✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 20/12/2018 वार - गुरूवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस* 💥 ठळक घडामोडी :- १९७१: झुल्फिकार अली भूट्टो हे पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष बनले. १९९४: राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महाथीर मोहम्मद यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा जवाहरलाल नेहरू पुरस्कार प्रदान. १९९९: पोर्तुगालने मकाऊ हे बेट चीनला परत दिले. २०१०: भाषेबाबत मूलगामी अभ्यास करून त्यावर विविधांगी लिखाणे करणारे ज्येष्ठ भाषावैज्ञानिक व समीक्षक अशोक केळकर यांना मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर. 💥 जन्म :- १८६८: फायरस्टोन टायर आणि रबर कंपनीचे संस्थापक हार्वे फायरस्टोन १८९०: नोबेल पारितोषिक विजेते झेक रसायनशास्त्रज्ञ जेरोस्लॉव्ह हेरॉव्हस्की १९०१: अमेरिकन पदार्थवैज्ञानिक रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ १९०९: भारतीय पत्रकार आणि राजकारणी वक्कम मजीद १९४०: पद्मश्री भरतनाट्यम व कथ्थक नर्तिका यामिनी कृष्णमूर्ती १९४२: पाकिस्तानातील पहिले हिंदू मुख्य न्यायाधीश राणा भगवानदास १९४५: भारतीय वकील शिवकांत तिवारी 💥 मृत्यू :- १९३३: संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक विष्णू वामन बापट १९५६: डेबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ संत गाडगे महाराज १९७१: द वॉल्ट डिस्ने कंपनीचे सहसंस्थापक रॉय ओ. डिस्ने १९९३: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार वामन नारायण तथा डब्ल्यू. एन. भट १९९६: बलुतं कार दलित लेखक दगडू मारुती तथा दया पवार *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली - राज्यपाल राजवटीचा कालावधी संपल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती शासन लागू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवीन ब्रिटनमधील पपुआ न्यू जेनिया येथे भूकंपाचा धक्का, 5.7 रिश्टल स्केलची नोंद, पालघरमध्ये ही भूकंपाचा धक्का* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मुंबई - मराठा आरक्षणाबाबतची सुनावणी मुंबई उच्च न्याालयाने २३ जानेवारीपर्यंत केली स्थगित* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *श्रीहरीकोटा: इस्रोकडून 'जीसॅट ७ ए' उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई- मेगा भरतीबाबत राज्य सरकारचं न्यायालयात प्रतिज्ञापत्र, '23 जानेवारीपर्यंत मेगा भरतीद्वारे नेमणूक नाही'* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात कालपासून सुरू झाली हेल्मेट सक्ती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *धुळ्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद, धुळ्यात तापमानाचा पारा 5 अंशांवर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= प्रतिलिपी डॉट कॉम वरील स्पर्धा गत आठवणीचा हिंदोळा मधील लघूकथा *लहानपण देगा देवा* वीस-पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या काळात कोणाच्या घरी लाइट नव्हते तर टीव्ही दुरची गोष्ट. रेडियो नावाची चालती बोलती वस्तू मात्र घरोघरी दिसून यायची. आकाशवाणी केंद्रचे अनेक चाहते होते. मात्र टीव्हीचे दिवाने अगणित होते. पण बघायला कुठे मिळायचे. ते दिवस आजही जशास तसे आठवते. टीव्ही वर दर रविवारी *रामायण* मालिका चालू झाली होती. गावात कुणाकडे ही टीव्ही नव्हती तेंव्हा तीन ........ वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील प्रतिलिपीच्या लिंक वर वाचन करावे आणि आपल्या मित्रांपर्यंत share करावे. https://marathi.pratilipi.com/na-sa-yevtikar-nasa/lahanpan •••••••••••••••••••••••••••••••••••••••••• ✍🏽 नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद 📱 9423625769 •••••••••••••••••••••••••••••••••••••••••• =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *संत गाडगेबाबा* गाडगे महाराज (फेब्रुवारी २३, १८७६ - २० डिसेंबरइ.स. १९५६) हे ईश्वर कशात आहे नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते. त्यांचे मूळ नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असे होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवाकरणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्या हातात मडके असा त्यांचा वेश असे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= घटनांना विचारांचे स्वरुप देणे हे वाङमयाचे कार्य आहे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* ========ஜ۩۞۩ஜ========= *१) जैव दहशतवादाला तोंड देण्यासाठी केंद्र सरकार कोणत्या प्रयोगशाळांचे जाळे वाढवणार आहे ?* विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळा *२) दक्षिण चीनमध्ये ६२ सें.मी. लांबीचा जगातील सर्वात मोठा कीटक सापडला. त्याचे नाव काय ?* फ्रिगानिस्ट्रिया चायनेनसीस झाओ *३) नंद राजघराण्यातील शेवटचा राजा कोण ?* धनानंद *४) नकाशावरील अंतर कशाने मोजतात ?* ओपीसोमीटर *५) स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव काय ?* नरेंद्रनाथ दत्त *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 शंकर हासगुळे, सहशिक्षक, बिलोली 👤 पल्लवी टेकाळे, कुपटी, माहूर 👤 परमेश्वर नन्नवरे, सहशिक्षक, उस्मानाबाद 👤 विठ्ठल नरवाडे, सहशिक्षक, धर्माबाद 👤 गजानन मुडेले, देगलूर 👤 सोपान हेळंबे, उमरी 👤 डॉ. माधव कुद्रे, कंधार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *आश्वासन* आश्वासन म्हणजे पाण्यावरची रेघ आहे दुष्काळात पडलेली काळजाला भेग आहे काळजाची भेग मिटता मिटत नाही आश्वासन पूर्ण होईल मनाला पटत नाही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *मोबाइल, फेसबुकच्या आभासी जगाने एक नवी संस्कृती जन्माला घातली आहे.* *'मे-फ्लाय संस्कृती' तिचं नाव ! मे-फ्लाय ही उडत्या किड्यांची प्रजाती. मे-फ्लाय प्रवर्गातील एक किडा अल्पकालिक असतो म्हणे. त्याला तोंड वा पोट नसते. असते फक्त विलासी इंद्रिय अन् तसलेच मनही ! तो रक्तहीन असला तरी रतिप्रविण असतो म्हणे. त्याचे आयुष्य चोवीस तासांचेही असत नाही. तीन तासांचे तारूण्य घेऊन जन्माला येणारा तो किडा फक्त पुनरूत्पादनासाठीच जन्मतो. संभोग झाला की मरतो. एकदम 'सर्जिकल स्ट्राइक'च म्हणाना. त्यात शृंगारक्रिया असत नाही. जीवनास्वाद नसतो. असते ओरबाडणे, भोगणे,मरणे नि मारणे..जगणे नसतेच.* *माणूस 'मे-फ्लाय' होणे हे आभासी, चंगळवादी, भोगवादी जीवनशैलीचे अपत्य होय. तुम्ही ठरवायचे की, तुम्हाला ATM जन्माला घालायचे आहे की माणूस! माणूस जन्माला घालायचा असेल, घडवायचा असेल तर जरा हवा येऊ द्या. घरी माणसे, पै-पाहुणे आले पाहिजेत. तुम्हींही इतरांच्या घरी जात येत रहा. गतीमान जीवनात उसंत शोधा. उसंत स्वत:साठी वापरू नका. निवांत म्हणजे स्मशान! आयुष्यात पाण्याचा खळखळाट ऐका. नुसते आभासी संदेशन, प्रक्रिया, प्रतिसादांनी मिळणारे सुख, समाधान, शांती हीसुद्धा आभासी असते. स्वत:पलीकडचे जग उघड्या डोळ्यांनी पहा. मुलांचे एकारलेपण उन्हाळी शिबिरांसाठी केवळ पैसे भरून निघणार नाही. त्यासाठी त्यांना वेळ द्या. दिले की संपले, असे पालकपण कारखान्याच्या मालकासारखे असते. आव्हानांना सामोरे जाणारे जीवन प्रत्यक्ष जगा नि पाल्यांना जगू द्या...* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= एखाद्यावेळी माणसाच्या हातून झालेली एखादी चूक कळत नकळत झाली असे समजावे.ती चूक जर दुस-यावेळी झाली तर समजावे की, दुर्लक्ष केल्यामुळे झाली आहे . तिस-यावेळी तीच चूक झाली तर असे समजावे की,तुमचे त्या कामात लक्ष नसल्यामुळे झाली आहे आणि पुन्हा पुन्हा जर तीच चूक झाली तर असे समजावे की,आपण इतरांपेक्षा जास्त चूका करण्याचा जणू संकल्प केला आहे आणि त्यातही तुम्ही महामूर्ख आहात हे सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. मग तुम्हीच विचार करा. तुम्हाला तुमच्या जीवनात चूका करायच्या की चूका टाळायच्या ? *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 कबीराचे बोल 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= ताको लक्षण को कहै, जाको अनुभव ज्ञान साध असाध ना देखिये, क्यों करि करुन बखान। सारांश ज्याच्याकडे अनुभवातून प्राप्त झालेलं ज्ञान आहे. त्याच्या लक्षणांच्या बाबतीत काही सांगावयाची आवश्यकता नसते. तो सज्जन दुर्जन असा भेद करीत नाही. सर्वांकडे समदृष्टीने पाहात असतो. अनुभवाच्या बळावर त्याने स्थितप्रज्ञता धारण केलेली असते. विश्वातल्या प्रत्येक घटनेकडे अनुभवी तटस्थपणे पाहात असतो. त्याच्या स्थिर वृत्ती ठामपणे वास्तवाकडे नेतात. वेळ ही वेळंच असते. ती बरी वाईट असण्याचं काही कारणंच नाही. मात्र अस्थिर वृत्ती शुभाशुभ असा वेळेबाबतीतही भेद करतात. सकाळ होणं हा नैसर्गिक घटनाक्रम आहे. ती बरी वाईट असणे ह्या अस्थिर मनाच्या धारणा असतात. सुप्रभात , मंगल प्रभात, शुभ सकाळ, शिव सकाळ, भिम सकाळ हे तर मनाचे खेळ असतात. मन वास्तवाबाबत तटस्थ नसतं, मात्र सकाळ ही सकाळंच असते, हे फक्त अनुभवीच सांगतो. चंद्र आपल्या शितल चांदण्याचा वर्षाव सर्वांवर करीत असतो. सद्गृहस्थ रस्त्याने चाललाय म्हणून त्याच्यावर प्रखर प्रकाश टाकणे आणि चोर चाललाय म्हणून कमी प्रकाश टाकणे असा चंद्राजवळही भेदभाव नसतो. झाडाकडेही समदृष्टी असते. झाडही त्याला खतपाणी पुरवणार्याला जशी शितल छाया देत तशीच छाया त्याच्यावर कुर्हाड चालवायला येणार्यावरही धहतं. त्याप्रमाणे खर्या संताकडे आप-पर असा भेदभाव नसतोच. हे संत प्रभावात कळतं. -एकनाथ डुमणे मुखेड =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *स्वरचिन्ह परिचय* पाच सहा अक्षरे शिकवुन झाली की एका स्वरचिन्हाचा परिचय करुन देणे. स्वरचिन्हे खुणा आहेत उकार न शिकवता उ आणि ऊ उच्चार लक्षात रहाणे महत्वाचे आहे. मुलांना येणार्या अक्षरास स्वरचिन्ह जोडुन होणारा उच्चार करण्याचा सराव घेणे. अक्षर परिचय चालु असताना टप्प्याने सर्व स्वरचिन्ह परिचय करुन द्यावा. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *सावधगिरी* पूर्वी एकदा लांडगे व बोकड यांची फार दिवस लढाई चालली होती. वास्तविक पाहता लांडग्यांनी पहिल्याच दिवशी पराभव करून त्यांचा फन्ना उडविला असता, परंतु बोकडांच्या बाजूस जे कुत्रे होते त्यांच्यापुढे त्यांचे काही चालेना. शेवटी तहाची वाटाघाट होऊन उभयपक्षी असे ठरले की, लांडग्यांनी आपली पोरे बोकडांच्या स्वाधीन करावी व बोकडांनी आपले कुत्रे लांडग्यांच्य ताब्यात द्यावे. मग या अटी अमलात येताच बोकडांकडे गेलेल्या लांडग्यांच्या पोरांनी आपल्या आयांसाठी आरडाओरडा केला. तो ऐकताच लांडगे धावून आले आणि बोकडांस म्हणाले, 'दुष्टांनो, आमच्या पोरांना मारून तुम्ही तह मोडला, तेव्हा लढाईला तयार व्हा.' इतके बोलून ते बोकडांवर तुटून पडले व बोकडांजवळ कुत्रे नसल्यामुळे ते सगळे सहज मारले गेले. तात्पर्य :- शत्रूशी सख्य करताना ज्या वस्तूवर आपली सुरक्षितता अवलंबून असेल अशा वस्तू त्यांना कधीही देऊ नयेत. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment