, "अरे, तुला काय वाटते ते पण सांग!" तो मुलगा म्हणतो, "गुरुजी, मला वाटत, त़ी म्हणाली असेल, मुलांना सांभाळा!" शिक्षक चकित होउन विचारतात, "तुला ही गोष्ट माहीत आहे का?" तो नकारार्थी मान हलवतो आणि म्हणतो," नाही गुरुजी, पण माझी आई वारली तेंव्हा शेवटच्या श्वासाला ती हेच म्हणाली होती!" "तुझे उत्तर बरोबर आहे!" शिक्षक हलकेच म्हणाले. बोट बुडाली. पतीने घरी जाउन, मुलीला एकट्यानेच लहानाचे मोठे केले. बऱ्याच वर्षानंतर, वार्धक्याने त्या पतीला जेंव्हा मरण आले तेंव्हा, त्याच्या पश्चात राहिलेले सामान आवरत असताना, त्याच्या मुलीला एक डायरी सापडते. त्यातून असे समजते की तीच्या आईला आधीच दुर्धर आजार झालेला असतो आणि ती त्यातून वाचणार नसते! त्या मुळे पतीला स्वत: जीवंत रहाण्याव्यतिरिक्त दूसरा पर्यायच नसतो! त्या डायरीत पतीने पुढे लिहिलेले असते, "तुझ्या शेजारीच जलसमाधी घ्यायची माझी किती इच्छा होती! पण आपल्या मुलीसाठी मला तुला त्या सागराच्या तळाशी एकटीलाच कायमसाठी सोडून याव लागल!" *तात्पर्यः* चांगल्या किंवा वाईट कृतीच्या पाठी, कधी कधी मोठी गुंतागुंत असते जी आपल्या सहज लक्षात येत नाही! त्यामुळे वरवर पाहून आपण कुणाहीबद्दल लगेच मत बनवून घेऊ नये. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
Super
ReplyDelete