✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 11/12/2018 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १८१६ - इंडियाना अमेरिकेचे १९वे राज्य झाले. 💥 जन्म :- १९६९ - विश्वनाथन आनंद, भारतीय बुद्धिबळ खेळाडू, ग्रँडमास्टर. १९०९ - नारायण गोविंद कालेलकर, भाषाशास्त्रज्ञ. १९२२ - दिलीपकुमार, हिंदी चित्रपट अभिनेता. 💥 मृत्यू :- १९८७ - जी.ए. तथा गुरुनाथ आबाजी कुलकर्णी, मराठी लेखक. १९९८ - राष्ट्रकवी प्रदीप, हिंदी कवी. २००४ - एम.एस. सुब्बुलक्ष्मी, गायिका आणि भारतरत्न, रेमन मॅगसेसे पुरस्कारविजेत्या. १९६३ - कोवलम माधव पणिक्कर, राजकारणी, इतिहासकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *पाच राज्यात झालेल्या निवडणुकांचे आज लागणार निकाल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *दिल्ली - लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *कोल्हापूर - शिक्षणाच्या वारीला कोल्हापूरच्या तपोवन भूमीत सुरुवात, शिक्षणमंत्र्यांनी साधला ऑनलाईन शिक्षकाशी संवाद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *आरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांचा राजीनामा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *गुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबई - राज्य सरकारने मेगाभरतीबाबत पुनर्विचार करावा, मराठा आरक्षण प्रश्नावरून हायकोर्टाची राज्य सरकारला सूचना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *ऍडलेड- भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पहिल्या मालिकेत भारतानं ऑस्ट्रेलियावर ३१ धावांनी मिळविला विजय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रदूषण एक समस्या* https://nasayeotikar.blogspot.com/2018/12/blog-post_10.html वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9523625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कवी प्रदीप* कवी प्रदीप यांचे खरे नाव रामचंद्र द्विवेदीं. त्यांचा जन्म ६ फेब्रुवारी १९१५ रोजी झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिमांशु राय आणि देविका रानी यांच्या बाँबे टॉकीजची सूत्रे शशधर मुखर्जींच्या हातात गेली. शशधर मुखर्जी हे प्रतिभा पारखण्यात उस्ताद होते. त्यांनी कवी प्रदीपांना आमंत्रित करून त्यांच्याकडून किस्मत, कंगन, बंधन, झूला आदी चित्रपटांची गीते लिहवून घेतली. प्रदीप यांचे दूर हटो ये दुनियावाले, हिदुस्तान हमारा है हे किस्मत चित्रपटातले गीत तुफान गाजले. प्रदीप याच्या रचनांत देशभक्ती आणि देशवासीयांमधे जागृती निर्माण करण्याची तळमळ होती. त्यांच्या स्वदेशावरील प्रेमापोटी त्यांनी असंख्य देशभक्तिपर गीते आणि कविता रचल्या. त्या कविता वाचून अनेकजणांचे रक्त उसळत असे. कवी प्रदीप यांनी कबीर आणि गालिब यांचे साहित्य वाचले होते. तसेच शैलेंद्र आणि साहिर लुधियानवी यांच्या काव्याशी ते चांगले परिचित होते. भारत-चीन युद्धाच्या सुमारास २६ जानेवारी १९६३ रोजी लता मंगेशकरांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर गायलेल्या त्यांच्या ऐ मेरे वतन के लोगो या गीताने भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यांत पाणी आणले होते. दे दी हमें आज़ादी बिना खड्ग बिना ढाल’ ‘आओ बच्चों तुम्हें दिखाएं झांकी हिन्दोस्तान की’ असे प्रसिद्ध गाणे त्यांच्या नावावर आहेत. १७०० गाणी लिहिणाऱ्या कवी प्रदीप यांना भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार गौरव केला. कवी प्रदीप यांचे ११ डिसेंबर १९९८ रोजी निधन झाले *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) हंगेरीमध्ये कोणती शासनपद्धती अस्तित्वात आहे ?* प्रजासत्ताक शासन पद्धती *२) 'बिटवीन द लाइन्स'चे लेखक कोण ?* कुलदीप नय्यर *३) संयुक्त संस्थानातील आकाराने मोठे आणि उष्ण पाण्याचे झरे असणारे राष्ट्रीय उद्यान कोणते ?* येलोस्टोन पार्क *४) बेरजेच्या मशिनचा शोध कोणी लावला ?* ब्लेस पास्कल *५) इस्टर्न टाईम्स हे वृत्तपत्र कोणत्या भाषेत प्रकाशित होते ?* इंग्रजी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● इलियास शेख ● प्रिया बुडे ● प्रा. नितीन दारमोड ● दस्तगीर सय्यद ● लल्लू खान ● दीपक पाठक ● आदर्श मडावी ● आकाश सोनटक्के ● विशाल स्वामी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *तत्त्व* क्षणिक सुखासाठी माणूस स्वतः ला विसरत आहे शुल्लक बाबींसाठी तोल घसरत आहे क्षणिक सुखा पेक्षा नैतिकतेला महत्त्व असते नैतिकता ढळू नये हे खरे तत्त्व असते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शांतता खूप बोलते. आधी कानांचा ताबा घेते, मग मनाचा. सर्व काही 'शांत' असते तेव्हा खूप काही 'आवाज' मूकपणे आपल्याभोवती फिरतात. शांततेत समुद्राची गाज हितगुज करते, माडामाडातून फोफावणारा वारा संवाद साधतो. शांततेत कधी आत्ममग्नतेची समाधी लागते तर कधी उत्तुंग विचारांच्या लाटांची भरती येते. दुपारच्या शांततेत घामाचे नितळ थेंब ओथंबलेले असतात तर संध्याकाळच्या कातरवेळच्या शांततेत एकाकीपणाची हुरहुर आठवणींचा कानोसा घेते. मध्यरात्रीच्या शांततेतून कधी असंख्य दुष्ट-सुष्ट विचारांची संगत पंगतीने बसते, तर कधी आयुष्याच्या उजळणीचे पाढे अंधारातून संततधारेसारखे प्रकटतात.* *शांतता सर्वत्र व्यापून आहे, तरीही तिचा शोध घ्यावा लागतो. शहरातली दुर्मिळ शांतता एखाद्या खेड्यात मुबलक सापडेल. शहरात गर्दीचा आवाजच कधी कधी शांततेची हौस पुरवतो. शांततेची ओळखही कान विसरतात. गर्दीतला आवाज सहज होता येते, मात्र शांततेत मूकपणे सहभागी व्हावं लागते. पण माणूस शांततेत सहभागी होण्याऐवजी तो ती भंग करण्यात धन्यता मानतो. एखाद्या शांत देवळात प्रथम घंटा वाजते. आपले अस्तित्व तो असे जाणवून देतो. क्वचित काही मंदिरात शांतता उदबत्तीच्या अस्तित्वात धीराने उभी असते. तिथे जिज्ञासू भक्तांचा मेळावा शांततेचा विलक्षण शोध घेत असतो. हीच शांतता काही चर्च व मशीदीतही सापडते, तेव्हा तिथे 'ईश्वरचा' अंश मुक्तपणे वावरत असतो.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ☀☀☀☀☀☀☀☀☀ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• हरिजन गांठ ना बान्धिये उदर समाना लेय आगे पीछे हरि खरे जो मांगे सो देय । सारांश महात्मा कबीर ईश्वरीय अंशाचे खरे गुण वैशिष्ट्ये सांगतांमा म्हणतात की,'ईश्वरीय अंश असणारे किवा ईश्वराची लेकरं हा विशाल निसर्ग. त्याची विलोभणीय सुंदर रुपं याना ओरबाडत नाहीत. विकास किवा भरभराटीच्या नावाखाली निसर्गाचे , पर्यावरणाचे विद्रुपीकरण करीत नाहीत. जुन्यातलं पूर्वीचं जे पर्यावरण पूरक आहे ते नाहीसं करून नव्हे तर त्याला राखून नाविन्य स्वीकार कसा करता येईल ? याकडे लक्ष देतात. भक्कम अशी शेकडो वर्षापूर्वीची झाडे निसर्गातले डोंगर टेकड्या ही रूप नष्ट करीत विकासाच्या आडून स्वतःलाच तर फसवित नाहीत ना ! गावातले रस्ते बांधताना दर पाच दहा वर्षाला फुटाफुटाने उंची वाढवून रस्त्यावरचे पाणी घराघरात सोडले तर याला विकास म्हणायचा का? रस्ते चकचकीत करताना गावकर्यांनी घर कशी उंच करायची. या विचारानं मुळ घर सोडून दुसरीकडंच वस्ती करावी लागू नये! मानवामात्रा व वन्यजीवांना ही जमीन व मोकळ आकाश कायम सुरक्षित लाभेल याची हमी देणारा विकासक लाभला पाहिजे. महागड्या उंची वस्तू वापरध्याचा मोह भाईबंधाना लुबाडून पूर्ण होता कामा नये? एकमेव मानव प्राणी वगळता कोणताही प्राणी आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी संचय करून ठेवत नाही. निसर्गातून फक्त पोटापुरतंच ते घेत असतात. निसर्गाचं संतुलन बिघडू देत नाहीत. इकडं पाच दहा वर्ष नेतेगिरी, ठेकेदारी करणारा गचकतो. त्याच्या जाण्यानंतर मागचे आक्रोश करताना 'पुढच्या दहा पिढ्या बसून खाल्ल्या तरी सरणार नाही इतकंं साहेबानं कमावलं हो '! म्हणून दुःख करतात की जणतेला लुबाडल्याचं अभिमानानं सांगतात ! देव जाणे. मतदानावेळी आमिशाला बळी पडायचे अन असेच नेते आणि विकासक आपल्यावर लादून घ्यायचे की लोकाभिमूख, धडपड्या, चळवळीतला लोकांशी नाळ असणारा नेता निवडायचा हे किमान नशेपासून दूर राहून मतदारानं ठरविलंं पाहिजे. हा निसर्गच माझा आहे. मला उद्याच्या भूकेची चिंता करण्याची गरजच काय आहे? ही पशू-पक्षांची खरी विचार सरणीअसते. कारण त्यांचं जगणं वास्तव नैसर्गिक आहे. याउलट मांणूस वर्तन करतो व विषाद करीत बसतो. हे बदललं पाहिजे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जेव्हा आपली वेळ वाईट असते तेव्हा आपल्याकडे लोक पाठ फिरवतात आणि जेव्हा आपली वेळ चांगली असते तेव्हा सगळेच जवळ येतात. परिस्थिती कशीही असली तरी प्रत्येकवेळी सुखदुःखात जे आपल्या पाठीशी असतात आणि आपण प्रत्येकवेळी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता पाठीशी असतो तीच खरी माणुसकी असते आणि तीच खरी अंत:करणातून एकमेकांबद्दलची खरी आत्मियता असते. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शांती - Peace* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मनःशांती* अनेक महापुरुषांनी सांगितलेले उपाय करुन थकलेला एक तरुण विवेकानंदांजवळ आला नि म्हणाला, '' स्वामीजी तासन् तास बंद खोलीत बसून मी ध्यानधारणा करतो, परंतु मनाला शांती लाभत नाही.'' त्यावर स्वामीजी म्हणाले, '' सर्वात प्रथम खोलीचा दरवाजा उघडा ठेव. आपल्या जवळपास राहणार्या दुःखी, रोगी व भुकेल्या माणसांचा शोध घे. त्यांना यथाशक्ती मदत कर.'' यावर त्या तरुणाने त्यांना, '' एखाद्या रोग्यासी सेवा करताना मीज आजारी पडलो तर ?'' असा प्रश्न विचारला. विवेकानंद म्हणाले, '' तुझ्या या शंकेमुळे मला असे वाटते की, प्रत्येक चांगल्या कार्यात तुला काहीतरी वाईट दिसते. म्हणूनच तुला शांती लाभत नाही. शुभकार्याला उशीर लावू नये तसेच त्यातील उणिवाही शोधू नयेत. हाच मनःशांती मिळविण्याचा जवळचा मार्ग आहे.'' *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment