✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 15/12/2018 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आंतरराष्ट्रीय चहा दिन* 💥 ठळक घडामोडी :- १९९४ - नेटस्केप नॅव्हिगेटरची १.० आवृत्ति प्रकाशित. 💥 जन्म :- १९७६ - बैचुंग भुतिया, भारतीय फुटबॉलपटू. 💥 मृत्यू :- १०२५ - बेसिल दुसरा, बायझेन्टाईन सम्राट. १०७२ - आल्प अर्स्लान, तुर्कीचा राजा, पर्शिया (ईराण) मध्ये. १२६३ - हाकोन चौथा, नॉर्वेचा राजा. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *राफेलमध्ये घोटाळा नसल्याची सुप्रीम कोर्टाची 'क्लीन चिट', मोदी सरकारला मोठा दिलासा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली- राफेल करारावरून सभागृहात गोंधळ झाल्यानं लोकसभा 17 डिसेंबरपर्यंत तहकूब* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *भोपाळ- मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून कमलनाथ 17 डिसेंबरला लाल परेड मैदानावर घेणार शपथ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *राज्यातील सर्वात कमी तापमान जळगावमध्ये (१० अंश सेल्सिअस) नोंदविण्यात आले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नवी दिल्ली : साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार प्रसिद्ध इंग्रजी लेखक अमिताभ घोष यांना जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी अशोक गेहलोत तर उपमुख्यमंत्रीपदी सचिन पायलट यांची निवड.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत वि. ऑस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटी सामन्यात, ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकली, पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://b.sharechat.com/acZsiGYGES Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सन 1998 मध्ये प्रचंड गाजलेली पुस्तिका खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *चंदर - किशोर कादंबरी* खालील ब्लॉगवर *भाग चौथा* वाचन करता येईल. https://www.blogger.com/blogger.g?blogID=5645795248580674337#editor/target=post;postID=52510233279047699;onPublishedMenu=overviewstats;onClosedMenu=overviewstats;postNum=0;src=postname वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक *अरुण वि. देशपांडे, परभणी/पुणे* 9850177342 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अमिताभ घोष* अमिताभ घोष यांची इंग्रजी साहित्यातील नामवंत लेखकांमध्ये गणना होते. ११ जुलै १९५६ मध्ये कोलकाता येथे जन्मलेल्या घोष यांचे महाविद्यालयीन शिक्षण दिल्लीत झाले. दिल्ली विश्वविद्यालयाचे सेंट स्टीफन कॉलेज आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून उच्चशिक्षण घेतल्यानंतर 'द सर्कल ऑफ रीजन' ही पहिली कादंबरी त्यांनी लिहिली. या कादंबरीला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर बघता बघता घोष यांनी साहित्यक्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला. घोष यांच्या 'शॅडो लाइन्स' या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यानंतर साहित्य क्षेत्रातील भरीव योगदानासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेले आहे. साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार प्रसिद्ध इंग्रजी लेखक अमिताभ घोष यांना जाहीर झाला आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका; त्याच हाताने कष्ट करा व स्वत:चे भविष्य घडवा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) हैद्राबाद स्टेट काँग्रेसचे स्थापना वर्ष कोणत ?* १९३८ *२) भारताचे राष्ट्रपती म्हणून डॉ. झाकीर हुसेन यांचा कार्यकाल कोणता ?* १३ मे १९६७ ते ३ मे १९६९ *३) भारतातील सर्वात जुना, जास्त कालमानाचा पर्वत कोणता ?* अरवली *४) हेल्मंड, अबू, दर्या, काबूल या नद्या कोणत्या देशात वाहतात ?* अफगाणिस्तान *५) कोस्टारीका या देशात कोणती शासन पद्धती अनुसरली जाते ?* अध्यक्षीय प्रजासत्ताक पद्धती *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● साईनाथ सायबलू ● बालाजी सुंकेवार ● श्रीधर काटेगर ● सुशील केकान ● रामकृष्ण लोखंडे ● शिवाजी रामदिनवार ● शुभ मलिक ● गुरुदास भागानगरे ● अनिल जाधव शिरपूरकर ● दीपक चावरे ● योगेश पाटील ● ऋषीकेश गरड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••• *झाडं* झाडं व्हायला बी ला गाडून घ्यावं लागतं प्रेम मिळवायचं तर मग प्रेम द्यावं लागतं गाडून घेतल्या शिवाय बीचं झाडं होत नसतं आपण दिल्याशिवाय कोणी प्रेम देत नसतं शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कुटुंब संस्थेचा मध्यवर्ती केंद्रबिंदू म्हणजे घर. घराचे आकर्षण फक्त मानवालाच असते असे नाही, तर पहाटेपूर्वी आकाशात भरारी घेतलेले पक्षी, माळरानावर चरण्यासाठी गेलेली जनावरे सायंकाळी आपल्या घराकडे वळतात. घर हे माणसांइतकेच पशुपक्षी, जनावरांना हक्काचा निवारा वाटते. पूर्वीची घरे एकत्र कुटुंबपद्धतीला सामावून घेणारी होती. दोन-तीन पिढ्यांचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र रहायचे. लहान मुला-मुलींच्या किलबिलाटाने घराचे गोकुळ होऊन जात असे. घराच्या भिंती फक्त दगड मातीच्या नव्हत्या, तर त्या प्रेम, जिव्हाळ्याने रसरसलेल्या होत्या. नातेसंबंध नुसते नातेसंबंध नव्हते, तर नात्यात मायेची ऊब होती.* *आज वृद्धांच्या समस्या 'आ' वासून उभ्या आहेत. मुलं परमुलखात गेल्यामुळे एकाकी पडलेली वृद्ध मंडळी एका बाजूला दिसतात, तर दुसरीकडे घरात मुलं, सुना, नातवंडे असूनही अवहेलनेने भरलेले एकाकीपण जगणारी वृद्ध मंडळी दिसत आहेत. समृद्ध संसारातील एक अडगळ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातंय. मुला-लेकरांच्या सुखासाठी तुफान होऊन झगडलेल्या माता पित्यांना 'थकलेल्या तुफानाला कुणी घर देता का घर...?' असं म्हणत भटकायची वेळ येते. अशी अनेक झुंजलेली तुफानवादळे रस्त्याकडेला, पुलाखाली, किंवा वृध्दाश्रमात नशिबाला दोष देत कण्हत पडलेली दिसतात.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जहाँ न जाको गुन लहै, तहाँ न ताको ठाँव । धोबी बसके क्या करे, दीगम्बर के गाँव ॥ अर्थ : जिथे आपल्याला पात्रता व योग्यतेनुसार गुण व कौशल्य दाखवण्यासाठी कार्य कर्तृत्त्व करण्यास वावच नसेल तिथे राहून काय हशील होणार आहे ? तिथे राहाणे व्यर्थच आहे. ही बाब पटवून देताना महात्मा कबीर म्हणतात की, ज्या गावात सर्व दिगंबरच (कपडे विरहित लोक) राहातात तिथे राहून धोब्याला काय उपयोग होणार आहे ? कला ही जीवनाची सावली मानली जाते. 'कलेनेच माणसाची ओळख । एरव्ही कोण पुसतो आणिक ? तुम्ही आहात राव की रंक । आता कोणी पुसेना ।' असे राष्ट्रसंत तुकडोजी ग्रामगीतेत म्हणतात. कलावंतानं आपली कला जीवनाचा आधार केली व कलेचा अहंकार अंगी न बाळगता तिला विनयशीलतेची जोड दिली की सर्व जग आपलंस होवून जातं. आपलं कसब व कौशल्य अशा ठिकाणी दाखवायला हवं की ते आपल्या जीवनाला स्वावलंबनाकडे नेईल. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जेव्हा आपली वेळ वाईट असते तेव्हा आपल्याकडे लोक पाठ फिरवतात आणि जेव्हा आपली वेळ चांगली असते तेव्हा सगळेच जवळ येतात. परिस्थिती कशीही असली तरी प्रत्येकवेळी सुखदुःखात जे आपल्या पाठीशी असतात आणि आपण प्रत्येकवेळी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता पाठीशी असतो तीच खरी माणुसकी असते आणि तीच खरी अंत:करणातून एकमेकांबद्दलची खरी आत्मियता असते. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 मूल घडवताना.......... 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मुलांचा व्यक्तीमत्त्व विकास करणे म्हणजे त्यांचे अंतरंग विकसित करणे होय. विकासासाठी मुलांमध्ये प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा, नम्रता यांसारख्या नैतिक मूल्यांची ओळख होणे, एवढा एकच उद्देश नसून त्याचे संवर्धन होणेही महत्त्वाचे आहे. खरेतर आपली संस्कृती एवढी महान आहे की, त्यातील विविध गोष्टी, राष्ट्रपुरुषांची उदाहरणे, धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे केले जाणारे आचरण यांप्रमाणे कृती केली आणि ते गुण आपल्यात आणण्याचा प्रयत्न केला, तरी खऱ्या अर्थाने व्यक्तीमत्त्व विकसीत होईल. गुंडेवार मा स जि.प.प्रा.शा गोंडेमहागाव ता. किनवट. जि नांदेड़ 9623124594 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• बाल कथा *अनमोल क्षण* प्रसिध्द लेखक कै. वि. स. खांडेकरांकडे अलोट गर्दी जमली होती. लोक हार घेऊन अभिनंदनासाठी तिष्ठत उभे होते. कॅमेरे सरसावुन फोटोग्राफर धावपळ करत होते. खांडेकरांना साहित्य ऍकेडमीचे पारितोषिक मिळाले तेव्हांचा प्रसंग. एका पत्रकाराने विचारले, 'आपल्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण कोणता ?' खांडेकरांनी दोन क्षण डोळे मिटले. प्रसंग त्यांच्या डोळयासमोर दिसु लागला. ते म्हणाले, 'आज सकाळीच एका अपरिचिताने येऊन माझ्या गळयात हार घातला. माझ्या पायावर डोकं ठेवलं मी विचारलं, 'कोण आपण? मी ओळखलं नाही'. 'साहेब, आज मी आहे तो आपल्यामुळेच. फार फार वार्षापुर्वी मी एका तळयाच्या शेजारून फिरत असता अचानक तोल जाऊन मी पाण्यात पडलो. मला पोहता येत नव्हतं, मी गटांगळया खाऊ लागलो. माझी ती अवस्था आपण पाहिलीत आणि ताबडतोब पाण्यात उडी घेतलीत. घाबरलेला मी गळयाला मिठी मारली. आपण जोरात हिसका देऊन मिठी सोडवलीत व ओढतच मला पाण्याबाहेर काढलंत. कुठलीही ओळख न देता उपकाराची भावना प्रगट न करता आपण निघून गेलात. मागून मला कळले मला वाचवणारे सुप्रसिध्द लेखक खांडेकर होते. तेव्हांपासुन आपल्याकडे यायचे होते तो योग आज आला'. खांडेकर म्हणाले, 'कोणालातरी जगायला आपण मदत करू शकतो ही गोष्ट माझ्या दृष्टीने फार मोठी आहे. तोच क्षण माझ्या जीवनातला अनमोल क्षण होय'. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment