✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 26/04/2018 वार - गुरूवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९६२: रेंजर-४ हे नासाचे यान चंद्रावर कोसळले. १९७३: अजित नाथ रे भारताचे १४ वे सरन्यायाधीश झाले. 💥 जन्म :- ५७०: इस्लाम धर्माचे संस्थापक मुहम्मद पैगंबर. (अनिश्चित) १४७९: पुष्टिमार्गाचे संस्थापक वल्लभाचार्य १५६४: इंग्लिश नाटककार आणि अभिनेता विल्यम शेक्सपिअर 💥 मृत्यू :- १९२०: थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन १९७६: साहित्यिक चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ आरती प्रभू १९८७: शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार शंकरसिंग रघुवंशी *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *राज्यातील आठ तालुक्यांत दुष्काळ जाहीर, यामध्ये यवतमाळ, जळगाव आणि वाशिम जिल्ह्यातील तालुक्यांचा समावेश.* ----------------------------------------------------- 2⃣ *विद्यापीठ अनुदान आयोगाने भारतातील २४ बोगस विद्यापीठांची नावे केली जाहीर, त्यात महाराष्ट्रातील एका विद्यापीठाचा समावेश* ----------------------------------------------------- 3⃣ *आसाराम बापूसह तीन आरोपींना जोधपूर कारागृह विशेष कोर्टाने ठरवलं दोषी. कोर्टानंं सुनावली जन्मठेपेची शिक्षा* ----------------------------------------------------- 4⃣ *नवी दिल्ली - भारताने जागतिक बँकेसोबतच्या 125 दशलक्ष डॉलरच्या कर्ज करारावर केली स्वाक्षरी.* ----------------------------------------------------- 5⃣ *बीसीसीआयकडून स्मृती मानधाना आणि शिखर धवनची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस.* ----------------------------------------------------- 6⃣ *आयपीएल 2018: गौतम गंभीरनं सोडलं दिल्ली डेअरडेव्हिल्सचं कर्णधारपद ; श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद* ----------------------------------------------------- 7⃣ *महिला क्रिकेट विश्वचषक 2019 : 30 मेपासून स्पर्धेला सुरुवात, इंग्लंड आणि द. आफ्रिकेत पहिला सामना* ----------------------------------------------------- *आजची विशेष बातमी - ग्रामीण बँक कर्मचाऱ्यांना 3 महिन्याच्या आत पेंशन योजना लागू करावी, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *साहित्यसेवा हेच खरे साहित्यिकांचे काम* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_76.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *नांदेड* नांदेड जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील दक्षिण-पूर्वेस व आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्याच्या सीमेलगत आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा भागात असलेल्या नांदेड जिल्ह्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. नांदेडात शीखांचे शेवटचे गुरु गोविंदसिंहजी महाराज यांचा गुरुद्वारा आहे. नांदेड संतकवी विष्णूपंत व रघुनाथ आणि वामन पंडित यांचे जन्मस्थान आहे. नांदेड जिल्ह्यात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व श्री गुरुगोविंदसिंहजी अभियांत्रिकी व तांत्रिक महाविद्यालय या महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था आहेत. जिल्ह्यातील प्रमुख नद्या- गोदावरी, मांजरा, मान्याद व पैनगंगा. नांदेड हे नाव श्रीशंकराच्या नंदी या वाहनाच्या नावावरुन उगम पावले असल्याचे सांगण्यात येते. जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- श्री गुरुगोविंदसिंह यांचा गुरुद्वारा, माहुरची रेणुकादेवी (शक्तिपीठ), बिलोली येथे मशिद, कंधारचा भुईकोट किल्ला, लोहा तालुक्यातील माळेगाव यात्रा, सहस्रकुंडचा धबधबा किनवट तालुका, देगलूर तालुक्यातील सिद्धेश्वर मंदीर (होट्ट्ल), नांदेडचा किल्ला व मुखेड येथील वीरभद्र शिवमंदिर प्रसिद्ध आहेत. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= ‘स्वतचा अहंकार चेपणे व दुसऱ्याचा अहंकार जपणे’ ही आहे सुखी व यशस्वी जीवनाची गुरूकिल्ली.’ *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) एकपेशीय कवकांना काय म्हणतात ?* 👉 किण्व *२) एल. पी. जी. (LPG) मध्ये कोणते घटक असतात ?* 👉 ब्युटेन आणि आयसोब्युटेन *३) कोणत्या शहरात वायुगळतीमुळे लाखो लोक मृत्युमुखी पडले ?* 👉 भोपाळ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद प्राथमिक शिक्षक तथा स्तंभलेखक 👤 विद्या बायस ठाकूर, साहित्यिक 👤 प्रदीप खपाटे बन्नाळीकर 👤 महेश शिटोळे 👤 गणेश मोतेवार, धर्माबाद 👤 रवी पांचाळ *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *दिसत ते* वरवर दिसत ते सारं खरं नसतं खोलात जाण्या पेक्षा वरवर बरं असतं जास्त खोलात गेलं की नको ते सारं कळतं आपुलकी आपलेपण सारं खुप दूर पळतं शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'यश' नेमकं काय? असं विचारल्यावर प्रत्येकाचं उत्तर वेगळं असतं. मुलांनी परीक्षेत चांगले मार्कस् मिळवणं? त्याला ‘योग्य’ तो मार्ग मिळणं, चांगली नोकरी मिळणं, भरपूर पैसे-प्रतिष्टा कमविणे? घर-गाडी मिळविणे.* *९५% मिळवून देखील आत्महत्या/नैराश्य असतेच. प्रतिष्टा-पैसा असूनही तुरुंगवास, वाद-विवाद... मग स्वतःला यशस्वी समजून देखील सुखी का नाही? असो... !* *कृष्णमूर्ती, रविंद्रनाथ टागोर याचं कधीही शाळेशी जमलं नाही. महात्मा गांधींना ३८%- ४०% गुण मिळत, तरीदेखील ही माणसं जगद्गुरू झाली. मुलं परीक्षा देऊन, गुणवत्ता दाखवून कधीच हुशार होत नाहीत किंवा यशस्वी होत नाहीत. जेव्हा शिक्षण संपतं आणि जगणं सुरु होत, तेव्हाच अनुभवाचं शिक्षण चालू होतं. worldclass होण्यासाठी अनुभवाचं शिक्षण आवश्यक आहे. त्यासाठी स्वप्रतिमा प्रबळ असावी लागते. आनंदी, समाधानी आणि जगावर प्रेम करणारी माणसंच "Worldclass Personality" म्हणून ओळखली जातात.* 🍀 *॥ रामकृष्णहरी ॥* 🍀 ⭐⭐⭐⭐⭐⭐ *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= कलाकाराच्या जीवनात कितीही सुखदु:खाचे चढ उतार असलेतरी तो प्रेक्षकांना निखळ आनंद देतो.तो आपले दु:ख कधीच सांगत नाही.तो इतरांच्या जीवनात असलेले थोडेबहुत दु:ख आपल्या कलेच्या माध्यमातून दूर करण्याचे काम करतो.ही देखील एक सेवाच आहे. आपणही त्याचपद्धतीने आपापल्या परीने इतरांच्या जीवनातले दु:ख काही प्रमाणात दूर करण्याचा प्रयत्न केल्यासआपल्यालाही आत्मिक समाधान मिळते. काही तरी आपल्या जीवनात एक चांगले काम केल्याचे समाधान वाटेल.आपणही आपल्या जीवनाचे कलाकार आहोत.फक्त कोणती कला कुठे आणि कशी उपयोगात आणावी यांचे ज्ञान असणे महत्त्वाचे आहे.आपले दु:ख सांगण्यापेक्षा इतरांचे दु:ख दूर करण्यासाठी प्रयत्न करावे.ही देखील एक सेवाच आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 म्हणी व त्याचा अर्थ 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उधारीचे पोते सव्वाहात रिते* - उधारी घेतलेल्या गोष्टीत तोटा ठरलेलाच असतो. *संकलक : छाया तूकारामसिंह बैस* सहशिक्षिका प्रा. शा. बाचोटी कॅम्प भोकर =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *मिळकतीचे व्यवस्थापन* एकदा धर्मपुर नगराचा राजा सोमसेन शिकारीवरून परतत असताना काही कारणाने आपल्या सर्व साथीदारापासून रस्ता चुकला आणि वेगळ्याच रस्त्याला लागला. जंगलातून रस्ता काढत काढत तो नगराच्या दिशेने वाटचाल करू लागला. रस्त्याने चालत असताना त्याला एक माणूस खांद्यावर कु-हाड घेवून व तोंडाने बासरी वाजवत चाललेला दिसून आला. तो माणूस हि नगराच्या दिशेने चाललेला होता तेंव्हा राजाने त्याच्यासोबत जाण्याचे ठरविले. दोघांनी एकमेकांशी संभाषण सुरु केले. राजाने त्या माणसाला विचारले,"तू कोण आहे?, तुझा व्यवसाय काय? आणि तू जे काही मिळवतो त्यात तू खुश आहे आहे काय?" त्या माणसाने उत्तर दिले,"महाराज! मी एक लाकुडतोड्या असून लाकडे तोडण्याचे काम करतो. रोज मला चार रुपये मिळतात. त्यापैकी पहिला रुपया मी पाण्यात टाकून देतो, दुसरा रुपया मी कर्ज चुकविण्यासाठी वापरतो, तिसरा रुपया मी उधार देण्यासाठी उपयोग करतो तर चौथा रुपया मी जमिनीत गाडून टाकतो." या म्हणण्याचा अर्थ राजाला काही समजण्याच्या आतच राजाचे सैनिक शोधत तेथे आले व राजा त्यांच्यासोबत निघून गेला. राजाला त्या लाकुडतोड्याचे म्हणणे शांत बसू देईना, त्याने भर दरबारात हा प्रश्न उपस्थित केला,"तो लाकुडतोड्या जे चार रुपये खर्च करतो, ते कसे ते मला सांगा?" कोणालाच या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. मग राजाने निर्णय घेतला कि त्या लाकुडतोड्याला दरबारात बोलवायचे. राजाने तसा आदेश दिला व दुसऱ्या दिवशी लाकुडतोड्याला घेवून सैनिक हजर झाले. लाकुडतोड्या आलेला दिसताच राजा सोमसेन त्याला म्हणाला,"तुझ्या धनाचे तू जे व्यवस्थापन करतो ते कसे ते मला सांग? मला काल काहीच कळले नाही." लाकुडतोड्या हसून म्हणाला, "महाराज! पहिला रुपया मी पाण्यात टाकून देतो म्हणजे मी माझ्या परिवाराचे पोषण करतो., दुसरा रुपया मी कर्ज चुकविण्यासाठी वापरतो म्हणजे म्हाताऱ्या आईवडिलांच्यासाठी खर्च करतो., तिसरा रुपया मी उधार देण्यासाठी उपयोग करतो म्हणजे म्हणजे मी माझ्या मुलांच्या शिक्षणावर खर्च करतो जेणे करून ते शिकून माझ्या म्हातारपणी मला सांभाळतील.तर चौथा रुपया मी जमिनीत गाडून टाकतो म्हणजे धर्म, दक्षिणा, दान यात खर्च करतो म्हणजे जेंव्हा मी मरेन त्याचे पुण्य मला मिळेल." राजाने हे उत्तर ऐकताच आनंदित होवून लाकुडतोड्याचा मोठा सन्मान केला आणि मोठे इनाम देवून त्याला त्याच्या घरी पाठविले. *तात्पर्यः आपण कमविलेल्या मिळकतीचा उपयोग कसा करावा त्या पैशाचे व्यवस्थापन कसे करावे जेणेकरुन सर्वांना लाभदायक होईल.* 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment